Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

काही किस्सेमय वाक्प्रचार !

म
म्हया बिलंदर
Tue, 02/24/2015 - 18:42
💬 4 प्रतिसाद
मला नेहेमी वाटायचे कि प्रत्येक म्हणीमागे किंवा वाक्प्रचारामागे काहीतरी संदर्भ, कोणती तरी गोष्ट असणार नक्की. अशी काय घटना घडली कि "काखेत कळसा…" किंवा "वासरात लंगडी गाय…" जन्माला आले? तर अशाच दोन घटना माझ्या समोर घडल्या व ज्यावर तिथल्या तिथे काही वाक्प्रचार जन्माला आले. (खरेतर या आधी मी हे दोन्ही वाक्प्रचार ऐकले नसल्याने मला तरी विशेष त्या घडीलाच जन्मले असे वाटते.तसे नसल्यास भरचूक नो) गावात एकाने तिसरा टेम्पो विकत घेतला व त्यावर (तो नसताना)चर्चा चाललेली. पहिला :- आयला मस्त कमावतोय गडी. दुसरा :- मग न्हाय तर काय? आधीचीच देणी दिली न्हाईत आन तिसरा बी कर्ज काढूनच घ्येत्लाय. पहिला :- म्हंजी 'घरची लाकडं जाळून कोळश्याचा धंदा करतोय' म्हणायचं तर? तर एका पंक्तीला एकाने खूप ढकलले व यजमानाने आणखीचा आग्रह करता आपली आधीच्या क्वाण्टीटी ची लाज वाटून बिचारा नाही नको म्हणत होता इतक्यात शेजारचा बोलला "घ्या राव,हेल्यावर पाचुंदा काय जड न्हाय." इथे पाचुंदा :- पाच ओंब्या किंवा पाच पेंढ्याचा बांधलेली मोळी. हेला :- बैल गाडी(आता ट्रक किंवा टेंपो) वर रचलेली पाचुन्द्यांची रास. तुमच्याकडे हि असले वाक्प्रचारमय किस्से असल्यास सांगा. बघू रंग जमतोय का.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3881 views

💬 प्रतिसाद (4)
अ
अंतु बर्वा Tue, 02/24/2015 - 19:03 नवीन
आमच्या ऑफीसमध्ये एकजण क्लायंटकडून उशिरा Requirement आली की म्हणायचां, "घ्या, आता डोक्याला ताप आणी पोटाला उपास". आणी खरच होतं, उशिरा आलेली Requirement म्हणजे घरी जाण्याची अनिश्चिती, हुकलेला लंच्/डिनर टाईम आणी निद्रानाश :-)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 02/24/2015 - 22:38 नवीन
उशिरा Requirement येण्याविषयीची म्हण आवडली; "डोक्याला त्रास आणि पोटाला उपास" हे आधिक जमलं असतं कदाचित. @म्ह्या बिलंदरः 'हेला' या शब्दाचा अर्थ मला वाटतं 'रेडा' असा आहे, बैलगाडी नव्हे. (संदर्भः 'जन्मा आला हेला, पाणी वाहाता-वाहता मेला' ही बिनकामाच्या आणि बुद्धीचातुर्य नसलेल्या व्यक्तींसाठी वापरली जाणारी म्हण)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 02/25/2015 - 08:00 नवीन
दुसर्‍या कुणीतरी केलेल्या चुकीचे खापर भलत्यावरच फोडणे ;-)
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 02/25/2015 - 08:41 नवीन
"घ्या राव,हेल्यावर पाचुंदा काय जड न्हाय."
ह्याच अर्थाची दुसरी म्हण आठवली "भरल्या गाडीला सुपाच ओझ होत नाही"
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 31 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 37 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा