Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शूट यू बासटर्ड

अ
अद्द्या
Tue, 02/24/2015 - 19:04
💬 12 प्रतिसाद
गेली तीन वर्ष सलग लीग च्या सेमीजपर्यंत धडक दिली होती . . पण प्रत्येक वेळी तिथून बाहेर पडलो होतो . . कधी वेळकाढू खेळ . . कधी ऐनवेळी केलेल्या चुका . कधी सामन्याच्या आदल्या दिवशी झालेली इंज्युरी . काहीना काही कारण . पण बाहेर पडलो होतो . . स्वस्तिक फुटबाल क्लब . हा आमचा क्लब . आम्ही ५-६ जणांनी सुरु केलेला . . रोज फुटबाल खेळायचो . . आणि सहज बोलता बोलता ठरलं कि लोकल लीग मध्ये पण टीम उतरवू . . ६ जण होतोच . आणखी ५-६ जण इकडून तिकडून मिळवले . . झाला क्लब सुरु . . यातले सहा जण म्हणजे . . म्हमद्या . ( सेंटर हाफ ) अविनाश ( लेफ्ट डिफेंडर ) , अप्पू (गोल कीपर) , विकी ( लेफ्ट फोरवर्ड ) रोह्या(राईट फोरवर्ड ) आणि मी . (राईट डिफेंडर ) बाकी सगळी चिल्ली पिल्ली असायची . . ज्यांना मोठ्या टीम मध्ये जायचं असेल ते इथे येउन १-२ वर्ष खेळून मग बाकी टीम मध्ये जात . . आम्हीही कधी कोणाला अडवलं नाही . . पण हि सहा मंडळी फिक्स होतो . . कारण अगदी पाचवी सहावीत असल्यापासून ओळख . कोणीही एका शाळेतलं नाही . शाळेत असताना एकमेकाविरुद्ध खेळून . आणि एक १-२ वेळा स्टेट लेवल वर बेळगाव साठी एकत्र खेळून ओळख झाली होती . . तीच नंतर वाढली . . आम्ही फक्त बॉल विकत घ्यायला पैसे घ्यायचो सगळ्यांकडून . बाकी जर्सी आणि लीगसाठी लागणारी एन्ट्री फी आम्हीच ६ जण भारत होतो . . एक तर आम्हीच काय ते नोकरी धंदे करणारे होतो . . बाकी सगळे वेगवेळ्या कॉलेजचे विद्यार्थी . . आणि पैश्यासाठी खेळ अडू नये कोणत्याही विद्यार्थ्याचा हा एक विचार स्वानुभवावरून आला होता . . त्यामुळे जो काही खर्च असेल तो आम्हीच करायचो . . म्हमद्या बद्दल थोडं वाचलं असेल तुम्ही लोकांनी . इतर ५ जण पण असेच "वेडे" म्हटले जावेत असे होते . . फक्त खेळासाठी खेळणारे . खेळाची मजा घेणारे . अविनाश . हा कम्प्युटर इंजिनियर होता . स्वतःची छोटीशी फर्म होती पठ्ठ्याची , महिना ३०-४० हजार कमवत होता . पण साला शेवटी होता गोखले . पक्का कंजूस . . पैसे खर्च करायला कंजूस . पण ग्राउंड वर याच्या सारखा हाच . डावीकडून हा कोर्नर ते तो कोर्नर असा नुसता पळत असायचा . कधी इंज्युर झालेला आठवत नाही . . अत्यंत सेफ खेळायचा . त्याला मी ओळखत असेलेल्या ८-९ वर्षात फक्त एकदाच येलो कार्ड घेतलं होतं . ते हि समोरून गोलकीपर रश करत असताना हा पण त्याच्या अंगावर गेला म्हणून . . पण म्हणून कधी डिफेंडिंग मध्ये कधी काही कमी पडलं नाही . समोरच्याला न पाडवता बॉल काढून घ्यायचा . कधी रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयावर चिडला नाही . अत्यंत शांत डोकं होतं माणसाचं . त्यामुळे काहीवेळा आम्ही त्याला संत अव्या म्हणून चिडवायचो . एक से एक कोर्नर किक घ्यायचा . . गोलकीपर नुसता बघत राहायचा . . कोर्नर शूटर साठी एक "ड्रीम शूट " असते ती म्हणजे बॉल हवेतच कर्व होत कीपर समोरून गोलमध्ये जातो तो . . हा शाळेत असल्यापासून यासाठी ओळखला जायचा . अप्पू . . याचं खरं नाव अप्पय्या नागस्वामी बेडर . . पण आम्ही अप्पूच म्हणायचो . . हा कीपिंग करायला थांबला कि वाटायचं पांढऱ्या क्रॉसबार खाली काळा खांब थांबलाय . . स्ट्रायकर वन ऑन वन असेल तरी हा दात काढून काही तरी विचित्र आवाज काढत ओरडत त्याला समोरे जायचा . कित्येकदा समोरचा घाबरून बॉल अर्ध्यात सोडायचा या मुळे. .आणि त्याने सोडला म्हणून हसण्याच्या नादात याने पण सोडला होता बॉल एक दोनदा . पण माणूस मस्त होता . केरळी मुलगा . मराठी यायची तोडकी मोडकी . पण बोलायचा फक्त इंग्रजीत . विकी . . दिसायला जाड होता . . कमी उंचीमुळे अजून जाड वाटायचा . पण वेग आणि चपळता इतकी होती कि आम्ही याला " फेदर टच " म्हणायचो . पासेस पण तसेच द्यायचा . . थ्रू बॉल देण्यात वस्ताद होता . . अगदी बघत राहावं असा खेळ . . याला पळताना बघून कित्येकदा आम्ही स्वतःला शिव्या दिल्या होत्या . . अरे ७४ किलोचा देह सांभाळून ५ फुट ४ इंच उंचीचा माणूस तुम्हाला लहान मुलांना केल्यासारखं कट करतो . . लाज वाटणारच . . आता रोह्या . . रोहित देसाई . . हा नाटक कंपनीत जायचा चुकून फुटबाल ग्राउंड वर आला होता. जर कुठे दुसऱ्याचा पाय याच्या पायाला लागला कि हा आडवाच . आणि चेहरे तर असे केविलवाणे करे जसं कि याचा पाय तुटून पडलाय . . एका अपघातात याच्या उजव्या हाताची ३ बोटे कापली गेली होती . . जेवढा नाटकी होता तेवढाच चांगला माणूस हि होता . . शिलाई दुकान आहे याचं . . वडिलोपार्जीत धंदा . . वडील गेल्यावर हाच सांभाळायचा . . आता राहता राहिलो मी . . तर मी . . तेच काम करायचो जे अविनाश डाव्या बाजूने करायचा . फक्त माझी चिडचिड जास्ती होती . . हाफ लाइन पार केली कि शूट करायची प्रचंड ओढ होती . . फ्रेंक लांपार्ड नि गेरार्ड हे आमचे देव . . ८ नंबर ची जर्सी घालून त्यांची नक्कल करण्यात आयुष्य गेलं . त्यामुळे फ्री किक , पेनल्टी शूट्स माझे असायचे . . आणि गोलच्या दिशेने कुठे हि कसाही मारलेला बॉल फिनिश करणे किंवा स्ट्रायकर ला देण्याचं काय होतं म्हम्द्याचं . . तर . . त्यादिवशी . . असाच एक ग्रुप स्टेज चा सामना होता . . मागल्यावर्षी लीग जिंकलेली टीम समोर होती . .सामना खूप त्रासदायक ठरणार होता . . हे माहित होतं . पण इतका हे नवतं माहित . पहिला हाफ झाला होता . . स्कोर होता ३-० . . तीन गोल खाल्ले होते पहिल्या हाफ मध्ये . . . पहिल्याच हाफ मध्ये ३ गोल ? घाणेरडेपणा होता हा . . कारण काय . .तर तोच . आमचा आरडा ओरडा करणारा काळा रेडा अप्पू . . प्रत्येक वेळी समोरून कोणी बॉल घेऊन आला कि हा ओरडत होता . . शूट यू बासटर्ड . पहिल्या १-२ वेळेला त्यांचा स्ट्रायकर चुकला . पण मग . त्यांचा सेंटर मिड समोर आला . . पद्या . . याला मी चांगलाच ओळखत होतो . बेळगावात असलेल्या काही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता . आमच्या येड्या अप्पू हा समोर आल्यावर पण ओरडला . . आणि पद्याने खरंच शूट केलं . . गोल . . पुढल्या १५ मिनिटात आणखी दोन गोल . . कोणी काहीच करू शकलं नवतं . हाफ टाईम झाला . नुसती चिडचिड चालली होती . . आणि त्यात हा आमचा कोच . . "लेट्स गिव देम अ बाय" म्हणाला . . हातात पाण्याची बाटली होती ती फेकली दुसऱ्या बाजूला . . "कोच . सामना पूर्ण खेळायचा आहे मला . . एवढी घरी जायची गडबड असेल तर तू जा . . . . कितीही गोल होऊदेत . मी खेळणारच . . " कोच : Aditya. . this match over. . you will be out of this league if we loose. . and that seems like the obvious result . .and don't talk me like i am equal to your age.. respect your elders. . I did not expect this from you. ." मी : I know .. but i am not going away from this. and whatever happens i will not allow you to give them a bye . . lets see how much they score.. atleast i will make sure that they will play the next match without 2 to 3 main players. . कोच : I am the coach.. your senior . .do as i say . . save your energy . . try next year.. with better players. . you guys are getting old now. . I will make sure to replace you people. me : ok . . but not in this team . . you are fired coach सगळे बघत होते माझ्या कडे . कोणीच काही बोललं नाही . . तेवढ्यात रेफ्री ने दुसरा हाफ सुरु व्हायची वार्निंग व्हिसल दिली . . ग्राउंड मध्ये उतरता उतरता अप्पू ओरडला जोरात . . " you bastards. . if you don't shoot the ball after you cross the half line.. i'l kill you all . . change the formation . .just shoot. . " विचार केला . . सामना तर जवळपास हरलोय . . त्यांच्या कीपर ला थोडा त्रास देऊन जाऊ . . फ़ोर्मेशन बदलली . . अव्या लेफ्ट फोरवर्ड ला गेला . . विकी ला मागे खेळायला सांगितलं . . मी राईट हाफ ला गेलो . . तिथे असलेल्या मुलाला मागे पाठवलं . . रोह्याला सांगितलं . . क्रोस करू नको बॉल . . मागे ढकल . मी रश करेन . . म्हमद्या ला काही सांगायची गरज नाही . . त्याने आमच्या पोजिशन बदलेल्या बघितल्या होत्या . . तो समजला जे समजायचं ते. . . आणि वेड्या सारखा ओरडला जोरात . . आद्या . . . आज तो कीपर को मालिश मिलेगी रे . . मी अव्या आणि म्हमद्या हसत होतो उगाचच . . सामना हरायची लक्षणं असताना पण नुसते हसत होतो . . त्यानंतर जे झालं ते आयुष्यात कधी विसरणार नाही . . . दुसऱ्या हाफ च्या पाचव्या मिनिटाला कोर्नर मिळाला . . अव्या गेला , , मला वाटलं नेहमी प्रमाणे कर्व करेल . . मी हाफ लाइन च्या पुढे ५-७ मीटर असेन . पूर्ण ओपन होतो . . अव्या ने माझ्या कडे रोल केला बॉल . . " शूट " . . सणसणत बॉल गोलकीपर च्या हाताला लागून क्रॉसबार ला लागून बाहेर . . ग्राउंड भोवती थांबलेले ३-४ हजार लोक अगदी शांत झाले होते . . आवाज येत होता तो क्रॉस बार चा . . हा आवाज एका मिड फील्डर साठी सर्वात सुंदर असतो . . जेवढा जास्ती आवाज . जेवढा जास्ती वेळ बार व्हायब्रेट करत राहील . तेवढी तुमची ताकत . सरळ साधा हिशोब होता . . कीपर आपला उजवा हात झाडत खाली बसला होता . . हेच पाहिजे होतं मला . . आसुरी आनंद म्हणतात तो हाच असावा . . काही वेळाने म्हम्द्याला लार्ज डी बाहेर मस्त वोलि मिळाला . . टोप राईट कोर्नर मध्ये गोल . . कोणीही तो बॉल अडवणं शक्यच नवतं . . स्कोर ३-१ . एक तास झाला होता . अजून फक्त अर्धा तास शिल्लक . . आणि तेवढ्यात रोह्या पडला . . अगदी खरोखर पडला . ३३ मीटर्स वर फ्री किक . . किक घ्यायला रेडी झालो . . मी आणि अव्या . दोघेही होतो . . मी किक घ्यायला स्टार्ट घेतला . . तेवढ्यात अव्या बाजूने जोरात गेला . . कोणाला काही समजायचा आत बॉल विरुद्ध टीम च्या वॉल च्या बाजूनी कर्व होऊन गोल . . ३-२ . . आहाहाहा . . त्यानंतर पुढच्याच २ मिनिटात मला रोहित ने बॉल मागे दिला होता . . हाफ लाइन पासून बुलेट किक . . लेफ्ट टोप कोर्नर ला गोल . . . सामना ड्रॉ झाला होता . . . शेवटची दहा मिनिटे उगाच इकडे तिकडे बॉल ढकलून काढली. हरलेला सामना खेचून काढला होता . . पण . . हा आमच्या सगळ्यांचा मिळून शेवटचा सामना . . नॉक आउट राउंड ला जायला सामना जिंकणे आवश्यक होतं . जे नाही झालं . . बाहेर पडलो . . म्हमद्या गेला … रोहित गोव्याला जाउन खेळतोय . . आणि मी . . सध्या फक्त पीसी वर . . पण प्रत्येक वेळी गोल समोर गेलो कि कानात अप्पू ओरडतो . . शूट यू बासटर्ड

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4124 views

💬 प्रतिसाद (12)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 19:24 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
अ
अमित खोजे Tue, 02/24/2015 - 19:50 नवीन
मस्त वर्णन. म्हमद्या बद्दल परत वाचून वाईट वाटले. .. असे अनेक मित्र, बालमित्र हरवलेला
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 02/25/2015 - 11:24 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/27/2015 - 09:50 नवीन
खूप छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/27/2015 - 09:59 नवीन
जहबहराट!!!!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 02/27/2015 - 15:06 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 02/27/2015 - 15:23 नवीन
झकास!!
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Sat, 02/28/2015 - 12:13 नवीन
*OK*
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sun, 03/01/2015 - 03:15 नवीन
थरारक. म्हमद्याचं काय झालं ?
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Mon, 03/02/2015 - 07:35 नवीन
http://www.misalpav.com/node/29858 इथे कळेल :)
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 03/02/2015 - 09:43 नवीन
धन्यवाद. बघतो.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Mon, 03/02/2015 - 07:36 नवीन
धन्यवाद सगळ्यांचे :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा