Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मी चाक पुन्हा शोधले (एक जुना अनुभव)

अ
अत्रन्गि पाउस
Fri, 02/20/2015 - 18:46
💬 13 प्रतिसाद
किडे करणे हा स्वभाव...घराचे ग्रील रंगवणे हि गरज..कालदिन एक रंगाचा डबा ब्रश पोलिश पेपर घेऊन आलो.सकाळी सकाळी कामाला लागलो ...थोडे रंगवल्यावर हातातील मोज्याचा रंग ग्रील ला पुसल्यावर मेंदू लहर आली व सरळ हातानेच रंग चोपडू लागलो...अरे वाह वेळ वाचू लागला ...पण हातमोजा फाटला ...बरबटलेल्या हाताने (किटलेल्या कानाने..."तुझे नस्ते उद्योग..हे तुझे काम आहे का ?..हे नंतर कोण आवरणार ?वगैरे वगैरे ' ) काय करावे असा विचार करत होतो तेवढ्यात आमचे वाचमन थोरात काही कामासाठी आले माझ्याकडे विचित्र नजरेने बघत बघत बोलू लागले ...आणि तेवढ्यात .."कपड्याच्या तुकड्याने रंग लावावा" हे वाक्य त्यांच्या तोंडून व माझ्या मनात अक्षरशः एकाच वेळी उमटले... मग काय दणादण रंगकाम पुढे सुरु केले...:) १० मिनिटात ग्रील रंगाने 'पुसून' काढले...काम उत्तम झाले आहे अशी प्रशस्ती वाट्याला (कधी नाही ती) आली आहे...रोकेल नि हात धुवून चहा व चैतन्य कांडी चा आस्वाद घेत थोडी विश्रांती घेतोय ...म्हटलं हा कृतार्थ क्षण सांगावा तुम्हाला... तात्पर्य : ग्रील रंगवतांना ब्रश पेक्षा फडक्याने रंग चोपडणे सोपे असते (ह्यालाच बहुदा 'पुन्हा चाक शोधणे' reinventing the wheel म्हणत असावेत..)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4646 views

💬 प्रतिसाद (13)
क
कपिलमुनी Fri, 02/20/2015 - 19:37 नवीन
शोध छान बाकी चैतन्य कांडी सोडायचा मनावर घ्या
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Fri, 02/20/2015 - 19:55 नवीन
बरेच दिवस झाले सोडून :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 02/20/2015 - 19:52 नवीन
जिव्हाळ्याच्या विषयावर धागा काढलांत. मी तर हाऊस आणि फर्निचर पेंटिंग/स्टेनिंगचा कोर्सही केला आहे! काही नाही, एक आपला उगाच छंद म्हणून! :) आणि रंगाच्या पुढे जाऊन माझा अनुभव असा की जर लाकडाला स्टेन (किंवा पॉलिश) करायचं असेल तर कापडाच्या (विशेषत: जुन्या बनियनच्या) तुकड्याने मस्त होतं. त्यातही जर दोन स्टेन मिक्स करून जर एक मधलीच शेड द्यायची असेल तर ब्रशपेक्षा कापडी बोळ्याने अफलातून येते... ट्राय करून बघा... क्षणाचा नवरा आणि अनंत काळचा रंगारी, पिडां :)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 02/20/2015 - 22:21 नवीन
रंगवलेल्या ग्रीलचा एक फोटो टाका ना ?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 02/21/2015 - 04:31 नवीन
ग्रिल रंगवतानाचा + रंगवलेल्या ग्रिलचा. -(बारीकसारीक कामं स्वतः कशी करता येतील या विचारात असलेला) पैलवान
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Sat, 02/21/2015 - 06:37 नवीन
किटलेल्या कानाने..."तुझे नस्ते उद्योग."....वगैरे वगैरे ऐकतांना
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/21/2015 - 09:37 नवीन
आणि हे सगळे रंगोद्योग करताना 'मल्हारचा एखादा प्रकार' गुणगुणत होता का हो ?
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 02/22/2015 - 00:49 नवीन
केलेला प्रयत्न स्तुत्त्य आहे . माझा नेहमीचा एकच प्रश्न असतो , " करुन पहायला काय हरकत आहे ? चुकले किंवा नाहीच जमले तर शेवटी कारागिर करणारच ना? पण आपण त्यातल्या त्यात पहावे ! फार झाले तर काय होइल? " उडाला तर कावळा, बुडला तर बेडूक " परवा फ्लश टाकीतील लिव्हर च्या दांडीला क्रॅक गेला आरल्डाइट लावून पाहिले, तर गुळगुळीत प्रुष्ठ्भाग असल्याने जमले नाही, मग एम सिल लावून पाहीले , त्याची ही तीच गत ! मग ड्रील मशीनने एक छिद्र पाडले आणि एक कडक तारेने छानपैकी पीळ दिला आणि काय सांगू ? कावळा उडायला लागला की जोरात ! चाळीस रुपये वाचले ना ?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/01/2015 - 18:10 नवीन
भारीतला शोध. कोणाला सांगू नका, मला सुतारकाम बघत बसायला फार आवडते. कोणा मुलीला करताना कधी पाहिले नाही म्हणून, नाहीतर मी पण करवत आणि रंधा घेऊन काहीतरी तयार करायला बसले आते आतापर्यंत!
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 03/02/2015 - 19:19 नवीन
आमचा सोफा जुना झालाय. घेता का ऑर्डर? :-)
  • Log in or register to post comments
प
प्रियाजी Tue, 03/03/2015 - 08:28 नवीन
पैसा, मी ही घरातील सर्व फरनिचर करताना बघत होते. त्या सुतारांना आवडत नव्हते हे कळत होते तरीही. त्याची आठवण झाली. मला वाटत होते की मी एकटीच असेन अशी आवड असणारी.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/03/2015 - 10:41 नवीन
थांबा थांबा, आधी एक बॉक्स तरी तयार करून बघते. मग आड्डरीचं बघू! :D
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 03/03/2015 - 07:36 नवीन
घरची अापली कामे स्वत: करण्याचा अानंद न्याराच! शेअर केल्याबद्दल धन्यवाद!लोक चिक्कू म्हणाले तरीही चालू ठेवा. - स्वधर्म
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा