Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

असा विचार मनात जन्म-अखेरीही नाही!

ब
बहुगुणी
गुरुवार, 02/05/2015 - 00:28
💬 2 प्रतिसाद
याआधी मी वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं या टॉम प्रॅक्स्टन-लिखित गाण्याचं रुपांतर केलं होतं. आज आंतर्जालावर भटकतांना त्याचंच आणखी एक गाणं आवडलं. The Last Thing on my Mind या Tom Paxton लिखित गाण्याचं हे मुक्त रुपांतरः जाण उशीराने आली गेली निसटून रेती राणी दृष्टीआड गेली, माझा जीव तिच्या हाती साधा निरोपही नाही काही ठेवली ना खूण खोट प्रेमात माझ्याही कसे कठोर हे मन तुला माहिती ना राणी माझ्या मनाची विराणी? कसा सांगू मी कानात, दुखवेन कशापाई? असा विचार मनात जन्म-अखेरीही नाही! झाली बरीच कारणे आता जाणवते मना कशी शेवाळली मने थांब, परतुनी ये ना! वाट सरता पायाशी किती विचार मनात किती गिरक्या स्वतःशी मार्ग हरवे वनात शेज एकटी सकाळी तुझी चाहूलही नाही गीत संपे जन्मकाळी तुला जाणीवही नाही तुला माहिती ना राणी माझ्या मनाची विराणी? कसा सांगू मी कानात, दुखवेन कशापाई? असा विचार मनात जन्म-अखेरीही नाही! आता जाणवते मना थांब, परतुनी ये ना!

हे गाणं खूप जणांनी म्हंटलेलं आहे, नील सायमन, जोन बाएझ, जॉन डेन्व्हर, वगैरे. तरूण पणी टॉम प्रॅक्स्टन ने म्हंटलेलं हे गाणं नंतर खूप वर्षांनी त्याने लियाम क्लॅन्सी आणि कोरसच्या साथीत म्हंटलं: मूळ गीताचे शब्द इथे आहेत. त्यात असलेली (आणि गाताना चांगली वाटणारी) शब्दांची द्विरुक्ती मी इथे रुपांतरात टाळली, कारण मराठीत आणतांना ते मला योग्य वाटलं.


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1971 views

💬 प्रतिसाद (2)
य
यशोधरा गुरुवार, 02/05/2015 - 02:09 नवीन
क्या बात. मस्त :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता गुरुवार, 02/05/2015 - 02:19 नवीन
मुक्त रूपांतर आवडले.. काही ठिकाणीतर ओरिजिनल पेक्षाही!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा