Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अथ: केस कथा

व
विवेकपटाईत
Wed, 02/18/2015 - 15:23
💬 11 प्रतिसाद
कालच बसमध्ये एका टकल्याची डोक्यावर लावलेली विग खाली पडली. त्याच्या डोक्यावरचे टक्कल पाहून काहीना हसू आले अर्थात त्यात मी ही होतो. तो माणूस रागाने पाहत, पुढच्याच बस स्थानकावर खाली उतरला. साहजिकच आहे, कुणालाही टकल्या म्हंटलेले आवडत नाही. एका लग्नात, लग्न लावणारे गुरुजी टकले होते, लहान पोरांनी अक्षता त्यांच्या टकल्या डोक्याला नेम मारून फेकल्या. मुलांवर खेसकण्या शिवाय ते काही ही करू शकले नाही. बहुधा प्रत्येक लग्नात त्यांना हे भोगावेच लागत असेल. मुलांच्या खोड्या थांबविणे कुणालाच शक्य नसते आणि लोकांचे तोंड ही बंद करता येत नाही. काही पुरुष विग घालतात, पण विग डोक्यावरून पडली तर, फजिती होते. आजकाल केसांचे रोपण ही होते, पण त्यासाठी कमीत कमी एक लक्ष रोकडा तरी खिश्यात पाहिजे. शिवाय ते केंस खर्या सारखे चमकदार वाटत नाही. शेवटी एकच उपाय उरतो, डोक्यावर केसांचे जंगल उगवा. मजबूत, लांबसडक केस तर स्त्रियांच्या सौंदर्याची निशाणी. नाजुक सुंदर राजकुमारी पण तिचे केस मात्र लांबसडक व दोरखंडा सारखे मजबूत. परीकथेतील राजकुमार तिचे मजबूत केस पकडून किल्यात चढायचा. कुणाला कळायचे ही नाही. दुसर्या राजकुमारीना निश्चितच तिच्या केसांचा हेवा वाटत असेल. एकदा एका सन्यासिनीचा फोटो बघितला होतो. तिच्या लांब केसानीच तिचे संपूर्ण शरीर झाकलेले होते, तिला अन्य वस्त्र परिधान करण्याची गरज वाटत नव्हती. स्त्री असो व पुरुष केसांसाठी लोक काहीही करायला तैयार असतात. शिकाकाई, अंड्याची जर्दी, आणि अधिकांश लोक 'मजबूत और घने बालोंका राज' चे विज्ञापने पाहून शेम्पू आणि तेल वापरतात. बाजारात विदेशी कंपन्यापासून ते बाबा रामदेवांचे स्वदेशी शेम्पू ही बाजारात आहे. कुठे सुपर स्टार 'अभिताभ बच्चन' थंडा थंडा कूल कूल नवरत्न तेल विकतो. तर कुठे हिरोईन आल क्लिअर विकते. दिल्लीच्या संग्रहालयात, मुगल आणि राजपूत कालीन चित्रे पाहत असताना, एक बाब लक्षात आली.चित्रातल्या अधिकांश स्त्रियांचे केस लांबसडक आणि मजबूत होते. स्त्रियांच्या पुरातन मूर्तींचे केस ही लांबसडक होते. मनात एक प्रश्न घोळू लागला, आज केसांसाठी स्त्रिया तेल, शेम्पू इत्यादी वापरतात, जुन्या काळी काय वापरत वापरात असतील, सहज वाचता वाचता अथर्ववेदात एक कथा सापडली. वीतहव्य नावाचे एक महर्षि होते. त्यांची एक मुलगी होती. ती त्यांना अत्यंत प्रिय होती. आपली मुलगी सुंदर दिसावी असे सर्व माता-पितांना वाटते. पण तिच्या केसांची वाढ कमी होती. काळजी पोटी महर्षि वीतहव्य, मुनी कृष्णकेश यांच्या निवासस्थानी गेले. आपली समस्या त्यांच्या पुढे ठेवली. मुनी कृष्णकेश यांनी नितत्नी नावाची औषधी गुणांनी युक्त वनस्पती महर्षि वीतहव्य यांना दिली. ह्या वनस्पतीच्या उपयोगाने केस शीघ्र वाढतात असा शोध महर्षि जमदग्नी यांनी लावला होता. निश्चितच या औषधी गुणांनी युक्त वनस्पतीच्या उपयोगाने महर्षि वीतहव्य यांच्या मुलीचे केस लांबसडक आणि सदृढ झाले असतील. म्हणूनच त्यांनी आभार व्यक्त करण्या साठी नितत्नी वनस्पतीला देवता मानून तिची स्तुती केली. (आजच्या भाषेत म्हणाल तर तिचे विज्ञापन केले) या केसवर्धक वनस्पतीला वेदांमध्ये स्थान मिळाले. (अथर्ववेद ८/१३७/१-३) दृंह मूलमाग्रं यच्छ वि मध्यं यामयौषधे I केश नडाइववर्धन्तां शीर्ष्णस्ते असिता: पर II (अथर्ववेद ८/१३७/३) हे औषधे तो केसांच्या अग्र भाग लांब, मध्यभाग सुस्थिर आणि केसांच्या जडानां मजबूत कर. नदी काठच्या नड वनस्पती प्रमाणे केस ही शीघ्र वाढो . नड: (नदी काठी वाढणारी वनस्पती (बहुतेक एक प्रकारचे तृण/वेत) - उपयोग नाव टोकरी बनविण्यात किंवा लहान नौका बनविण्यासाठी वापर होत असे)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3367 views

💬 प्रतिसाद (11)
अ
अमित खोजे Wed, 02/18/2015 - 20:36 नवीन
कुठे मिळेल हो हि नितत्नी वनस्पती? टकलावर जंगल उगवण्यचे सर्व प्रयत्न करुन थकलो आता. द्रोणागिरी पर्वतावर मिळत असेल तरिही जाऊन आणायची तयारी आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 02/19/2015 - 03:56 नवीन
रोचक!
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 02/19/2015 - 04:40 नवीन
कथा छान. मुंबईकर कॉलेजकुमारांना लोकलला लटकत, हवा खात, प्रवास करायची मोठी हौस. मी आणि मित्रमंडळी याला अपवाद नव्हतोच! परंतु, गंतव्य स्थानकावर उतरल्यावर, मित्रमंडळी खिशातून कंगवे काढून केस नीटनेटके करीत असताना माझा हेवादेखिल करीत असत. कारण माझे घनदाट केस! त्सुनामी आली तरी माझा केसही वाकडा होणार नाही, ह्याची खात्री!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/19/2015 - 04:59 नवीन
देवाच्या कृपेने डोक्यावर चांगले केस साबुत आहेत. खरं तर डोक्यावर केस नाहीत म्हणुन खुप वाईट वाटून घेऊ नये. ( खरं तर ज्याचं त्याचं दु:ख) पण, उगं डोक्यावर दोन तीन ठिकाणी गुच्छ लटकत असलेले आणि मग उगं कंगवा डोक्यातुन फिरवणारे महाभाग दिसले की मग मला हसु आवरत नाही. :) टकल्या लोकांची फॅशन आली पाहिजे म्हणजे मग सर्व टकल्या लोकांना भले दिवस येतील असं माझं मत आहे. बाकी त्या वनस्पतीचं नाव शोधुन सांगा.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 02/20/2015 - 12:24 नवीन
अहो सर,
डोक्यावर चांगले केस साबुत आहेत
म्हणता, मग कशाला हवीये नितत्नी ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/20/2015 - 12:55 नवीन
माझ्या मित्राला पाहिजे त्याला राहून राहून वाटतं अजुनही कोणत्या तरी जड़ी बूटीने त्याच्या डोक्यावर केस येतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/20/2015 - 13:52 नवीन
हा दूरदृष्टीचा परिणाम असू शकेल ! :) ;)
  • Log in or register to post comments
प
प्रथम म्हात्रे Fri, 02/20/2015 - 12:19 नवीन
या वनस्पतीला मराठी बोलीभाषेत काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/20/2015 - 12:28 नवीन
छान कथा! या वनस्पतीचे प्रचलित नाव कोणाला माहीत आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 02/20/2015 - 13:08 नवीन
कर्पूरसुंदरी आठवली.
  • Log in or register to post comments
श
शरभ Fri, 02/20/2015 - 13:50 नवीन
कुठ्ली ? करिना की करिश्मा कर्पुर ?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा