धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं !
मला जाणवत असलेल्या विविध गोष्टी (संकीर्ण संग्रह म्हणा हवं तर) इथे एकत्रित लिहितो आहे.
कुणाला काही दुरुस्ती सुचवायची असल्यास, मूळ मुद्द्यांत भर टाकायची असल्यास(किंवा लेखाला छानपैकी
शिव्या घालायच्या असल्या तरी) स्वागत आहे.
.
.
हे अमुक पुरेसे "आधुनिक " नाहित; ते तमुक आधुनिक आहेत; असं येतं बोलण्यात कधी कधी.
" आधुनिक " ह्या शब्दाखाली जे जे काही येतं; त्यावर अमेरिकन आचार-विचार-संस्कृतीचा मोठाच पगडा दिसतो.
शिवाय "आंतरराष्ट्रिय" , "जागतिक" ह्या शब्दाचा खरा अर्थ खूपदा "अमेरिकेच्या कानावर पडलेली गोष्ट" असा असतो.
"अमुक अमुक माणसाच्या कार्याची आंतरराष्ट्रिय सतरावर दखल घेतली गेली " म्हणजे अमेरिकास्थित/स्पॉन्सर्ड संस्थेने दखल घेतली असा अर्थ वाटतो.
अमुक विद्या, तमुक शास्त्र, अभ्यास-व्यायाम पद्धती, मार्शल आर्ट्स,योगशास्त्र, अध्यात्मविचार ,स्वयंपाक पद्धती ,आहार शैली आंतरराश्ट्रिय स्तरावर
पोचली म्हणजे अमेरिकेतील निदान काहिंनी त्याची दखल घेतली असा होतो.
अमेरिकेची मान्यता म्हंजे जगाची मान्यता!
जागतिकीकरण म्हणजे अमेरिकीकरण.
तुमची पद्धत अमेरिकेत सामावली गेली पाहिजे किंवा अमेरिकन पद्धत तुमच्यात सामावली गेली पाहिजे.
आपण आपल्याही नकळतपणे त्या प्रवाहात जोरात खेचले गेलेलो आहोत.
(असं खेचलं जाणं चूक अथवा बरोबर, ह्यातील काहीही आमचे म्हण्णे नाही. तो मुद्दा नंतरचा.)
विचारही त्यांच्याच पद्धतीचा केला जावा, अशी आपली आपल्याचकडून अपेक्षा असते.
.
.
अमेरिकनिझम हा नवा धर्मच उदयास आलेला आहे. आपण एखाद दोन पिढ्यांपूर्वीच त्यात सामील झालेलो आहोत.
जे व्हायचे बाकी आहेत; तेही लवकरच होतील हे नक्की. पण हे होताना त्यांनाही कळेलच असे नाही.
.
.
अमेरिकनिझम हा मायावी आहे तो ह्याच साठी.
ते तुम्हाला प्रेषित दाखवत नाहित. नवा ईश्वर/गॉडही दाखवत नाहित.
पण तुमच्या वागण्या-बोलण्यात , अगदि विचार करण्यापासून ते आचरणापर्यंत ते तुम्हाला बदलवून टाकतात.
पण "आम्ही तुम्हाला बदलत आहोत" अस प्रचार न केल्यानं आणि नवा प्रेषित समोर न दिसल्यानं आधीच्या धर्मातले लोक तितके खवळून उठतच नाहित.
कुणाचं म्हण्णं असेल की :-
"
कोणी काय करावं हे न सांगता विलिंगली लोक फॉलो करतात व फॉलो करताना त्यांचे विकल्प काढूनही घेतले जात नाहीत. जे चाललय ते स्वेच्छेनं होतय. तुझ्या लिहिण्यातून "मुक्त विचार" हाच कॉन्स्पिरसी आहे असे ध्वनित होतेय." कॉन्स्पिरसी किंवा काय आहे ते नेमके सांग्ता यायचे नाही. खूपशे लोक स्वेच्छेने सामील होताहेत हे खरे आहे. ("भुलवणे" हा शब्द इथे वापरता येइल का ? भुलवण्याच्या क्रियेतही भुलवली गेलेली बाजू स्वेच्छेनेच निवड करताना दिसते.) हे जे काही होतय ते खूपसं उत्स्फूर्तपणे होतय हे १००% मान्य. . . पण जे तसे नाहित; त्यांची ज्या पद्धतीनं खिल्ली उडवली जाते; त्यातून न्यूनगंड वाढीस लागण्याची शक्यता. मग न्यूनगंड असलेलेही एखादेवेळेस अधिक समर्थ होण्यासाथी तुमच्यासारखेच होण्याचा प्रयत्न करतात. ही पण एक बाजू आहे. . . माझ्या मित्रानं मागे कुणाचंतरी एक नेमकं वाक्य ऐकवलं होतं. we all are wanna be americans! अमेरिकन(किंवा पाश्चात्त्य) विजयाचं ह्याहून भारी वर्णन करता येणं अशक्य आहे. ते थेट डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्येचा तोल बदलू पहात नाहित. तुमच्या भूमीत येउन तुम्हाला मारुन बहुसंख्य होण्याची स्वप्नं आता तेपाहात नाहित. कत्तल करीत सुटत नाहित. "तुझं धर्मांतरच करतो भडव्या" म्हणत नरड्या धरत नाहित. तुमच्याही नकळत तुमचा माइंडसेटच बदलतात. (ह्याला ब्रेनवॉश म्हणता यावं का ? ) . . मला अमेरिका आवडते की ह्याच साठी की त्यांनी प्रत्यक्षात सोयीस्कर मुक्त विचार, आधुनिकता वगैरे वगैरेचा जप करत अमेरिकनिझम हा नवीन धर्म अस्तित्वात आणला आहे. तो इतका मायावी आहे की तो वेगळा असा जाणवतही नाही. त्याचा प्रचार हा प्रत्यक्षात त्याचा प्रचार म्हणूनही होतच नाही. "आधुनिकतेचा प्रचार" नावाची गोळी लोकांच्या गळी उतरवली की झालं. शिवाय तुम्ही तुमचा आधीचा धर्म explicitly सोडूनच इकडे यावं असं बंधन नाही. ही प्रोसेस इतकी हळूवार आणि अल्लाद होते (पाणयत उकळल्या जात असलेल्या बेडकासारखे) की आधीचा धर्म तुम्ही कधी सोडलात हे तुम्हालाच कळत नाही. नावाला तुम्ही जुन्याच धर्माचे असता. प्रत्यक्षात अमेरिकनिझमचे आचरण करत असता. काही प्रमाणात हे हिंदू नावाच्या धर्मासारखच आहे. माणूस हिंदू बनला तरी त्याला तो हिंदू बनल्याचा पत्ताच नस्तो. . . कॉन्स्पिरसी म्हण्णे किंवा चांगले-वाईट असे मी काहिच म्हणत नाहिये. सध्या जे जसं दिसतय, ते जमेल तितकं तस्सच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. . . ह्यांच्या प्रभावाखाली येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही तुम्ही -- तुमचं शरीर तेच राहिलं असलं तरी मन बदललेलं असतं. शरीर हे निव्वळ हार्डवेअर. त्यावरचं सॉफ्टवेअर -- तुमचं मन, राहणी-विचारसरणी -- वागण्या बोलण्याची पद्धत --एकूणच संस्कृती हे त्या हार्डवेअरवर चालणार सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअरच आमूलाग्र बदललं जातं ह्या माअर्ह्तात्र्थात्न . . चार -दोन टाळकी मिळून बसली आणि "आता हे मिशन सुरु करु. हा प्रपोगेंडा करु" असे म्हणून अंतिम टार्गेट ठरवून बसलित असं वाटत नाही. हे काहीतरी वेगळय. सतत उत्क्रांत होत जाणारं वेगळच कॉक्टेल आहे. --मनोबा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वरकारण मी इगतपुरीला जाणार्या गाडीत आहे तर तुम्ही पुण्याला जाणार्या! (पुणेकरांनो, नो ऑफेन्स इंटेंडेड!!)छ्या ! पुण्याबद्दलचा ऑफेन्स टाळला तरी इतका मस्त संवाद कुठल्या गाडीत बसून ऐकावा... आपलं वाचावा... असा प्रश्न पडला आहे ;) :)