Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

प
पिंपातला उंदीर
Fri, 02/06/2015 - 11:34
💬 84 प्रतिसाद
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ? सगळे मार्क्स , अडम्स, टोल्स्टोय ." भारतासारख्या वैविध्यपूर्ण तेने नटलेल्या खंडप्राय देशात आपण बाहेरच्या देशातल्या कोणत्या तरी माणसाने तयार केलेला 'इझम ' जसा च्या तसा कॉपी पेस्ट करतो आणि कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचे संदर्भ वापरतो यावर झालेली हि खास नेमाडीय कोटि .साहित्य संमेलनावर त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा धुरळा उडाला . काहीही असो नेमाडे कायम बातम्यात असतात हे खर . ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात कायम मराठी लेखकांवर अन्याय होतो अशी ओरड चालू असताना नेमाडे याना हा पुरस्कार घोषित झाल्याने आपण खुश होण्यास हरकत नाही . आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय पांडुरंग सांगवीकर याचे आधुनिक version असणारया एका चाहत्याचा नेमाड्यांना मानाचा मुजरा .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25657 views

💬 प्रतिसाद (84)
अ
अत्रन्गि पाउस Fri, 02/06/2015 - 11:39 नवीन
असं कसं असं कसं अहिंसा / मनू / बुद्ध ...हे आपण आयात कुठे केलेत ... असो ...नेमाडे वगैरे ..इतकी हाय लेव्हल आपली नाही .. त्यामुळे मी पैला आणि पास !!!
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 02/06/2015 - 11:55 नवीन
सत्याग्रह, उपोषण आणि त्याचे नवे वर्जन अण्णा आणि केजरी वाले हे सुद्धा कुठे आयात केले आपण..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/06/2015 - 12:24 नवीन
नेमाडेसरांचे मनःपूर्वक अभिनंदन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/06/2015 - 12:37 नवीन
नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन! मराठी लेखकाला ज्ञानपीठ मिळालंय ना!
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Fri, 02/06/2015 - 12:46 नवीन
छान बातमी आहे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/06/2015 - 12:50 नवीन
कोसलाकारांचं अभिनंदन...
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 02/06/2015 - 12:52 नवीन
फार आनंद झालेला आहे. नेमाडे यांचं अभिनंदन.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Fri, 02/06/2015 - 12:59 नवीन
वा वा वा! मस्त बातमी. नेमाडे यांचं अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 02/06/2015 - 13:07 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 02/06/2015 - 14:13 नवीन
श्री भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Fri, 02/06/2015 - 14:39 नवीन
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित नेमाडे सर, आज एका मराठी सारस्वता ची योग्य दखल घेतली गेली. ज्ञानपिठ पारितोषिक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. टिका स्वयंवर,कोसला, बिढार आणि झुल घेउन जाणाया (उदाहरणार्थ पांडूरंग सांगवीकर) निरर्थकतेचे पापुद्रे सोलून समृद्ध अडगळ बनणार्‍या योद्ध्याला मानाचा मुजरा. (एके काळी आम्ही तुमचे फ्यान होतो, ती तुमची ३० वर्षानी आलेली समृद्ध अडगळ बाहेर येइ पर्यंत)
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Fri, 02/06/2015 - 14:41 नवीन
आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Fri, 02/06/2015 - 14:48 नवीन
नेमाडेंचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/06/2015 - 15:03 नवीन
हार्दीक अभिनंदन !
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 02/06/2015 - 16:09 नवीन
कोसलाकार नेमाड्यांचे अभिनंदन!समृध्द अडगळकार नाही!!
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 04:36 नवीन
अरे वा! अस सलेक्टिव अभिनन्दन करता येत? ह. घ्या .
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Fri, 02/06/2015 - 17:56 नवीन
मराठी दिन काही दिवसांवर आलेला असतांनाच 'कोसला'कारांना मिळालेल्या ज्ञानपिठासाठी हार्दीक अभिनंदन
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 02/06/2015 - 19:05 नवीन
मराठी साहित्यीकाला ज्ञानपीठ मिळाल्याचा विशेष आनंद आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 02/06/2015 - 19:33 नवीन
भालचंद नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद झाला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/07/2015 - 04:48 नवीन
नेमाड्यांचं लिखाण अगदी कोसलासकट फ़ारसं आवडलं नसलं तरीही त्यांचे ह्या पुरस्काराबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
र
राही Sat, 02/07/2015 - 11:51 नवीन
असेच काहीसे, शिवाय त्यांचा तो देशीवाद आणि बेधडक-बेछूट बोलणे अगदी डोक्यात जाते. शिवाय, अन्य साहित्यिकांबद्दलची अगदी तुच्छ वृत्ती. असो. तरी अभिनंदनच.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 02/07/2015 - 13:00 नवीन
थोडासा pspo प्रश्न: हे देशीवाद काय प्रकरण आहे? म्हणजे "भारतीय लोक/परिस्थिती/संस्कृती वेगलं आहे आणि त्याला परदेशी विद्वानांनी बनवलेले सिद्धांत लागू होत नाहीत" असं काहिसं का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/07/2015 - 13:17 नवीन
थोडंसं असंच काहीसं नेमाड्यांचा देशीवाद म्हणजे ग्रामसंस्था टिकली पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजेत. संत, समाजसुधारक, आंबेडकरादिक थोर विचारवंत ह्यांनी नव्या कल्पनांचा पुरस्कार केला त्यामुळे मूळची भारतीय संस्कृती बदलत गेली. खेडी सोडून शहराकडे जाणे चुकीचे आहे. जातिव्यवस्था मोडणं अशक्य आहे. जागतिकीकरणाच्या नादात आपण आपलं स्वत्वं गमावतो आहोत वगैरे वगैरे. वास्तविक व्यक्तिगत जीवनात नेमाडे मात्र नेहमीच आपल्या ह्या भूमिकेशी विसंगत वागतांना दिसतात. उदा. अध्यापनाच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या शहरात जाणे, परदेशी जाउन विद्यार्थ्यांना शिकवणे इत्यादी इत्यादी.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 02/07/2015 - 14:09 नवीन
ओक्के. आपण विसंगत वागलो तरी व्हायचं ते होईलच - म्हणजे ग्रामसंस्था टिकेल वगैरे - असा विचार असावा. म्हणजे एकट्या माणसाच्या कृतीपेक्षा हा रेटा मोठा आहे वगैरे...
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 12:09 नवीन
नेमाडे यान्चा माज- पॉप्युलर प्रकाशनचे भटकळ त्या काळी नेमाडे आणि गाडगीळ या दोघांची पुस्तके प्रकाशित करीत. नेमाडे भाषणात म्हणाले की सुरवातीला त्यांना गाडगीळ हे लेखक म्हणून आवडत नसत, पण नंतर ते त्यांना आवडायला लागले, याचं कारण म्हणजे आपल्यापेक्षा वाईट लिहिणारा लेखक असला की त्यामुळे आपलं महत्व वाढतं *biggrin*
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 02/07/2015 - 12:59 नवीन
कोणताही कलावंत किती मोठा आहे ते खरे तर लोकांच्या प्रतिसादाने ठरत असते. लोकांमधे अभ्यासक पण असतात व आस्वादक पण ! या दोन्ही दृष्टीकोनांचा गुणाकार होऊन जो लोकप्रिय होतो तो " खरा" ! पारितोषिके मिळाली तर एकाच पातळीवर एखाद्याचे श्रेष्टत्व ठरते सर्व पातळ्यांवर नाही. यात सारे आले. मी नेमाडेंंचे एकही पुस्तक वाचलेलेच नाही पण ज्ञानपीठ हे मोठे लक्षण आहे श्रेष्टपणाचे ! केवळ या निकषावर नेमाडे याना कुर्निसात !
  • Log in or register to post comments
H
hitesh Sat, 02/07/2015 - 13:32 नवीन
छान
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 02/07/2015 - 14:58 नवीन
नेमाड्यांचे अभिनंदन! मराठी ज्ञानपिठ विजेत्यांमधे मला वाटते कुसुमाग्रज आणि विंदाच असतील ज्यांच्या लेखनावर टिका झाली नसावी. नेमाड्यांप्रमाणेच खांडेकर देखील लोकप्रियतेप्रमाणेच टिकेचे धनी होते. पण मला वाटते ते महत्वाचे नाही. त्यांनी जे काही मराठी वाड्मयात भरीव योगदान केले आहे त्यासाठी जे योग्य पारीतोषिक आहे ते त्यांना मिळालेले आहे. आणि त्याचा नक्कीच आनंद आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/07/2015 - 15:19 नवीन
भालचंद्र नेमाडे यांचं अभिनंदन...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 02/07/2015 - 16:22 नवीन
असेच म्हणतो. वादविवाद, मतभेद इत्यादी बाजूला ठेऊन एका मराठी लेखकास हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनापासून आनंद झाला आहे. श्री नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 17:05 नवीन
हे अजून एक महत्वाच . कोसला ही कादंबरी प्रकाशकाने--रा.ज. देशमुखांनी, काही वर्षं कुजवली. आमच्या (प्रस्थापित) लेखकांवर टीका करू नका असा दबाव आणण्यासाठी. नेमाडे त्या दडपणाला बधले नाहीत. पण ह्या काळातच त्यांनी मराठी लेखन-वाचन संस्कृतीचा सखोल विचार केला असावा. आपल्या विद्रोहाला भक्कम सामाजिक आधार निर्माण करण्याचा विचार ह्या काळातच पक्का झाला असावा. कोसला नंतरच्या कादंबर्यांमध्ये ही शिफ्ट स्वच्छपणे दिसते. लेखक आणि वाचक ह्या दोन टोकांमध्ये प्रकाशक, वाचनालयं, समीक्षक, विविध संस्था, पुरस्कार असे अनेक दुवे वाचन संस्कृतीत महत्वाचं कार्य पार पाडतात. त्याची बांधणी नेमाडेंनी केली. हे कार्य त्यांनी अतिशय निष्ठेने, तडफेने आणि हिशेबीपणे केलं. हातकणंगलेकर, महानोर, श्याम मनोहर ते अरुण कांबळे ते यू. आर. अनंतमूर्ती अशी एक मोठी रेंज त्यांनी ह्या कार्यात निर्माण केली. विद्वत्ता, पांडित्य ह्या जोरावर साहित्य अकादमी सारख्या संस्थेमध्ये दबदबा निर्माण केला. साहित्य अकादमीची नजर पश्चिमेकडे लागलेली होती ती त्यांनी पूर्वेकडे वळवली. नेमाडे ज्या काळात साहित्य अकादमीमध्ये सक्रिय होते त्या काळातील अकादमीची प्रकाशन पाह्यली तरिही हे सहजपणे ध्यानी येईल. विविध प्रादेशिक भाषांना मान्यता देण्याचं काम केंद्र सरकारने साहित्य अकादमीकडे सोपवलं. ह्या कार्यात नेमाडेंनी कळीची आणि मोलाची भूमिका बजावली. अर्थात त्यांच्या वाट्याला जो काही मर्यादीत अवकाश आला त्यामध्येच हे पाह्यला हवं. वाचकांची अभिरुची बदलल्याशिवाय उच्चवर्णीयांची मिरासदारी मोडून काढता येणार नाही हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. त्यासाठी विरोधकांचा पाणउतारा करणं, त्यांना हास्यास्पद ठरवणं आणि नवी समीक्षा जन्माला घालणं अशा दोन्ही पातळींवर कार्य केलं. हे केवळ साहित्यिक कार्य नव्हतं. तर सामाजिक-राजकीय कार्य होतं. संपन्न भाषा, साहित्यिक मूल्य ह्यासोबतच नेमाडेंच्या नेतृत्व गुणांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. सामाजिक-राजकीय कार्य म्हटलं की काही दुय्यम तत्वांना मुरड घालावी लागते. उदाहरणार्थ पुरस्कार न स्वीकारणं वगैरे. त्यामुळे मध्यमवर्गीयांतील काही विद्रोहींनी त्यांच्यावर टीकाही केली. पण तोपावेतो नेमाडेंचा सामाजिक आधार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात निर्माण झालेला होता. आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या देशीवादाच्या मांडणीला आधार मिळालेला होता. त्यामुळे ह्या इन्यागिन्या वर्तमानपत्री टीकाकारांची डाळ शिजली नाही. काही अपवाद अर्थातच होते पण लेखकाची नैतिकता ह्या नव्या निकषाच्या आधारे नेमाडेंनी त्यांचा बंदोबस्त केला. साठोत्तरी साहित्याने निर्माण केलेली नवी अभिरुची महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवण्याचं आणि वाचकांची अभिरुची बदलण्याचं मोठं कार्य नेमाडेंच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलं. हिंदू-एक समृद्ध अडगळ, ह्या कादंबरीच्या पहिल्या खंडात नेमाडेंच्या वैचारिक निष्ठा, इतिहासाचं आकलन, भाषा, राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण समर्थपणे प्रतिबिंबित झालं आहे. देशातील नव्या वाचन संस्कृतीला मिळालेली मान्यता म्हणूनही त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराकडे पाह्यला हवं.- फेबु वरून साभार सुनील तांबे
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 02/08/2015 - 11:15 नवीन
इथे एक वेगळा विचार मांडलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 02/08/2015 - 17:54 नवीन
दुव्या बद्दल धन्यवाद!
यापूर्वी मराठीमध्ये वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) आणि िवदा करंदीकर यांना ज्ञानपीठ सन्मान मिळाला होता. नेमाडे यांनी 'बिढार' कादंबरीमध्ये (आवृत्ती ४ थी, पान ४१) या तीन लेखकांची किती असभ्य भाषेत नालस्ती केली आहे हे ज्ञानपीठ पुरस्कार समितीला माहीत नसले तरी मराठी वाचक विसरले असतील असे वाटत नाही.
या बद्दल कोणास अधिक माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Mon, 02/09/2015 - 05:01 नवीन
खर तर कोसलाचि विक्री वाढण्यामागे कोसला च्या नंतरच्या आवृत्तीत पु ल देशपांडे यांनी दिलेली सुंदर प्रतिक्रिया हे एक महत्वाचे कारण होते . पण नेमाडे सतत पु ल वर टीका करत . तशी ती तेंडूलकर यांनी पण केली होती 'लेखकराव ' हि नेमाडे यांनी प्रसिद्ध केलेली संकल्पना त्याना पु ल यांच्यावरूनच सुचली होती असे म्हणतात . पण वैक्तिक मला अस वाटत कि कुसुमाग्रज असो वा पुल नेमाडे यांची टीका वैयक्तिक नव्हती . जरी तशी ती सकृतदर्शनी दिसत असली तरी . तिला प्रस्थापित विरुद्ध नवे , आहे रे विरुद्ध नाही रे , ब्राम्हण सारस्वत विरुद्ध बहुजन असे अनेक larger dimension होते . नंतर नेमाडे स्वतःच प्रस्थापित लेखकराव बनले हा मुद्दा वेगळा .
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Mon, 02/09/2015 - 05:16 नवीन
अवांतर - बाकी उचकापाचक करत असताना हे एक interesting प्रकरण सापडलं . लेखकांनी लेखकांच्या केलेल्या अपमानावर . भन्नाट आहे . http://flavorwire.com/188138/the-30-harshest-author-on-author-insults-in-history
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/09/2015 - 11:11 नवीन
“बिढार” ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे." " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? " (चोप्य-पस्ते) दुवा ब्लॉग नेमाने नेमाडेवरुन साभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/09/2015 - 09:56 नवीन
आभार...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 02/07/2015 - 17:59 नवीन
हे जे काही आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानपीठ वैगेरे वैगेरे ते मिळाल्यामुळे नेमाडेंचे अभिनंदन करतो. एक माहीती हवी होती उदाहरणार्थ म्हणजे नेमाडे हे इंग्रजीचे प्राध्यापक होते ना?
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Sun, 02/08/2015 - 05:12 नवीन

खरंच जग खूप जवळ आलंय. नेमाडेंना बोलवा ट्विटरवर.

Image removed.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sun, 02/08/2015 - 05:15 नवीन
सन्दर्भ कळाला नाहि
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 02/08/2015 - 05:26 नवीन
हा घ्या संदर्भ...
Ban English, says Jnanpith winner, hits out at Naipaul and Rushdie Feb 6, 2015, 11.21PM IST [ Vaibhav Purandare ] MUMBAI: On a day he was declared winner of the 2014 Jnanpith award, India's highest literary honour, Marathi writer Bhalchandra Nemade described English as a "killer language" and calling for its banning from the field of education in India. He also sharply criticized two Indian-origin writers, V S Naipaul and Salman Rushdie, for "pandering to the West" and dismissed their works as being of little value. "Primary as well as secondary education should be in the mother tongue. What is so great about English? There isn't a single epic in the language. We have 10 epics within the Mahabharata itself. Don't make English compulsory; make its elimination compulsory," Nemade (77), who himself has been a teacher of English and comparative literature at various universities including the School of Oriental and African Studies in London, said. He was speaking at a function in Dadar organized by the Matrubhasha Samvardhan Sabha. Nemade is only the fourth Marathi writer to win the award, after V S Khandekar (1974), V V Shirwadkar aka Kusumagraj (1987) and Vinda Karandikar (2003). Espousing his pet theory of 'Deshivaad' (nativism) that rejects globalization, the writer of the 1963 novel Kosla, which is considered one of the seminal works of 20th century Marathi literature, said English had destroyed languages. "In North America, there were 187 languages 150 years ago. Now just 37 remain. Australia had 300 languages; only 65 remain, and of five languages in the UK, only Irish has survived alongside English," Nemade, who is also a linguist, said. While urging Indians to look up to the works of Premchand and others, he excoriated Naipaul and Rushdie in particular. "When Naipaul came to India, he saw an area of darkness. Then he saw a wounded civilization and blamed Islamic rule for the wounds and not the British because he was staying in England. This is how you get your knighthood," Nemade said, quoting from the poet Derek Walcott's acerbic attack on Naipaul in verse. He also questioned the literary value of most of Salman Rushdie's works after Midnight's Children, saying much of the stuff such writers had written did not have a great deal of literary merit. Nemade, who is now working on the second part of a tetralogy (the first part is titled Hindu), said he was rooting for the mother tongue not out of emotionalism but pure science. "Cognition is possible only through the mother tongue," he insisted, and quoted from a 1963 UNESCO document, a statement by linguists made at a Paris convention in 1968 and even a World Bank report to make the case for education in India's native languages. Finally, making a concession for English, he said, "It's not that we shouldn't learn English. We should. But we don't need education in English. Let us treat it like footwear. Keep it outside the home, to be used when needed outside the home."
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sun, 02/08/2015 - 05:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 02/08/2015 - 09:18 नवीन
आपले मत काहीही असो - पण नायपॉल, रश्दी यांच्यावर वैयक्तिक आगपाखड करणे अकारण आहे. चिमुकल्या वॉशिंगटनच्या कुऱ्हाडीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sun, 02/08/2015 - 10:14 नवीन
हा एक नवीन टेक या प्रकरणावर http://ekregh.blogspot.in/2015/02/blog-post_8.html
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 02/08/2015 - 05:42 नवीन
एका मराठी माणसाला हे पारितोषिक मिळाल्याबद्दल आनंद वाटला. अडगळ वगैरे वाचून असे वाटले की ते पुस्तक वाचल्या न वाचल्याने तसाही काही फरक पडला नसता; त्यामुळे 'एका मराठी माणसाला' सोडता बाकी काहीच फरक पडला नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 02/08/2015 - 09:10 नवीन
मी कथा कादंबर्‍यांचा वाचक नसल्याने साहित्याबद्दल समीक्षेतूनच अधुन मधून माहिती घेत असतो. जनस्थान पुरस्कार मिळाल्या नंतरच्या नवशक्तीच्या या अग्रलेखात त्यांच्या साहित्यविषयक प्रतिभेला आमचा आक्षेप नाही किंवा साहित्यातील शिव्यांना आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप त्यांच्या चुकीच्या दंभस्फोटाबद्दल आणि औचित्याचे भान सुटण्यावर आहे. अशी टिका आली होती. हिंदू या कादंबरी बद्दल युनिक फिचर्सवर सुहास पळशीकरांचे समीक्षण आणि मायबोलीवरील साजिरा यांचे रसग्रहणातूनच बरीचशी माहिती मिळाली. भालेराव (अरुण अनंत?) यांचा नेमाने नेमाडे या नावाचा नेमाडेंवर नेमाने टिका करणारा एक ब्लॉगही आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/09/2015 - 11:34 नवीन
माहितगार, वेगवेगळ्या दुव्याबद्दल आभार...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 02/10/2015 - 12:28 नवीन
असेच म्हणतो. बाकी माहितगार, आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्‍यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्‍यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही. (हाच धागा पुढे वाढवून मराठीतील वेगवेगळ्या साहित्यकृतींबद्दल विकिपीडियावर माहिती टाकली जावी अशी विनंती.)
  • Log in or register to post comments
च
चिगो Sun, 02/08/2015 - 09:24 नवीन
श्री. भालचंद्र नेमाडे ह्यांचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन..
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Sun, 02/08/2015 - 09:26 नवीन
http://www.loksatta.com/vishesh-news/bhalchandra-nemade-should-return-jnanpith-award-1069374/?SocialMedia
नेमाडे यांनी सन्मान परत करावा या अर्थाचे विनय हर्डीकर यांचे पत्र आज लोकसत्ता मध्ये आहे. विनय हर्डीकर यांनी याधीही नेमाडे यांच्यावर टीका केल्याचे आठवते आहे. लोकसत्ता मधेच वर्षभरापूर्वी लेख होता कि कोसला ला ५० वर्ष पूर्ण झाली त्यासंदर्भात. कुणाला तो लेख मिळाला तर जरूर लिंक द्या.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा