Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निर्णय (शशक स्पर्धा कथा)

न
नाखु यांनी
Tue, 08/25/2015 - 07:13  ·  स्पर्धा
स्पर्धा
"वार्याने पण सकाळीच उच्छाद मांडलाय !" ती पुटपटली. पण खरंच वैताग बाहेरच्या घोंघावणार्याबद्दल का मनातल्या , नीट समजेना. महिनाभरातल्या अनाकालनीय घडामोडी आणि हा असा ह्ट्टी..नको म्हटलं तरी कालची भेट आठवलीच. "मग सांगीतेलस ना तुझ्या घरच्यांना ?" ..... "धडाधडा बोल घुमेपणा सोड आता." "मला धीरच होत नाही, सांगायला" " पण कधीतरी कळणारच ना मग तूच सांगीतलेले चांगले ,तेही लगेचच" "अरे याचे परिणाम काय होतील माहीतीयत ना ? तू सांगीतल का त्यांची संमती ?" " सांगीतल्येय आणि मी स्वछंदी माझा निर्णय मीच घेतो, माहीतेय घरच्यांनाही !" ... पडद्याच्या धक्क्याने पडलेली तस्वीर उचलताना डोळ्यातील पाणी बोटांबरोबर तस्बीरीला कधी लागले ते तीलाही कळले नाही. तस्बीरीतले दोघे खरे आपल्यालाच बघतायेत का भास आहे नुसता. ============

उत्तरार्ध :

तस्बीरीत कसे अगदी एक्मेकांत विरघळल्यासारखे आणि उमलणार्या फुलासारखे प्रसन्न. पण आता इतकी टोकाची फरपट ? परतीचे दोर तर मागे नाहीतच या प्रेमविवाहात. मग पुढे ? दाराची बेल कर्कश्श वाजत राहीली. "आई $$$$ तुम्ही !!! या ना, पण तो नसतो इथे हल्ली !" "माहीत्येय म्हणूनच आलेय " "पण इथला पत्ता..." "ते महत्वाच नाही तुझे कपडे आवरून सामान घे आणि चल घरी" "घरी ? कुठे?? आणी तुम्हाला कुणी....." "सगळं घरी गेल्यावर सांगते. माझ्या लेकाला तुला मुक्त करायचं ना मग तूच त्याला सोड कायमचा, आणि ..." पण आई मी कुठे जाऊ ? कुठे म्हणजे? माझ्याकडे, लेक आपल्या आईकडेच येणारना ! घट्ट मिठीत आईच्या मायेचा रंध्रानुभव डोळ्यातल्या अश्रूंनी बाहेर पडत होता तर "अहो आई" स्वतःच्या डोळ्यातील अश्रूंना मुक्त करीत होत्या

वाचनखूण लावा
| 3164 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 3164 views

न
नाखु Tue, 08/25/2015 - 07:31 नवीन
दुरुस्ती करणे स्पर्धेतून हटवणे. नजर्चुकी क्षमा नाखुस
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 08/25/2015 - 08:25 नवीन
खासच! सतराशे साठ खाष्ट सासवांच्या (एवढ्या खाष्ट नसतात खरंतर, सुनांच्या मनातच जास्त असतात) गोष्टी पेक्षा ही एक गोष्ट वाचावी.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Tue, 08/25/2015 - 08:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 08/25/2015 - 08:39 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/25/2015 - 15:53 नवीन
उत्तम समारोप.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/26/2015 - 03:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 08/25/2015 - 16:13 नवीन
अर्थात्, पूर्वार्धाचा उत्तरार्धाला संदर्भ आहेच, पण उत्तरार्ध आधिक आवडला, किंबहुना, मला वाटतं की उत्तरार्ध on its own एक सशक्त शतशब्दकथा आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 08/25/2015 - 20:31 नवीन
अगदी असेच! कथा आवडली!
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Tue, 08/25/2015 - 16:13 नवीन
आवडली कथा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/25/2015 - 16:24 नवीन
आवडली कथा.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 08/25/2015 - 20:43 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 08/26/2015 - 08:22 नवीन
ही सासू पाहून माझी आई आठवली. मुलासुनेच्या भांडणात मुलाला घराबाहेर काढणारी आणि त्याने आत्महत्या केल्यवर भिरभिरलेली. कथा म्हणून सुरेख.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Fri, 08/28/2015 - 20:17 नवीन
ओह्ह.. खरेच.. ही कथाही आवडली
  • Log in or register to post comments
G
gogglya Wed, 08/26/2015 - 08:32 नवीन
अश्या विषयांवर मालीका का बनवत नाहीत मराठी निर्माते ?
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 08/26/2015 - 10:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
माधुरी विनायक Wed, 08/26/2015 - 12:52 नवीन
कथा आवडलीच. सत्य कथा असेल तर सोन्याहून पिवळे...
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 08/26/2015 - 12:58 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 08/26/2015 - 13:20 नवीन
+१ जबरदस्त कथा.... (आमच्या एका ओळखीच्या घरात घडलेली कथा.त्यामुळे जास्त आवडली.)
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 08/27/2015 - 09:09 नवीन
मस्त अश्या गोष्टी प्रत्यक्षात सुधा घडतात . काही महिन्यांपूर्वी बातमी वाचली होती
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 08/27/2015 - 18:06 नवीन
+१ सकारात्मक गोष्ट आवडली
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 08/29/2015 - 13:05 नवीन
सुन्दर ! +१ +१
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा