Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

सोबत...

स
संदीप डांगे यांनी
Sat, 08/15/2015 - 10:35  ·  स्पर्धा
स्पर्धा

सदर कथा स्पर्धेसाठी नाही. माझी स्पर्धेतली कथा दुसर्‍या कुणाच्या आधीच उपलब्ध असलेल्या कल्पनेवर आधारित आहे असे लक्षात आल्याने, पूर्ण 'ओरिजिनल' कथा देऊ शकलो नाही याची एक कलाकार म्हणून खंत लागून राहीली. त्यावर उपाय म्हणून ही कथा देत आहे. वाचकांना आवडेल अशी आशा.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

जेवण झाल्यावर त्याने त्या कळकट्ट, घाणेरड्या लॉजच्या, भयंकर वास मारणार्‍या खोलीतल्या पलंगावर ताणून दिली.

जेवणाचे पैसे घ्यायला आलेला नोकर अंमळ रेंगाळला...

त्याने विचारले, "काय पाहिजे अजून...टीप?"

"मला काही नको साहेब... तुम्हाला काही लागेल काय आणखी...?"

"नाही. जेवण झाले. आता झोपतो. बास."

"झोपण्यासाठीच... सोबत पाहिजे का? तुमच्या आवडीची मिळेल, एकापेक्षा एक."

तो काय बोलतो हे लक्षात येताच त्याच्या अंगावरून सर्र्कन काटा आला... त्याने त्यास हाकलून लावले.

रात्रभर तो तळमळत कुशीवर कुशी बदलत होता. एका फोनची वाट बघत.

सकाळी तो फोन वाजला...

"सगळे गेलेत. आता चार दिवस आपण दोघेच. तू लवकर ये."

ह्याने ताबडतोब आवरले. आज सहा महिन्यांनी उपवास सुटणार होता.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


वाचनखूण लावा
| 2502 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 2502 views

प
पैसा Sat, 08/15/2015 - 11:02 नवीन
जर नकळत दुसर्‍याची कल्पना वापरली गेली असेल तर त्याला अगदी कठोरपणे वा़ङ्मयचौर्य म्हणता येणार नाही. असे होऊ शकते. कधी कल्पना माहीत असेल तर त्याचा विस्तार वेगळ्या प्रकारे केला तर स्वतंत्र कलाकृती होते. तसेही जगात ओरिजिनल कथा कल्पना ७/८ च आहेत म्हणतात ना!
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Mon, 08/17/2015 - 20:26 नवीन
१. वरील कथा आवडली . २. प्रतिसादांमध्ये व्यक्त केल्या नुसार खंतावण्याचे कारण नाही. ३. पैसाताईंना विनंती की कधीतरी त्यांनी उल्लेखिलेल्या ७/८ कथा कल्पना मिपावर दयाव्यात.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 08/15/2015 - 12:14 नवीन
छान कथा आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/15/2015 - 15:14 नवीन
सुंदर शशक ! तुमच्या विनंतीला मान देवून ही कथा स्पर्धेतून काढली असली तरी, "एकसारख्या कथाबिजावर वेगवेगळ्या कथा असू शकतात, असतात." असे माझे व्यक्तीगत मत आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/15/2015 - 15:22 नवीन
आजच्या दिवसाचेच पहा ! १५ ऑगस्ट १९४७ च्या घटनेवर वर किती कथा, कविता, कादंबर्‍या, लेख, चित्रणे केली गेली आहेत याची गणती नाही... भविष्यातही स्वातंत्र्यदिनावर लिहीले/चित्रिले जाईल... आणि ते करताना कोणत्या शब्दसमुच्च्याची अथवा चित्रांची चोरी केलेली नसली तर त्या सर्व कृती मूळ/अस्सल/ओरिजिनल असतील... फक्त वापरलेल्या बीजावर कोणाचा कायदेशीर स्वामित्वहक्क प्रस्थापित झालेला नसावा, इतकेच.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 08/17/2015 - 18:19 नवीन
अगदी योग्य. बीज एक असलं तरी विस्तारा मुळे ती कथा अजुन सशक्त वाटु शकते, तिचं एक वेगळंच रूप आपल्या समोर येऊ शकतं. याचं अगदी बोलकं आणि उत्तम उदाहरण म्हणजे शेक्स्पीअर च्या हॅम्लेट ची भारतीय अभिव्यक्ती: हैदर !! कुणी विचार केला होता की हॅम्लेट च्या द्विधा मनस्थितीचं इतकं परिणामकारक चित्रण काश्मीर च्या पार्श्वभूमीवर बेमालुमपणे उमटेल?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 08/24/2015 - 14:13 नवीन
लईच्च डो़कं लावून तयार केलेला पिच्चर!!
  • Log in or register to post comments
ड
डायवर Sat, 08/15/2015 - 16:00 नवीन
आधी वाटले " होऊ दे लॉजचा खर्च " प्रकारातली कथा असेल पण शेवटच्या कलाटणी मुळे कथा आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sun, 08/16/2015 - 05:14 नवीन
मस्त आहे!!!
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Mon, 08/17/2015 - 13:27 नवीन
एकसारख्या कथाबिजावर वेगवेगळ्या कथा असू शकतात, असतात.>>>+१११ तरीही माझी भयकथा अप्रकाशित केली . मुळ कथेपेक्षा भयानक वेगळी असूनसुद्धा
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 08/18/2015 - 18:44 नवीन
६०६ वाचने आणि फक्त ९ प्रतिसाद? ब्ला ब्ला ब्ला.... (पुढचं काय आठवत नायीये ओ.. 'मी' ची कहाणी..) (प्रतिसाददात्यांचे धन्यवाद! पैसाताई आणि म्हात्रेकाका, धन्यवाद! तुमच्या मताशी सहमत आहेच. कथाबीज फुलवणे ही पण एक स्वतंत्र कला आहेच. कित्येक कथाबीज उत्तम व नेहमीचंच असूनही फुलवता न आल्याने मोठमोठे चित्रपट गंडलेत.)
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 08/18/2015 - 23:08 नवीन
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 08/24/2015 - 14:17 नवीन
उगाच फापटपसारा नसलेली, मुद्द्याचं बोलणारी.... (कॉलेजात असताना एक मित्र ठाण्याला जायचा दर दोन महिन्यानी.. )
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 35 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 40 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा