Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एम. एस. ई. बी. आणि संस्कार !

म
म्हया बिलंदर
गुरुवार, 02/05/2015 - 16:51
💬 13 प्रतिसाद
म्हया बिलंदर - हेल्लो एम. एस. ई. बी.? पलीकडून - हं बॉला? म्हया बिलंदर - अहो, *** ईथे वीज गेलीये. पलीकडून- बरं . म्हया बिलंदर - अहो, बरं काय? कोणाला तरी पाठवून बिघाड दुरुस्त करून घ्या. पलीकडून - हं, येईल १५ मिनटात . म्हया बिलंदर - कोण? पलीकडून - कोण म्हणजे? म्हया बिलंदर - कोण म्हणजे, वीज की तुमचा माणूस? पलीकडून - माणूस. म्हया बिलंदर - मग वीज? पलीकडून - तिथून पुढं १५ मिनटात. म्हया बिलंदर - अहो, संध्याकाळ झालीये पूर्ण काळोख पडलाय. मुलांचा आभ्यास जेवण सगळं राहिलंय आणि… (पलीकडून खड्याक. फोन ठेवला) ========================================== तासाभराने ========================================== म्हया बिलंदर - हेल्लो एम. एस. ई. बी.? पलीकडून - हं बॉला? म्हया बिलंदर - अहो, *** ईथे वीज गेलीये. पलीकडून- बरं . म्हया बिलंदर - अहो नव्याने ऐकल्यासारखं काय बोलताय? तुमचा माणूस आणि वीज दोन्हीही आलेले नाहीत. पलीकडून - हा, तो तर कधीच पाठवलाय काम करत असेल लायीट येईल थोड्याच वेळात…. म्हया बिलंदर - छान, हेच शिकवता का घरी स्वतःच्या मुलांना? पलीकडून - क्काय? म्हया बिलंदर - हेच संस्कार देता का मुलांना? पलीकडून - काय संस्कार? म्हया बिलंदर - अहो, मी तुम्हाला गेट च्या बाहेरून गेला तासभर बघतोय. घरून फोन आला आणि समजलं वीज नाही. म्हंटल इथून कोणाला तरी सोबत घेऊनच निघावं. तासाभरा पूर्वी फोन केला तेंव्हा तो इथेच गेट वरून. तुम्ही माझा फोन उचलायला आत गेलात बोललात बाहेर येउन बसलात तासभर पेपर वाचलात. पुन्हा फोन आला म्हणून पुन्हा आत गेलात. हे सगळं मी इथून पाहिलं. तुम्ही कोणत्याही माणसाशी बोलला नाहीत, कोणाला पाठवलं नाहीत आणि वर खोटं बोलताय? पलीकडून - अहो तसं नाही इथे मी एकटाच आहे ना दुसरा कोणी असता तर मीच आलो असतो…. म्हया बिलंदर - म्हणून खोटं बोलताय? घरी मुलांना जर समजलं की त्यांचा बाप सर्रास खोटं बोलतो तर काय परीणाम होईल त्यांच्यावर? काय मत होईल त्यांचं तुमच्याबद्दल? पलीकडून - चला, मी येतोच तुमच्याबरोबर. म्हया बिलंदर - अहो पण मग इथे? पलीकडून - ते बघू हो. कोण नाय मरत ईथे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4238 views

💬 प्रतिसाद (13)
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/05/2015 - 18:24 नवीन
मस्त लिवलंय :) तरीही, चोरी पकडली गेल्यानंतरही उद्धट शब्दात सारवासारवी न करता इतक्या सरळ्पणे वागणारा माणूस एमेशीबीत आहे हे वाचून ड्वाळे पानावले :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/05/2015 - 19:13 नवीन
एम.ए,सी.बी. मध्ये काही चांगली माणासे होती पण आणि असतीलही. बाकी, लिखान छान
  • Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर गुरुवार, 02/05/2015 - 19:18 नवीन
तुम्ही एमेशिबियन आहात(होतात) का?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/05/2015 - 20:22 नवीन
नाय , माझा बा होता
  • Log in or register to post comments
उ
उदय के'सागर Fri, 02/06/2015 - 06:58 नवीन
+१ पुण्यातल्या चतु:श्रुंगी इथल्या एम.एस.ई.बी. विभागाला काही दिवसांपुर्वी जाणं झालं. बिलात झालेल्या घोळाबद्दल ज्या 'साहेबांना' भेटायला सांगितलं होतं ते अपेक्षेप्रमाणे सुट्टीवर होते. डोकंच फिरलं, म्हंटलं अता आहेच चकरा-वर-चकरा. पण मग तिथे एक दुसर्‍या मॅडम होत्या, त्यांनी व्यवस्थित चौकशी करुन माझ्या समस्येचं 'साहेब' नसतांनाही निराकरण केलं. प्रॉब्लेम ५-१० मिनीटात सुटला. आणि शिवाय ह्या मॅडम कुठलीही चिडचिड न करता (नाकं-तोंडं न मुरडता) सर्वांशीच नीट वागत होत्या हे पाहून डोळे पाणावले - वेल, गमतिचा भाग सोडला तर खरंच खूप चांगला अनुभव आला. ऑफिस बाहेर निघतांना कुठल्याही प्रकारची टिपीकल सरकारी ऑफीस मधून बाहेर पडताना असते तशी डोक्यात चिडचीड नव्हती. एम.एस.सी.बी. ने कॉल-सेंटर सुरु केलं आहे त्याच्या टोल-फ्री नंबर वरून देखील व्यवस्थित माहिती मिळाली होती - ह्या उपक्रमाला शुभेच्छा, गोष्टी बदलता आहे वा सुधारता आहेत हे पाहून्/अनुभवून फार छान वाटलं/वाटतं.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/05/2015 - 19:44 नवीन
+++१११ टु एक्का!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 02/05/2015 - 20:01 नवीन
एम. एस. सी. बी. चा प्रामाणिकपणा आवडला
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/05/2015 - 20:55 नवीन
खिक्क हा प्रामाणिकपणा आवडला. अवांतर: स्नेहाच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.. ;)
  • Log in or register to post comments
र
रायनची आई Fri, 02/06/2015 - 05:56 नवीन
माझा मामा आहे एम्.एस्.ई.बी.मधे... एम्.एस्.ई.बी.म्ह्णजे "मन्डे टु सन्डे ईलेक्ट्रीसीटी बन्द" :-)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 02/06/2015 - 08:05 नवीन
१. एकाच कर्मचार्याच्या अनुभवावरून एमेसीबीचे सरसकटीकरण केलेले दिसते. २. वरच्या प्रसंगातला काळ कोणता आहे ? कारण एमेसीबी दहा वर्षापूर्वी नामशेष झाली असून सध्या महावितरण आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/10/2015 - 05:30 नवीन
सरसकटीकरण्ण!! देखा? क्या काँन्फीडन्स है? ;)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 02/06/2015 - 08:43 नवीन
हा घ्या एम एस ई बी चा अजून एक अनुभव http://misalpav.com/node/10533
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/12/2015 - 05:50 नवीन
हा अनुभव कुठेही येऊ शकतो. मी सध्या बीयश्नेलवाल्यांबरोबर लपाछपी खेळत आहे!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा