Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मूगाची कचोरी

स
स्वाती दिनेश
Fri, 11/18/2016 - 16:58
खूप पूर्वी ठाण्याच्या गोखले रोड वर छाया स्वीट्स नावाचे दुकान होते. त्यांची कचोरी प्रचंड फेमस होती. अर्थात ठाणेकर असल्याने रांगा बिंगा लागत नसत दुकानात पण ती कचोरी म्हणजे आय हाय.. मस्तच होती. काळाच्या ओघात ते दुकान गेलं आणि त्याबरोबर ती कचोरीही गेली. नंतर मग गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस नावाचे अगदी लहानसे दुकान आहे तेथे तशीच कचोरी मिळायला लागली ती आजतागायत मिळते आहे. सकाळी १०-११ च्या सुमाराला तिथे गेलात तर बरेचदा मस्त गरमागरम मूग कचोर्‍या मिळतात. म्हणजे एरवीही मिळतात पण गरमागरम हव्या असल्या तर तेथे सकाळी जा. नाहीतर मग मी सांगते तशा करून खा. ह्या कचोर्‍या तशा टिकाऊ आहेत पण नो वन कॅन इट जस्ट वन.. म्हणत फस्त केल्या जातात. तर ही कचोरी इथे जर्मनीत मनात येईल तेव्हा कशी बरं मिळणार? मग स्वतःलाच कामाला लावावे लागते. असो, नमनाला घडाभर तेल खूप झाले.. कचोर्‍याही तळायच्या आहेत त्याला तेल लागणार आहे ना.. तर ह्या कचोर्‍यांसाठीचे साहित्य- सारणासाठी- १ वाटी मूग डाळ, २ चमचे बडिशेप, ३ ते ४ चमचे धने जीरे पूड, चमचाभर आमचूर, २ चमचे लाल तिखट, २ चमचे तीळ, १ चमचा खसखस, ३ ते ४ चमचे साखर, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबिर, २ पळ्या तेल आवरणासाठी- २.५ वाट्या मैदा, पाउण वाटी तूप, मीठ, लिंबाच्या रस चमचाभर- साधारण दोन छोट्या फोडींचा रस, कोमट पाणी तळणीसाठी- तेल किवा ए फ्रा सारणाची कृती- मूगाची डाळ व बडिशेप साधारण तीन तास तरी भिजत घाला. नंतर उपसून वाटा, वाटताना पाणी कमीत कमी ठेवा. एका कढईला तेलाचा हात लावून तिच्यात २ पळ्या तेल तापत ठेवा. त्यात तीळ व खसखस घाला. नंतर ही मूगाची वाटलेली डाळ घाला. थोडे परतून घ्या. मग तिखट, धनेजीरे पूड, मीठ घाला. आच मोठी ठेवून परतत रहा. वाटल्यास अधून मधून पाण्याचा हबका मारा. मिश्रण मऊ व मोकळे झाले पाहिजे. आच बंद करून साखर घाला, आमचूर व कोथिंबिर घाला. मिश्रण ढवळून एकसारखे करा. आवरणाची कृती- तूप पातळ करून घ्या. मैद्यात छोटा चमचाभर मीठ घाला. लिंबाचा रस घाला. त्यात हे गरम केलेले पातळ तूप घाला. हवे तसे कोमट पाणी घालून मळा. फार घट्ट नको, किंचित सैलसरच गोळा बनवा व १५-२० मिनिटे झाकून ठेवा. ह्याच्या छोट्या पुर्‍या लाटून त्यात मूगाचे सारण भरा, कडेने बंद करत आणा व बंद केलेला भाग खाली ठेवा. तसेच तळतानाही बंद केलेला भाग खाली ठेवून तेलात सोडा व कचोरी तेलात सोडताना आच मोठी ठेवा, नंतर तळताना मध्यम आच करा. म्हणजे कचोरी फुटणार नाही. ए फ्रा मध्ये करायच्या असतील तर- ए फ्रा २०० अंशावर प्रिहिट करा. कचोर्‍यांना ऑइल ब्रशिंग करून घ्या. आधी ६ मिनिटे, मग पालटून ६ मिनिटे मग १८० अंशावर २ ते ३ मिनिटे ए फ्रा करा. गोल्डन गुलाबी रंग आला नसेल तर अजून एखादा मिनिट ए फ्रा करा. दोन्ही प्रकारे केलेल्या कचोर्‍यांचा फोटो देते आहे. मुद्दाम एकाच वेळी दोन्ही प्रकारे केल्या. चवीत फारसा फरक जाणवला नाही. तेलात तळलेल्या कचोर्‍या- . ए फ्रा मधील कचोर्‍या- .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17279 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/18/2016 - 17:13 नवीन
मस्त !आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 11/18/2016 - 18:11 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 11/19/2016 - 04:43 नवीन
अहाहा! मस्त. एफ्रा पर्यायासाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
न
नरेश माने Sat, 11/19/2016 - 06:11 नवीन
एकदम तोंपासु.....
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 11/19/2016 - 06:22 नवीन
सुरेखच ग
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 11/19/2016 - 09:53 नवीन
स्वाती,झकास.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Sat, 11/19/2016 - 09:57 नवीन
मस्तच! लावलेस कामाला सुट्टिचे.
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Sat, 11/19/2016 - 22:29 नवीन
मस्त रेसेपी... लवकरच करुन बघावी लागेल
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/20/2016 - 02:52 नवीन
ए फ्रा वाल्यांची मजा आहे बुवा! दोन्ही प्रकारे केलेया कचोर्‍या छान दिसतायत. आवरणात लिंबूरस घालतात हे पहिल्यांदा पाहिले. मी एकदाच कचोर्‍या घरी ट्राय केल्या होत्या. पुस्तकातील प्रमाणानुसार सारण परतायला घेतले तर जामच चिकटले.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/20/2016 - 17:12 नवीन
अग, परतायला घेतले की मूगाचे सारण चिकटायला लागतेच, म्हणून तर कढईला तेलाचा हात लावून घ्यायचा आधी, म्हणजे मग बरे पडते. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Mon, 11/21/2016 - 10:06 नवीन
अगोदर कुकरमध्ये वाफवून घेऊन,तहान झाल्यावर हाताने मोकळी करून परळी तर काम सोपे होते.
  • Log in or register to post comments
र
रुपी Sun, 11/20/2016 - 04:13 नवीन
मस्त दिसत आहे. कचोरी फार आवडते, पण कधीच करुन पाहिली नाही. लहानपणी ते सायकलवर डब्ब्यांमधून आणून कचोरी विकणारे यायचे, त्यांच्याकडची कचोरी फार आवडायची. तान वर्षांपूर्वी राजस्थानात फिरताना एका छोट्याश्या गावात सकाळी मस्त कचोरीचा नाश्ता केला होता त्याची आठवण आली :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 11/20/2016 - 07:51 नवीन
स्वाती ताई कोणत्या चांगल्या लाग्ल्या जास्ती? ए फ्रा च्या की, तळलेल्या? कचोरि मस्त! एकदम.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/20/2016 - 08:14 नवीन
अगं, किती दिवसांनी!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/21/2016 - 17:38 नवीन
सरप्राइज!!! ट्याणट्याढ्याण!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/22/2016 - 13:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/20/2016 - 12:55 नवीन
किती दिवसांनी? यशोसारखेच म्हणतेय, :) खूप फरक नाही जाणवला ए फ्रा आणि तळलेल्या कचोर्‍यांमध्ये त्यामुळे आता ए फ्रा कचोर्‍या खाता येणार असल्याने जास्त वेळा केल्या जातील हे नक्की.. :) बाणा, बरोबर.. तेथील गुलकंदवडी मस्त असतेच, मला त्यांच्याकडची दुधीवडीही आवडते, गोरसपेक्षाही यांची जास्त आवडते. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/20/2016 - 08:09 नवीन
कचोरी मस्तच ! गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस ते हनुमान "डेअरी" आहे, स्वीट्स नव्हे ! त्यांच्याकडे गुलकंद वडी आणि सुतरफेणी हे माझे दोन्ही आवडते पदार्थ देखील मिळतात. :) अवांतर :--- ते (सर्वव्यापी) कुठेतरी हरवलयं पहा बरं... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नशे सी चढ़ गयी ओय कुड़ी नशे सी चढ़ गई... पतंग सी लड़ गई ओये कुड़ी पतंग सी लड़ गई... ;) :- Befikre
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/21/2016 - 17:39 नवीन
अवांतर :--- ते (सर्वव्यापी) कुठेतरी हरवलयं पहा बरं... ;) गप्प मेल्या!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/20/2016 - 08:14 नवीन
काय टेंप्टींग दिसत आहेत ते फोटो!
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Sun, 11/20/2016 - 08:36 नवीन
एकदम तोंपासु.. दोन्ही पध्द्तीने करून पाहीन.. पाककृती खूपच छान सांगितली आहे.. आवडली..
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sun, 11/20/2016 - 14:53 नवीन
आह्ह !!! कचोरी.. स्लर्प !
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sun, 11/20/2016 - 23:17 नवीन
करून बघेन.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Mon, 11/21/2016 - 04:52 नवीन
मस्त मस्त ..नक्की करून बघेन
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 11/21/2016 - 06:21 नवीन
आवडली पाकृ, एकदा करून बघेन....
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/21/2016 - 06:28 नवीन
सारणात लिंबाचा रस घालण्याचे प्रयोजन छान चव व्यतिरिक्त आणखी काय असावे ? एक बाळबोध शंका म्हणून फक्त विचारतोय. नेमस्त नाखु
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 11/21/2016 - 08:49 नवीन
घातल्याने आवरणात क्रिस्पीपणा येतो. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 11/21/2016 - 11:14 नवीन
पाउण वाटी तूप
वनस्पती तूप का ? वनस्पती तूपाऐवजी तेल चालेल का ?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 11/21/2016 - 12:01 नवीन
मी मार्गारिन घेतले. वनस्पती तूप घेऊ शकता किवा तेलही घेऊ शकता. तेल घेतल्यास गरम करून मैद्यात घालावे. स्वाती
  • Log in or register to post comments
प
पूर्वाविवेक Mon, 11/21/2016 - 11:17 नवीन
फार छान आणि सोप्पी रेसिपी.
  • Log in or register to post comments
व
विजय पिंपळापुरे Mon, 11/21/2016 - 14:55 नवीन
स्वाती असली ठाणेकर आहात् तर, छाया स्वीट्स चा उल्लेख केलात म्हणजे बरेच वर्ष ठाण्यात राहीलात तर
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 11/22/2016 - 13:39 नवीन
आता करून बघते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 59 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 3 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 7 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा