Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

तात्या'ज झानटामाटिक ब्रेड, अर्थात फोडणीचा पाव! :)

व
विसोबा खेचर
Tue, 09/23/2008 - 14:14

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13674 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/23/2008 - 14:49 नवीन
फोट्टो तर झकास आहे, त्यावरुन झानटामाटिक खदडायला भारीच लागत असेल असा अंदाज करतो. पाकृ मस्त !!! तात्या, तिकडचा मूड बरा असेल तेव्हा करुन पाहीन :)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 09/23/2008 - 14:56 नवीन
>>तात्या, तिकडचा मूड बरा असेल तेव्हा करुन पाहीन हा ब्रेड बघुन तिकडचा मुड नक्कीच चांगला होइल. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/23/2008 - 15:56 नवीन
अहो सर... तिकडचा मूड बरा असेल तर तुम्ही कशाला कराल? ;) तिकडूनच करणं होईल ना, हो की नाही? उलट तिकडचा मूड बरा नसेल आणि तुमच्यावर स्वतःच करुन खयची वेळ आली तर ही सोप्पी पाकृ एकदम झानटामाटिकच राहिल की नाही? बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/23/2008 - 18:08 नवीन
गटण्या, बिपीन, 'मिपाच्या' आमच्या आयुष्यातल्या घुसखोरीने, आमच्या एका सुखी संसाराचा मुड हल्ली बिघडलाय. मिपावरील इतक्या रेसेपी दाखवल्या. पण कधी तिकडून प्रयत्न करुन पाहिन म्हटल्याचा आवाज सुद्धा आला नाही. मिपा ही सटवी कुठून यांच्या आयुष्यात आली असा अनेकदा आरोप होतो आमच्यावर. त्यामुळे झानटामाटिक आणि इतर रेसिपींना दाद देण्यापलिकडे आम्हाला काहीही करता येत नाही. :) -दिलीप बिरुटे (दु:खी )
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 18:21 नवीन
आमच्याकडे उलटीच गंगा आहे (नेहेमीप्रमाणे, आम्ही दोघेही विक्षिप्त ना)! मी इथे पडीक असते त्यामुळे अभिरला कटकट होत नाही. तो त्याचं काम करत बसतो आणि मला टवाळक्या करायला फोरम मिळालाय! :-) (विक्षिप्त) अदिती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/24/2008 - 07:47 नवीन
प्रा. डॉ. >> 'मिपाच्या' आमच्या आयुष्यातल्या घुसखोरीने, आमच्या एका सुखी संसाराचा मुड हल्ली बिघडलाय. एका सुखी संसाराचं म्हणजे असे किती संसार आहेत? आणि एकापेक्षा जास्त असतिल तर सुखी कसे? रहस्य सांगावे ही विनंति. ;) ह.घ्या. बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/23/2008 - 14:51 नवीन
तात्या, आम्हीही ह्याला फोडणीचा पावच म्हणतो लहानपणापासून! झानटामाटिक फोटू अन् पाकृ! आम्ही शेंगदाणे पण घालतो त्यात. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 14:54 नवीन
आम्ही शेंगदाणे पण घालतो त्यात. येस्स! आम्ही पण घालतो परंतु मी ते घालायला विसरलो.. :) आपला, (झानटामाटिक वेंधळा) तात्या.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 09/23/2008 - 15:07 नवीन
"झानटामाटिक ब्रेड " आम्ही काल रात्रीच हादडायला केला होता ... ऐनवेळी कंपणीतुन येताना रुमवर भाजी शिल्लक आहे हे गॄहीत घरुन आलो होतो, पाहिले तर "बाकी शुन्य" ... मग ऐनवेळचा उपाय म्हणुन केला .... शेंगादाणेही घातले होते ... पण रंग असा फोटोत दिसतो तसा नव्हता आला. असो. " रंगात काय आहे" कुणीतरी म्हटलेच आहे ना ... अवांतर : ह्याच्यासोबत " ऑरेंज ज्युस" ही चवीला एकदम झानटामाटिक लागतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/23/2008 - 15:08 नवीन
तू तर म्हणालास, पाटा-वरवंटा पोळपाटावर च्चेपून त्याचे तुकडे टाकले! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/23/2008 - 15:12 नवीन
पाटा आणि वरवंटा हे दोन्ही पोळपाटावर कसे बुवा चेपायचे? (ह. घ्या.) रेवती
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 09/23/2008 - 15:21 नवीन
आमची मनस्वी म्हणते ...
आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
पण आमच्याकडे तर " आलं लसुण " सुदीक नाय, मंग काय करायचं ??? तात्पुरते पाटा वरवंट्याचे बारीक तुकडे करुन ते पोळपाटलाटाण्यावर लाटले व नम्तर मिक्सरमध्ये भरडले तर चालतील काय असे तिला मी विचारले. तर ती चालते असे म्हणाली ... पण काल एवढा वेळ नसल्याने मी पटकन "पाटा-वरवंटा पोळपाटावर चेपुन" घेतला ... समजले काय ? नसेल तर जास्त लोड नका घेऊ ... अवांतर विषयांतराबद्दल क्षमस्व ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/23/2008 - 15:54 नवीन
डान्या... ऑरेंज ज्यूस कसाही झानटामाटिकच लागतो रे... ;)
  • Log in or register to post comments
क
किट्टु Tue, 09/23/2008 - 14:53 नवीन
भारी फोटो टाकला आहे. पाहुन एकदम खायची हुक्की झाली. थोडी खादाड, किट्टु :)
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 09/23/2008 - 14:55 नवीन
तात्या, फोडणीच्या पावाचा फोटो मस्तच. :) ती प्लेट हातात घ्यावी आणि रिकामी करूनच खाली ठेवावी असे वाटत आहे. :(
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2008 - 14:56 नवीन
'फोडणीचा पाव' अर्थात शिंचा 'झानटामाटिक बिरेड' मस्तच. फोडणीला टाकण्या आधी त्यावर किंचित पाणी किंवा पातळ ताक शिंपडावे. मस्त लुसलुशीत होतो.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 09/23/2008 - 15:00 नवीन
तात्या, पा़कृचे नाव आणि फोटो दोन्ही झकास ! झानटामाटिक ब्रेड : नाव ऐकून खावासा वाटतो हे खरेच ! -- सौ. लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 09/23/2008 - 15:02 नवीन
फोडणीत कांदा गुलाबीसर परतून घेतला अणि थोडी कढीपत्त्याची पाने घातली तर झानटा डबल होतो असा अनुभव आहे. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/23/2008 - 15:09 नवीन
मीही कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे घालते. पण हा फोटू तर मस्तच आलाय. रेवती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 15:10 नवीन
एकदम झानटामॅटिक! तात्या, लय भारी ... मीपण झानटामाटीक ब्रेड करुन खाणार! त्यावर लिंबू पिळलं की आणखी जास्त मजा येते.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 09/23/2008 - 15:44 नवीन
रोज काहीतरी झानटामॅटीक करावे म्हणतो. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 09/23/2008 - 15:46 नवीन
अरे वा फोटो मस्त ! आम्हाला रानडे बालक मंदिरात दुपारच्या वेळेस एकदा अशी ब्रडची भाजी /चिवडा / फोडणीचा पाव करायला शिकवला होता :) म्हणजे मुलांनी पावाचे तुकडे करुन द्यायचे असे काम होते. तेव्हा मजा आली होती. आता कुठल्याशा 'न्यू इंस्ग्लिश' स्कूल मध्ये केजी क्लास मधल्या किड्सना कुकींक कोर्सच्या अंडर त्यांच्या मिस असा डानटामाटिक ब्रेड कुक करायला टीच करत असतील अशी एक थॉट माइंडमध्ये आली. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/23/2008 - 15:53 नवीन
तात्या... चिटींग... पाकृ लिहिताना, मिरची बद्दल काही लिहिलं नाहिस, म्हणजे 'हा पदार्थ तयार झाल्यावर (किंवा तयार झालाच तर ;) ) एखाद्या डिश मधे नीट भरून वर छान अश्या २-४ हिरव्या मिरच्या ठेवाव्या. लुक छान येतो" छाप. फोटो बघितला तर मस्त मिरच्या वगैरे मारके... एकदा करुन बघितला पाहिजे. बाकी 'झानटामाटिक' (केवढा अवघड शब्द आहे हा टायपायला, मी सरळ वरुन कट्-पेस्ट केला) हा शब्दसुध्दा मस्तच हो... बिपिन.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 09/23/2008 - 16:06 नवीन
बिपीनदा , ते " कॉपी + पेस्ट " असेल हो ! "कट" कसे करणार ह्या " ह ट म ल " फॉर्मॅटच्या पानावरुन ? अशी काय सुविधा असल्यास आम्हाला सांगा, मग समाचार घेतो आमच्या विरोधकाचा ... जाऊ दे, तुमच्या भावना समजल्या पण तरीही हात आवरत नव्हता .. ( कॄपया ह.घ्या.) अवांतर : झानटामाटिक हा शब्द व ऑरेंज ज्युस कसाही चांगलाच लागतो .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 09/23/2008 - 16:06 नवीन
भापो!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/24/2008 - 07:37 नवीन
टिंग्या, भापो म्हंजी भारतिय पोलीस का? का तुला भारी पोस्ट म्हनायचंय?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/24/2008 - 07:30 नवीन
मापी द्यावी सर्कार येक डाव... खरं मंजी मला 'शीशीपी टेक्नॉलॉजी' आसं ल्ह्यायचं व्हतं पण त्ये कट्-पेस्ट सोपं व्हतं टायपायला म्हून कट्टाळा क्येला... पुन्यांदा न्हाई व्हायचं आसं. पन सर्कार तुमचं ते 'ह ट म ल' जरा खटमल सारकं वाटतं, नुस्तं वाचूनच आंगाला खाज आली पघा... बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 09/23/2008 - 16:14 नवीन
फोटो कुठे आहे? पाव खाऊन टाकला बहुतेक डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 16:16 नवीन
इजाभौ, जरा दम धरा, फोटू येईपर्यंत .... मग दिसेल सगळा झानटामॅटीक पाव, मिरची!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 09/23/2008 - 16:28 नवीन
दिसला दिसला. लैच येळ लागतो खाली यायला फोटुला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/23/2008 - 16:20 नवीन
झानटामाटीक तात्यांची झानटामाटीक रेसिपी.... चालूद्या.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Tue, 09/23/2008 - 17:33 नवीन
'झानटामाटिक बिरेड' मस्तच...... ह्यात जर उकड्लेल्या बटाटाच्ये काप टाकले तर....
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/23/2008 - 19:30 नवीन
पाककृतींच्या पुस्तकात ब्रेडमध्ये बटाट्याच्या सळ्या तळून घाला असं लिहिलयं, म्हणजे ही सुद्धा एक पाकृ आहे. रेवती
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 09/23/2008 - 18:31 नवीन
झानटमॅटीक ब्रेडमध्ये कोल्हापूरी मसाला टाकावा व चकणा म्हणूनही खावा (मिलिटरी रमबरोबर असले झानटमॅटीकच पाहिजेत.. सोबतीला भुर्जीही मस्त लागते) (रमाका॑त) प्रसाद
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 09/23/2008 - 19:12 नवीन
वा काय दिसतोय झानटामाटीक ब्रेड !! मी पण कांदा,कोथिंबीर्,दाणे आणि लिंबू पिळून करते(यातलं फक्त लिंबू पिळाय्च.. बाकीचं नाही!) :) ... अप्रतिम लागतात!! त्या बरोबर दही किंवा ताक पण आवडतं मला कधी कधी..
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 09/24/2008 - 04:45 नवीन
तात्या , फोटो एकदम मस्त ! मी कांद्या बरोबर बारिक चिरलेला टोमॅटो ही घालते. ईश्वरी
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 09/24/2008 - 05:01 नवीन
आवडतो. पदार्थ शिळा झाला की फोडणीचा पाव, फोडणीचा भात वगैरे चटपटीत प्रकार करायला मिळतात. (ताज्या पावाचा/पोळीचा/भाताचा हा झानिटाम्याटिक उपयोग करता येत नाही...) **हिंदीच्या प्रभावामुळे म्हणा "झान्टा..." असे कुठले नाव खाद्यपदार्थासाठी आवडत नाही. झांट्यांचे काजू मात्र चालतात.**
  • Log in or register to post comments
प
प्रगती Wed, 09/24/2008 - 08:20 नवीन
आम्ही याला ' पावाची कोशिंबिर' म्हणतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/24/2008 - 08:39 नवीन
लय भारी फोटू रे तात्या... मस्त !! स्वाती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 53 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 5 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 9 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा