Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव

म
माहितगार
गुरुवार, 02/12/2015 - 07:39
💬 28 प्रतिसाद
लाकूडतोड्याची गोष्ट या संजीव खांडेकर यांच्या दीर्घ कवितेचा संक्षेप एका संध्याकाळी एक लाकूडतोड्याटाईप गरीब इसम एका नदीकिनारी आपले कपडे धूत होता. ....... तर घाईमुळे धुता धुता अचानक त्याच्या हातून त्याची 'स्किन' निसटली आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात लांबवर वाहून जाऊ लागली. पोहता न आल्याने व एकुलती एक 'स्किन' वाहून गेल्याने आता आपल्याला नागडेच राहावे लागणार नागडेच शहराकडे परतावे लागणार या जाणिवेने लाकूडतोड्या शहारला ..... तू कशाला काळजी करतोस?" एवढे म्हणून भगवान स्वतःच नदीच्या पाण्यात उतरले. एका डुबकीतच त्यांनी निळ्या रंगाची, नवीकोरी, लेबलसहित असलेली, काही ठिकाणी मुद्दाम फाडलेली डिझायनर जीन्स बाहेर काढली लाकूडतोड्यासमोर धरली, ...... लाकूडतोड्याने जीन्स हातात घेतली, निरखली व त्यांना, ती परत देत तो पुटपुटला, 'ही नव्हे माझी...' ..... श्रीभगवान म्हणाले, 'मॅन हिअर यू गो; तुझीच ही. अॅन्टिफिट. टेक्सास, यू. एस. मरीन इन गल्फ; चढव अंगावर ... आणि गेट लॉस्ट!' ...... भगवान म्हणाले, 'हे माझ्या फाटक्यातुटक्या मित्रा, I'm really pleased and happy. Touched and moved. कित्येक दिवसांत तुझ्यासारखा सच्चा भक्त पाहिला नव्हता. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. म्हणून विसर तुझी जुनी अडगळ वेडगळ स्किन. बक्षीस म्हणून या तिन्ही जीन्स मी तुला देत आहे. आणि वर एक वरही.' ..... And there shall be a giant mall, And there became the Mall. And there shall be Jeans on Sale. And there became the Sale of Jeans. And the God said there shall be happiness And there became the happiness ...' ..... लाकूडतोड्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याने तिन्ही जीन्स एकापाठोपाठ एक लेबलसह अंगावर चढवल्या. भगवान म्हणाले, 'यापुढे कोणीही राहणार नाही नागडाउघडा.' तरी त्याने पुन्हा विचारलेच, 'पण माझं म्युझिक महाराज?' श्रीभगवानांनी बोट वर केले. लाकूडतोड्याने वर पाहिले. दहा दिशांनी उजळत काही गोपुरे वर येताना दिसत होती. सारे शहर होर्डिग्जच्या सप्तरंगात न्हात होते. लाकूडतोड्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे एका नव्यानेच वर येणाऱ्या, मॉलच्या उजळलेल्या मनोऱ्याच्या दिशेने तो चालू लागला. हात जोडून म्हणाला, 'Thank you.' आज सकाळी सकाळी मिपावर आलेल्या एका नव्या कवितेतील ओळींनी चक्क धक्का दिला. नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा.....श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा .. नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा .." :) प्रतिसाद देणार्‍यांनी पण लगेच "पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, " या गदिमांच्या ओळींची आठवण करून दिली :) कविला स्थळ आणि काळाच बंधन नसत हे मान्य, गदिमांचा १९७७ पर्यंतचा काळ मान्य आहे, मोह नसणारे आणि असणारे सर्व काळात असतात आणि मोह असणार्‍यांची संख्या सर्व काली अधीक असतील हे ही मान्य व्यक्तीगत स्तरावर आपल्या मिपाकर कविंना संपत्तीचा मोह सोडावासा वाटतो हेही मान्य तरीही सदहुर कवि महोदयांची कविता सद्य सामाजीक काळाचे प्रतिनिधीत्व कितपत करू शकेल अशी शंकाच वाटली नाही, तर सर्वकाळी सोन्यावर अतुट प्रेम करणारे आम्ही भारतीय परकीय चलनाच्या गंगाजळीत कितीही तूट आली स्वीस बँकांमध्ये जवाहिर्‍यांनी कितीही पैसा जमा केला तरी सोने आणि जडजवाहिरांची खरेदी वाढवतानाच दिसतेच आहे एवढेच नाही तर गदीमांचा काळ ते आताचा काळ यात केवढातरी सामाजीक बदल घडलेला आहे. आम्ही आज मोदींना मते देतो ते फक्त पोटापुरते अन्न दे म्हणून देतो का आमच्या आकांक्षा त्या पलिकडच्या आर्थीक स्पर्धात्मक युगात पोहोचल्या आहेत म्हणून देतो ? खरतर मला आधी प्रेषक, विदेश यांच्या कवितेच विडंबन करू की गदीमांच्या कवितेच विडंबन करू असा प्रश्न पडला पण गेल्या दिवाळीअंकात ऐसी अक्षरेने संजीव खांडेकर यांचा नांगी गळू लागलेले फुलपाखरू + लाकूडतोड्याची गोष्ट हे दोन मिळून एक अती प्रदीर्घ काव्य-लेख बदललेल्या काळातील केवळ पोटापुरते मागणार्‍या अल्पसंतुष्ट लाकुडतोड्याते आर्थीक समृद्धीतूनच सर्वकाही मिळवण्यासाठी धावणारा असंतुष्ट लाकुडतोड्या या लाकुडतोड्याच्या बदलत्या जाणीवांवर चपखल विडंबन करते. त्या काव्य लेखाच मी मागे ऐसीवर रसग्रहण करण्याचा प्रयास केलाच होता, कवि विदेश यांच्या कवितेच्या निमीत्ताने तो मिपाच्या वाचकांसाठी खाली पुन्हा देत आहे. संजीव खांडेकर यांचा काव्य लेख प्रदीर्घ असल्यामुळे माझ रसग्रहणही बर्‍या पैकी वेळ काढून वाचावे लागेल एवढे दीर्घ आहे. संजीव खांडेकर यांच मुळ लेखन ऐसीवरील नांगी गळू लागलेले फुलपाखरू + लाकूडतोड्याची गोष्ट या दुव्यांवर उपलब्ध आहेच. नांगी गळू लागलेले फुलपाखरू + लाकूडतोड्याची गोष्ट हे दोन मिळून एक अती प्रदीर्घ काव्य-लेख बनतोय. लाकूडतोड्याची गोष्ट हि कविता नांगी गळू लागलेले फुलपाखरू मधील लेखकाची भूमीका समजून न घेता वाचली तर खूप महत्वाचा आणि मोठा काँटेक्स्ट सुटून जातो. लाकूडतोड्याची गोष्ट हि कविता नांगी गळू लागलेले फुलपाखरू हे अतीच दिर्घ असल्यामुळे त्याचा संक्षेप करण्याचा मी या प्रतिसादातून प्रयास केला आहे. लाकूडतोड्याची गोष्ट येथे माझ्या प्रतिसादातून काव्याच्या माझ्या मतानुसार असलेला रसग्रहणाचा प्रयत्न केला आहे. "लाकूडतोड्याची गोष्ट" चा मी वर केवळ संक्षेप दिला आहे. पुढील रसग्रहण पुढे वाचण्यापुर्वी, "लाकूडतोड्याची गोष्ट कविता या दुव्यावर " जाऊन वाचणे अधीक उपयूक्त असू शकते. संजीव खांडेकर यांनी नांगी गळू लागलेले फुलपाखरू हा लेख आधी लिहिला आहे का त्यांची 'लाकूडतोड्याची गोष्ट' उपरोक्त काव्य आधी लिहिली हे निश्चीत सांगता येत नाही. नांगी गळू लागलेले फुलपाखरू हा लेख न वाचता 'लाकूडतोड्याची गोष्ट' काव्य स्वतंत्रपणे वाचता येत असले तरीही काव्याचा आणि काव्य लेखक संजीव खांडेकर यांच्या भूमीकेचा पुरेसा उलगडा केवळ काव्यातून होत नाही, त्यांच सदर काव्य आणि लेख याचे धागे एकमेकांशी एकमेकांशी घट्ट जुळलेले आहे त्यांच्या लेखाचे काळजीपुर्वक वाचन केल्यास लक्षात येते. नांगी गळू लागलेले फुलपाखरू + लाकूडतोड्याची गोष्ट वेगवेगळे दिलेले असले तरीही ते एकाच लेखसंग्रहात एकाच वैचारीक दृष्टीकोणातून आले आहेत, म्हणून नांगी गळू लागलेले फुलपाखरू + लाकूडतोड्याची गोष्ट हा एक काव्य लेख अथवा लेख काव्य आहे असे म्हणावेसे वाटते म्हणूनच संजीव खांडेकर यांचा उल्लेख निव्वळ कवी अथवा निव्वळ लेखक असा करण्यापेक्षा काव्य लेखक असा अधिक योग्य वाटतो. नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेख वाचण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात म्हणून निटसा न वाचताच केवळ काव्यच वाचले जाण्याची आणि काव्यास न्याय पुरेसा न्याय न मिळण्याची शक्यता वाटते म्हणून नांगी गळू लागलेले फुलपाखरू याचा संक्षेप करणे आणि काव्याचा आणि लेखाचा सहसंबंध दाखवण्याचा माझ्या परिने प्रयास करणे असा प्रयास करण्याचा मानस आहे. नांगी गळू लागलेले फुलपाखरू या लेखाच्या आधारे काव्य लेखकाची भूमीका समजून घेण्याचा प्रयत्न केला असता काव्यलेखकाच्या काही भूमीका स्पष्ट होत जातात. संजीव खांडेकर म्हणतात "मी स्वतः कलेला समाजपरिवर्तनाच्या चळवळीपासून वेगळे मानत नाही." त्यांचा दृष्टीकोण कलेसाठी कला असा नसून प्रबोधनासाठी कला हि त्यांची भूमीका उघड आहे. बदललेल्या काळात रंजनाच्या क्षेत्रात केवळ कलेलाच मुल्य प्राप्त झालेलय अस नाही तर कलाकारालाही (व्यक्तीला) क्रयमुल्य प्राप्त झाल्याची संजीव खांडेकरांची तक्रार आहेच अर्थात हा वेगळा विषय आहे पण मुख्य म्हणजे त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश प्रबोधन असल्यामुळे कलामुल्य आणि त्यात कुठे उत्कटतेशी तडजोड झाली अथवा कृत्रीमता जाणवल्यास ते मुद्दे वाचकाने गौण गृहीत धरावेत हि कोणत्याही प्रबोधनवादी लेखकाची अपेक्षा असू शकते. या मुद्द्याचा नंतरच्या प्रतिसादात अधिक उहापोह बहुधा करेनच. काव्य-लेखकाचा मराठी, महाराष्ट्र, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय इतिहास, तत्वज्ञान , अर्थशाशास्त्र, सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या व्यापकपटाशी परिचय आहे १९८०च्या आधीच्या दशकांमध्ये स्वतःला विवीध चळवळींमध्ये झोकून देणारा माणूस, गेल्या तीस एक वर्षात कुठेतरी हरवला आहे त्याचा शोध काव्य लेखक नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखातून घेतोय तर त्याची सामाजिक परिणती लाकूडतोड्याची गोष्ट या काव्यातून मांडली जाती आहे. भांडवलशाहीच्या प्रगतटप्प्याला अभिप्रेत आदर्श अर्थव्यवस्था तर दुसर्‍या बाजूला मागे पडत चाललेल्या मार्क्सवादी भूमीका या दोन्हींचा काव्यलेखकास यथास्थीत परिचय दिसतो. काव्यलेखक लेखात म्हणतो "पोथीनिष्ठ डावे (जेमसन यांच्या भाषेत Vulgar Marxist) अशा समकालीन कलावंताची समीक्षा करताना बदलल्या काळाचे, दुभंगलेल्या निष्क्रिय व कोणतीच भावभावना न उरलेल्या समाजाचे, भांडवली अर्थव्यवस्थेतल्या 'मनी कॅपिटल मनी' (MCM) या फॉर्म्युल्याने आलेल्या आडाखी अर्थरचनेचे पैलू व पदर लक्षात न घेता नुसतीच टीका करतात हे योग्य नाही." या वरून काव्यलेखक पोथीनिष्ठ डावा नसावा परंतु गेल्या तीसवर्षात झालेल्या बदलांचे मुल्यमापन डाव्या अंगाच्या कुठल्यातरी छटेने होते आहे. अर्थात हे मुल्यमापन केवळ डाव्या चष्म्यातून झाले असण्याची शक्यता आहे म्हणून दुर्लक्षीण्यासारखे नाही कारण झालेला मानवी आणि सामाजिक बदल काव्य-लेखकाने त्याच्या लेख आणि काव्याच्या माध्य्मातून ज्या नेमकेपणाने पुढे आणला आहे ते मार्मिक आणि म्हणून दखल घेण्या जोगे वाटते आहे. 'लाकूडतोड्याची गोष्ट' कवितेतिल लाकूडतोड्याटाईप गरीब इसम एक प्रोलेटॅरिएट म्हणजे रोजंदारीवरील कामगार आहे. "त्याच्यापाशी कपड्यांचा एकच जोड होता. तोही अनेक ठिकाणी फाटलेला. तो एकच एक असल्यामुळे तो कपड्यांनाच 'स्किन' म्हणत असे" या ओळीत तुलना १९८० च्या दशकाआधीच्या कामगार आणि इतर गरीबांच्या स्थितीशी आहे. (संदर्भ: १, २) १९८० च्या आधीही कामगारांची/गरीबांची त्वचा (जखमांमुळे) फाटलेलीच होती, अंगावरची ती जखमांनी फाटलेली त्वचा हेच त्याचे एकमेव कपडे आहेत. (जखमांनी) फाटलेली त्वचा हे त्या कामगाराच्या/गरीबाच्या स्वत्वासाठी वापरलेल रुपक आहे. आता काळाच्या ओघात नदीतून बरच पाणी वाहून गेलय (काळ बदललाय) हि त्याची त्वचा फाटकी असणे जुनीच गोष्ट आहे ती मलीन होते आणि म्हणून तो सतत नव्याने येणार्‍या नदी प्रवाहातील पाण्याने तो त्याची त्वचाच स्वत्व धुऊन घेण्याच्या प्रयत्नात आहे. हे स्वत्व धुऊन घेणही सोप राहीलेल नाही. त्याला स्वत्व धुऊन घेण्याच काम अत्यंत घाई घाईत उरकाव लागतय जो पर्यंत त्याच स्वत्व धुऊन पुन्हा घालत नाही तो पर्यंत तो केवळ नागडाच नव्हे चक्क त्वचा नसलेला म्हणजे स्वत्वहीन नागडा असतो. उरलं सुरलं स्वत्व पुन्हा परिधान करण्याची घाई एकदिवस त्याच्या अंगलट येते, एकुलती एक 'स्किन' कसबस जपलेल फाटक का असेना स्वतःच स्वत्व वाहून जाते, आता आपल्याला नागडेच म्हणजे स्वत्वाशिवायच राहावे लागणार "या जाणिवेने लाकूडतोड्या शहारला" आणि "तो घाबरून प्रथम धाय मोकलून तर नंतर नियमित ड्रमबीट्ससारखा हुंदके देत रडू लागला. " तो आता नियमित रडू लागलाय कि सोबतच बदललेल्या काळात त्याच्या रडण्यालाही नियमांनी जखडून टाकल्यामुळे त्याला त्याच रडणही तालबद्ध टेवाव लागतय ?
ते बीट्स इतके तालबद्ध, रिदमिक होते की त्यावर सारा आसमंत थिरकू लागला. नाचू लागला. जणू सारा निसर्गच - डिस्कोथेक प्लॅटफॉर्म झाला आहे असे भासू लागले.
यात एका पेक्षा अधिक अर्थांनी काव्य लेखक उपहास करतो आहे. त्या गरिबाच्या आसमंताला त्याच्या हुंदक्यांशी काही एक देणे घेणे नाही त्याच्या हुंदक्यांनाच त्याच्या भोवतालचा निसर्ग आपल्या रंजनाच माध्यम बनवतोय दुख्खाचाच बाजार बनवतोय. काळ एवढा बदललाय की कुणालाच कशाच काही वाटत नाही. "जीत का मंत्र है, टेक इट इझी पॉलिसी," या ओळींकडे काव्य लेखकाचा निर्देश येथे प्रस्तुत वाटतो. नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखात पर्यावरणाच्या राजकारणाचा उल्लेख लेखक करतो त्या उल्लेखातून येणार्‍या उपहासाची छटा सुद्धा या ओळींना असू शकेल का
....सखीला आता गंमत वाटू लागली होती. अधूनमधून तीही नाचू लागली. 'माय हिप्स डोन्ट लाय' म्हणत नाचू लागली..... .....सखीसकट सारा निसर्ग पुन्हा नाचण्यासाठी पोझ घेऊ लागला. ढुंगण वरखाली करत, पायांनी ताल जमवू लागला. जागच्या जागीच घुमू लागला......
सोबत खालील ओळी अभ्यासा "परंतु गेल्या काही वर्षांत असे काय बरे घडले असावे की विचित्र वाटणारा पिकासो किंवा हुसेन, चित्रे, कोलटकर किंवा त्याही आधीचे मर्ढेकर, तेंडुलकर किंवा ढसाळ असे सगळेच सद्य समाजाला विघातक वाटेनासे झाले? इतकेच नव्हे तर यातील बहुतेक सगळे 'क्लासिक' किंवा 'लोकमान्य व राजमान्य' कला-सौंदर्य-व्यवस्थेत चपखलपणे सामावले गेले! दुसरीकडे समकालीन कलाप्रांतात विरोध व्हावा वा धक्का बसावा असे काही घडताना आपल्याला दिसत नाही. जे जे म्हणून असभ्य होते, धक्कादायक किंवा वाळीत टाकलेले होते - मग पंक असो, रॉक असो, किंवा लैंगिक मुक्ताविष्काराचे दर्शन असो - सारेच काही आता समाजात सहज गिळून विनासायास पचवले जाते. इतकेच नव्हे, असे काही असलेच तर ते विक्रीच्या दृष्टीने (कमर्शियली) यशस्वी तर होतेच; परंतु शासनाच्या वा अन्य अकादमीच्या पुरस्कारालाही प्राप्त होते. जाहिरातक्षेत्राने तर आधुनिकांच्या काळात जे जे वावगे म्हणून हिणवले जाते ते ते आपले मानून सबंध आधुनिकतेचेच एक प्रॉडक्ट किंवा क्रयजन्य उत्पादन करून टाकले आहे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे वुडस्टॉक फेम जीन्स पॅन्ट्स आणि चे गव्हेराचे चित्र छापलेल्या चड्ड्या, निकर्स आणि ब्रेसियर्ससुद्धा विक्रीला उपलब्ध आहेत. विरोधाला क्रयवस्तू करून तिची विक्री करण्याच्या या 'मार्केट फोर्स'च्या ताकदीला काय म्हणणार?..... जे जे म्हणून व्यवस्थेला आव्हान देणारे होते त्याचीच व्यवस्था - Canon बनवून - ते पाठ्य पुस्तकापासून रस्त्यावरील दुतर्फा होर्डिंग्जवर रंगवून त्यातील सुप्त विरोध इच्छारूपाला पिळून पिळून रिकामे करण्यात ही व्यवस्था यशस्वी झाली आहे. ......अशा 'स्व'चे स्खलन किंवा पतन झालेल्या, वीर्यपतनानंतर क्षीण झालेल्या लिंगासारख्या, आणि स्वतःतील ऊर्जेचा अभाव जाणवून 'थंड' झालेल्या समाजाला कशाचेच काहीही वाटेनासे होते. जेमसन यांची सुप्रसिद्ध रचना वापरायची झाल्यास ते या अवस्थेला 'Waning of the affect' असे म्हणतात - भावनेचा क्षय, नातेसंबंध, प्रेम, राग, द्वेष अशा साऱ्याच भावना या अवस्थेत नष्ट होऊ लागतात. शब्द गुळगुळीत होतात. ............या सर्व भावनांचे व्यावसायिक व 'कमर्शियल' क्रय वस्तू रूपांतर करण्यासाठी एका बाजूला मदर्स, फादर्स, ब्रदर्स, फ़्रेंड्स अशा सगळ्या नात्यांचे 'डे' साजरे करण्यासाठी व त्याकरता खरेदी-विक्री होण्यासाठी एका स्वतंत्र मार्केटची निर्मिती सद्य भांडवली अर्थव्यवस्थेने केकवरील 'आयसिंग'सारखी मांडली आहे. प्रेम व्यक्त करायचे तर शॉपिंग करा, कंटाळा घालवायचा तर शॉपिंग करा - Shop till you drop अशा घोषणांतून, लैंगिक सुखापासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आध्यात्मिक भोंगळापर्यंत आणि रामदेव बाबाच्या योगसाधनेपासून डॉ. केगलच्या एक्सरसाईजपर्यंत माणसातील माणूस नष्ट करण्याची, त्याला भूतकाळापासून वेगळे काढण्याच, त्यामुळे भविष्याची कल्पना करण्याची संवेदना नष्ट करण्याची, किंवा सतत वर्तमानातच ठेवण्याची योजना सद्य व्यवस्थेच्या, भांडवलाच्या शेवटच्या अतिप्रगत टप्प्यात आखण्यात आली आहे. कशाचेच काही न वाटणे ही सर्वात भीषण बाब आहे. मानवी इतिहासात माणसाचे एवढे नीच पतन कधीही झाले नसावे. या फॅशनेबल अलिप्ततेचे (modish detachment) आणि उपरोधिक विडंबनाचे आविष्कार समकालीन (उत्तर-आधुनिक?!) साहित्य व कलांमध्ये आपल्याला वारंवार भेटत राहतात. नव्वदीच्या सुरुवातीला प्रभू देवा याचे 'ब्रेक डान्स'वर केलेले गमतीशीर गाणे ते गाणे असे होते: “उर्वशी, उर्वशी… टेक इट इझी उर्वशी - उंगली जैसी दुबली है। नही चाहिये फार्मसी जीत का मंत्र है, टेक इट इझी पॉलिसी, चार दिन की चांदनी, ये जवानी फॅन्टसी, उर्वशी … टेक इट इझी उर्वशी.” विरोध तर बाजूला राहिला, परंतु, 'ठेविले अनंते तैसेची रहावे' किंवा काहीही झाले तरी Take it easy, प्रतिक्रिया नको. प्रतिसाद नको. काहीही घडो; परंतु मातीच्या थंड गोळ्यासारखा पहुडलेला हा समाज ढिम्म हलण्याचे नाव घेत नाही. ..... आणि, मुख्य म्हणजे हाच ढिम्म, निराकार, निर्गुण, गुळगुळीतपणा समकालीन वा उत्तर-आधुनिक..... अनेक मराठी लेखक-कवींच्या साहित्यातून वारंवार जाणवणारी फॅशनेबल संन्यस्तवृत्ती - डिटॅचमेंट माझे आधीचे संबधीत प्रतिसाद : नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखात काव्यलेखक १९८०च्या आधीच्या ध्येयवेड्या चळवळीतील जगातील ध्येयाची विठ्ठलाशी तुलना करत असावा. लेखात काळासोबत झालेल्या बदलांबद्दल काव्यलेखक म्हणतो, "ज्या वाटेवर विठ्ठल भेटेल म्हणून चाललो, ती वाट वाट नव्हती, उलट जे जे त्याज्य मानले, तेच व तेवढेच सत्य आहे की काय अशा तात्त्विक, आयडिऑलॉजिकल, आणि प्रसंगी धार्मिकदेखील गोंधळाच्या वादळात 'संकल्प' पिढीचे तारू अडकले व भरकटलेही." . ह्या बदलाची एकुण व्याप्ती काव्यरुपातून व्यक्त करताना, झालेल्या बदलांचा सामाजिक परिणाम नोंदवताना बदललेल्या काळातील व्यवस्थेने "श्रीभगवान" (ध्येयच) बदलले आहे की "श्रीभगवान" (ध्येय) च बदललेल्या काळातील व्यवस्थेच प्रतिनिधीत्व करतात की, गरीब गुलामास (चळवळीच्या कार्यकर्त्यास) , मालक असलेला "श्रीभगवान" (आजची व्यवस्था) कसेही वागला/ली अपमानीत केल तरी त्याला त्याच काही वाटत नाही. "श्रीभगवान" (व्यवस्था) सुखलोलुपतेत ते ही (पत्नी सोबत नव्हे) कुणातरी सखी सोबत रममाण आहे. सर्व सुविधा आपल्या डाव्या पायाच्या आंगठ्यात सहज समाविष्ट करण्या एवढे तंत्रज्ञान उपलब्ध असून ते सर्वसामान्यांसाठी न वापारता आपल्या पायाचा डावा अंगठा चोखण्यासाठी तोंडात ठेवण्यात व्यवस्था मश्गूल असल्याची कठोर टिका काव्य लेखक नवव्यवस्थेवर करतो आहे. "श्रीभगवान" आणि सखीच यांच जग वेगळ आहे ज्यात सखीला स्वत्व हरवलेला प्रोलेटॅरिएट / गरीब कामगार पुर्ण अनोळखी आहे. प्रोलेटॅरिएट शब्द म्हणजे प्रथमतः प्रथम तिला हा परफ्युम किंवा ब्रेसियरचा नवा ब्रॅन्ड असावा असे वाटते एवढी ती मार्केट फोर्सेसच्या (ब्रॅन्डसच्या) आहारी गेली आहे. पण या विपरीत परिस्थितीतही एकदाच सखीला आणि मग श्रीभगवानांना भान येत पण बदललेल्या काळामुळे या भान येण्याच्याही मर्यादा पुन्हा पुढे येतात.
श्रीभगवान पुन्हा म्हणाले, 'अगं प्रोलेटॅरिएट, प्रोलेटॅरिएट...' ...भगवानांना एकदा वाटले, सरळ चक्र चालवावे आणि त्या फाटक्या माणसाचे मुंडके उडवावे. म्हणजे रडणे थांबेल, त्यामुळे म्युझिक बंद होईल आणि निसर्ग ताळ्यावर येईल.
सखीला समजावताना या विश्वात असे प्रोलेटॅरिएट असतातच अशी किचीत दुर्लक्ष करणारी अगदीच अडचण झाली तर त्याचे मुंडके उडवू इच्छिणारी त्याला मुळासकट संपवू पाहणारी व्यवस्थेची भूमीका आहे, पण विरोधाभासाची जाणीव झाल्यावर, श्रीभगवान दखलतर घेतात.
....स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आहे. हजार हात आणि दशसहस्र पाय आहेत, हबल, बबल, सबल, सखोल, स्फटिक आहे. मशीनरी, बॉम्ब्स म्युझियम्स आणि पार्लमेन्टदेखील आहे. देवळं, चर्चेस किंवा मशिदी मदरसे
हा सारा मिजास, मिरवणं आहे. पण मार्केट फोर्सेस नी देऊ केलेली जीन्स सोडून लाकुडतोड्यास त्याचे स्वत्व जपणारी काळासोबत वाहून गेलेली त्याची स्वतःची त्वचा त्यास देण्यास व्यवस्थाशरण श्रीभगवानाकडे हतबल सिद्ध होतात आणि श्रीभगवानने दिलेले कपड्यात (जीन्स मध्ये) लाकूडतोड्यास आपले स्वत्व सापडत नाही म्हणून तो ती जीन्स आपली नाही म्हणून नाकारतो तेव्हा. स्वत्वाचा हट्टलावून धरून आपल्या सुखलोलूपतेच्या वेळेत व्यत्यय आणणार्‍या लाकूडतोड्यास त्याच्या स्वत्व मागण्याच्या आग्रहामुळे वैतागून संयम सुटून व्यवस्था शेवटी शिव्यांची लाखोली वाहून मोकळी होते नाईलाजाने स्वत्व सोडून नवव्यवस्थेला शक्य असेल ते गरीबांवर लादून मोकळी होते. लाकूड तोड्यासही त्याचे काही वाटत नाही. तीन ब्रॅण्डेड जीन्स दिल्या की लाकुडतोड्याचा विरोधही विरघळून जातो.
त्याचा चेहरा आनंदाने फुलला. पण क्षणभरच. पाठोपाठ त्याच्या साऱ्या नागड्या शारीरिक आंतररचनेतून एक पीळदार उसासा बाहेर पडला. तो म्हणाला, ' व्हाय डू यू डू धिस? ही पण माझी नव्हे.' सखीसकट सारा निसर्ग पुन्हा नाचण्यासाठी पोझ घेऊ लागला. ढुंगण वरखाली करत, पायांनी ताल जमवू लागला. जागच्या जागीच घुमू लागला. पण श्रीभगवानांनी प्रसंगावधान राखले एक हात उंचावून त्यांनी निसर्गाला आपल्या जळजळीत नजरेने रोखले. सखीला फ्रीज केले आणि लाकूडतोड्याला स्मितहास्य दिले. भगवान म्हणाले, 'हे माझ्या फाटक्यातुटक्या मित्रा, I'm really pleased and happy. Touched and moved. कित्येक दिवसांत तुझ्यासारखा सच्चा भक्त पाहिला नव्हता. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. म्हणून विसर तुझी जुनी अडगळ वेडगळ स्किन. बक्षीस म्हणून या तिन्ही जीन्स मी तुला देत आहे. आणि वर एक वरही.' लाकूडतोड्या म्हणाला, 'तो कोणता महाराज?' भगवानांनी आता जाणले होते की निसर्ग काबूत येऊ लागला आहे. श्रीभगवानांनी अभयमुद्रा धारण केली आणि ते म्हणाले, 'And there shall be a giant mall, And there became the Mall. And there shall be Jeans on Sale. And there became the Sale of Jeans. And the God said there shall be happiness And there became the happiness ...'
तरीही लाकूडतोड्याच्या शरीरातन विरोधाचा उसासा आपसूकपणे बाहेर पडलाच तर व्यवस्था निसर्ग आणि सखीला आपल्या तीक्ष्ण नजरेने दम भरते, लाकूडतोड्याला स्मीत हास्य आणि मिथ्यापण अधिक स्वप्नवत आश्वासने देऊन जिंकून घेते. लाकूडतोड्या व्यवस्थेने देऊ केलेल्या मॉलच्या दिशेने जाताना Thank you. म्हणतो तर व्यवस्था मनाशी Fuck you असे पुटपुटते पण लाकुडतोड्याला त्याचे आता सोयरसुतक उरलेले नाही, तोही थंड होऊन त्याच मार्केटफोर्सेसनी दिलेल्या जीन्सच्या चक्राचा भाग होऊन गेलाय स्वत्व विसरून गेलाय. लेखक We are witnessing the emergence of a new kind of superficiality in the most literal sense या वाक्याकडे निर्देश करतो. नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखात काव्यलेखक म्हणतो
"....भीती आहे ती इतिहास नसण्याची...... ....भूतकाळ पचवण्याची, इतिहास वागवण्याची, आणि इतिहास जगण्याची मानवी क्षमता दिवसेंदिवस कमी कमी होताना जाणवते. ग्राहक भांडवली व्यवस्था (Consumer Capitalism) किंवा 'लेट' - सद्य अर्थव्यवस्थेच्या रगाड्यामध्ये माणसाला फक्त आणि फक्त, सततचा वर्तमानच जगण्याची सक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. असा माणूस भविष्याचा वेध तर सोडाच, पण उद्यासाठीही जगायला दिवसेंदिवस असमर्थ ठरण्याची शक्यता असते. ज्याला केवळ वर्तमानच आहे तो कसल्या चळवळी उभारणार? कसल्या कला विकसित करणार? उद्याचे कोणते गाणे आज म्हणणार?"
ज्याच्या करता लढायच त्यालाच विवीध आकर्षणात अडकवून मार्केट फोर्सेसनी दुसरीकडे लक्ष वळवल एका अर्थानी संपवला आहे तेव्हा तो काळ मागे पडला त्या चळ्वळी मागे पडल्या आहेत. नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखात या सर्व बदलाची परिणती एक दिवस अधिक हिंसक जगात होईल असे काव्यलेखकास वाटते या बद्दल आजच्या काळात कुणी क्वचितच सहमत होईल. परंतु प्रगत भांडवलशाहीच्या जग संधींच्या दृष्टीने फ्लॅट-सपाट आहे याची लेखक नोंद घेतो, या सपाट जगात एका अर्थाने त्या गरीब कामगारा प्रमाणेच जवळपास प्रत्येक व्यक्ती स्वत्व हरवून बसली आहे. एखाद्या खरेदी करू शकणार्‍या आणि काम करणार्‍या रोबोट पलिकडे व्यक्तीच या व्यवस्थेत स्थान नाही या बदललेल्या गंभीर वास्तवाकडे काव्य लेखक यशस्वीपणे निर्देश करतो असे वाटते. व्यवस्थेच्या तोंडी जे असभ्य शब्द काव्यलेखकाने जाणून बुजून घातले आहेत त्याचा उद्देश स्वत्व हरवलेल्या मशिनीकृत झालेल्या माणसाला पुन्हा एकदा जाग करण्याचा भान देण्याचा आहे हे इथे लक्षात घेतले पाहीजे. लाकूडतोड्याची गोष्ट या कवितेतील शिव्या (जिथपर्यंत माझा कयास आहे) मजा देण्यासाठी अथवा मजा घेण्यासाठी नसाव्यात. त्या बद्दल मी अधिक या प्रतिसादातून मांडणी केली आहे. लाकूडतोड्याची गोष्ट कविने वापरलेली श्रीभगवान हि प्रतिमा आजच्या बदललेल्या भांडवलशाहीच्या काळात सर्वच समाजाला मार्केटफोर्सेसच्या कह्यात करणार्‍या व्यवस्थेचे प्रतिनिधीत्व करते अथवा व्य्वस्थाशरण झाली आहे हे दाखवण्यासाठी वापरली असावी. लाकूडतोड्याची गोष्टमध्ये शिव्यांच्या वापरांचा कवीचा मूळ उद्देश बदललेल्या व्यवस्थेच स्वरूप दाखवणे आणि शिव्या दिल्यानंतरही जाग न येणार्‍या आपल हरवणार स्वत्व थंड पणे स्विकारणार्‍या समाजाकडे लक्ष वेधणे समाजपुरुषाला जागे करणे असा असावा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8473 views

💬 प्रतिसाद (28)
व
विजुभाऊ गुरुवार, 02/12/2015 - 07:47 नवीन
अगो बाबो........ कीस पाडलाय कीस पाडणे.. तेही व्हॅलेन्ताईनच्या आठवड्यात.! का लोक असा एखाद्या गोष्टीचा कीस पाडतात. एखादी सुंदरी .सुंदर दिसते म्हंटले इतकेच बास असते की. फारफार तर तीचे डोळे बोलके आहेत. सुंदर हसते इतपत ठीक आहे. पण त्यापुढे जाऊन लोक तीचे यकॄत किती उत्तम आहे. प्लीहा किती चकचकीत आहे. किंवा मज्जारज्जू किती निळा आहे. तीच्या मोठ्या आतड्याचा व्यास अमूक अमूक इतका आहे अशी सौंदर्य चिकित्सा का करतात कोण जाणे
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 02/12/2015 - 07:55 नवीन
खपलोय *ROFL* *dash1*
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/12/2015 - 13:53 नवीन
खपल्या गेलो आहे =))
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/12/2015 - 10:54 नवीन
पण त्यापुढे जाऊन लोक तीचे यकॄत किती उत्तम आहे. प्लीहा किती चकचकीत आहे. किंवा मज्जारज्जू किती निळा आहे. तीच्या मोठ्या आतड्याचा व्यास अमूक अमूक इतका आहे अशी सौंदर्य चिकित्सा का करतात कोण जाणे ....का लोक असा एखाद्या गोष्टीचा कीस पाडतात.
=)) सुंदरीला पटवण्यासाठी :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 02/12/2015 - 07:51 नवीन
काही चुकलंय का माझं ?? अचानक मला सुन्न झाल्या सारखं वाटतंय ...का अजून काही ?? कुणी मधल्या हायपर लिन्क्स सकट वाचून जरा सोपं करून सांगेल का ?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 02/12/2015 - 08:00 नवीन
हे असा लिहिणार्‍यांचा आणि पूर्ण वाचणार्‍ञांचा मला फार फार कौतुक वाटत
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/12/2015 - 08:01 नवीन
आताचं म्हणाल तर निशःब्द का काय म्हणतात ना अगदी तसंच कायतरी झालंय ! काय झालंय ते कळलं तर नक्की लिहेन त्याबद्दल :) ;) .
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/12/2015 - 08:39 नवीन
माहितगार सर, तुम्ही ही अधलीमधली उदाहरणे न देता थेट तुमचा मुद्दा लिहिला असतात ना, तर लोकांचा गोंधळ उडाला नसता हो! ते इंटुक चेटुक आमच्या मिपाच्या साध्याभोळ्या लोकांना झेपत नाय! :D
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/12/2015 - 10:17 नवीन
संजीव खांडेकरांच हे लेखन ऐसी अक्षरेवर दिवाळी अंकाच्या माध्यमातून आली तेव्हा, ऐसी हे अभिव्यक्ती स्वांतत्र्याचे जबरदस्त समर्थक असूनही तेथील चर्चेची दिशा साहित्यातील अश्लीलता या दिशेने जाऊ लागल्याचे पाहताच त्या बाबत वेगळा धागा काढला होता. 'स्वत्व आणि श्रीभगवाच्या ठिकाणी व्यवस्था हे शब्द ठेऊन संजीव खांडेकरांची लाकुडतोड्या कविता मूळातून वाचावी '. हे एक वाक्य ही पुरेसे ठरले असते. पण पुन्हा चर्चा साहीत्यातील अश्लीलता या विषयाकडे भरकटत राहिली असती. आणि तसे झाल्याचे पाहूनच कविता अशील साहित्याचा भाग नाही वेगळे मुद्दी सांगते हे सांगण्यासाठी मी ऐसीवर सविस्तर रसग्रहणाचा प्रयत्न केला होता. संजीव खांडेकरांच्या कवितेचे तुकडे करुन वर्णन करण्यापेक्षा थेट कविता जशीच्या तशी दिली असती तर 'कोपी राईट' का काय म्हणतात ना त्याचे उल्लंघन झाले अथवा केवळ दुवा देऊन चार ओळीत बोळवले, तरी धागा उडवण्याच्या मिपा संपादकांच्या धोरणास घाबरून, आमचा गोंधळ झाला म्हणून अधिक लिहिण्याचे मनावर घेतले तर असा हा वेगळा गोंंधळ झाला. आपण म्हणता ते १०० टक्के मान्य.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/12/2015 - 11:49 नवीन
खांडेकरांची कविता/लेख याबद्दल लिहिल्यामुळे लोकांचा जास्त गोंधळ उडाला आहे.
कविला स्थळ आणि काळाच बंधन नसत हे मान्य, गदिमांचा १९७७ पर्यंतचा काळ मान्य आहे, मोह नसणारे आणि असणारे सर्व काळात असतात आणि मोह असणार्‍यांची संख्या सर्व काली अधीक असतील हे ही मान्य व्यक्तीगत स्तरावर आपल्या मिपाकर कविंना संपत्तीचा मोह सोडावासा वाटतो हेही मान्य तरीही सदहुर कवि महोदयांची कविता सद्य सामाजीक काळाचे प्रतिनिधीत्व कितपत करू शकेल अशी शंकाच वाटली नाही, तर सर्वकाळी सोन्यावर अतुट प्रेम करणारे आम्ही भारतीय परकीय चलनाच्या गंगाजळीत कितीही तूट आली स्वीस बँकांमध्ये जवाहिर्‍यांनी कितीही पैसा जमा केला तरी सोने आणि जडजवाहिरांची खरेदी वाढवतानाच दिसतेच आहे एवढेच नाही तर गदीमांचा काळ ते आताचा काळ यात केवढातरी सामाजीक बदल घडलेला आहे. आम्ही आज मोदींना मते देतो ते फक्त पोटापुरते अन्न दे म्हणून देतो का आमच्या आकांक्षा त्या पलिकडच्या आर्थीक स्पर्धात्मक युगात पोहोचल्या आहेत म्हणून देतो ?
हा तुमच्या लेखातला मूळ मुद्दा आहे. फक्त त्याबद्दल लिहिलं असतंत तरी जास्त लोकांपर्यंत पोचलं असतं.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/12/2015 - 12:24 नवीन
हो बहुधा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी १९८० च्या आधीचा काळ ते आताचा काळ यातील फरक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुतः खांडेकरांच्या कवितेतूनही तोच प्रयत्न अधिक नेमके पणाने आहे म्हणून त्या कवितेचे संदर्भाच्यादृष्टीने रसग्रहण देण्याचा प्रयत्न केला आहे. खांडेकरांच्या कविते समजून घेण्यासाठी त्यांचा लेख समजून घ्यावा लागतो आणि त्यांचा तो लेख गल्ली ते आंतरराष्ट्रीय राजकारण समाजकारण अर्थकारण अशा अनेक बदलांचा ३० वर्षांचा मागोवा घेतो. ज्यांना या सर्व बदलांचे सर्व बारकावे माहित नाहीत त्यांच्यासाठी त्यांचा लेख आणि त्यावर अवलंबून त्यांची कविता जरासे क्लिष्ट आणि जड आहेत हे मान्य आहे. उदाहरणार्थ "गोंधळाच्या वादळात 'संकल्प' पिढीचे तारू अडकले व भरकटलेही." यातील संकल्प पिढी म्हणजे कोण आणि काय संदर्भ हे इतरांना सहज उमगणारही नाही. १९८० मध्ये त्यावेळचे तरूण कार्यकर्ते जसे की नरेंद्र दाभोळकर रझीया पटेल नीलम गोर्‍हे इत्यादी विवीध चळवळीतील कार्यकर्त्यांच्या चळवळींची संकल्प नावाच्या पुस्तकातून त्यांनी परिचय करून दिला. या संकल्प पिढीच्या सामाजीक चळवळी कुठेतरी दिसेनाशा झाल्या आहेत याचे कारण ह्या चळवळीतील त्रुटीत नाही तर बदलत्या सामाजीक आर्थीक संदर्भात आहे त्याचा शोध त्यांनी त्याच पुस्तकाचे २०१० मध्ये पुर्नमुद्रण करताना त्यांच्या उपरोक्त कविता आणि लेखाच्या माध्यमातून घेतला. असे असंख्य संदर्भ असल्यामुळे क्लिष्टता आणि जडपणा सहाजीकपणे आला आहे. आणि ती क्लिष्टता रसग्रहणाच्या माध्यमातून कमी करण्याच्या प्रयत्नात मीही कुठेतरी कमी पडत असेन हे मान्य आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 02/12/2015 - 09:18 नवीन
ह्या लिंकवर हिम्मत करून गेलो तर तिथे त्या लेखात अजून ५-६ लिंक्स (मी तेवढ्याच) पहिल्या... आणि घाई घाईने परत फिरलो ... युनिव्हर्सल केओस मधून एक कोस्मोस निर्माण होतांना वगैरे वगैरे आठवले
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/12/2015 - 11:23 नवीन
लाकूडतोड्याची गोष्ट हि कविता उपहासात्मक आणि गंभीर असली तरी मूळातून दखल घेण्यासारखी आहे. कॉपीराईट मुळे कविता जशीच्या तशी न देता रसग्रहण दिले आहे. ऐसीवरील प्रतिसादांचा क्रम काहीसा उलट सुलट असतो रसग्रहण वेगवेगळ्या प्रतिसादातून झाले असल्यामुळे दुव्यांची संख्या वाढल्यासारखी वाटते. ऐसी वरील संजीव खांडेकरांचे मुख्य धागे दोनच आहेत. एक कवितेचा आणि दुसरा लेखाचा. कवितेतील सर्व प्रतिमा / रुपके त्यांच्या लेखा शिवाय लक्षात येत नाहीत. स्कीन म्हणजे स्वत्व श्रीभगवान म्हणजे व्यवस्था. श्रीभगवानांचे पायाचा डावा अंगठा चोखणे अशा प्रतिमांचा शोध केवळ कवितेतून लागत नाही कारण त्या कवितेला त्यांच्या लेखाची पार्श्वभूमी आहे. आणि त्यांच्या लेखाचे स्वरूप खरोखरही तुम्ही म्हणता तसे युनिव्हर्सल केओस मधून एक कोस्मोस निर्माण होतांना वगैरे वगैरे आठवतेय असे वाटावे असेच आहे रसग्रहण लिहिताना त्यांचा लेख कमीत कमी चारदा सविस्तर वाचून त्याचे संक्षीप्तीकरण करावे लागले आणि सतरा वेळा कविते सोबत मागे पुढे करत वाचावा लागला याच कारण त्यांनी लेखात फार असंख्य विषयांचा एकत्रित उहापोह केला आहे. त्यामुळे पाच मिनीटात वाचून संपवले असे त्यांच्या लेखाचे स्वरुप नाही. आणि मुख्य म्हणजे कवितेतील प्रतिमांची लेखातील भूमीकेशी सांगड आहे त्यामुळे तो लेख वाचल्या शिवाय कविताही नीटशी समजत नाही असे काहीसे होते. - ऐसीवर रसग्रहणाला प्रतिसादही मिळाले नव्हते. इथे प्रतिसाद तरी मिळाले :) माझ्या गोंधळामुळे इतर मिपाकर गोंधळताहेत हे पाहून गंमत वाटली. धन्यवाद
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 02/12/2015 - 10:40 नवीन
सावकाश प्रतिसाद देईन.
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील गुरुवार, 02/12/2015 - 11:17 नवीन
मूळ कविता वाचल्यावर या भागापासून वाचायला सुरूवात केली तर समजण्यास थोडे सोपे होईल, असे वाटते - संजीव खांडेकर यांनी नांगी गळू लागलेले फुलपाखरू हा लेख आधी लिहिला आहे का त्यांची 'लाकूडतोड्याची गोष्ट' उपरोक्त काव्य आधी लिहिली हे निश्चीत सांगता येत नाही. नांगी गळू लागलेले फुलपाखरू हा लेख न वाचता 'लाकूडतोड्याची गोष्ट' काव्य स्वतंत्रपणे वाचता येत असले तरीही काव्याचा आणि काव्य लेखक संजीव खांडेकर यांच्या भूमीकेचा पुरेसा उलगडा केवळ काव्यातून होत नाही, त्यांच सदर काव्य आणि लेख याचे धागे एकमेकांशी एकमेकांशी घट्ट जुळलेले आहे त्यांच्या लेखाचे काळजीपुर्वक वाचन केल्यास लक्षात येते.
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 02/12/2015 - 11:24 नवीन
प्रतिसाद वाचले .. अजूनही लेख कशासंदर्भात आहे हे कोणी इस्क्तून सांगितले तर वाचण्याचे कष्ट घेता येतील. विजुभाऊंचा प्रतिसाद वाचून लेख वाचण्याची आवश्यकता आहे असे अजूनतरी वाटत नाही. अश्या अतिप्रदिर्घ लेखासंदर्भात "पी पी टी" आणि "म्यानेजमेण्ट समरी" ची संपादक मंडळाने सोय करावी अशी विनंती करून माझा प्रतिसाद आवरता घेतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/12/2015 - 12:40 नवीन
१९८० ते २०१० या काळात झालेल्या आर्थीक-सामाजीक-राजकीय बदलांचे सामान्य माणसाच्या जीवनावर नेमका काय परिणाम झाला याचा पट खांडेकरांची लाकुडतोड्या कविता मांडते. कविता समजून घेण्यास जराशी क्लिष्ट असली तरीही ती सामान्य माणसाबद्दल आहे. मी एक सामान्य व्यक्ती आहे म्हणून मी सर्वसामान्यांच्या दृष्टीने कवितेत कविला काय म्हणायच आहे हे ह्या लेखातून इस्कटून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात एकुण प्रतिसादांवरुन माझा प्रयत्न हवा तसा सफल झाला नाही हे मला स्विकारले पाहीजे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/13/2015 - 06:13 नवीन
४/८ ओळींत जे सांगता आलं असतं ते मूळ लेखकाने ४००+ ओळीत सांगितलंय. सगळा गोंधळ त्यामुळेच झाला आहे.
  • Log in or register to post comments
प
पदम गुरुवार, 02/12/2015 - 11:44 नवीन
वाचताना डोक्यावरुन जाउ लागले, मग वाचनच टाळले. कोणी सांगेल का समजवुन?
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव गुरुवार, 02/12/2015 - 12:36 नवीन
आमचे डोके म्हणजे काय आयफेल टॉवर वाटले की काय? माझ्याही डोक्यावरुनच गेले. :)
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/12/2015 - 12:43 नवीन
विशाखा पाटील म्हणतात तसे लाकुड तोड्या हि कविता पूर्ण स्वरूपात मुळ दुव्यावर जाऊन वाचावी लागेल (या लेखात कॉपीराईट मुळे पूर्ण कविता जशीच्या तशी देता आलेली नाही.) कविता पूर्ण वाचली असेल तर पुढील रसग्रहणाचे संदर्भ जरासे लागू शकतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील गुरुवार, 02/12/2015 - 13:23 नवीन
मला जे कळलं ते असं - १९८० च्या दशकात अनेक जण सामाजिक चळवळीमध्ये काम करत होते. त्यांनी लिहिलेल्या मनोगतांचं पुस्तक - 'संकल्प'. या पुस्तकाला संजीव खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तो लेख म्हणजे 'नांगी गळू लागलेले फुलपाखरू.' (लेख अवघड असला तरी उत्तम आहे.) यातले मुद्दे कवितेशी संबंधित आहेत, असं त्यांनी लेखाच्या शेवटी लिहिले आहे. आधी लेखातले काही मुद्दे - १. १९८० च्या दशकात झोकून देऊन सामाजिक कार्य करणारे लोक होते. नंतर सामाजिक, आर्थिक परिस्थिती बदलली. परदेशातून पैसा येऊ लागला, NGOs चा सुळसुळाट झाला. २. एकेकाळी ज्या गोष्टींना समाज मान्य करायला तयार नव्हता, त्या आज समाज सहज पचवतो, किंबहुना त्याला ते पचवायला भाग पाडलं आहे. ( उदा. 'सखाराम बाईंडरवर' उठलेले वादळ ते 'एक चावट संध्याकाळ' - हे उदाहरण माझे आहे, लेखकाचे नाही. ) ३. आज जग बाजारवर / खरेदीवर चालते - हा मुद्दा सर्वांच्या परिचयाचा आहे. आता कवितेकडे वळू - १. लाकुडतोड्या स्वत्व गमावलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो. हा आजचा समाज आहे - बाजाराच्या आधीन असलेला, आपण नक्की कोण आहोत, आपल्याला काय हवं आहे, हे नं कळणारा. २. श्रीभगवान हे देखील काळाच्या ओघात बदलेले आहेत - अंगठा चोखणं, सहजपणे अपशब्द. म्हणजे त्यांचंही स्वत्व हरवलंय. त्यांची सखीही तशीच. तिला 'प्रोलेटरीअट' शब्द एखाद्या वस्तूच्या brandचा वाटतो, (मार्क्सवाद ते बाजार हा प्रवास) ३. त्या तीन जीन्सची प्रतिमा- एकेकाळी असे कपडे स्वत: हून वापरले जात नव्हते. परिस्थितीमुळेच लोक ते वापरत. आता त्यांची fashion आहे, असं आपण म्हणतो. म्हणजे हा लेखातला दुसरा मुद्दा - एकेकाळी ज्या गोष्टींना समाज मान्य करायला तयार नव्हता, त्या आज समाज सहज पचवतो, किंबहुना त्याला ते पचवायला भाग पाडलं आहे. ४. शेवटी श्रीभगवान स्वत्व शोधत बसणाऱ्या लाकूडतोड्याला वर देतात - या तिन्ही जीन्स घे. (इथे श्रीभगवान मार्केट फोर्स होतात, असे कपडे घालण्यात वावगं काही नाही हे पटवतात.) अशा जीन्सच्या खरेदीसाठी मॉलही उघडून देतात. जीन्सचा खप होतो, आणि आनंद पसरतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 02/12/2015 - 14:31 नवीन

नका नं हो ताई इतकं सिरीयसली घेऊ

मेघना मोड ऑफ
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील गुरुवार, 02/12/2015 - 15:46 नवीन
केवढी हो काळजी तुम्हाला, भाऊ! त्याचं काय आहे, मला असा डोक्याला खुराक आवडतो हो भाऊ.

त्यामुळे उगाच काळजी करू नका हो.

  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/12/2015 - 13:59 नवीन
मूळ कविताच सुमार वाटली.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/12/2015 - 14:22 नवीन
पहील्या वाचनात मला सुद्धा कविता जराशी उथळच वाटली. त्या कविते खाली ('नांगी गळू लागलेले फुलपाखरू' ह्या लेखाच्या संदर्भात वाचण्यासाठी पुनर्प्रकाशित.) अशी सूचला लिहीली होती. नांगी गळू लागलेले फुलपाखरू हा लेख न वाचता 'लाकूडतोड्याची गोष्ट' काव्य स्वतंत्रपणे वाचता येत असले तरीही काव्याचा आणि काव्य लेखक संजीव खांडेकर यांच्या भूमीकेचा पुरेसा उलगडा केवळ काव्यातून होत नाही असे माझे मत बनले,
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 02/13/2015 - 05:13 नवीन
तुम्हाला काय माहीत की मी गपगार झालो.. *unknw* लेख अर्धाच सोडून थेट प्रतीक्रियाच वाचाय्ला घेतल्या आणि समक्ष्-मोक्ष काय तो अनुभवला!!! *SCRATCH*
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/13/2015 - 05:27 नवीन
चक्क मोक्षच ? :) आम्ही मोक्षाची सर्वीस फ्री देत नै ! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा