Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एक मस्त पोपट!!!

अ
अत्रन्गि पाउस
Fri, 02/20/2015 - 18:57
💬 11 प्रतिसाद
दोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट .... (तेव्हा शब्दबद्ध केलेला) कोपनहेगन (डेन्मार्क) च्या अतिशय सुरेख अशा स्कॅंडीक मध्ये मुक्काम .. ह्या हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये भला थोरला पियानो ..काल सायंकाळी एका मडमेने काही गत वाजवली.... व ती गेली....थोड्या वेळाने...इकडे तिकडे बघून..समस्तांची लज्जा त्यजून आम्हीही मग बसलो... मंदशा सरत्या संधीप्रकाशात थोडा यमन छेडला... ...हार्मोनियम आणि पियानो मध्ये बराच फरक पण तरी तुका म्हणे त्यातल्या त्यात...म्हणता म्हणता मूड लागला व थोडा पुरिया धनश्री वाजवला (माफक हो)....उठून बघतो तर आजूबाजूचे गोरे बघत होते..चेहेर्यावरून तरी त्यांना आवडले असावे ....एक दोघांनी जरा हसून माना डोलावल्या..नाही..टाळ्या सुद्धा वाजवल्या ...आम्ही तसेच तंद्रीत ...तिथून निघून गेलो.. थोड्या वेळाने रात्री जेवण करून लांब फेरी मारून आलो ..... आलो तर सगळं जरा शांत शांत...म्हटलं या बुवा बस जरा हात साफ करू...'हमीर' चा मूड वाटत होता...म्हणून मग 'नमन नटवरा' सुरु केले ....आता स्वान्तसुखाय वादना मध्ये मला कसलाच अडथळा नको होता ...इतक्यात लक्ष्य गेले ...एक गोरा लांबून कुतूहलाने बघत होता...नजरा नजर होताच त्याने थम्स अप करून दाखवले..मी त्याचा स्वीकार करून पुढे गेलो आणि थोड्या वेळाने थांबलो... पुढे काय वाजवावे असे मनात येते न येते तोच ती रिसेप्शानिस्त माझ्या दिशेने येत होती... मी थोडेसे उठल्यासारखे करून तिला विश केले.. जवळ येउन....$%^$%^%&^.. सा$$ मला म्हणाली .. कृपया पियानो वाजवू नका... मी म्हटलं का?.... इथे शांतता राखली पाहिजे..मी म्हटलं ओ के ...इथे वाजवण्याच्या वेळा काय?...तर ती #@$@#$ म्हणते हा शो साठी ठेवलाय ...वाजवायला नाही.... म्हटलं ...गेलीस उडत!!!...गच्छ सूकर भद्रं ते (ह्याचा अर्थ काय आहे?..पु लं नि अनेक ठिकाणी वापरला म्हणून आपण पण वापरलं झाल ) नशीब एवढंच...हे बघायला कुणी नव्हते...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4935 views

💬 प्रतिसाद (11)
ब
बहुगुणी Fri, 02/20/2015 - 20:37 नवीन
बाकी तुमचं हार्मोनियम रेकॉर्डिंग असलं तर इथेच टाका की, 'या हॉटेलात आलेल्या' मिपाकरांना नक्कीच आवडेल :-)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 02/21/2015 - 05:54 नवीन
हा पोपट नाही...१ वाया घालवलेली संधी आहे ;)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 02/21/2015 - 07:43 नवीन
तुमचा काही पोपट झालेला नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 02/21/2015 - 07:53 नवीन
डेन्मार्क (निदान ते हॉटेल तरी) बराच "संगीत-अविकसित" दिसतो आहे ! :) नॉर्वेमध्ये ओस्लोमधील पार्लमेंटजवळच्या सार्वजनिक स्केटिंग रिंक आणि त्याच्या उत्तरेस किर्केनेसमधल्या स्नो हॉटेलमध्ये भारतीय संगीत आवडीने लावलेले पाहिले/ऐकले आहे !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 02/21/2015 - 08:14 नवीन
हात तेरी!! त्या औरंगजेबीला घाबल्लात?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/21/2015 - 08:49 नवीन
गच्छ सूकर भद्रं ते भवतु म्हणजे (शब्दशः) डुकरा जा. तुझे कल्याण होवो. आणि व्यंगार्थाने उच्च गोष्टीनचा आस्वाद घेण्याची तुझी लायकी आणि उंची नसल्याने निघून जा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 02/21/2015 - 09:08 नवीन
माझाही अंदाज तोच होता... धन्यवाद डॉक्टर
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/21/2015 - 09:14 नवीन
हा अत्रंगी पाऊस त्यांना झेपला नाही. तुमचे वादन ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 02/21/2015 - 18:40 नवीन
हे भलतंच झालं हो......जाऊ द्या....गाढ्वाक्क गुलाची चव नाय येऊची....
  • Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७ Sun, 02/22/2015 - 08:20 नवीन
एक मस्त पोपट!!! *ROFL*
  • Log in or register to post comments
अ
अगम्य Sun, 02/22/2015 - 09:48 नवीन
तो श्लोक असा आहे: गच्छ सूकर भद्रं ते | ब्रूहि सिंहो हतो मया | पण्डिताः एव जानन्ति सिंहसूकरर्योर्बलं || अर्थ: हे डुकरा तुझे भले होवो. तू खुशाल (लोकांना ) सांग की मी सिंह मारला. जाणकार लोक सिंहाची शक्ती काय आणि डुकराची शक्ती काय हे जाणतात.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 31 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 37 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा