Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[शतशब्दकथा स्पर्धा] वड्यांवरची मालकी

श
शब्दानुज यांनी
Tue, 08/04/2015 - 15:21  ·  स्पर्धा
स्पर्धा
सकाळी नाष्ट्यासाठी एका वड्याच्या गाड्यावर थांबलो होते. त्याच्याकडुन प्लेट घेताना नेमकी ती खाली मातीत पडली. लगोलग तो रडु लागला," साहेब 'त्यानं' वडे मोजुन ठेवले व्हते .. आता तेवढं पैसं नाही दिलं तर.." पाकीट काढलं आणि पैसे देऊन मी निघालो. जाताना बघीतले तर मातीतले वडे तो वेचुन खात होता. समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्याच्यासाठी एकही नव्हता. त्याला त्याच्याच गाडीवर पोटभर जेऊ घातलं आणि मी निघालो. पाच पाऊल जाताच त्याने आवाज देऊन मी विसरलेलं पैशाने भरलेलं पाकीट मला परत आणून दिलं.... घरी परतलो आणि कपडे बदलताना लक्ष्ात आलं की रस्त्यावरुन येताना माझं पाकीट कोणीतरी मारलं आहे. प्रत्येकजण इथे भुकेला आहे. प्रत्येकाची भुक मात्र निरनिराळी..

वाचनखूण लावा
| 7127 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • 7127 views

न
नूतन सावंत Sat, 08/08/2015 - 05:58 नवीन
सुरेख.+१
ए
एक एकटा एकटाच Sat, 08/08/2015 - 20:06 नवीन
+१
स
सुहास झेले Sat, 08/08/2015 - 22:06 नवीन
वाह !!
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 52 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा