Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाप्पाचा नैवेद्यः धारवाडी पेढे

प
प्रभाकर पेठकर यांनी
Tue, 09/06/2016 - 04:10  ·  लेखमाला
लेखमाला
1 साहित्य : खवा अर्धा किलो. भुरा साखर : अर्धी वाटी + थोडी वरून लावण्यासाठी. वेलची पावडर : १ मोठा चमचा (टेबलस्पून) साजूक तूप : १ मोठा चमचा (टेबलस्पून) दूध : १ वाटी भ्रुरा साखर बनविण्याची कृती : एका कढईत दीड वाटी साखर घेऊन त्यात पाऊण वाटी पाणी घालावे आणि मध्यम आचेवर तापवून तीनतारी पाक बनवून घ्यावा. पाक तयार झाला की आच बंद करून सतत ढवळत राहावे. हळूहळू पाक घट्ट होत जातो. पांढरी साखर दिसू लागते. सतत ढवळत राहावे. जसजसा पाक थंड होईल, तसतशी साखर घट्ट होऊ लागेल. साखर संपूर्णपणे थंड आणि कोरडी झाली की मिक्सरमधून दळून ध्यावी. आवश्यकता वाटल्यास चाळूनही घ्यावी. ही झाली भुरा साखर. पेढे बनविण्याची कृती: पुन्हा एका कढईत खवा घालून मध्यम किंवा त्याहून कमी आचेवर तापवावा. परतत राहावे. हळूहळू खवा पातळ होत जातो. सतत परतत राहावे, म्हणजे तळाला लागून जळणार नाही. हळूहळू त्यातील पाणी आटून खवा मिळून यायला लागतो. खवा अशा प्रकारे कोरडा झाला की पाव वाटी दूध त्यात मिसळून ढवळावे. परतत राहावे. ही कृती दर थोड्या थोड्या वेळाने करत राहून (खवा कोरडा झाला की) सतत परतत राहावे. खव्याचा रंग बदलून तपकिरी होऊ लागतो. सर्व दूध संपल्यावर वेलची पावडर घालावी, एक मोठा चमचा (टेबलस्पून) साजूक तूप घालून सर्व मिसळावे. नीट मिसळले गेले की अर्धी वाटी (किंवा त्याहून कमी) भुरा साखर त्यात मिसळून घ्यावी. आच बंद करून सर्व मिश्रण ताटात काढून घ्यावे आणि थंड होऊ द्यावे. (दोन ते तीन तास) एका बशीत भुरा साखर घेऊन थंड झालेल्या खव्याचे पेढे बनवून साखरेत घोळवून एका ताटलीत नीट मांडून ठेवावेत. हे पेढे जरा मऊसर असतात, पण ते जसजसे थंड होत जातील (रात्रभरानंतर) तसतसे घट्ट होत जातील. आकाराने ओबडधोबड असले तरी चवीला मस्त असतात. हे पेढे बनविण्यासाठी संयमाची खूप गरज असते. मध्य किंवा मंद आचेवर खवा परतताना हात दुखून येतो, पण अंतिम पेढ्यांची चव चाखल्यावर सर्व त्रास सार्थकी लागल्याचा आनंद होतो. हे पेढे शीतकपाटात १५ दिवस, पण नजरेसमोर २-३ दिवसच टिकतात. शुभेच्छा...! टीप : धारवाडी पेढ्यांसाठी खवा भाजताना गडद तपकिरी रंगावर येईपर्यंत भाजावा लागतो. पण हलका रंग आल्यावर मिळून आलेल्या खव्यात दुधात खललेले केशर, साखर आणि वेलची पूड घालून गोल आणि जरा चपटे केशरी पेढे बनवितात. तसेच केशर न घालता पिवळा रंग आणि जायफळ पूड घालून (वेलची पूड ऐच्छिक) आकाराने लहान पिवळे पेढे बनवितात. दुधाऐवजी खव्यात ताजी साय (फ्रेश क्रीम) घालून मलई पेढे बनतात (खव्याचा रंग बदलू द्यायचा नाही). आपल्या कल्पकतेनुसार मँगो पेढे, बदाम पेढे वगैरे बनविता येतील.

वाचनखूण लावा
| 28128 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 28128 views

प
पैसा Tue, 09/06/2016 - 04:12 नवीन
अ प्र ति म! पेढे हा प्रकार करायला तसा सोपा दिसतोय, पण का कोणजाणे नेहमी विकत आणले जातात आणि मग त्यात साखर जास्त आहे म्हणून बोंब मारणे हेही नेहमीच!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 09/06/2016 - 15:45 नवीन
खरंच अप्रतिम!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 09/06/2016 - 15:45 नवीन
खरंच अप्रतिम!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 09/18/2016 - 08:12 नवीन
अहाहा !
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 09/06/2016 - 05:00 नवीन
बप्पा मोरया अगदी प्रसन्न होईल अश्या पेढ्यांनी.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानव Tue, 09/06/2016 - 05:05 नवीन
आमच्या धाकट्याच्या नजरेसमोर २-३ दिवसच राहतील हे मात्र निश्चित..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 09/06/2016 - 05:05 नवीन
सुरेख पाककृती.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 09/06/2016 - 05:11 नवीन
विकतची भुरा साखर घेऊन प्रयोग केल्या जाईल.मस्त पाकृ आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 09/06/2016 - 05:12 नवीन
वर लावलेल्या साकरेने जास्त वेल नरम राहतात का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/06/2016 - 05:22 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/06/2016 - 05:59 नवीन
धारवाडी पेढे अतिश्शयच आवडते. फोटोही मस्तच आणि पाकृ तर काय? भारीच. स्वाती
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 09/06/2016 - 06:34 नवीन
फोटोच बघत बसले.पाकृहि मस्त.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 09/06/2016 - 06:34 नवीन
फोटोच बघत बसले.पाकृहि मस्त.
  • Log in or register to post comments
स
संत घोडेकर Tue, 09/06/2016 - 07:29 नवीन
मस्त! तुम्ही मिश्रा पेढेवाल्यांच्या पोटावर पाय आणणार असे वाटते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/06/2016 - 07:36 नवीन
हुब्बळीला मिश्राच आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/06/2016 - 07:34 नवीन
मला असले खमंग पेढेच आवडतात.आजकाल ओले मऊ पेढे(अमदाबादी),कंदी (सातारा,वाइचे)मिळतात ते नुसढेच गोड लागतात.कंदीत तर खव्याच्या चवीऐवजी कणकेची चव येते.अलिबाग/चौल येथे फफेबंधुंकडे मिळतात.विजापुरात कृष्णा डेअरी.(बेळगावकडे कुंदा असतो)होस्पेट - नंदिनी डेअरी.गोरेगाव - सप्रे स्वीट्स. पेढ्यांवर एक लेख लिहा सवडीने.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 09/06/2016 - 07:48 नवीन
फफेबंधुंकडे
पुलंनी लिहिलेली असा मी असामी मधील मास्टर शंकरची मिस आठवली. लिपस्टीक लावून तिला मामा फफे हे बोलायला लावायची बेंबट्याईच्छा आठवली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 09/06/2016 - 08:16 नवीन
आता प्रसादाला नक्की करून बघते.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 09/06/2016 - 08:19 नवीन
दोनच महिन्यापूर्वी धारवाडला जाणे झाले होते..पण तिथले पेढे काही फोटोतल्याइतके देखणे दिसले नाही बरं ! प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट..
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 09/06/2016 - 08:28 नवीन
वाह! अप्रतिम दिसताहेत पेढे.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 09/06/2016 - 10:05 नवीन
पेढे मस्तच दिसतायत काका.. घरात थोडा खवा आहेच. त्याचे करुन बघते आज हे पेढे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/06/2016 - 10:18 नवीन
मस्तं ! पेढे आवडता प्रकार आहे. खव्यात 'खोट' नसली तर साखरेला न घाबरता खूप खाल्ले जातात :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/06/2016 - 12:27 नवीन
मस्त पाकृ व फोटो नेहमीप्रमाणेच आकर्षक आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 09/06/2016 - 13:33 नवीन
वाह!!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 09/06/2016 - 15:39 नवीन
असा तिहेरी योग आहे!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 09/06/2016 - 16:00 नवीन
धारवाडी पेढे खूप मस्त लागतात.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 16:30 नवीन
व्वा! आम्हा गोडघाशांना ही मेजवानी झकास! सुरुवातीला चारच जिन्नस बघून मनात म्हटलं, अरेवा, सोपी आहे, फटक्यात करुन टाकू. नंतर पाकृ वाचता वाचता लक्षात आलं हे खरंच संयमाचं काम आहे. आपलं आणि संयमाचं वाकडं असल्याने बायकोला त्रास दिला जाईल! ;))
  • Log in or register to post comments
स
सई कोडोलीकर Tue, 09/06/2016 - 17:28 नवीन
पेढे खुपच छान दिसतायत काका. त्यामागच्या कौशल्याला आणि मेहनतीला सलाम!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 09/06/2016 - 18:11 नवीन
सुरेख फोटो नि पाककृतीही.
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 09/06/2016 - 19:41 नवीन
सुंदर दिसत आहेत पेढे. छान पाकृ :) खरंच फारच संयम लागत असणार हे बनवायला..
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 09/06/2016 - 20:01 नवीन
सुंदर पाककृती. रच्याकने खवा ह्या प्रकारातल्या भेसळीमुळे खव्याचे पदार्थ शक्यतो टाळतोच. खव्यातली भेसळ कशी ओळखावी?
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Tue, 09/06/2016 - 20:02 नवीन
क्या बात हे !!!
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Tue, 09/06/2016 - 21:30 नवीन
वाह किती मस्त
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Wed, 09/07/2016 - 07:13 नवीन
वाह!! मस्त
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Wed, 09/07/2016 - 12:48 नवीन
मस्त पाक्रु !!!
  • Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर Wed, 09/07/2016 - 14:33 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
भ
भुमी Wed, 09/07/2016 - 16:07 नवीन
वेळ काढून करून बघणार....
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/07/2016 - 16:29 नवीन
ही पाकॄ हवीच होती, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/07/2016 - 23:46 नवीन
एबीपी माझाच्या कार्यक्रमात आज(७)मथुरा पेढे दाखवले होते त्यात दुधात भाजलेला खवा टाकून नंतर हीच कृती दाखवली त्यामुळे बघता आले.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक गुरुवार, 09/08/2016 - 04:29 नवीन
पेढे खावे ते हेच पुण्यातल्या पावडरच्या पेढ्याला हि चव नाही हो
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/08/2016 - 08:36 नवीन
'पुणे तिथे काय उणे' असं म्हणतात बा!
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक गुरुवार, 09/08/2016 - 09:06 नवीन
पण खरे सांग, पेढे पावडर चे असतात कि नै
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/08/2016 - 09:38 नवीन
नाहीतर कोणीतरी माझा लकडीपुलावर झाईर सत्कार करतील. =))
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 09/08/2016 - 12:13 नवीन
धारवाडी पेढ्यांची पाकृ फार फार आवडली, नक्की करणार मी. फोटो +११११
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 09/11/2016 - 19:05 नवीन
मधुर गोड. पण भुरा साखरेला काय पर्याय असेल तर सांगा ना!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/12/2016 - 22:35 नवीन
भुरा साखर वापरलीच पाहिजे असे नाही. सतारी कंदी पेढे म्हणूनही चालतीलच की.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 09/13/2016 - 08:37 नवीन
हो, हे बरे! धन्स.
  • Log in or register to post comments
प
पूर्वाविवेक Tue, 09/13/2016 - 11:10 नवीन
पेढे-बर्फी यामध्ये आवडणारा हा एकमेव प्रकार. फारच रुचकर दिसतेयेत.
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 09/13/2016 - 14:56 नवीन
मस्त!!!!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Fri, 09/16/2016 - 17:47 नवीन
खास पेठकरी पाकृ. नानकचा खवा वापरून होतील का?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा