मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे..
- मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2
- मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग ३ ओरिजनल प्रेम पत्र ...
- मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4
- मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संग - भाग 5
Book traversal links for मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे..
मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...
मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.
“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मघांची तलम झालरही होती. स्वर्गाच्या वेशीवरून उधळलेल्या ताऱ्यांची रुपेरी ओंझळ सुद्धा मला या छताकडून भेटीदाखल मिळत होती....”मैत्रीचे कसे असते पहा. नेहमी प्रत्यक्ष भेटले पाहिजे असे नाही. ना ओळख ना पाळख. एके सकासकाळी मी प्रवासात असताना मोबाईल खणाणला. ‘मी अरूण, दिल्लीतील शरद सोवनीचा मित्र. खूप वर्षापुर्वी 1979 साली श्रीनगरला घरी भेटायला आलो होतो. पण न भेट होऊन परतलो. आता 2015 सालापर्यंत मी तुम्हाला गेले कित्येक वर्षे शोधतोय. आज तुमचा फोन मिळाला. म्हणून हा संपर्क’... ‘बर, पण तू शरदचा मित्र ना? मग ‘तुम्ही’ काय सरळ तू म्हण मित्रा! म्हणून मी त्याची भीड चेपली अन् अरे-तुरे वर आलो, झाले, त्यानंतर काही ईमेल झाल्या, त्याच्या सायकलबाजीबद्दल कळले. पुन्हा भेटायचे ठरले पण मुहुर्त साधेना. तो क्षण नेमका शरदच्या चिरंजीवाच्या विवाहेच्या निमित्ताने आला. तोही असा की 10-15 मिनिटांचा... नव्या मुंबईतील महापे मिलेनियम पार्कमधील रमाडा हॉटेलात सुंदर विवाह सोहळा व नंतरचे विविध खाद्य पदार्थांनी सजलेले स्वरुची भोज संपत आले. मी शरदला विचारले, ‘अरे तो तुझा सायकलवाला मित्र अजून दिसला नाही? ‘अरे तो काय नुकताच आलाय’. एका सूट परिधान केलेल्या, फ्रेंचकट दाढीतील स्मार्ट व्यक्तीने ‘मी अरूण’ म्हणून हस्तांदोलनातून प्रत्यक्ष भेटीचा आनंद सामावला... ! पुढील 15 -20 मिनिटात त्याच्या गाडीतून वाशीला पुण्याची बस पकडायला उतरलो. तोवर त्याने आगत्याने सायकल सफरचे 400पानी सुबक पुस्तक सप्रेम भेट देण्याने माझ्या अनुभव विश्वाला पुन्हा श्रीनगरातील आठवणीत डुंबायला प्रेरित केले... त्या पुस्तकातील अनुभवांची संक्षिप्त ओळख नंतर करून द्यावी याची ही आगामी तुतारी... सुरवातीला सफरवाचकांशी संवाद साधताना मयूरडौलात मराठीभाषेशी लडिवाळ साधत अरूण म्हणतो, “... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मघांची तलम झालरही होती. स्वर्गाच्या वेशीवरून उधळलेल्या ताऱ्यांची रुपेरी ओंझळ सुद्धा मला या छताकडून भेटीदाखल मिळत होती....” या विवाहाच्या सोहळ्यात आणखी एक मित्राची गाठ पडली ते आपले स्मायली फेम अतृप्त आत्मा त्यांच्या पौरोहित्याखाली शरद उर्फ चित्रगुप्तांच्या द्वितीय पुत्राचा विवाह संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी तयार केलेली आकर्षक पुष्प रचना...
Figure 1अतृप्त आत्मा पुष्प रचनेत मग्न
💬 प्रतिसाद
(15)
ख
खटपट्या
Wed, 02/11/2015 - 21:56
नवीन
खूप छान. पुस्तक विकत घेउन वाचेनच.
आत्माजी रॉक्स !!
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
गुरुवार, 02/12/2015 - 04:41
नवीन
जरूर वाचा.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/12/2015 - 03:05
नवीन
पुस्तकाची माहिती आणखी येऊद्या ओककाका!
आमचे पुण्याचे गुर्जी मुंबैला गेले का!
गुर्जी, असाल तिथून परत या, आख्खे पुणे तुमची आठवण काढत आहे. हवे तर सायकल घेऊन या, पण या. ;)
चित्रगुप्तजी, घरात नवीन सदस्य आणल्याबद्दल अभिनंदन!
- Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी
गुरुवार, 02/12/2015 - 06:49
नवीन
++1
- Log in or register to post comments
स
सविता००१
गुरुवार, 02/12/2015 - 11:02
नवीन
रेवाक्काशी पूर्ण सहमत :)
गुर्जी, असाल तिथून परत या, आख्खे पुणे तुमची आठवण काढत आहे. हवे तर सायकल घेऊन या, पण या. ;)
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
गुरुवार, 02/12/2015 - 17:16
नवीन
मित्रांनो, प्रवासाचा व लेखनाचा आवाका इतका मोठा आहे. कि त्यातील वेचक प्रसंग देता देता अनेक पाने होतील.
काही काळात पुढील भागात रंगतदार प्रसंग वर्णने सादर करायच्या विचारात आहे.
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Sat, 02/14/2015 - 08:45
नवीन
मित्रांनो,
अरुण वेढीकरांच्या सायकल सफरीच्या विविध आठवणींची नोंद सादर केली आहे.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/12/2015 - 18:57
नवीन
+१ पुस्तक वाचण्यास उत्सुक
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Wed, 02/18/2015 - 14:05
नवीन
आता पोहोचले उधमपूर पर्यंत...
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Fri, 02/13/2015 - 06:43
नवीन
रेवती,
कधी रे येशी परतून! वाल्यांची घर वापसी झाली की नाही?
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 02/14/2015 - 14:24
नवीन
आता गुर्जी कशेळी कट्ट्यालाही जाणार असतील ना!
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 03/01/2015 - 13:50
नवीन
मस्त सुरुवात!
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Mon, 04/20/2015 - 22:52
नवीन
काही काळापुर्वी या पुस्तकाच्या परिचयाची सांगता मी भाग 6 मधे केल्याचे स्मरते. परंतु मिपा मेन्टेनन्स ला गेला त्यात माझा तो धागा गेला असावा असे वाटून तो मी परत लावला होता. नंतर मी अन्य कामात व्यस्त झालो. आज पहातो तर तो धागा सापडत नव्हता... तरुणाईला भावेल असा जरा चटपटीत रंगतदार तो होता. कोणी तो पाहिला होता काय?...
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 04/20/2015 - 23:07
नवीन
http://www.misalpav.com/node/30903
पंख लागलेले दिसत आहेत.
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Wed, 04/22/2015 - 04:36
नवीन
धाग्याला पंख लागायला काय निमित्त असावे? सामान्य ज्ञान विषयक माहिती हवी आहे म्हणजे पुढील धागा शिवताना वीण घट्ट बसेल!
- Log in or register to post comments