सर्व मिपाकरांना नमस्कार
मला चांगला मोबाईल घ्याचा आहे. बजेट 10,000रु/- फक्त(?)
Yu Yureka Plus घ्यावा हा विचार आहे.
तरीही सर्व मिपाकरांनी योग्य मॅाडेल सुचवा.
मोबाईल कडून अपेक्षा (Requirement)
1.चांगले बॅटरी बॅकअप.
2.उत्तम कॅमेरा
रेड एम आय ४ घेण्यात आलेला आहे.... अखेर विंडोज चा संग सोडावा लागतोय. ही जबरदस्ती आहे खरं म्हणजे. पण असो. नव्याचं स्वागत स्वागतासारखंच होईल. पण विंडोज फोन मात्र जपण्यात येईल.
३ जीबी रॅम. स्नॅपड्रॅगन ४३५. आद्रीनो ५०५ जीपीयु. ४१०० बॅटरी. अँड्रॉईड ६.० एमआययूआय ६
उत्सुक !
मी दोन महिन्यांपुर्वी नोकीया ५ घेतला. अतिशय उत्तम क्वालिटी. खरतर नोकीया बाजारात नसल्यामुळेच मी नाईलाजाने इतर फोन वापरले होते. कमी फिचर्स आणि जास्त किंमत असले तरी नोकीया च हवा असा माझा आग्रह होता. आता नोकीयाचे नवनवे मॉडेल्स बाजारात यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे काही वर्षे तरी चिंता नाही.
नोकिया ५, ३ जीबी रॅम घेण्यात आलेला आहे, दणकट अल्युमिनियम बॉडी, अन सोबत मेक इन इंडिया प्रॉडक्ट वापरायचा आनंद! बॅटरी वगैरे सगळं काही आलबेल आहे अजून तरी (नोव्हेंम्बर कडे घेतलाय, फ्लिपकार्ट वरून) , अन हो माझा नोकिया ५ ओरियो अपडेट झाला सुद्धा
टाइम टू टाइम सिक्युरिटी पॅच येत राहतात नोकियाचे ते एक बेस्ट, स्टॉक अँड्रॉइड असल्यामुळे ब्लोटवेयर जवळपास शून्य, त्यामुळे बॅकग्राउंड एप प्रोसेस मुळे बॅटरी ड्रेन होणे नाही, मला एक प्रश्न पडलाय, नवीन सिक्युरिटी पॅच आला की जुन्यावरच ओव्हरराईट होतो की नवी स्पेस लागते त्याला?
लेनोवो के८ नोट ( व्हेनम काळा) ऑन-लाइन अॅमेझॉन वरून खरेदी केला.
दोन तीन दिवसात कुरियरने घरी येईल.
आरडी सेल व हाडेफाका डेबिट कार्ड खरेदी सुट मुळे रू.१४,०००चा रू.९८९० ला पडला
४जीबी, ६४ जीबी इन्टरनल मेमरी, १३एमपी+५एमपी डयुअल कॅमेरा आणि बरेच काही.
व्हॅल्यू फॉर मनी !
https://www.amazon.in/Lenovo-Note-Venom-Black-4GB/dp/B01LZKSUXF?tag=googinhydr18418-21&tag=googinkenshoo-21&ascsubtag=a5ae6b05-a2c0-44ab-baa4-1a050119896b
तुमचे बजेट किती आहे ? काय स्पेसिफिकेशन हवीत ? त्यावर कोणकोणती अॅप्स वापरणार आहात हे तर कळू द्या !
पोस्ट कोविड, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर दसरा दिवाळी निमित्त सवलतीत सेल १६-१७ ऑक्टोबर पासॉन सुरु होणारेत, त्यावर अक्षरशः शेकड्याने आहेत.
कुठला ठरवलात ते इथे टाकायला विसरू नकात.
यावरून आता कोणता घ्यावा हे लगेच तुलना करून सांगता येईल.
ड्यूल सिम ,ड्यूल 4g LTE हा नवीन ट्रेंड आहे android phone साठी. ( एकाचवेळी जिओ आणि एरटेल/वोडा कार्ड
active राहाणे)
ओटिजी कनेक्टिविटी हवीच. चांगली क्याम्रे हाइ रेझ विडिओ काढतात आणि मेमरी लवकर फुल होते. ते दुसऱ्या कार्डावर ढकलण्यासाठी.
६ जीबी १२८ जीबी मेमरि आणी १८,००० बजेट मध्ये असलेले फोन सुचवा
सॅम्सन्ग एम ३१ , मोटो फ्युजन प्लस , रेड मी नोट प्रो ९ हे तीन शॉर्ट्लिस्ट केलेत .
यातला चांगला कोणता ??
पूर्वीच्या जे सिरिजचं नाव बदलून एम केलंय.
A seriesयापेक्षा चांगली आणि S galaxy आणखी चांगली.
------------
A चा प्रॉब्लेम म्हणजे हाइब्रिड सिम स्लॉट . (पण ६४ /१२८ जीबीला आणखी मेमरी कार्डाची गरज नसते.)
Lenovo Vibe K5 Note (Gold, 64 GB) (4 GB RAM) (किंंमत १२९९९)या नवीन संचाबद्दल कोणाला काही माहिती आहे का?