💬 प्रतिसाद
अ
अनामिक
Fri, 09/19/2008 - 02:10
नवीन
मस्तं! याच पद्धतीने वेफर्सपण करता येतात. बटाट्याचे पातळ चिप्स पाण्यात अर्धवट उकडून घ्यायचे अन व्यवस्थीत कोरडे झाले कि तळायचे. एकदम सह्ही लागतात!!
- Log in or register to post comments
ग
गणा मास्तर
Fri, 09/19/2008 - 07:10
नवीन
इथे स्पर्धा चालु आहे
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Fri, 09/19/2008 - 07:26
नवीन
करून बघीन आता. धन्यवाद प्राजु!
मनस्वी
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .*
आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
- Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर
Fri, 09/19/2008 - 07:29
नवीन
उपाहार गृहात फ्रेन्च प्राईज खाल्ल्यापासून त्याची चांगली पाकृ मीही शोधत होतो.
बाटाट्याच्या उभ्या कापलेल्या तुकड्यांना मक्याचे पीठ (कॉर्न फ्लोर) चोळून ते तळले तर बर्यापैकी कुरकुरीत होतात.
पण फारसे समाधान होत नाही. सही पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2008 - 07:34
नवीन
बटाट्याचे तुकडे करून (फ्राईजच्या आकाराचे) अर्धवट उकडताना त्यात किंचित हळद टाकावी. तळल्यावर अजून छान दिसतात. बाकी कृती प्राजूने दिल्या प्रमाणे. आम्ही रोज पंधरा किलोच्या फ्रेंच फ्राईज बनवतो.
- Log in or register to post comments
अ
अभिज्ञ
Fri, 09/19/2008 - 08:54
नवीन
प्राजुताई,
पाकृ आवडली.
आपण हि पाकृ करून पाहणार.
अभिज्ञ.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Fri, 09/19/2008 - 09:03
नवीन
प्राजु,मी ही असेच बनवते फ्रेंच फ्राईज..(इथे त्याला पोमीज् फ्राईज म्हणतात.)
आणि फ्रोझन फ्राईज पॅकेट आणले तर अवन मध्ये बेक करते तळत नाही.
स्वाती
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 09/19/2008 - 14:02
नवीन
फ्रोझन पाकिटातील पदार्थांवर बर्फाचा अंश राहिल्याने ते तेलात घातले असता तेल सर्वत्र उडून घाण होते. फ्रोझन पदार्थ सहसा बेक करावेत.
फ्राईजसाठी बटाटा अर्धवट उकडून तळणे सर्वात उत्तम.
- Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे
Fri, 09/19/2008 - 12:07
नवीन
करून बघायला पाहिजे...
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 09/19/2008 - 13:46
नवीन
सुंदर पाकृ!
दारूसोबत खायला मजा येते! :)
आपला,
(व्हॅट ६९ प्रेमी) तात्या.
- Log in or register to post comments
श
शितल
Fri, 09/19/2008 - 13:56
नवीन
प्राजु
शब्बाश ग.
मला ही ते खुप आवडतात. मी फ्रोजन पॉकीट आणले की ओव्हन मध्ये लावायचे.
पण हे आता नक्की करून पहीन.
अग तुला पिझ्झा ही माहित आहे का कसा करायचा असेल तर लगेच त्याची ही पाककृती देऊन टाक. :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/19/2008 - 14:11
नवीन
>> अग तुला पिझ्झा ही माहित आहे का कसा करायचा असेल तर लगेच त्याची ही पाककृती देऊन टाक.
त्यातही पिझ्झा बेस कसा करायचा ते!
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 09/19/2008 - 14:17
नवीन
मैद्यात, यीस्ट, मध, ऑलिव्ह ऑईल, मीठ आणि पाणी घालून चांगले मळून घ्यावे. सैल नको आणि घट्टही नको. तास दिड तास झाकून ठेवावे. मळलेले पीठ फुलून येते. ते पुन्हा चांगले मळून* अर्धातास झाकून ठेवावे आणि नंतर लाटावे. लाटलेल्या पोळीला काट्याने अधून मधून टोचून घ्यावे. त्यावर ब्रशने ऑलिव्ह ऑईल लावावे. नंतर त्यावर टॉमेटो सॉस, हवी ती टॉपिंग्ज, चीज वगैरे घालून ३७५ डी. वर १०-१५ मि. किंवा क्रस्ट बेक होईपर्यंत आणि चीज न जळेपर्यंत भाजून घ्यावे. झाला पिझ्झा तय्यार.
* मळून घेताना या पिठाला केवळ पोळीच्या पिठासारखे हाताने मळून न घेता चांगले आपटा धोपटावे. चार-आठ रट्टे द्यावेत.
एखाद्यावर राग काढायला संधी मिळाली नसेल तर त्या संध्याकाळी पिझ्झा करावा. पाककृती हमखास उत्तम होते. ;)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 09/19/2008 - 16:49
नवीन
प्रियाली, मी कधी मध नाही गं घातला पिझा बेस मध्ये. यावेळी घालून बघेन्. नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 09/19/2008 - 16:55
नवीन
बहुधा थोडा गोडुसपणा यावा म्हणूनच असणार आणि साखरेमुळे जास्त गोडुस नको असे असेल. मी कुठेसं वाचलं होतं म्हणून मध घालते. खूप काही फरक लागतो असं नाही. वापरला नाही तरी चालेल.
कधीतरी, खूप कष्ट नको असतील आणि वेगळा पिझ्झा हवा असेल तर परंपराचा एखादा बर्यापैकी लागणारा (सर्वच चांगले असतात असे नाही) चिकनचा मसाला आणून बोनलेस चिकन बनवते. ग्रेव्ही थोडी घट्ट ठेवते आणि पिझ्झ्यावर ही ग्रेव्ही आणि चीज टाकून बनवलेला पिझ्झाही वेगळा आणि चांगला लागतो.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 09/19/2008 - 16:58
नवीन
रात्री राहिलेला मटर पनिर सुद्धा घालून मी केला आहे पिझ्झा आणि सगळ्यात गम्मत म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने आपण भोगीचि भाजी करतो ना.. ती जरा कोरडी करून पिझ्झा वर घातली म्हणे. चांगली लागली असावी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/19/2008 - 17:18
नवीन
साठी पीठ मळताना मी दुधात भिजवते, किंचित साखर बाकी सर्व सेम. एकदा तर पाण्यात पिठ भिजवले व संपवायचे होते म्हणून नॉनफॅट ड्राय मिल्क मिसळले. फारसा फरक नाही पडला इतर वेळेपेक्षा.
रेवती
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2008 - 18:11
नवीन
यीस्टची वाढ साखरेच्या कोमट पाण्यात चांगली आणि भराभर होते. म्हणून ज्या-ज्या पदार्थात यीस्ट घालायचे त्याला १० मिनीटे साखरेच्या कोमट पाण्यात घालून ठेवतात.
पण, हल्ली नवीन यीस्ट मिळते ते असे १० मिनीटे वेगळे ठेवावे लागत नाही. पिठात घालून पिठ डायरेक्ट भिजवायचे. अर्थात त्यातही साखर घालावीच लागते.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 09/19/2008 - 19:43
नवीन
बहुधा अमेरिकेत असेच डायरेक्ट घालण्याचे यीस्ट मिळते कारण त्याच्या वेष्टनावर किंवा पिझ्झ्याच्या पाककृतीत असे सांगितल्याचे वाचले नाही, म्हणजे इन्श्टंट असावे.
यीस्टची वाढ साखरेच्या कोमट पाण्यात चांगली होते हे नव्याने कळले.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/19/2008 - 19:48
नवीन
>> यीस्टची वाढ साखरेच्या कोमट पाण्यात चांगली होते हे नव्याने कळले.
त्याच कारणाने पावातही साखर असते. त्या बॅक्टेरियांना (बॅक्टेरियाच असतात ना), अन्न साखरेतूनच मिळतं.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 09/19/2008 - 20:29
नवीन
मीही अर्धा कप कोमट पाण्यात अर्धा चमचा साखर घालून यीस्ट घालते. ते कोमट पाण्यात चांगले वाढते.. फसफसते..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चकली
Tue, 09/30/2008 - 19:59
नवीन
छान दिसतोय पिझ्झा !. मी तु लिहलेस तसे ओवन बेक्ड फ़्राईज करते..मस्त होतात. फ़्रेंच फ़्राईज इतकी मजा नाही पण छान होतात!
चकली
http://chakali.blogspot.com
- Log in or register to post comments
अ
अद्वैत जोशी
Tue, 09/30/2008 - 20:17
नवीन
हा पिझा माझ्या रसिक खादाडांपर्यंत चवीला तरी येऊ द्या.
फक्त पाककृती वाचण्यात व फोटो पहाण्यात काय मजा .........
न खाता प्रतिक्रीया कशी देणार??
आणि हीच बाब इतर खाद्यपदार्थांसाठी सुद्धा लक्षात ठेवा, मी पुरणापासून हरणापर्यंत सर्व खातो.
(एक रसिक खादाड) अद्वैत जोशी.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 10/01/2008 - 17:36
नवीन
मी पुरणापासून हरणापर्यंत सर्व खातो
मजेशीर वाक्य.
रेवती
- Log in or register to post comments
म
मिना भास्कर
Sat, 11/08/2008 - 01:57
नवीन
इतकी परफेक्ट पाकृ कशी दिलीस? इटलीत तर नाहीस ना? :?
- Log in or register to post comments
म
मिना भास्कर
Sat, 11/08/2008 - 02:07
नवीन
चीज आधीच न घालता १० ते १२ मिनीटांनी घालावे. टॉपिंग करीता ऑलिव्ह, मश्रुम, वापरले तर त्याला इटलियन चव येईल. भाज्या आवडत असतील तर, वांगी, सिमला मिरची, घोसावळे, यांचे काप थोड्याशा तेलावर हलकेसे शॉलो फ्राय करुन घ्या. ते टॉपिंग करता वापरा.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/19/2008 - 15:10
नवीन
अश्याच पाककृती ज्याने वजन वाढण्याची ग्यारंटी. फ्रेंच फ्राईज आवडत नाहीत असा माणूस विरळा (खूपच अवांतरः मला अशी व्यक्ती माहीत आहे जीला हापूस आंबा आवडत नाही) .
पाकृ आवडली. तू सांगितली होतीस एकदा मला.
रेवती
- Log in or register to post comments
श
शितल
Sat, 09/20/2008 - 00:20
नवीन
प्राजु,
आता तर तु मला पिझ्झा कसा करायचा तो नाही सांगितलेस तर तुझ्या घरी येऊन पिझ्झा खाणार.
चल लवकर दे पिझ्झाची पाककृती.:)
- Log in or register to post comments
य
येडा खवीस
Wed, 10/01/2008 - 15:51
नवीन
बाटाट्याचे तुकडे अंदाजे ४०% शिजू द्यावेत.
अरे हे नेमकं कसं ठरवायचं......
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
- Log in or register to post comments
P
pooja kulkarni
Mon, 10/13/2008 - 07:53
नवीन
तु केलेलि रेसिपी आव् डली
- Log in or register to post comments
म
मीनल
Mon, 10/13/2008 - 13:44
नवीन
फ्रेंच फ्राईज तयार झाल्यावर ते लगेच फस्त न करता त्याची भाजी ही करता येते.
फोडणी करावी.
त्यात लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालावेत.
मग त्यात सफेद तीळ ,काजूचे तुकडे घालून गार होऊ द्यावे.
वरून हवे असेल तर मीठ,चिमूट भर साखर घालावी.
थोडेसे लाल तीखट रंगासाठी घालावे .
त्यात फ्रेंच फ्राईज हलकेच मिक्स करावेत म्हणजे ते मोडणार नाही .
सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घालावी.
पार्टी स्टाईल मस्त कुरकुरीत भाजी होते.
मीनल
- Log in or register to post comments
स
सुधा सुहास कुलकर्नी
Sat, 10/18/2008 - 12:29
नवीन
आवडली बघ एकदम
आजच करते
- Log in or register to post comments