Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

महागाईचे कारण

द
देवांग
Mon, 02/02/2015 - 11:01
💬 13 प्रतिसाद
एक दिवस शिक्षकांनी वर्गात सांगितले कि उद्या तुमच्या वर्गाचा ग्रुप फोटो काढायचा आहे तरी सर्वांनी प्रत्येकी ५० रुपये फोटोसाठी आणावेत त्याच वर्गात आपला बाळ्या पण होता, ज्याला लहानपणीच नेता बनायचं किडा चावला होता ...आणि तोच सर्व वर्गाचा नेता होता. जशी त्याने हि सूचना ऐकली ...तशी तास संपल्यावर रागाच्या भरात सर्व विद्यार्थ्यांना म्हणाला कि "हि तर खुली लुट आहे...हे शिक्षक हि शाळा आपल्याला अशीच लुटत राहणार ...मला सांगा कि फोटो प्रिंटआउटला ५० रुपये लागतात का ?...प्रिंटआउट १० रुपयात मिळते ....हि शाळा आपले सर्व शिक्षक राहिलेले ४० रुपये आपआपसात वाटून घेणार. आपल्या वर्गात 60 मुले आहेत....म्हणजे २४०० रुपयाचा भ्रष्ठाचार आपल्या डोळ्यादेखत होतो आहे. अश्या भ्रष्टाचारी लोकांमुळेच देश मागे पडला आहे.तरीच मला वाटले कि हे शिक्षक रोज नाश्त्याला मिसळ आणि सामोसे कसे खातात. भलाईचा जमाना राहिला नाही" भाषण देवून बाळ्या घरी आला आणि आईला म्हणाला "आई उद्या शाळेत फोटो काढायचा आहे त्यासाठी १०० रुपये प्रत्येकी आणायला सांगितले आहेत" आई : "१०० रुपये ? शाळा आहे कि दरोडेखोरांची टोळी ? दर वेळेस असे पैसे घेत असतात त्यात फी वेगळी. आपल्या पैशावर ऐश चालू आहे तुमच्या शिक्षकांची ...आमच्या काळात असे काही नव्हते. थांब तुझे बाबांकडून पैसे घेवून तुला देते" बाबा कामावरून घरी आल्यावर आई : अहो ऐकलेत का बाळ्याचा उद्या शाळेत ग्रुपफोटो काढायचा आहे...शाळेने २०० रुपये मागितले आहेत" हि साखळी अशीच पुढे चालू आहे अश्याच तऱ्हेने महागाई वाढत आहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2562 views

💬 प्रतिसाद (13)
र
राजाभाउ Mon, 02/02/2015 - 12:05 नवीन
सुरुवात फोटोग्राफर पासुन झाली १० रु नी, आणि शेवट झाला ते फोटोग्राफच्या बायकोने फोटोग्राफरकडे २०० रु मागीतले तेंव्हा :-D
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/02/2015 - 12:27 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 02/02/2015 - 12:41 नवीन
छान रे देवांग्या.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:28 नवीन
माई =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/02/2015 - 20:04 नवीन
तुमच्या "ह्यां"चं मत राहीलच की ओ :) ;)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 02/03/2015 - 05:20 नवीन
ते बहुधा फोटो काढायला गेले असावेत!;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 02/03/2015 - 07:25 नवीन
काढलेला फोटो पैसे न देता दुरुस्त करायला गेले आहेत ! उगा "ह्यांच" अवमूल्यन करू नका बरे !
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 02/02/2015 - 13:07 नवीन
एक गिर्हाईक फोटोग्राफर कडे महागाई बद्दल तक्रार करु लागले. फोटोग्राकर"महागाई काय फक्त तुमालाच का ? आमच्या बाळ्याच्या शाळेत एका फोटुचे 500 रु घेतात "
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/02/2015 - 20:06 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 14:28 नवीन
आयटीवाल्यांचा उल्लेख नसल्याने फाऊल.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 02/03/2015 - 07:59 नवीन
अच्र्त ब्व्ल्त
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 02/03/2015 - 05:18 नवीन
मस्त!आधी का नाही भेटलात? उगाचच इकाॅनाॅमिक्स शिकावं लागलं ना!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/03/2015 - 05:51 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा