सर्वसाक्षीजी हा फोटो फारच सुंदर आहे...
आमच्या इथ पण खारुताई पाहिला मिळतात पण इमारतींची संख्या वाढल्या मुळे आता त्यांची संख्या देखील कमी झाली आहे..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली
खो खो खो!! पण पोझ बाकी छान दिली आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली आणि शेजारच्या झाडावर गायब झाली.
मनापासून चित्रीकरण करणार्यां साक्षीरावांना नीट पोज दे असे साक्षात श्रीरामांनी सांगितलेले दिसते ;)
मस्त अकृत्रिम पोज मधील फोटो..
इवलीशी खारूताई खूप आवडली.
छोटीशी खारूताई
दगडावर बसली होती
निरागस गोजिरवाण्या
दिसण्याने नटली होती
.
इवल्याश्या अस्तित्वाने
हृदयाचा पीळ गळाला
आडून तिला बघण्याचा
माझा गं उत्सव झाला
.
कवी: तुषार जोशी, नागपूर
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
साक्षीजी, ऑन डिमांड तुम्ही मस्त फोटो टाकला आहे. धन्यवाद.
मी आणि एक मित्र एकदा आमच्या जॉड्रलच्या मागच्या बाजूला "आर्बोरीटम" आहे तिथे दबा धरून बसलो होतो खारींचे फोटो काढायला. मला नाही मिळाला हा, पण त्याचं नशीब मेहेरबान होतं. हे बघा:
ऋषिकेश ती कविताही आवडली.
मी पण एका खारुताईचा फोटो काढला होता २ महिन्यांपूर्वी...तिने पण अशीच मस्त पोझ दिली होती माझ्यासाठी...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
वा वा.....
कलादालनात सुंदर चित्रांची भर पडत चाललीय.
मनापासून चित्रीकरण करणार्यां साक्षीरावांना नीट पोज दे असे साक्षात श्रीरामांनी सांगितलेले दिसते
:) सहमत.
मी पुण्यात होतो तेव्हा संगम ब्रिजवर, घाटपांडे काकांच्या हापिससमोर टिपलेली ही खारुताई
तिथे पूल सुरु होतानाच्या चौथर्यावर बर्याच खारुताया दिसायच्या...बर्याच धीट होत्या.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
खारींचे सारे फोटोज मस्त आलेत. भारतीय खारींच्या पाठीवरचे तीन पट्टे (रामाने सेतुबंधनानंतर दिलेली शाबासकी) युनिक असावेत. ते आंग्ल/अमेरिकन खारींच्या पाठीवर दिसत नाहीत. (त्यांना बिन-पट्टेवाल्या म्हणायचा मोह टाळतो :))
साक्षीजी मस्त फोटॉ.
गणा मास्तर क्लास आहे तुम्ही टाकलेला फोटो.
घाटावरचे भटा यांच्याकडे खारुताइंपैकी भुत खारुताई आले होती की काय?? :)
ह घ्या.
बाय द वे सरपटणार्या प्राण्यांच आणि साक्षीजींच काय साटलोट असेल बर??
त्याना ते भारीच पोज देतात :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी