Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मिश्र डाळींची भजी

स
स्वाती दिनेश
Tue, 11/22/2016 - 14:18
मुसळधार पावसात किवा बाहेर स्नो फॉल होत असताना गरम गरम भजी म्हणजे क्या कहने? तर पेश आहेत ही मिश्र डाळींची भजी.. मूग डाळ, हरबरा डाळ आणि उडीद डाळ एकेक वाटी असे समप्रमाणात घ्या. त्या एकत्रच भिजत घाला. ७ ते ८ तास भिजवा. म्हणजेच संध्याकाळी भजी हवी असतील तर सकाळी डाळी भिजवा. दुपारच्या जेवणात किवा ब्रंचला हवी असली तर रात्री डाळी भिजत घाला. वाटताना त्यात दोन तीन मिरच्या, लसणीच्या २-३ पाकळ्या आणि आल्याचा लहानसा तुकडा घाला. मिरच्यांचे प्रमाण आपापल्या तिखट पणाच्या आणि मिरच्यांच्या आवडीनुसार ठरवा. मी दोन मिरच्या घेतल्या. कमीत कमी पाणी घालून वाटा. ह्या वाटणात एक लहान कांदा बारीक चिरून घाला. कोथिंबिर चिरून घाला आणि चवीनुसार मीठ घाला. तेल तापत ठेवा. तापलेल्या तेलाचे चमचाभर मोहन त्यात घाला. मध्यम आचेवर भजी तळा. आल्याच्या गरम चहाचे घुटके घेत, बाहेरचा पाऊस किवा स्नो बघत ही भजी खा, :) किवा १८० अंशावर ए फ्रा ५ मिनिटे प्रि हिट करा. बेकिंगपेपरचे छोटे तुकडे करा व त्यावर सांडगे घालतो तशी भजी घाला व ए फ्रा मध्ये ठेवा. ४ मिनिटानंतर बाजू पालटून बेकिंग पेपर काढून टाका, तेलाचा हात लावा व परत ५ मिनिटे ए फ्रा करा. कचोर्‍यांप्रमाणेच मुद्दाम दोन्ही पध्दतीने भजी करून पाहिली. नेहमी तळतो तशी भजी तर मस्त लागतातच पण ए फ्रा मधली भजीही तितकीच टेस्टी झाली होती. दोन्ही फोटो देते आहे. तेलात तळलेली भजी . ए फ्रा मधील भजी .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9703 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Tue, 11/22/2016 - 14:21 नवीन
वाह! दोन्ही प्रकारे पदार्थ करून दाखवण्याची कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 11/22/2016 - 15:53 नवीन
वा ! सहीच , एअर फ्रायर मधले जास्त क्रिस्पी वाटत आहेत :)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 11/22/2016 - 15:56 नवीन
हे एअर फ्रायर प्रकरण घ्यावं लागणार असं वाटतंय. विश्वास बसत नाही इतकी क्लास दिसत आहेत ती भजी!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 11/22/2016 - 16:20 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/22/2016 - 17:03 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 11/22/2016 - 17:46 नवीन
आजच करून बघणार.
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 11/22/2016 - 21:15 नवीन
वा.. सारखीच दिसत आहेत दोन्ही फोटोंतली भजी. ए.फ्रा.मध्ये बाजू पलटल्यावर बेकिंग पेपर काढून का टाकायचा?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 11/22/2016 - 21:37 नवीन
बाजू पलटल्यावर भजी अर्धवट तयार झालेली असतात, त्यामुळे जाळीला चिकटत नाहीत.त्यामुळे बेकिंग पेपरची गरज उरत नाही आणि बेकिंग पेपरचे छोटे तुकडे जास्त वेळ ए फ्रा मध्ये ठेवल्यावर एकदोनदा जळले त्यामुळे मी आता ते काढून टाकते. अर्थात तेच तुकडे पुढच्या भज्यांच्या घाण्याला वापरता येतात. स्वाती
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Wed, 11/23/2016 - 05:30 नवीन
दोन्ही प्रकारे पदार्थ करून दाखवण्याची कल्पना खरच खूप छान आहे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 11/23/2016 - 08:12 नवीन
अशा डाळींची भजी रश्श्यात टाकून आमच्या घरी मस्स्त भाजी/रस्सा/आमटी करतात.
  • Log in or register to post comments
व
विजय पिंपळापुरे Wed, 11/23/2016 - 09:52 नवीन
इतर डाळी बरोबर मटकी किंवा मटकीची डाळ पण घालू शकता मटकीची डाळ भिजवून, न वाटता घालावी. जोडीला कढीपत्ता जरूर घालावा, फार छान स्वाद येतो.
  • Log in or register to post comments
प
प्राची१२३ Wed, 11/23/2016 - 10:39 नवीन
वा !! मस्तच ....
  • Log in or register to post comments
म
मनिमौ गुरुवार, 11/24/2016 - 15:41 नवीन
ईकडे.मस्त कुरकुरीत दिसतायत
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 11/24/2016 - 16:52 नवीन
मस्त मस्त!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/25/2016 - 02:09 नवीन
कुरकुरीत... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मनमा इमोशन जागे रे... ;) :- Dilwale
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 11/25/2016 - 02:44 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 11/25/2016 - 14:54 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा