रिबटेबल प्रिझंप्शन
ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला.
"हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही."
तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे.
"याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला.
"तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं.
आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी. फ्रस्ट्रेशन सालं...
ती बाकावरून उठून जवळ आली.
"सर, पास झालात की लग्न कराल माझ्याशी?!"
बस्स! टचकन डोळ्यांत पाणी आलं माझ्या. ती "पास झालात की" म्हणाली; "पास झालात तर" नाही...
मी मिठीत घेतलं तिला. "नक्की. प्रॉमिस." घशात काहीतरी दाटून आलं होतं.
कितीतरी वेळ आम्ही तसेच उभे होतो. तिचा उष्ण उ:श्वास माझी छाती उबारून टाकत होता.
पण...पण...
"लग्नाचं वचन मी देऊ शकणार नाही..."
"का?" तिने वर पाहिलं. "दुसरी कुणी..."
"नाही, तसं काही नाहीये." मी दुखावलो. "सोशल काँट्रॅक्ट्स आर नॉट एन्फोर्सेबल. बॅल्फोर वर्सेस बॅल्फोर. नाईन्टीन नाईन्टीन. टू के बी फाईव सेवंटीवन." मी छाती काढून म्हणालो.
"एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली. "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!"
--------------------------
तर मंडली, अॅडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
💬 प्रतिसाद
(75)
स
सानिकास्वप्निल
Tue, 02/10/2015 - 18:45
नवीन
कथा आवडली :)
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Wed, 02/11/2015 - 07:04
नवीन
छान आहे कथा !
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 02/11/2015 - 07:42
नवीन
कथा मस्त.... पण कुठेतरी खोल झालेल्या जखमेवरची खपली खरवडून गेली.
- Log in or register to post comments
स
सविता००१
Wed, 02/11/2015 - 07:47
नवीन
कथा आवडली
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Wed, 02/11/2015 - 10:11
नवीन
''स्पष्टीकरण प्रतिसाद'' वाचल्यावर कथा समजली आणि आवडली.
तुम्ही अधिक लिहिलं पाहिजे हे पुन्हा एकदा लक्षात आलं.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/11/2015 - 10:36
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
न
नंदन
Wed, 02/11/2015 - 11:06
नवीन
तंतोतंत!
- Log in or register to post comments
स
स्नेहल महेश
Wed, 02/11/2015 - 10:23
नवीन
स्पष्टीकरण वाचल्यावर गोष्ट कळली
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 02/12/2015 - 00:28
नवीन
प्रेमकथा असून सम्जायला इतका वेळ लागला. *unknw*
म्हणुनच एकाच फिल्ड मधली माणस जास्त सम्जू शकता एकमेकाची भाषा.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sun, 02/07/2016 - 14:22
नवीन
मौका भी है और दस्तुर भी..!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 02/07/2016 - 15:08
नवीन
आदूबाळाssssssss
पुढे काय झालेन? कॉन्ट्रैक्ट झाला काय सात जलमाचा!! :D :D
- Log in or register to post comments
K
Keanu
Sun, 02/07/2016 - 18:06
नवीन
कॉलेजचे दिवस आठवले. Merger and amalgamation चे प्रश्न आले की धडकी भरायची. एका अकाउंटची एन्ट्री दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट करायची आणि tally न होणारे पैसे miscellaneous अकाउंटला टाकायचे, एवढंच माहित होत.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 02/07/2016 - 18:31
नवीन
:) मस्तं आहे कथा.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 02/07/2016 - 19:07
नवीन
मस्त आहे कथा.दोन मुंग्या त्यांच्याच भाषेत बोलणार ना? मिशा हलवून!
सगळं समजलं पण जेपीने आताच वर का काढली कथा?१४ फेब्रुवारीची तयारी?
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 02/08/2016 - 09:23
नवीन
सुंदर
तुम्ही सी ए आहात हे वाचुन तुमच्याविषयीचा अगोदर असलेला आदर दुणावला.
सी.ए. म्हणजे ग्रेट असतात.
संदर्भाशिवाय मात्र वरचा लेख कळला नसता.
अजुन लिहत रहावे कमी लिहीता याच्याशी सहमत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 02/08/2016 - 09:42
नवीन
पुनरेकवार खूप आवडली कथा.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 02/08/2016 - 12:42
नवीन
नव-वाचकांना आणि पुनर्वाचकांना धन्यवाद!
ही गोष्ट म्हटली तर खरी, म्हटली तर काल्पनिक आहे. म्हणजे पात्रं खरी आहेत / खर्या व्यक्तींवर आधारित आहेत, पण घटना तंतोतंत नाहीत. (या संदर्भात सत्य कल्पनेपेक्षा खरोखर भन्नाट आहे!)
तारीख पे तारीखच्या चक्रात अडकलेल्या विद्यार्थ्याला छोट्या / क्षुल्लक गोष्टीचाही कसा आधार वाटतो हे सांगण्याचा एक प्रयत्न होता.
आणि हो, २०१६च्या व्हॅलेंटाईन दिवसाच्या शुभेच्छा!
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 02/08/2016 - 13:45
नवीन
सी.ए. हा अभ्यासक्रम तसा कॉलेज किंवा युनिव्हर्सीटी त होत नसतो ना. हा एक इन्स्टीट्युट ची मेंबरशीप मिळते. मग असे जे विद्यार्थी आहेत जे १२ वी नंतर हा कोर्स करतात. त्यांचा नॉर्मल कॉलेज लाइफ शी संबंध कसा येतो मग ?
म्हणजे जर हा अभ्यासक्रम क्लासेस व अभ्यास यावरच आधारीत असतो तर दुसरे अभ्यासक्रम जसे कॉलेज वा युनिव्हर्सीटी त होतात तर या मुलांच सोशल लाइफ कस बनत मग ?
म्हणजे त्यामुळे काही दुष्परीणाम , अलग पडल्यासारख होत नसेल का ? आणि त्याने हा कोर्स अधिकच आव्हानत्मक होतो का ? म्हणजे मी जी कॉमर्स क्षेत्रातली मुल बघितलीत वा जो हा कोर्स करणारी ते कॉलेज ला फारच कमी जातात व ऑफीस मला वाटत जी काय तुमची कंपलसरी उमेदवारी असते त्यात लवकरच ही मुल लागतात.
थोड काही म्हणा एकंदरीत थोडे काही म्हणा रुक्षतेला अनुकुल वातावरण होत का ?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 02/08/2016 - 14:28
नवीन
सीए / सीएस दोन प्रकारे करता येतं. एक म्हणजे तुम्ही म्हणता तसं बारावीनंतर. आणि एक बॅचलर्स डिग्रीनंतर. जे डिग्रीनंतर करतात त्यांना डिग्रीपर्यंत तरी कॉलेजलाईफची मजा घेता येतेच.
मी बारावीनंतर केलं होतं. कॉलेजला बारावीआधीही फारसा जात नसे. त्यानंतर तर जवळजवळ थांबलंच. त्यातून आमच्या कॉलेजमध्ये "पुर्गं सीए करतंय" म्हणून कोणत्याही विशेष सवलती मिळत नसत. (आणि ते बरोबरच होतं.) कॉलेज लाईफशी तसा संबंध येत नसे. गॅदरिंग / डेज पुरता हजेरी लावत असे इतकंच. तरी सीए करणारे पुष्कळ होते, आणि दिवसात चारपाच तास तरी क्लास असे. त्यामुळे तशी सोशल लाईफची कमतरता नव्हती. ;)
---
सीए/सीएस लोक रुक्ष असतात हा एक लोकप्रिय गैरसमज / स्टीरियोटायपिंग आहे. कंपनीज अॅक्टचे ठोकळे किंवा आकड्यांनी गच्च भरलेलं एक्सेलशीट हाताळणारी व्यक्ती शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेऊ शकते, किंवा "शांताबाई" वर एक पाय वर करून नाचू शकते हे सहसा पटकन पचनी पडत नाही. इथे मिपावरच मला माहिती असलेले चार तरी सक्रिय आयडी सीए/सीएस आहेत. ते बाकी काहीही असले/नसले तरी रुक्ष नक्कीच नाहीत.
असतात - रूक्ष, कंटाळवाणे, वैतागवाडी, छिद्रान्वेशी सीए/सीएस लोकही असतात. पण ते स्टँडप कॉमेडियन किंवा बोहारीण किंवा पायलट झाले असते तरी रुक्षच झाले असते.
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 02/08/2016 - 15:12
नवीन
झकास प्रतिसाद आवडला
तुम्ही आणि संजय क्षीरसागर किमान या दोघांना बघुन तरी सीए रुक्ष असतात हा गैरसमज नसावा.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 02/08/2016 - 15:40
नवीन
मस्त रे आदूबाळा
तुझ्याच वाक्याचे एक्स्टेन्शन म्हणजे आदूबाळ सीएस न होता सायंटिस्ट, डॉन किंवा बिजनेसमन झाला असता तरी सेन्स ऑव्ह हयुमर असाच लाजवाब अन बिनतोड राहिला असता.
मिपाला मिळालेला वनेनोन्ली नाईस आयडी. कीपीटप
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 02/08/2016 - 17:26
नवीन
अभ्या भौ
सिर्क एक
स्रिर्फ एक
इतनी बडी मेंबरशीप और सिर्फ एक मेंबर
वनेन ओन्ली इतक्या आयड्या बघितल्या आणि तुम्ही म्हणताय
ओन्ली विमल
बहोत ना इंसाफी है
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 02/08/2016 - 17:31
नवीन
१२ वीनंतर सीए?? बापरे! _/\_
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 03:14
नवीन
पण ते स्टँडप कॉमेडियन किंवा बोहारीण किंवा पायलट झाले असते तरी रुक्षच झाले असते.
आदूबाळ भाऊ एकलंबर हो!! सीए लोकांची मेहनत पाहुन आहे! फार कमी वयापासून अफाट सिलेबस सोबत झोंबायच्या सवयी मुळे सीए/सीएस/डॉक्टर लोकांचे सिविल सर्विसेज किंवा स्टेटसिविल सर्विसेज मधे निवडून यायचे प्रमाण भारी असते पहिल्याच एटेम्पट ला
- Log in or register to post comments
ज
जेपी
Mon, 02/08/2016 - 14:43
नवीन
माझे दोन मित्र,एक मैत्रीण सिए आहेत.
त्यांनी घेतलेले मेहनत अफाट आहे..
त्यातील एकाने आता त्याचे क्लास चालु केलेत..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2