Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

इतनीसी उमर मे ये शौक?

अ
अत्रन्गि पाउस
Tue, 02/24/2015 - 12:03
💬 46 प्रतिसाद
इतनीसी उमरमे ये शौक? गल्ल्यावरचा बनियाने डोळे विस्फारून विचारले .... झाले असे होते कि छोटा वसंता लाहोरला आपल्या मामांकडे सुट्टीमध्ये म्हणून गेला होता. दिवसभर खेळणे वगैरे करता करता एक दिवस शोध लागला कि जवळच्या मशिदीत एक अवलिया गाण्याचा शौकीन होता आणि स्वत: चीजा बांधत असे ...मग काय वसंता रोज संध्याकाळी वही पेन्सिल घेऊन मशिदीत जाऊ लागला ... इतरांबरोबर तो हि त्या दिवसाची बंदिश लिहून घेई व आनंदाने परत येई ...पण थोड्याशा रितेपणाने .. एक दिवस संध्याकाळी परत आल्यावर मामांनी विचारले हम्म मग, काय वसंता काय म्हणताहेत तुमचे खांसाहेब ? वसंताने मोठ्या उत्साहाने आपली वही समोर ठेवली ..थोडी पाने चाळून मामा म्हणाले...अरे पण नुसत्या चीजांनी काय होणार ..त्यांनी काही शिकवले का नाही ? ..वसंता बिचारा हिरमुसून नाही म्हणाला ... कौतुकाने मामा म्हणाले ..बर बर आज आता जेव उद्या मी सांगतो ते कर ... दुसर्या दिवशी मामांनी आपल्या लाडक्या भाच्याला जवळ बोलावले आणि तब्बल एक रुपया दिला आणि वर एक कान मंत्र ...मुळच्याच चलाख भाच्याने ते उमजून मान डोलावली व तडक कोपर्यावरच्या बनियाकडे गेला .. थोडे लाह्या बत्तासे, धूप, थोडी फुले असे पैशा दोन पैशाचे खरेदी केले व तो रुपया गल्ल्यावर ठेवला ..बनिया ते पैसे उचलायला लागल्यावर म्हणाला "और बाकी पैसोन्का गांजा"....तेव्हा हे सगळे सर्रास मिळायचे ...बनियाचे डोळे खोबणीतून बाहेर यायच्या बेताला आले आणि तो जवळपास ओरडलाच ...इतनीसी उमर मे ये शौक? ... वसंता काहीच बोलला नाही...शेवटी वाण्याने दिलेला मोठ्ठा पुडा घेऊन झपझप मशिदीकडे निघाला ...आज नाही म्हटले तरी थोडं उशीरच झाला ...सूर्य कलायला लागलेला आणि लोक परतायला लागलेले ... तो कलंदर फकीर ...त्यांचे नाव आसदखान ..आपल्या शागीर्दन्बारोब्र आवराआवरी करू लागलेले .. तेवढ्यात वसंता समोर येऊन बसला ... "क्योन बेटा आज कॉपी नाही लाये ? ... बंदिश नाही लीख के लोगे?"... वसंताने एक शब्दही नं बोलता हातातला पुडा समोर ठेवला आणि नम्र पणे उघडून त्यांच्या समोर सादर केला ...समोरचा तो अलिबाबाचा खजिना पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले .... असदखान म्हणाले .."बोलो बेटा क्या चाहते हो ?"... "गाना सिखना है".... त्या निरागस बालकाच्या नजरेतले ते तेज, गाणे शिकण्याची असोशी सगळे सगळे त्या अवलियाने क्षणार्धात जोखले आणि किंचित हसला .. "चलो तो फिर आजसे हि शुरू करते है ... अम्म ..शाम का वख्त है मारवा से शुरू करते है" ... उस्ताद आपल्या शागीर्दांना घेऊन मशिदीतल्या विहिरीपाशी गेले मग .. छोट्या वसंताला बाजूला उभे करून सगळे विहिरीत झुकले आणि असदखान मारव्याचा रिषभ धैवत लाऊ लागले ..विहिरीतला घुमलेला त्यांचा स्वर ....त्यांनी हलकेच बाकीच्या शिष्यांकडे बघितले ...आता त्यांनी स्वर लावले ... मग हळूच छोट्या वसंताच्या खांद्यावर थोपटले .. आता वसंताने पण स्वर लावला ...सगळेच चमकले ..सुभानल्ला ...क्या सूर पाया है लौंडेने ...आणि मग सुरु झाला एक प्रवास ...मारव्याचा ...
हे मदमाती चली भामिनी ..
... ....उणे पुरे ६ महिने ..फक्त फक्त आणि फक्त मारवा.... बोटाला धरून मारव्यातल्या कित्येक खाचा खोचा ..उस्ताद सांगतोय हा नवा शागीर्द ते टिपतोय ..मधून स्वत:चे पण रंग हळूच टाकतोय ..उस्ताद ते पारखून ..हिण ते जाळून ..अस्सल ते उजळून.. कणाकणाने मारवा पुढे जातोय ...हळूहळू शिकणे शिकवणे हा फरकच जणू लोप पावत चाललेला ...आणि मग एक दिवस गाता गाता वसंताने थोडी उसंत घेताच आसदखां एक्दम थांबले ...म्हणाले ...'अब बस हो गया बेटे ..इथून पुढचा मारवा तुला आपोआप सापडेल...जाओ ..खुदा तुम्हे सलामत रखे ..' ... आणि मग त्या अवलीयाचा तो आशीर्वाद खरा ठरला ... (संकलित)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9680 views

💬 प्रतिसाद (46)
व
वेल्लाभट Tue, 02/24/2015 - 12:05 नवीन
नमन !
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 02/24/2015 - 12:25 नवीन
जबरी. वसंतरावांची ही कथा ऐकून होतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/25/2015 - 02:30 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 02/24/2015 - 14:09 नवीन
वसंतरावांचा मारवा दर बैठकीत वेगळेच रुप घेऊन यायचा. उत्तरेकडे लोक त्यांना प्रेमाने 'वसंतखाँ' म्हणायचे. फार आवडली ही कथा.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 02/24/2015 - 14:28 नवीन
स्फुट लेखन आवडलं! (अवांतरः ही सत्यकथा की दंतकथा हे माहीत नाही, सत्यकथा असेलही, पण मग 'मला बिडी आणून दिली तरच अवघड गणित शिकवेन' अशी वृत्ती असलेले मास्तर माझ्या लहानपणी मला -किंवा इतर कोणालाही- कितपत रुचले असते, असा प्रश्न मनात आला.....अशा गोष्टी, ज्या व्यक्तिशः आपल्या बाबतीत घडल्या तर खटकतील, त्या वसंतराव, पंडित भीमसेन जोशी, गोनिदा, यांसारख्या दिग्गजांच्या बाबतीत घडल्या तर त्या 'क्षम्य' म्हणून आपण ग्लॅमराईझ करतो का? पुन्हा एकदा, तुमचं लेखन आवडलंच, फक्त त्या अनुषंगाने मनात आलेला विचार मांडायला उद्युक्त केलं इतकंच.) तुमचं शास्त्रीय संगीताबद्दलचे लेख आणि उल्लेख वाचून तुमच्याविषयी खूप अपेक्षा आहेत, तुम्ही, तिमा आणि चौरा यांसारख्या मिपाकरांनी माझ्यासारख्या अज्ञ वाचकांना शास्त्रीय संगीताचा आनंद कसा घ्यावा हे समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगणारी लेखमाला सुरू केलीत तर खूप ॠणी असेन.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/24/2015 - 15:11 नवीन
हि १०० % सत्यकथा आहे कारण दूरदर्शन वर मी हि दस्तुरखुद्द पं. वसंतराव देशपांडेंच्या तोंडून ऐकल्याचे आठवते. पं. अशोक रानडे यांनी घेतलेली मुलाखत. मला आठवतात ते शब्द असे आहेत. मामा-- वश्या गाढवा असे का कोणी गाणे शिकतात. चार चीजा लिहून काय होणारे? चल मीच येतो उद्या. पुढचा किस्सा आहेच.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/24/2015 - 14:34 नवीन
वसंतराव देशपांडे??
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/24/2015 - 15:05 नवीन
वाचतोय...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 02/24/2015 - 15:22 नवीन
मी लहान असताना किशोरच्या दिवाळी अंकात पं.वसंतराव देशपांडे यांनी आपल्या संगीतसाधनेबद्दल ही आठवण लिहिली होती. गंडा बंधनाची आठवणही होती- काळे चणे, दर्ग्यावर घालायला चादर, फकीरांना मिठाई अशी. आता नीटसे आठवत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Tue, 02/24/2015 - 15:41 नवीन
अरेच्च्या...मिठाईचा उल्लेख राहिला वर... तसेच माहेर /स्त्री/ किर्लोस्कर किंवा तत्सम मासिकात 'भारतीय शास्त्रीय संगीतातील ब्रम्हकमळ' असा एक लेख आला होता ...त्यातील अजून एक किस्सा आठवला ...वेगळा धागा टाकतो...
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 02/24/2015 - 15:45 नवीन
सुरेशचंद्र नाडकर्णींनी सुरेख लेख अनेक वर्षांपूर्वी लिहीला होता. मला वाटते, तो प्रत्यक्ष वसंतरावांकडून ऐकूनच लिहीला होता.
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 02/24/2015 - 20:04 नवीन
शेवटच्या चार पाच ओळी खूपच आवडल्या!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/25/2015 - 01:27 नवीन
मला वाटतं मी वाचलेल्या कथेत वसंता गिरनार पर्वतावर गुरूच्या शोधात राहतो.काही महिनही होतात . तिकडच्या राहणाऱ्या बऱ्याच साधुंशी ओळखीही होतात. परंतू वसंता वेगळ्याच गुरूच्या शोधात आहे हे कुणाला माहित नसते. आणि एके दिवशी एक साधू "मला येतं थोडंफार" असं म्हणून तिथल्याच विहिरीवर थोडं शिकवतो. तेवढंच. कारण तो साधू नंतर कधीच सापडला नाही वसंताला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 02:03 नवीन
पण वरचा किस्सा अगदी खरा आहे .. तो गिरनार चा पण सांगा की
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 02/25/2015 - 08:46 नवीन
ते विहीरींचे वगैरे लाहोरचेच आहे. गिरनारची ष्टोरी मी तरी प्रथमच ऐकतोय.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 02/25/2015 - 02:43 नवीन
या रोचक लेखामुळे पुल यांनी घेतलेल्या वसंतरावांच्या मुलाखतीची आठवण झाली.त्यात लाहोरचा किस्सा वसंतराव यांनी खुद्द सांगितला आहे. वसंतराव यांच्या निधना नंतर भीमसेन जोशी यांनी ' हिंदुस्तानी संगीतातील मारवा गेला' असे म्हटल्याचे स्मरले . https://www.youtube.com/watch?v=wRdLzpQ34s0 https://www.youtube.com/watch?v=8IH6fdfg8gY
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 04:14 नवीन
फारच मस्त ...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/25/2015 - 04:46 नवीन
कर्नाटकातील माणिकपूर येथे माणिकप्रभू महाराजांची गादी आहे (=प्रत्येक मठाधिपती माणिकप्रभूच असतो. यांना दत्ताचा अवतार मानतात. संगीतातले महाराज आहेत).इथे त्यांच्या दरबारात कलाकार गायक वादक आपली कला सादर करून येतात .एकाचवेळी बरेच गातात वाजवतात गोंगाट असतो तरी महाराजांचे लक्ष असते. त्यातल्या एखाद्यालाच बोलावून आपल्या माधुकरीतील चटणी भाकरीचा प्रसाद देतात.महाराजांचे शिष्य गावातून माधुकरी आणतात तीच ते खातात. हा प्रसाद फारच थोड्यांना मिळतो. बाकीच्यांना अन्नछत्रातले सुग्रास जेवण असते.महाराज हे खात नाहीत. यावर एक पुस्तकही आहे. अशा काही जागा भारतात आहेत तिथे जाऊन जमेल तेवढा अनुभव घ्यावा परंतू श्रद्धेचं डिसेक्शन करण्याच्या हेतूने तिथे जाऊ नये असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 06:39 नवीन
श्रद्धेचे डिसेक्शन नाही जेन्युइन्ली हा अनुभव घेतला पाहिजे .....
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 02/25/2015 - 05:38 नवीन
फारच छान. आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 02/25/2015 - 06:35 नवीन
वसंतराव म्हणजे माझे दैवतच. मी गाणे ऐकायला लागलो तेंव्हा वसंतराव गेलेले होते. तरी त्यांच्या मैफिलींची रेकॉर्डींग मिळवून मिळवून ऐकली ( ती मिळवण्यासाठी कुठे कुठे खेपा घालाव्या लागल्या ते वगळेच ). काय ते महान गाणे आणि त्यातुन दिसणारी प्रखर सांगितीक बुद्धीमत्ता. वसंतराव गाताना इतक्या सहज पणे अवघड गोष्टी गावुन टाकायचे आणि त्यासुद्धा एकामागुन एक ( की आधीच्या हरकती बद्दल विचारच करायला वेळ मिळत नाही ), त्यामुळे कदाचित ते लोकांना सोपे वाटत असावे. त्यांचा "पटमंजीरी" म्हणुन एक प्रकार आहे माझ्या कडे, त्यात रागेश्री, मारुबिहाग, केदार, शंकरा आणि नंद असे राग आहेत पण् ही रागमाला नाही बर का. हे सर्व राग आलापात, तानेत, बोलबनावात आणि सरगमेत असे काही ब्लेंड केले आहेत की ऐकताना वाटावे की हा एकच राग आहे. पण नीट ऐकले की कळावे की वर जाताना केदार होता आणि लगेच पुढचा स्वरसमुह मारुबिहाग आणी नंतर समेवर येताना नंद होता. केवळ चमत्कार आहे. पेटीवर आप्पा होते, त्यांना वाजवणे कीती कठीण गेले असेल काय माहीती?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 06:40 नवीन
ऐकलाच असेल ....नसेल तर सांगा... देतो
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 02/25/2015 - 06:50 नवीन
आहे आहे. विचारल्या बाबत धन्स
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/25/2015 - 11:10 नवीन
@त्यांचा "पटमंजीरी" म्हणुन एक प्रकार आहे माझ्या कडे.........केवळ चमत्कार आहे >>> प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....!

इथे लावा ते!

प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....प्लीज.....!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 02/25/2015 - 11:12 नवीन
कसे लावायचे ते सांगा. मला माहीती नाही. आणि ५० मिनिटाचे रेकॉर्डीग असल्यामुळे फाईल मोठी आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 02/25/2015 - 11:27 नवीन
जमले तर यु नळीवर टाकतो आणि इथे लि़ंक देतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 02/25/2015 - 17:03 नवीन
हा घ्या पटमंजीरी http://www.mediafire.com/listen/kqrac8l3bodhybv/Patmanjiri-Rageshri_Marubihag_Kedar_Nand_Shankara-Vasantrao.MP3
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 02/25/2015 - 06:43 नवीन
वसंतरावांबद्दलचा किस्सा आवडला. यानिमित्ताने पुलंनी त्यांच्यावर लिहिलेला तो अप्रतिम लेखही आठवला. पुण्याच्या आकाशवाणीच्या मूठभर कंपूकडून त्यांची झालेली उपेक्षाही आठवली. असो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 07:10 नवीन
कोण लोक होते हो ते ? कुणाला नवे माहित आहेत का ? आणि नक्की काय इश्यू होता ?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/25/2015 - 08:57 नवीन
कार्यक्रमाच्या वेळी वसंतरावांना नं ओळखल्यामुळे रेकॉर्डींग आर्टीस्ट कडुन काही अपमान झालेला असं कुठेतरी वाचल्याचं आठवतयं. सेम किस्सा बाबुजींच्या बाबतीतही घडलेला.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 02/25/2015 - 07:05 नवीन
मला अतिशय अभिमान वाटतो की भारतीय शास्त्रीय संगीताला लाभलेला हा सितारा आमच्या जिल्ह्याची देण आहे!!, पंडितजी मुळचे मुर्तिजापुर जिल्हा अकोला चे होते :)
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 02/25/2015 - 07:29 नवीन
वर दिलेल्या पुल नी घेतलेल्या मुलाखतीत वसंतराव यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील सावळापुर असल्याचा उल्लेख आहे .
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 07:31 नवीन
कमळापूर च्या वतनदार घराण्याचा उल्लेख आहे पुलंनी लिहिलेल्या लेखात
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/25/2015 - 11:17 नवीन
एका दैवी गायकाच्या इतिहासातले रोचक पान !
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/25/2015 - 12:56 नवीन
छान आठवण!
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Wed, 02/25/2015 - 14:55 नवीन
ही गोष्ट अगदी १००% खरी आहे. त्यांच्याच तोंडून ऐकली आहे. ते माझे आवडते गायक आहेतच, त्यांच्या काही मैफलीही live ऐकल्या आहेत. वसंतराव १९८३ सालच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते, त्या वेळी वपुंनी घेतलेली त्यांची मुलाखत माझ्या संग्रही आहे. जवळजवळ साडेचार तासांचा हा कार्यक्रम अप्रतिम आहे. इतका वेळ ऐकायची इच्छा आणि तयारी असेल, तर एक श्रवणसत्र-कम-कट्टा होऊ शकतो..
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 15:50 नवीन
इथे लोड कराहो ... श्रवणसत्र तर करूच ....४-५ GB खजिना आहे ...
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर गुरुवार, 02/26/2015 - 07:20 नवीन
बरं, प्रयत्न करतो. पण एकत्र ऐकण्याची मजा काही वेगळीच.. म्हणजे 'समानशीले व्यसनेषु सख्यम'नुसार प्रत्यक्ष भेटी-ओळखीही होतील, हा सुप्त हेतू. धाग्याची वाचनखूण साठवून ठेवली आहे. @प्रसाद१९७१ : पटमंजिरी दुव्यासाठी आभार.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 02/26/2015 - 09:56 नवीन
अग्दि अग्दि
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 02/25/2015 - 17:04 नवीन
http://www.mediafire.com/listen/kqrac8l3bodhybv/Patmanjiri-Rageshri_Marubihag_Kedar_Nand_Shankara-Vasantrao.MP3
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 18:12 नवीन
काय बोलावे .... मुश्कील आहे हो मुश्कील आहे ...
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/25/2015 - 18:24 नवीन
आता पुढचे १० १२ दिवस ह्यात ...
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 02/25/2015 - 18:52 नवीन
अहाहा!
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 02/26/2015 - 18:32 नवीन
२ मध्यम जंक्शन म्हणून वापरणे ...आपल्या नैसर्गिक गायकीत असलेली सततची फिरत बाजूला ठेवून ...समेवर येतांना तो वत्सल नंद ... आईग्ग ....कठीण आहे
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 02/25/2015 - 17:23 नवीन
असे किस्से कितीदा ऐकले / वाचले तरी त्याची चव कमि होत नाहि... वरण भात आणि साजुक तुप जसं. लिंक्स शेअर केल्याबद्दल प्रसादभौंना अनेकानेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 02/25/2015 - 19:31 नवीन
धागा आणि प्रतिसाद. खूप दिवसांनी काहितरी अभिजात ऎकल्याचं समाधान मिळतय. (शा. संगीतातलं दुर्दैवाने मला काही कळत नसल तरी)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा