मातृभाषा दिवस साजरा करू-मातृभाषेत बोलू
फेब्रुवारी महिना तसा प्रेमाचाच असतो. या महिन्यात आपापली प्रेमं योग्य तिथे व्यक्त करून झालीच असतील सगळ्यांची. उद्याचा दिवस आपलं मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्याचा आहे. मिपाकरांचं भाषाप्रेम माहीत असल्यामुळे हा धागा काढत आहे. २१ फेब्रुवारी हा 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची थोडी पार्श्वभूमी अशी:
फाळणीनंतर बांगलादेश 'धर्म' या एका मुद्द्यामुळे एक अख्खा देश पलीकडे असणार्या पाकिस्तानशी जोडला गेला होता. पण जेव्हा 'उर्दू' ही एकमेव राष्ट्रीय भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेथील बांग्ला भाषकांची भाषिक अस्मिता जागी झाली. बांग्ला भाषेलाही समान दर्जा मिळावा म्हणून आंदोलन उभे राहिले. आणि ते आंदोलन चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात २१ फेब्रुवारी १९५२ रोजी ४ विद्यार्थी आंदोलकांना गोळ्या घालून मारण्यात आले. या घटनेवरून मोठा जनक्षोभ उसळला आणि बराच काळ लढा दिल्यावर शेवटी १९५६ मधे हा दर्जा बांग्ला भाषेला देण्यात आला. पाकिस्तानपासून वेगळेपणाची बांगलादेशीय ओळख निर्माण होण्यात हा भाषिक लढा एक महत्वाचा मुद्दा मानला जातो. सन २००० साली युनेस्कोने मातृभाषेची ताकद दाखवून देणार्या या दिवसाची आठवण म्हणून या दिवशी 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' साजरा करायचे ठरवले.
'मातृभाषा' या शब्दालाच अनेक पदर आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या राज्यांच्या भाषिक वर्गीकरणामुळे आणि 'भाषा व बोली' यांच्या व्याख्येच्या गोंधळामुळे त्या त्या राज्याची प्रमुख भाषा ती मातृभाषा असा काहीसा गैरसमज असतो. 'मातृभाषेतील शिक्षण' म्हणजेसुद्धा राज्याच्या प्रमुख भाषेतील शिक्षण असा काहीतरी गोंधळ याबाबतीत चालू असतो. एका भाषेच्या नावात सामावल्या जाणार्या अनेक बोली (आणि कदाचित भाषाही) या शैक्षणिक माध्यमाच्या प्रमाणीकरणामुळे मागे पडत आहेत. प्रत्येक बोलीला तेवढीच मान्यता असावी असं कितीही वाटत असलं, तरी काही आर्थिक, सामाजिक, राजकीय अडचणींमुळे ते कदाचित शक्यही होणार नाही. पण आपली स्वतःची बोली, तिचा आपल्यास अभिमान असेल, तर आपल्यापुरती तरी टिकवणं सहज शक्य आहे.
तर या मातृभाषा दिवसानिमित्त, आपण या धाग्यावर स्वतःच्या मातृभाषेत काही ना काही लिहूया. मातृभाषेची तुमची स्वतःची जी व्याख्या असेल, तिच्यात बसणार्या कोणत्याही बोलीत लिहिलंत तरी चालेल. शक्य असल्यास त्या बोलीचे नाव, कुठे बोलली जाते ही माहिती द्यावी. माहिती नसल्यास नुसतंच काहीतरी लिहू शकता. शक्यतो अर्थ देऊ नये. अगदीच न समजेपर्यंत, जेवढा अर्थ समजला त्यावरून आपल्या मातृभाषेत प्रतिसादकर्ता प्रतिसाद देईल.
चला तर मग, मातृभाषेत बोलू.
💬 प्रतिसाद
(81)
प
पैसा
Fri, 02/20/2015 - 17:26
नवीन
मातृभाषेची माझी व्याख्या अशी की आपण लहान असताना आपली आई आपल्याशी ज्या भाषेत बोलते ती आपली मातृभाषा. माझी मातृभाषा मराठीच! मात्र इंग्लिश, हिंदी, कोंकणी या तेवढ्याच प्रेमाने शिकले! संस्कृतही आवडते. हापिसातले सहकारी आणि बॅटमन यांच्याबरोबर कन्नडमधेही बोलायचा प्रयत्न केला. आता एकच भाषा माझी असे म्हणू शकणार नाही.
माझा मराठाची बोलू कवतुके
परि तो अमृतातेही पैजा जिंके|
इतकी गोड माझी भाषा! तिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तिच्या किती उपभाषा आणि बोली. तशाच इतर भाषांच्याही सर्व बोलींचीही जपणूक झाली पाहिजे, नाहीतर त्या अस्तंगत होत जातील. कर्नाटकात गेलेल्या कोंकणी लोकांचे उदाहरण समोर ठेवले पाहिजे. कित्येक पिढ्या कर्नाटकात गेल्या, कोंकणीला स्वतःची अशी धड लिपीही नव्हती. तेव्हा त्यांनी फक्त आपसात बोलून त्यांच्या घरांतून कोंकणी जिवंत ठेवली. आजही हे लोक आपली मातृभाषा कोंकणी म्हणून अभिमानाने सांगतात. तशीच तंजावरला गेलेल्या मराठी लोकांनी मराठी जिवंत ठेवली. आजही हे लोक आपली मातृभाषा मराठी म्हणून अभिमानाने सांगतात. मग आपल्याला ज्या भाषेतून शिकायला मिळालं, बोलायला मिळालं तर ती बोलायची एरवी लाज का वाटावी?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 02/20/2015 - 18:00
नवीन
@"मातृभाषेची माझी व्याख्या अशी की आपण लहान असताना आपली आई आपल्याशी ज्या भाषेत बोलते ती आपली मातृभाषा. " >>> ब्बास! खल्ल्लास! :HAPPY: अगदी मनातली व्याख्या.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 02/23/2015 - 17:57
नवीन
त्या हिषोबाने सध्याच्या मराठी मुलांची मातृभाषा इंग्लिश आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 02/24/2015 - 08:31
नवीन
येग्झ्याक्टली!!
- Log in or register to post comments
म
मितान
Fri, 02/20/2015 - 17:30
नवीन
सुंदर विषय ! तयारी करून बोलायला येते ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 02/20/2015 - 17:38
नवीन
अगदी अगदी. मातृभाषेचा विजय असो!
मत्तु येन हेळबेकु मातृभाषेयल्लि? याके अंद्रे नन्न एरडु मातृभाषागळु अवं.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 17:43
नवीन
तुमची मातृभाषा आमच्या मातृभाषेपेक्षा वेगळी असल्यास अजाबात हर्कत नाय... पण मराठीतले भाषांतर दिल्यास तुम्हाला काय म्हणायचे ते आम्हालापण समजेल :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 02/20/2015 - 17:50
नवीन
नीनु कन्नड बरेयु मत्ते मराठीत बोला!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 02/20/2015 - 17:56
नवीन
नीनु स्वल्प स्वल्प बरतेत +)
यल्ला बरेंग इल्ले !
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 17:59
नवीन
चकए चब्दश चळलाक चरतं चपथश!!!
चकीबा च्न्नडक ला चच्या चशेतभा चललंबो चरतं चक्याचीडो चटवा चगेलला.
;)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 02/20/2015 - 18:15
नवीन
चमचीतु चषाभा चंचीको ? +D
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 18:19
नवीन
चम्हालातु चपलीझे चीकी चीओ चईता..चवढं चते चंचीचको चैवजीअ चणतीको चण्हालातम्ह चरत चरफा चरंब चटेलवा... =))
चकीबा अलिंगकॉ चवाळट चर्टाका =))...चंधळगो चलायलाघा चणीचको चहिना..चरबो चलझा...
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 02/20/2015 - 18:30
नवीन
चणतीको चहीना. चमच्याआ चडेक चंचीचको चणतातम्ह. चल्हापुरीको :)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 18:35
नवीन
चईलीस्मा चलटीउ चताकटा चतये चहिना... :(...
चल्हापुरीको चकांनालो चम्हीआ चलेंजचॅ चरतकं चहिना...चपशेलस चघारमा...चकीचे चपाकरमि चणतीलहा चताआ =))
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 18:56
नवीन
चर्वाप चहीना. चलात्या चपणआ चल्हापुरीको चर्शनव्ह चंव्हाकि चलिभाषाबो चणूम्ह. चकानाकाहा :)
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Sat, 02/21/2015 - 07:01
नवीन
"दुड्डक्का" नमश्कारा _/\_
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 02/20/2015 - 18:46
नवीन
आय कम्पलीटली अॅग्री विथ यू. वी ऑल मस्ट स्पीक इन अवर मदरटंग. धिस वील हेल्प टू प्रिझर्व मराठी इन ऑल इटस ग्लोरी. माय हार्टीएस्ट बेस्ट ऑफ लक फॉर धिस इनिशिएटीव्ह. जय हिंद. जय महाराष्ट्र.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 18:51
नवीन
मिष्टर डार्क ष्टोण, आय कंप्लिटली अॅग्री विथ यु. यु नो व्हॉट, वी शुड टेक इनिशिएटिव्ह टु प्रिझर्व्ह अवर मदर टंग. ऑल मराठी पीपल शुड बी युनायटेड अंडर भगवा फ्लॅग. अल्सो वी शुड गेट रिड ऑफ एव्हरी हिप्पोक्रीट अटेंप्ट ऑन अवर लँग्वेज...व्हॉट से यु? लाँग लिव्ह मराठी...
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 19:00
नवीन
व्हॉट यु से लाईक दॅट, कप्तान ? ही ब्ल्याक ष्टोण नाट डार्क ष्टोण. वोक्के ?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 19:04
नवीन
वोक्के सार्र्र्र्र!!! आय अॅम व्हेरी सॉरी फॉर माय लाष्ट कॉमेंट मिष्टर ब्लॅक स्टोन. आय होप दॅट वॉझंट रेसिस्ट फॉर यु...!!! =))
आय रन, यु रन..बीफोर सिझरियन टीम कम्स अप विथ सिझर अँड सिझेस डाउन ऑल द कॉमेंट्स =))
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 02/20/2015 - 20:02
नवीन
आय डाऊट दे विल हॅव टाईम ऑर एनर्जी टू रीड ऑल दीज कॉमेंट्स. इट इस व्हेरी कम्बरसम टू डू सो. बट आय अॅग्री दॅट धिस इझ व्हेरी फन्नी वे ऑफ रायटींग पोस्ट्स. बाय द वे, इट इझ नॉट ब्लॅक स्टोन, इट इझ ब्लॅक माऊंटन.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/21/2015 - 03:28
नवीन
सॉरी वन्स अगेन सार्र...हिअर ऑनवर्ड्स यु विल बी नोन अॅज (Ser) सार्र ब्लॅक माऊंटन. इफ ओन्ली मिष्टर बाबुराव अर्नाळकर रिड्ज धिस... =))
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 02/20/2015 - 19:11
नवीन
ब्ल्याक स्टोण दा करेक्ट्ट वर्ड डा. बट इट इज सो रेसिस्ट्ट यू नो.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 02/20/2015 - 19:18
नवीन
आंवशीक खावंक, ह्या पिश्या अबोलीक नाय कामधंदो! काय तरी नाय तिकडची खुळां काढतां! म्हणां, "स्वतःच्या मातृभाषेत काहीतरी लिहा!"
कित्यांक? आमी आमच्या मातृभाषेत काय तरी लिहितलोंव. मिपाकरी मेंबरां तां र-ट-फ करत वाचतलीं. तेंका शिंदळीच्यांक त्यातले अर्धे म्हणी लागूचे नाय. मगे ह्याचो अर्थ काय आणि त्याचों अर्थ काय म्हणान विचारत येतली. बरां ता बरां पण अर्थ जाणून घेवंन गप्प बसूंची नाय, मेल्यांचा तोंड ह्या तिरफळाचा; सदैव उघडां!! उगीच तेंच्यावर चर्चा करत बसतंली इकाळ्या पावसाची!!!
सांगितलो कोणी हो उद्योग? उगीच भिंतेक तुमड्यो लावंन बसूचे धंदे!!! तेंपेक्षा कढी-शित खावंन दोन तास नीज काढलेली काय वायट!!!
(काय उतरलंय का आमच्या मातृभाषेचं वळण?)
:)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 02/20/2015 - 22:19
नवीन
खयचा रें तू ?? कणकवली, देवगड वेंगूर्ला.... ?
- Log in or register to post comments
न
नंदन
Sat, 02/21/2015 - 01:24
नवीन
प्रत्ययकारी लिखाण म्हणतंत ता असा! ;)
('चों'बडेपणाबद्दल दिलगीर आहे. कृ.ह.घे., खटपट्याजी)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 02/21/2015 - 04:59
नवीन
आता तू खयचा ते सांग ...
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 02/21/2015 - 05:03
नवीन
शीतकढी व्हयी म्हणान तुम्ही येतले आणि कोणतरी 'पुणेकार' कढीयेचां पियूष हाडून दितलो. चलतां मां? :P
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 02/21/2015 - 05:38
नवीन
आवो कसलां ता पियुष ? शीरकंडाच्या तांब्यात पानी घालून हलवून देतील. घानयारडे मेले..
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 02/24/2015 - 12:07
नवीन
तू गप रंव रे मेल्या!! कड्येचो सत्यानाश ज्या कोणी केलो होतो त्याचो रेफरन्स असां हयसर!!..
'पुणेकार' बगितला का इले !! :P
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 02/21/2015 - 05:07
नवीन
कढी- शीत आणि वांगडा बांगडुल्यांचा हुमण नायतर तिसर्या, खुब्यांची भाजी तरी नको? आणि वालीची भाजी इसरलातशे?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 02/20/2015 - 20:13
नवीन
它不应该是一种罪过,在中国写。任何人在这里谁能够理解?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 02/21/2015 - 04:00
नवीन
是的,我能理解......但與谷歌的哥哥的幫助。
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Fri, 02/20/2015 - 20:43
नवीन
Bom dia todos. Aqui ninguém pode falar 'Marathi'. Assim, hoje Português é a minha língua de comunicação! ;-)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sat, 02/21/2015 - 03:24
नवीन
आंजी पोर्तुगालला असते वाट्टं +)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/21/2015 - 03:23
नवीन
अरे काय चाल्लयं. त्या पिशि तै वेड्या पिश्या होउन पाशवी सेनेचा हल्ला चढवतील ना =))
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 02/21/2015 - 04:34
नवीन
मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 02/21/2015 - 04:40
नवीन
किती त्या अपेक्षा! =))
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 02/21/2015 - 05:23
नवीन
போன்ற கடுமையான பொருள் பதில்கள் மிகவும் ஏமாற்றம் தான்.
இன்று நான் ஒரு மிபபகர் இருப்பது வெட்கமாக பூர்த்தி.
பைய்ஜாரபுவா
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sat, 02/21/2015 - 06:45
नवीन
ఈ రోజుల్లో తెలుగుని చాలా సులువుగా టైపు చెయ్యవచ్చు. అందుకు చాలా పరికరాలు, పద్ధతులు అందుబాటులో ఉన్నాయి. వాటన్నింటి సమాహారమే ఈ టపా.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/21/2015 - 07:45
नवीन
वरच्या दोन्ही भाषा वाचायला यक्कदम्म सोप्या आहेत....
गुडुगुडू गुडुगुडू गुडूम् गुड्गुड् गुड्गुड् कुममुडू कूडुम् कुडुकूडू... इ इ इ +D
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 02/21/2015 - 08:00
नवीन
जिलब्याच जिलब्या!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 02/22/2015 - 14:46
नवीन
पोण्ड्रु कडुमैयान पोरुळ् पदिल्गळ् मिगवुम् एमाट्रम् तान.
इण्ड्रु नान ओरु मिपपगर इरुप्पदु वेट्कमाह पुर्त्ति.
(म्हणजे काय ते इच्यारू नका. आम्ही फक्त वाचून दाखवलेय, तेवढेच येते =)) )
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/22/2015 - 15:45
नवीन
छ्या, बात काय जमी नाय !
खडे दाक्षिण्यात्य मडक्यात घालून हालवले किंवा देवनागरी मडक्यात घालून हालवले... आम्हाला तोच अनाकलनीय आवाज ऐकू येतो ;) कायतरी समजेल असा आवाज काढा :)
- Log in or register to post comments
व
विशाखा पाटील
Sat, 02/21/2015 - 05:46
नवीन
खानदेशात अहिराणी भाषा बोलली जाते. ती माझी मातृभाषा नसली, तरी लहानपणापासून ऐकत आल्यामुळे तिच्यातले शब्द कानावर पडले की बरे वाटते. ('सकाळ' वृत्तपत्राच्या जळगाव आवृत्तीत अधूनमधून तिच्यातले शब्द वाचायला मिळतात. कुठल्या गोंधळाची बातमी असली की त्यात हमखास 'दांगडो' असा शब्द वापरतात.)
खानदेशात अहिराणीशिवाय इतरही अनेक बोली आहेत. सर्वच बोलींवर गुजराती, राजस्थानी, हिंदी आणि अर्थातच मराठीचा प्रभाव आहे. गुजरातला लागून असलेल्या भागात गुजराथीचा प्रभाव जास्त आहे, तर बऱ्हाणपूरकडच्या भागात हिंदीचा. बोलण्याचा सूरही त्याप्रमाणे बदलतो. शहादा, नंदुरबार या भागातलं बोलणं मला कानाला खडखडीत वाटतं, तेच रावेर, यावल या पट्ट्यात लांब सुरात बोललं जातं आणि कानाला गोड वाटतं. जळगाव, भुसावळ या भागात रोखठोकपणा जास्त असतो. अजयाने विचारलेला प्रश्न या भागात असा विचारला जाईल - तुम्ह्न येड लागेल शे का? / चगी गये का वो?
हाझा कैफा! शुक्रान! :)
- Log in or register to post comments
आ
आरोही
Sat, 02/21/2015 - 16:00
नवीन
मले बी हेच म्हन्न होत व !! तुन्ह एकदम नेम्बंदी सांगी दिलं पाय बैना...........त गोट आशी शे कि मन्ही माय काय अहिराणी नि बोले तरीबी आम्हाला थोडीफार इ जास बोल्याले ..पाय बैना पिशे ,तुले काही समजी राह्यला का नाही वं ??का आम्हाले बठे कामाले लाइसन मज पाहत ऱ्हास वं !!! *wink*
- Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी
Sat, 02/21/2015 - 06:04
नवीन
मिपा वर मातृभाषे वरून रचला गेला इतिहास. सर्वच मान्यवर लागले बोलू.
संपादक करणार हस्तक्षेप. काहीतरी भाषिक षडयंत्र गेले रचले असण्याची आशंका
- Log in or register to post comments
म
मितान
Sat, 02/21/2015 - 08:08
नवीन
काल पिशीबरं गप्पा मारत होताव तवा तिनं मनलाल्ती की आज असं असं मातृभाषेत बोलायचं.. मी म्हणलं कामुन ? तर म्हणे असा असा दिवस साजरा करायचा ! मग मी म्हनलं कॉलेजमधी काय कर्लालाव आज? तर म्हने पोरं प्रेझेंटेश्नं कर्लालेत. मी पन मग कळचिट्यावानी कळ लावलेव. म्हनले अगं नुस्ती काय बोलाय्लीस? लिहून हुच्चपना कर की ! तिनं बी मन्ली का लिहिते.
एकीकडं पोरं काय काय कर्लालेत. निस्ते पैशे उडूलालेत...बापायच्या कारी न सुझ्क्या उडुलालेत. लाहाच्चरपना उतू जाउ लालाय. आन बघावं तर ही बया अस्ले दिवस साजरे कर्लालीय. उगं आपलं देणं न घेणं न् फुक्कटचं कंदिल लावनं !
लोकं पन लैच्च शाणे ! मातृभाषा म्हनलं की जे चेव आल्यानि ! कवाचं बडबडलालेत एक शब्द कळना झालंय.
जाऊ द्या !
ह्यांनी यायची वेळ झाली. कोरड्यास करते आता.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sat, 02/21/2015 - 08:21
नवीन
लई ग्वाड बोल्तीस गं आज्जे +)
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Sat, 02/21/2015 - 14:47
नवीन
:-)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »