Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अश्मयुगातला बाबा

S
saumitrasalunke
Tue, 02/17/2015 - 06:52
💬 8 प्रतिसाद
आपली मुलगी बाबांसोबत दंगा करण्याच्या मूडमधे आहे.. बाबांनासुद्धा तेच करायचं आहे. पण नकळत डोक्यात काटे टकटक करत पुढे चाललेले.. बॉस कालच म्हणाले होते, जरा लवकर ये उद्या, डेडलाइन जवळ आलीये आणि आपण अर्ध्यात पण नाही आहोत. मुलीला फसवून दाराबाहेर पडताना चहासुद्धा घ्यायची इच्छा होत नाही. ती जी काही सात अट्ठाविस किंवा आठ चौदा असते ती पकडायला उसेन बोल्टला शरम वाटावी या स्पिडमधे तुम्ही पळता. कधी मिळते कधी हुकते. मिळाली तर ठीक पण हुकली तर जबर म्हणजे डबल मूड ऑफ़! असं वाटतं अश्म्युगात असतो (हे गृहीत धरून की तेव्हा काहीतरी बोली विकसित झाली असेल) तर कसं असतं? मुलगी सकाळी सकाळी म्हणाली असती... "बाबाबा सकासाशा!" (चला सश्याच्या शिकारीला जावुया) मग तुम्ही म्हणाले असता, "नकोगा वाबोगाचावा नाता तिहातिया दुण्सो टापाटाका" (वाघ चावेल नाहीतर हट्टी हत्ती सोंडेत धरून आपटेल) मग ती चिडून आईला (जीने कुठल्या तरी जड़ीबुटिचा चहा कढत ठेवलाय) म्हणाली असती,"सपक्ला तार्भी वारिबा साटू नकाला सपकला वारिबा माटु"... (किती भित्रा नवरा आहे तुझा, मला नका आणू असला भित्रा नवरा) मग तुम्हाला वाईट वाटलं असतं.. तुम्ही तड़क office bag सॉरी, दगडी भाला खांद्याला लावून तिला म्हणाला असता: "ठूल झेमा परी काशिरी रुकुन ययूया घरी, तिराती जम्मर वालचे मलाला सव्वालाचा घाम्प्रून ताघ्लेला हुम्माला. होप लिझा झिमा नझाला रिबारी हुम्मान टोखाटा लोबलो चिगोष्ट खरी" (ऊठ माझे परी, शिकार करून येवुया घरी रात्री मछर कडकडून चावले मला अस्वलाचं पांघरुण घातलं होतं मी तुम्हाला झोप नव्हती झाली माझी बरी म्हणून खोटं बोललो, हिच गोष्ट खरी) तुम्हाला ती "झेमाबाबाला.... झेमाबाबाला" म्हणत बिलगली असती आणि तुम्ही तुमच्या योकोबाला (बायकोला) म्हणाला असतां, "जाआ मूर्साय राफ्राय राका हां, लोकाम्बी लिमाली राता गबातो" (आज सुरमई फ्राय कर हां, कोलमी मिळाली तर बघतो) हट्टी हत्ती आणि चावरया वाघांचा एरिया टाळत तुम्ही मस्त फिशिंग नेट घेवुन गेला असता छोट्याश्या समुद्रसफरीला आणी तुमच्या परिराणी सोबत केली असती मासेमारी!!! नको तो लैपटॉप, त्या डेडलाइन्स, त्या मीटिंग्स, एम् एस वर्डची सेटिंग, आणि अप्रूवलसाठीचं वेटिंग... तुम्ही आणि तुमची बच्चू मासेमारीला, कधी शिकारीला, झाडांवर लटकायला, जंगलात स्वैर भटकायला, दगडाने ठिणग्या पाडत, झाडावरचा मध काढत, उंच डोंगरावर दोघींना घेवुन जात, गुहेतून आणलेला शिधा,कुठल्याश्या सुळक्यावर बसून खात... सूर्य उतरला की तुम्हीही उतरून तुमच्या घरी, थंडीत दोघिंवर अस्वलीं पांघरूण आणि तुमची रात्रभर राखणदारी सौमित्र साळुंके १७ फेब्रुआरी २०१५ तळटीप: अश्मयुगात कुठून आली फिशिंगनेट आणि नाव, अश्मयुगात बोली भाषा नव्हतीच, ही बोली भाषा मराठी किंवा अरबी भाषेसारखी वाटतेय अश्या स्वरूपाच्या कमेंट्स करू नयेत. तसल्या खवचटपणावर फक्त माझी मक्तेदारी आहे स्मित केवळ भावना लक्षात घ्यावी. माझी ज्ञानपीठासाठी शिफारस व्हावी असा माझा मानस नाही कारण मला सलमान रश्दीची भीती वाटते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2557 views

💬 प्रतिसाद (8)
ब
बाबा पाटील Tue, 02/17/2015 - 07:00 नवीन
जल्ला काय कल्ला नाय बा.*scratch_one-s_head* *SCRATCH*
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/17/2015 - 07:17 नवीन
ऑ? अस कस कळल नाही? घरात ती दोन गुण्ड पोरटी आहेत ना? त्यांच्या बद्द्लच्या प्रेमाबद्द्ल लिहीलं आहे. मराठीतले शब्द इरवुन फिरवुन त्यांना जरा जास्तीचे काने मात्रे दिलेत. तपशिल एकच....पोरी बरोबर टवाळक्या करायच्या सोडुन पैक्याच्या मागे धावावं लागतयं.
  • Log in or register to post comments
ग
गिरकी Tue, 02/17/2015 - 07:46 नवीन
आवडलं !!
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 02/17/2015 - 15:10 नवीन
पण काय करता,दमलेल्या बाबाची गोष्ट माहिते आहे ना.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 02/17/2015 - 16:09 नवीन
ची जाहिरात आठवली!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/18/2015 - 11:11 नवीन
लेखन वाचले ! अश्मयुगात प्रवेश झाल्या सारखे वाटले... *LOL* चला आत्ताच्या डिजीटल युगात परतावे म्हणतो !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Fri, 02/20/2015 - 09:51 नवीन
लेखकाची कल्पनाशक्ती व शब्दप्रभुत्व बघून वारल्या गेलू आहे.. :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/20/2015 - 15:38 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा