Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गलित आहे गात्र अजुनी

च
चिमिचांगा
Sat, 02/07/2015 - 19:07
💬 31 प्रतिसाद
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे ? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ? उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे ? *************************************** गलित आहे गात्र अजुनी, लाडके अवधी जरा दे एवढ्यातच पुनर्प्रत्यय मागशी, देऊ कसा गे? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन उरली रात्र अवघी, का न धरीशी धीर जरा गे? बघ अजून पुसतोच आहे पाठीवरचा घाम सारा कोरडा पडला घसा अन् प्राणही कंठाशी आले सांग, ह्या आतुरल्या मुखचंद्रम्याला काय देऊ? सुकून गेले ओठ, आता थोडका 'सूकून' दे गे प्रेमरंगी खेळता, घाई सखे नाही बरी गे दोन डावां अंतरी, थोडीतरी टँप्लिज दे गे - कवि चिमिचांगेश खट

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7149 views

💬 प्रतिसाद (31)
ट
टिल्लू Sat, 02/07/2015 - 20:10 नवीन
छान. बाकी ते "गे" मूळे या विडंबनाला एक गुढ अर्थ आला आहे. :)
  • Log in or register to post comments
च
चिमिचांगा Sun, 02/08/2015 - 02:03 नवीन
छान. आता 'दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी' चा भावार्थ सांगा पाहू!
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 02/08/2015 - 03:54 नवीन
ह्यले म्ह्न्ता काकद्रुश्ति
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 02/08/2015 - 00:52 नवीन
चांगलीय, चांगेश...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/08/2015 - 02:12 नवीन
शेवटच्या दोन ओळीनी गहिवरून आलं ! एकच डाव पण झकास झाला तर कशाला ट्यामप्लीज लागेल म्हणतो मी ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 02/08/2015 - 04:20 नवीन
सर अलिकडे गहिवरणं वारंवार होऊ लागलय तुमचं वेळीच दाखवून घ्या हो :-\
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/08/2015 - 11:14 नवीन
धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
साती Sun, 02/08/2015 - 03:38 नवीन
मला तर चिमिचांगा वाचल्यावर 'चिमिचांगा सखे मिळाल्या' असं एक गाणं आठवतं नेहमी. ;)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 03/09/2015 - 13:56 नवीन
भारीच मॅच होत आहे
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 02/08/2015 - 04:16 नवीन
नायिका आपल्या मृत पतिच्या शवासमोर हे गाणं म्हबते आहे. गात्र शांतच झाली आहेत... नेहमीकरता.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 02/08/2015 - 04:22 नवीन
+))
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 02/08/2015 - 04:21 नवीन
मिपाचे मोठे प्लेयर व्हाल असे भाकीत करतो.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/08/2015 - 04:38 नवीन
किंवा असलेल्याचं एखाद्या प्लेयराची समस्तं लक्षणे ओसंडुन व्हात आहेत असही म्हणु शकताय =))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/08/2015 - 05:32 नवीन
बैद्यनाथची एक जाहिरात आठवली उगाचचं =))
  • Log in or register to post comments
H
hitesh Sun, 02/08/2015 - 06:14 नवीन
तुमचे हे कवितेचे गात्र चुकीच्या सेक्शनात का खुपसलेत? काव्य विभागात खुप्सा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 02/08/2015 - 06:31 नवीन
कदचीत आवडणार नाही, पण यात बराच सत्यांश आहे. तरुण भार्या आहे अपुली, राजसा विसरलास का रे? घरी आला जरी तरी तू, संगणकी, बुडलास का रे ? अजुनही लागला नसे रे, वंश दिप घरात अपुल्या, कुचक्या त्या टोमण्यांना, सामोरी जाउ कशी रे? सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे? बघ कशा पडल्याच आहे, प्रोटीन एक्सच्या रिक्त शिश्या एवढे रिचवुन सारे, अल्पसा सहवास का रे? उसळती हृदयात माझ्या, मातृत्वाच्या उंच लाटा, ही मनिषा पूर्ण करण्या, साथ तू, देशील का रे? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/08/2015 - 06:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/08/2015 - 10:22 नवीन
@सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे?>>> =)) __/\__ =))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/08/2015 - 11:16 नवीन
=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चिमिचांगा Sun, 02/08/2015 - 15:34 नवीन
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे
*lol* बहुधा प्रोटीन एक्सचं खत घालूनही घरच्या झाडाची फळं शेजारणीच्या अंगणात पडत असावीत ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 02/09/2015 - 09:33 नवीन
अगागागागा......म्हटले तर ठ्ठो विनोदी, पण तरीही करुण.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 02/09/2015 - 09:53 नवीन
यु टु पैजारबुवा ?
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 02/08/2015 - 06:53 नवीन
..स्वल्पवैराग्याचे उत्तम वर्णन. ..चिमीचांगा व्हेज पण असतो का? ;)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 02/08/2015 - 09:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ध
धडपड्या Sun, 02/08/2015 - 10:18 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 02/09/2015 - 01:35 नवीन
एकंदरीत कोणतेही " एक्स" न घेता सगळे जे काही वर सुटलेयत त्यामुळे हसून हसून मेलो .
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Mon, 02/09/2015 - 09:30 नवीन
शिलाजित मकरध्वज बरोबर जायफळ टाकुन दुध घ्या रे,गात्र परत जागेवर येतील. (** अधिक माहिती हवी असल्यास तपासणी फी द्यावी लागेल.)*blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 02/09/2015 - 19:57 नवीन
ते पण चांदीच्या पेल्यातून ;)
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 02/09/2015 - 09:50 नवीन
आवडलं नाही. हे विडंबन वाचून बघा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/18/2015 - 03:26 नवीन
बीभत्सरसोत्कर्षसीमा झाली म्हणतो मी .... मानले बुवा !!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 03/09/2015 - 13:51 नवीन
अशक्य आहात सगळे चिमीचांगा आणि पैजारबुवा देखिल........... जबरदस्त
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा