Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

देवनागरी सुलेखन

ध
धनंजय
गुरुवार, 09/25/2008 - 21:07

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24240 views

💬 प्रतिसाद
प
प्रियाली गुरुवार, 09/25/2008 - 21:26 नवीन
तुमचं अक्षर सुरेख आहे पण माझं तुमच्याहून सुरेख आहे. कळफलक बडवायला लागल्यापासून युनिकोड फाँट हेच माझे हस्ताक्षर. ;) ह. घ्या. देवनागरी नेहमी लिहिली जात नसताना (असा माझा ग्रह) तुम्ही वळण राखले आहे हे खरेच उत्तम. इथे बोरू आणि शाई कुठे मिळते? देवनागरी लिहिण्यासाठी बोरूचा कोन तासलात का ब्लेडने? तो कसा असावा त्याचा फोटो चढवता येईल का?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/25/2008 - 22:06 नवीन
देवनागरी लिहिण्यासाठी बोरूचा कोन तासलात का ब्लेडने? तो कसा असावा त्याचा फोटो चढवता येईल का? खरंच हेच विचारणार होतो, जरूर फोटो टाका धनंजय.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 09/25/2008 - 22:38 नवीन
मी बोरू पूर्वी बनवला आहे, पण वरील नमुन्यांमध्ये वापरलेला नाही. बोरू कडक वेत (रीड) क्राफ्टच्या चाकूने कापून/तासून बनवत असे. पण वापरताना तो फार लवकर बोथट व्हायचा (बहुधा योग्य प्रकारच्या वेताच्या काड्या वाकड्या अंगणात वाढत नसाव्यात), म्हणून कंटाळून मी तो प्रयोग बंद केला. वरील नमुने रोमन पद्धतीने कापलेल्या (तयार विकत घेतलेल्या) निबने काढलेले आहेत. आता मी देवनागरी निबही मिळवली आहे - दोन्ही प्रकारच्या निबचे फोटो इथे डकवतो. भारतातून शाई आणली होती, पण ती शालेय शाई होती, पर्मनंट नव्हती. दोनतीन वर्षांत अक्षरे फिक्की पडली. साधारणपणे आर्टिस्ट सप्लाय दुकानातून शाई आणतो. (वरील नमुन्यांतली शाई अशीच. दुसर्‍या नमुन्यातली शाई कॅलिग्राफी सेटबरोबर फुकट मिळाली होती.) त्याच दुकानांत उगाळायची शाईची काडी आणि सहाणही मिळते. ही काडी काजळाची असते, त्यामुळे एकदम पर्मनंट असते. ही शाई मी फक्त कुंचल्याने लिहिण्यासाठी वापरली आहे. (निबमध्ये साकळली तर नीब बाद होईल, असा चिक्कू विचार.)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 09/26/2008 - 09:07 नवीन
अतिशय सुंदर हस्ताक्षर चित्रे.. खूप आवडली बोरू बद्दल इथे वाचता येईल (तिथे लेखा पेक्षा प्रतिक्रियांमधे बरीच माहिती आहे म्हणा :) ) -(या अक्षरापुढे कोंबडीच्या पायांसारखं अक्षर असणारा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
न
नीलकांत गुरुवार, 09/25/2008 - 21:31 नवीन
हे सुलेखन तर खुपच सुंदर झालेलं आहे. असेच आणि असतील तर येऊ द्या ना ! मिसळपाव वर आणि कुणी सुलेखन करतं का? नीलकांत
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 09/25/2008 - 22:50 नवीन
तुम्ही नेमकं काय काय करता? अगदी माझ्या मनातले विचारलेत. सुलेखन छान. (खरोखरच "सु"लेखन आहे.) तुमचे पाहून आता पुण्याहून नक्की नीब मागवणार! :-) बाकी त्या पाठाचा अर्थ काही कळला नाही.
  • Log in or register to post comments
व
विकि Mon, 09/29/2008 - 20:38 नवीन
सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युतपालव यांचे संकेतस्थळ http://achyutpalav.com/wallpaper.htm येथे पाहू शकतोस.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/25/2008 - 22:13 नवीन
(हस्ताक्षरप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/25/2008 - 22:30 नवीन
देवनागरी सुलेखन सुरेख आहे, अतिशय आवडले. अप्पा बळवंत चौकातील त्रिमूर्ती ट्रेडर्स या दुकानात हे बोरू मिळतात. धनंजयांकडून माहिती घेऊन मी ते आणले खरे, पण अजून काही प्रयोगाला मुहूर्त सापडलेला नाही :(.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/25/2008 - 22:45 नवीन
वाटोळे सरळे मोकळे। वोतले मसीचे काळे। कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे। मुक्तमाला जैशा।। अक्षरमात्र तितुके नीट। नेमस्त पैस काने नीट। आडव्या मात्रा त्याहि नीट। आर्कुली वेलांट्या।। पहिले अक्षर जे काढीले। ग्रंथ संपे तो पहात गेले। येका टाकेचि लिहिले। ऐसे वाटे।। ह्या समर्थ सूचना आठवल्या! "सुंदर हस्ताक्षर हा दागिना आहे!" हा सुविचार आता कळफलक बडवून लिहावा लागतो हा दैवदुर्विलास! कागदावर बोरु टेकवून जमाना झाला, आता तर कधीमधी पत्र लिहिताना मराठी अक्षरांची वळणेच आठवत नाहीत अशी परिस्थिती येते. (खुद के साथ बातां : रंग्या, लेका बघ, धन्याशेठ डॉक्टर असूनही त्याचे हस्ताक्षर कसे मोत्यासारखे आहे! ;) तुला संपूर्ण बाराखडी आठवते का रे? चल बघू 'ज्ञ' आणि 'ऋ' काढून दाखव! :T ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/25/2008 - 23:27 नवीन
छान प्रतिसाद
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 09/30/2008 - 05:17 नवीन
रंग्या, लेका बघ, धन्याशेठ डॉक्टर असूनही त्याचे हस्ताक्षर कसे मोत्यासारखे आहे! अगदी खरे बोललात रंगाशेठ.हे तर जगातले ८वे आश्चर्य म्हणजे डॉक्टर असूनही त्यांचे अक्षर केमिस्ट सोडून इतरानाही वाचता येते. :) कदाचित प्रॅक्टीसींग डॉक्टर नसल्याचा फायदा म्हणावा का हा? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/25/2008 - 23:04 नवीन
या प्रसिद्ध गीतमालिकेतील 'श्रावणमासी' या भागाअंतर्गत वैशाली सामंत यांनी 'असा बेभान हा वारा...' हे गाणे म्हटले तेव्हा मंचावरच संतोष क्षीरसागर यांनी त्या गीताचे बोल घेऊन देवनागरी सुलेखनाचे काही नमुने पेश केले होते, त्याची यानिमित्ताने आठवण झाली. त्यात बोरूबरोबरच (की बोरू नव्हता? बहुधा नसावा) साधे पेन्ट ब्रशचे फलकारे मारून सुलेखन केले गेले होते. (स्मरणशील)बेसनलाडू या कारागिरीचे यू ट्यूबवरील चित्रण येथे पाहता येईल. (दुवादार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/25/2008 - 23:36 नवीन
मला वाटतं त्या कार्यक्रमात (किमानपक्षी मी जी त्याची डीव्हीडी आवृत्ती पाहिली त्यात) जवळपास सगळ्याच (किंवा बर्‍याच) गाण्यांच्या बोलांचं सुलेखन केलं होतं. मला तरी तो प्रकार फारसा झेपला नाही. म्हणजे, स्टेजवर गायलं जात असलेलं गाणं घ्यायचं, त्यातले काही रँडम कीवर्डस रंगवायचे. मला तरी त्यात काही विशेष इंप्रेसिव्ह असं, त्यातून काही भाव वगैरे पेश होतात वगैरे असं काहीही वाटलं नाही. उलट स्टेजवर गायल्या जात असलेल्या गाण्यापासून डिस्ट्रॅक्शन! असो. ज्याचं त्याचं मत.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/25/2008 - 23:41 नवीन
मुळात मला ते सगळेच जे चालले होते ते आवडले असे माझ्या वरील प्रतिसादातून वाटले असल्यास क्षमस्व; मला काही प्रकार झेपले नाहीत, पण काही नक्कीच आवडले. जसे 'जटा पिंजून या लाटा' चे सुलेखन आवडले, पण निळ्या रंगात जे बटबटीत स्वरूपात लिहिले गेले, ते झेपले नाही. याबाबत धनंजयांना खरड केली आणि दुवा दिला. त्या खरडीला त्यांनी दिलेल्या उत्तरातील लॅक ऑफ प्लॅनिंगसह बोल भराभर सुलेखित करायचा मुद्दा पटण्यासारखा वाटला. त्याच कार्यक्रमात बेला शेंडेंच्या 'ये रे घना...' गाण्यासमयी फडके का कुणीतरी शिल्पकाराने आकारलेले शिल्प तर मला ओ की ठो कळले नाही. गाण्यापासून डिस्ट्रॅक्शन - तसेही सामंतताई आणि शेंडेताईंना त्यांच्या वाद्यवृंदासह पूर्ण गाणे बघणे हे सुद्धा 'गाण्या'पासून डिस्ट्रॅक्शनच वाटते/ले मला (सुस्पष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/25/2008 - 23:52 नवीन
सहमत आहे. http://www.youtube.com/watch?v=aYd75dJ9o7I&feature=related या प्रमाणे काही असावे अशी कल्पना असेल असे वाटले. प्रयोग म्हणून नक्षत्रांचे देणेमधला तो भाग ठीकआहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/25/2008 - 23:26 नवीन
फार उत्तम नमुने. तुम्ही नक्की काय काय करता हा प्रश्न नीलकांताप्रमाणे मलाही पडला. डॉक्टरचे अक्षर इतके सुंदर..कमाल आहे :) >>(बहुधा योग्य प्रकारच्या वेताच्या काड्या वाकड्या अंगणात वाढत नसाव्या>> :) मस्त ! --लिखाळ. आमच्या हातातली पेने आणि आमच्या वह्या वाकड्या दुकानातल्या असल्याने आमचे लिखाण आम्ही केमिस्ट कडुनच वाचून घेतो.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 09/26/2008 - 06:35 नवीन
सुंदर.... धनंजय, तुम्ही खूपच छान सुलेखन करता हो... मस्तच. बाकी डॉक्टरचे अक्षर इतके छान!!!! बाकीचे डॉक्टर काही बोलत नाहीत तुम्हाला? ;) बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 09/26/2008 - 06:42 नवीन
सुलेखन सुरेखच! अरे सुनील, तुझे अक्षर की कोंबडीचे पाय, असे आमचे शिक्षक विचारीत असत! असो. अवांतर - रोमन कॅलिग्राफीच्या मानाने देवनागरी कॅलिग्राफी तशी दुर्लक्षीतच. पण आता मुंबईत झालेल्या देवनागरी पाट्यांच्या सक्तीमुळे देवनागरी सुलेखनाला संजीवनी मिळेल? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 09/26/2008 - 07:15 नवीन
कॅलीग्राफी आवडली. कॅलीग्राफीसाठी वापरले जाणारे टाक/बोरू , शाया (शाईचे अनेकवचन?), वेगवेगळ्या पद्धती (रोमन, देवनागरी, चिनी) असे माहितीप्रद लेखन वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 09/26/2008 - 08:54 नवीन
सुलेखन सुरेख ! वरील सर्वांप्रमाणेच हा धनंजय अजून काय काय करतो? हा प्रश्न कौतुकाने विचारावासा वाटतो आहे,:) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/29/2008 - 20:18 नवीन
स्वातीताई आणि इतरांप्रमाणे मी ही कन्फूज्ड आहे... तुम्ही नक्की काय कात करता? सुलेखन अप्रतिम आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/27/2008 - 09:42 नवीन
धन्याशेठ, तुझी कॅलिग्राफीही लै भारी रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 09/29/2008 - 18:42 नवीन
अप्रतीम... आपल्या एक एक कलांची ओळख हळू हळू होते आहे. प्रा. गळतग्यांच्या पुस्तकावरील आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 09/29/2008 - 20:05 नवीन
धनंजय .. प्रतिसादाला उशीर झाल्याबद्दल सॉरी पण तुम्ही केवळ अशक्य आहात :) खूपच सुरेख सुलेखन आहे. मला व्यनिने तुमचा इपत्ता कळवाल का? ------- मला खात्री आहे अच्युत पालव ह्यांची वेब साईट तुम्ही पाहिली असेलच. ह्या क्षेत्रातला दादा माणूस आहे :)
  • Log in or register to post comments
व
विकि Mon, 09/29/2008 - 20:35 नवीन
फारच सुंदर सुलेखन. आम्हालाही शिकवा सुलेखन कसे करायचे ते. खरोखरच बोरु तासणे सर्वात कठीण काम आहे. बोरूविषयी माझी आठवण सांगतो- मी अख्या मुंबईत बोरू शोधत होतो शेवटी परळला मनोहर बुकडेपोत बोरू मिळाला. सर्वात कठीण काम म्हणजे बोरूने लिहीणे असे मला वाटते. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 09/30/2008 - 06:31 नवीन
रिपीट प्रकाटाआ ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/30/2008 - 08:57 नवीन
सु रे ख . . . मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Wed, 10/01/2008 - 08:28 नवीन
धनंजय, सुलेखन आवडले. उर्दू कॅलिग्राफीतला पहिला नमुनाही चांगला होता. "तुग्रा" शैलीतला आहे बहुतेक. असो. तुमच्या सुलेखकाच्या कारकीर्दीसाठी माझ्या शुभेच्छा. सुलेखन करण्यासाठी बोरूच हवा असेही नाही. मिळेल त्या साधनाने सुलेखन करता येते. करायला हवे, असे म्हणतात.अच्युत पालव ह्यांचे सुलेखन अवलोकनार्थ. अक्षरांत "पैलतोगे काऊ कोकताहे"चा गोडवा आहेच. शिवाय त्यातला "काऊ"ही डोकावतो आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 10/05/2008 - 16:18 नवीन
एक रेखीव लिपी-शैलीच (फाँटच) बनवली आहे अच्युत पालव यांनी. सुबक आणि आकाराने मोठ्या शेंड्या-टोप्यांखाली चिमुकली देवनागरी अक्षरे बघून उडिया लिपीची आठवण आली. उडिया लिपीत मोठ्या वळणदार गोल फराट्यांच्या खाली आपली नेहमीची देवनागरी अक्षरे असतात.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 10/05/2008 - 16:23 नवीन
वा वा वा वा वा! मला हा फाँट ;) प्रचंड आवडला.. सुरेख आलेखन!!!!! अजुन नव्या शैलीत लिहिलं असेल तर येऊद्या इथे चित्तर साहेब! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 10/05/2008 - 16:56 नवीन
हा धागा आवडला. आणखी माहीती मिळाल्यास उत्तम कारण मी स्वतः कॅलीग्राफी शिकण्याचा प्रयत्न करतोय. मी तासलेले बोरु आणले आहेत. सराव करतोय सद्ध्या. पुण्यात अप्पा बळवंत चौकातील 'त्रिमूर्ती' नावाच्या दूकानात कॅलीग्राफी संबंधीत सामग्री मिळते. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Tue, 10/07/2008 - 11:37 नवीन
हृषिकेश ह्यांचा मागणीनुसार अच्युत पालव ह्यांच्या सुलेखनाचा आणखी एक नमुना :

Image removed.

र. कृ. जोशी आणि कमल शेडगे ह्यांचे नमुनेही आहेत. सध्या जवळ नाहीत. मिळाल्यावर इथे देईन.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Tue, 10/07/2008 - 11:44 नवीन
'भाषा आणि जीवन' पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील नमुने अवलोकनार्थ:

Image removed.

  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 18 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा