कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१०

मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते. मग रंगाची दुनिया मला चित्रित करता येत असेल तर मी कृष्णधवल चित्रणात का रमायचे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. १९३० नंतर जेव्हा रंगीत फिल्म उपलब्ध झाली तेव्हा त्याची प्रत एवढी चांगली नसायची. दिसणारे रंग व छायाचित्रात येणाऱ्या रंगात बराच फरक पडत असे. शिवाय डार्करुममधे जे घोळ व्हायचे ते वेगळेच.... नंतर नंतर जेव्हा रंगीत फिल्मची प्रत अतोनात सुधारली तेव्हा मात्र सगळे छायाचित्रकार या माध्यमात छायाचित्रण करु लागले. शिवाय आठवणी साठवून ठेवण्यासाठी छायाचित्रण करतात त्यांना तर ही पर्वणीच होती. काहीच काळातच कृष्णधवल फिल्म मिळते का नाही अशी चौकशी लोक करु लागले. पण ॲन्सेल ॲडॅम्स सारख्या अनेक छायाचित्रकारांनी कृष्णधवल छायाचित्रांची ताकद व परिणामकारीकता ओळखली होती. त्यामुळे रंगीत दुनियाची छायाचित्रे कितीही रंगीत झाली तरीही या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या तोंडातून प्रशंसोद्गार बाहेर पडत व अजूनही पडतात. ‘ब्लॅक अँड व्हाईटची मजा काही औरच’ हे त्यातील एक नेहमी कानावर पडणारे वाक्य. असो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

रंगीत छायाचित्रणाचा सामान्य जनतेत होणारा वापर इतका वाढला की कृष्णधवल चित्रे ही जुन्या जमान्याचीच असा विचार करण्याचा पायंडाच पडून गेला. मला वाटते फार पूर्वी एखादे छायाचित्र काढल्यावर ते हातात पडेपर्यंत इतका वेळ जायचा की ते छायाचित्र कालचे हो़ऊन जायचे. त्यामुळे की काय चित्रपटसृष्टीमधे भुतकाळ दाखविताना तो सेपिया किंवा कृष्णधवल छटेमधे दाखविण्याची पद्धत पडली असावी.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मग कृष्णधवल छायाचित्रे अजुनही जनमानसांवर गारुड करतात याचे काय कारण असावे बरं ? खर तर तुम्ही त्या छायाचित्रातील एक अत्यंत महत्वाचा घटक ‘रंग’ हा काढून टाकता. पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्या छायाचित्रातील इतर अत्यंत महत्वाचे लपलेले घटक आपल्या दृष्टीस पडतात. यात तर कृष्णधवल छायाचित्रणाचे यश सामावलेले नाही ना? विचार केल्यावर मला तरी हे पटले. ज्या छायाचित्राचा विषय हा रंग नाही त्यात रंगाची गिचमीड रसभंग करु शकते हे मी माझ्या अनेक छायाचित्रांमधे स्वत: अनुभवले आहे. याचा उलट अर्थ असाही होतो की महत्वाचा व्यापून टाकणारा घटक "रंग' गेल्यामुळे छायाचित्रकाराला इतर घटकांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल..... (जे तुम्हाला तुमच्या छायाचित्रात करायचे आहे.)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

यात कृष्णधवल चित्रे कशी काढावीत किंवा त्यामागे कुठला दृष्टीकोन असावा, कुठली छायाचित्रे कृष्णधवल करावीत हे लिहिण्याचा माझा मुळीच मानस नाही. आपल्याला ते माहीत आहेच... आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांपैकी योग्य अशा एकाचे कृष्णधवलमधे रुपांतर करुन आपण येथे टाकावे...त्या अगोदर खालील माहिती वाचल्यास आपल्याला मदत होईल असा विश्र्वास वाटतो.

कृष्णधवल छायाचित्र काढण्यासाठी आपल्याला विषय पूर्णकृष्ण ते पूर्णधवल या दोन छटांमधे पडणार्‍या अनेक छ्टांमधे पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे. यात अवघड काही नाही, सरावाने ते सहज जमते. जर तुम्ही पूर्वी कधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डेव्हलप केली असेल तर तुम्हाला हे लगेचच समजेल. ... हे रंग कृष्णधवलच्या अनेक छटांमधे पहाण्याने ते छायाचित्रात कसे दिसतील हे आपल्याला समजते. आता हल्लीच्या डिजिटल डार्करुममधे ही छटा तुम्ही बदलू शकता पण कुठली किती बदलायची यासाठी हे मुलभूत ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटते.

आता खालील आकृतीमधे प्रत्येक रंगाची छटा कृष्णधवलमधे कशी दिसते हे बघा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आता जेव्हा तुम्ही दोन निराळे रंग बघता तेव्हा कदाचित कृष्णधवल चित्रामधे त्याची एकच छटा असू शकते किंवा त्यांमधे अगदी थोडा फरक असू शकतो. या छायाचित्रांतील गंमत त्यामुळे निघून जाते. उदा. खाली एका पुस्तकातील तीन छायाचित्रे दाखविली आहेत.

१ रंगीत....मोटारींचा रंग आपल्या डोळ्याला भावतोय कारण ते रंग गडद व वेगळे आहेत्..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

२ कृष्णधवल... यात हे छायाचित्र किती मद्दड झाले आहे ते बघा. कारण रंगीत चित्रामधे जरी ते रंग वेगवेगळे दिसत असले तरी कृष्णधवलमधे त्याची छटा एकच आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

३ एकाचा टोन बदलल्यावर .....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मित्रहो....
या धाग्यावर आपली (प्रत्येकी एक) कृष्णधवल चित्रे टाका..... अवधी : २० दिवस.
जास्त टाकलीत तर कृपया जी स्पर्धेसाठी नाहीत त्यावर तसे स्पष्ट लिहा.
पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी पुढे १० दिवस.

शेवटी, मी काढलेली छायाचित्रे ही सजावट म्हणून टाकलेली आहेत....त्याला दुसरा अर्थ नाही.... आपण अधिक चांगली टाकाल याची खात्री आहे....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

शेवटी छायाचित्र एडिट करा, करु नका....ते पाहिल्यावर... भावले पाहिजे, आवडले पाहिजे हे महत्वाचे...

स्पर्धेसाठी शुभेच्छा !

जयंत कुलकर्णी
संपादकांना: यात हवा तो बदल करण्याचा आपला अधिकार मान्य करीत आहे.... :-)