सोबत...
सदर कथा स्पर्धेसाठी नाही. माझी स्पर्धेतली कथा दुसर्या कुणाच्या आधीच उपलब्ध असलेल्या कल्पनेवर आधारित आहे असे लक्षात आल्याने, पूर्ण 'ओरिजिनल' कथा देऊ शकलो नाही याची एक कलाकार म्हणून खंत लागून राहीली. त्यावर उपाय म्हणून ही कथा देत आहे. वाचकांना आवडेल अशी आशा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जेवण झाल्यावर त्याने त्या कळकट्ट, घाणेरड्या लॉजच्या, भयंकर वास मारणार्या खोलीतल्या पलंगावर ताणून दिली.
जेवणाचे पैसे घ्यायला आलेला नोकर अंमळ रेंगाळला...
त्याने विचारले, "काय पाहिजे अजून...टीप?"
"मला काही नको साहेब... तुम्हाला काही लागेल काय आणखी...?"
"नाही. जेवण झाले. आता झोपतो. बास."
"झोपण्यासाठीच... सोबत पाहिजे का? तुमच्या आवडीची मिळेल, एकापेक्षा एक."
तो काय बोलतो हे लक्षात येताच त्याच्या अंगावरून सर्र्कन काटा आला... त्याने त्यास हाकलून लावले.
रात्रभर तो तळमळत कुशीवर कुशी बदलत होता. एका फोनची वाट बघत.
सकाळी तो फोन वाजला...
"सगळे गेलेत. आता चार दिवस आपण दोघेच. तू लवकर ये."
ह्याने ताबडतोब आवरले. आज सहा महिन्यांनी उपवास सुटणार होता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
प
Sat, 08/15/2015 - 11:02
नवीन
जर नकळत दुसर्याची कल्पना वापरली गेली असेल तर त्याला अगदी कठोरपणे वा़ङ्मयचौर्य म्हणता येणार नाही. असे होऊ शकते. कधी कल्पना माहीत असेल तर त्याचा विस्तार वेगळ्या प्रकारे केला तर स्वतंत्र कलाकृती होते. तसेही जगात ओरिजिनल कथा कल्पना ७/८ च आहेत म्हणतात ना!
Sat, 08/15/2015 - 15:22
नवीन
आजच्या दिवसाचेच पहा ! १५ ऑगस्ट १९४७ च्या घटनेवर वर किती कथा, कविता, कादंबर्या, लेख, चित्रणे केली गेली आहेत याची गणती नाही... भविष्यातही स्वातंत्र्यदिनावर लिहीले/चित्रिले जाईल... आणि ते करताना कोणत्या शब्दसमुच्च्याची अथवा चित्रांची चोरी केलेली नसली तर त्या सर्व कृती मूळ/अस्सल/ओरिजिनल असतील... फक्त वापरलेल्या बीजावर कोणाचा कायदेशीर स्वामित्वहक्क प्रस्थापित झालेला नसावा, इतकेच.
Mon, 08/17/2015 - 18:19
नवीन
अगदी योग्य. बीज एक असलं तरी विस्तारा मुळे ती कथा अजुन सशक्त वाटु शकते, तिचं एक वेगळंच रूप आपल्या समोर येऊ शकतं. याचं अगदी बोलकं आणि उत्तम उदाहरण म्हणजे शेक्स्पीअर च्या हॅम्लेट ची भारतीय अभिव्यक्ती: हैदर !! कुणी विचार केला होता की हॅम्लेट च्या द्विधा मनस्थितीचं इतकं परिणामकारक चित्रण काश्मीर च्या पार्श्वभूमीवर बेमालुमपणे उमटेल?
Tue, 08/18/2015 - 18:44
नवीन
६०६ वाचने आणि फक्त ९ प्रतिसाद? ब्ला ब्ला ब्ला.... (पुढचं काय आठवत नायीये ओ.. 'मी' ची कहाणी..)
(प्रतिसाददात्यांचे धन्यवाद! पैसाताई आणि म्हात्रेकाका, धन्यवाद! तुमच्या मताशी सहमत आहेच. कथाबीज फुलवणे ही पण एक स्वतंत्र कला आहेच. कित्येक कथाबीज उत्तम व नेहमीचंच असूनही फुलवता न आल्याने मोठमोठे चित्रपट गंडलेत.)