शीर्षक मिपासंवाद छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: निकाल
नमस्कार मंडळी,
छायाचित्रणकला स्पर्धेच्या १४व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. प्रवेशिका व स्पर्धेसाठी नसलेली छायाचित्रेही एकाहून एक होती. मत नोंदवणार्या अनेक मिपाकरांनीही हीच भावना व्यक्त केली आहे.
तृतीय क्रमांक मिळाला आहे, मिनियन यांच्या येलोस्टोन तलावाच्या छायाचित्राला.
द्वितीय क्रमांक मिळाला आहे, फोटोग्राफर243 यांच्या पुण्याजवळील एका जलाशयाच्या छायाचित्राला.
अन प्रथम क्रमांक मिळाला आहे, स्पा यांच्या 'राजगडावरील एक तळे' या छायाचित्राला.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
ता.क. छायाचित्रणकलेच्या पुढच्या भागाची घोषणा लौकरच करण्यात येईल.
-----------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मंडळी,
आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील.
तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या.
या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान
नमस्कार मंडळी,
यंदाच्या स्पर्धेला दिलेल्या उत्साही प्रतिसादाबाबत मनःपूर्वक धन्यवाद.
या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबदलही जरूर लिहा.
कोणाचेही छायाचित्र मतदानासाठी घ्यायचे राहिले असेल तर ते त्वरित लक्षात आणून द्यावे. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ९ तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
जी छायाचित्रे स्पर्धाविषयाला अनुरुप नाहीत त्यांना मतदानाच्या धाग्यातून वगळले आहे याची कृपया नोंद घ्यावी. सदर स्पर्धकांना प्रवेशिका बदलण्याची विनंती संदेशाद्वारे पाठवण्यात आली होती.
या वेळी मतदानासाठीचा अनुक्रम शेवटच्या प्रवेशिकेपासून उलट्या दिशेने आहे. फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे.
क्र.२ ग्रॅन्ड मरे,मिनेसोटा येथील लेक सुपिरिअरचा किनारा

क्र.३ पाबेघाट ओलांडून केळदच्या दिशेने जाताना दिसणारं एक जलाशय

क्र.४ कशेळी बांध, आडिवरे मार्ग, रत्नागिरी
क्र.६ बो लेक, बान्फ नॅशनल पार्क कॅनडा

क्र.९ स्नोडोनिया पर्वतावरचं एक तळं

क्र.१० ओल्पर लेक ब्राउनश्वेग, जर्मनी.

क्र.१५ लेक लुगानो, स्वित्झर्लंड

क्र.१९ शांग्रिला (युन्नान राज्य, चीन)
क्र.२४ युनोको लेक, निक्को, जपान
क्र.२५ किकपू स्टेट पार्क, ओकवूड, इल्लिनॉय, अमेरिका
























