मन हे माझे
सभोवती आसपास कुठंच नसताना तू, माझं मन हे असं तुजभोवती रेखलेलं, उमजेल का कधितरी तुला माझं असं सतत तुझ्या सहवासासाठी घुटमळणं, एका शब्दासाठी, कटा़क्शासाठी तासन तास आसुसणं, परवाच चिडवत होत्या मैत्रिणी, आमच्या खळाळत्या धबधब्याला द्रुष्ट कुणाची लागली? काय त्यांना सांगू तुझं नाव?, छे ! छे !! काहीतरीच काय? स्वतःशीच बोलायच तर होतय बावरायला, खर सांगू ka ? आजकाल हसावसंसुध्दा नाही वाटत.कुणाशी बोलावसंच नाही वाटत, सतत असावं आपल तुझ्या चिंतनात , सुटतात मग आपोआप खोल नि:श्वास, वाटत कधी याबरोबरच जाईल श्वास, खुळी वाटतेय ना कल्पना? आहेच मी अशी वेडी खुळी , तुझ्या विशाल व्यक्तिमत्वापुढे अगदीच बावळी. म्हणुनच, पण बावरतेय ना व्यक्त करायला भावना - मनीच्या खुणा.
काल काय गंमत झाली सांगू ? शीतल चांदण्यांत ,यमुनेच्या खळाळत्या प्रवाहनादात, पोर्णीमेच्या प्रकाशात ताजमहाल होते पाहत सुखावुन, हलकेच मागून चाहूल आली, पायरवाची खूण तर ह्द्याला जाणवली , संगतीत तुझ्या पुन्हा ताज अनुभवायचा म्हणुन मी जराशी उसासले, तर आईनं पांघरुण होतं ओढुन काढलं आणि नेहमीसारखंच स्वप्न आमचं होत भंगलं .
ए!! मला एकदाच सांग ना? मीही आवडते का रे तुला? भीती वाटते रे कधी कधी, कसं विचारु तुला? झिडकारलंस तर, मोडुन जाईन मी, मग राहु का अज्ञानातच, कल्पना करत की तू आहेस माझा? होशील माझा? आईदेखील काल म्हणाली, 'लक्श कुठं असतं गं आजकाल तुझं ? एकेक गोष्ट चार चार वेळा सांगावी तेव्हा कुठे समजतेस, काय चाललंय काय तुझं?
काय सांगु? खर तर काहीच नाही चाललंय, हो की नाही ?
ए!! पण अभ्यासपण नाही होत काही, वर्गातही माझ्या मनात असतोस तूच आणि पुस्तक उघडावं तर पानापानावर दिसतोस तू, जेवताखातानाही तुझीच याद मनात, घालावी का तुला साद, सतत विचार मनात. कळतय रे, असं वागुन नाही चालणार, काय करु रे? सुचेनाच काही.
आवाज येतोय आतुन हळूहळू, मंजिरी मावशी, मैत्रीण आईची, आलीये ना! आई म्हणतेय,
“आपणचं समजुन घ्यायला हवं ग आपल्या बछड्यांना, चुकतात कधी मधी, आपणच समजवायला हवं, आमच्या सोनाचं गेल्या काही दिवसात काहीतरी बिनसलंय नक्की, कशातच लक्श नाहीये, पण मला खात्री आहे ती स्वःता हुन सांगेल सार. मग निघेल मार्ग. अग, त्यांनाही अवधी द्यायला हवा असतो. आपला विश्वास हवा असतो."
एकदम दचकलेच मी. म्हणजे, आईच्या लक्शात आलंय तर सारं. खरचं ! आई अगदि मैत्रिणी सारखी वागते ना नेहमी आपल्याशी. आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक गोश्टीत सहभागी असायची ती?बोलावं का तिच्याशी? रागावणार तर नाही नं? पण रागावली अगदि तरी, झालीच तर मदतच होईल तिची या विचारांच्या भुंग्यातुन सुटायला.
ठरलं तर मग , आता ही मावशी गेली की मूड बघून आईशीच बोलायचं, मन अगदि मोकळं करायच, हे ठरवून्च किती हायसं वाटलं म्हणुन सांगू?
💬 प्रतिसाद
(16)
अ
अजया
Mon, 02/02/2015 - 09:18
नवीन
छान लिहिलंय.लिहित रहा.
- Log in or register to post comments
स
सविता००१
Mon, 02/02/2015 - 09:27
नवीन
सुंदर लिहिलं आहेस.
मस्तच.
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Mon, 02/02/2015 - 09:41
नवीन
आला आला....valentine day आला!!!
मस्त लिहिलय ग सुचेता!
- Log in or register to post comments
म
मीता
Mon, 02/02/2015 - 10:04
नवीन
मस्त लिहिलय
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Mon, 02/02/2015 - 10:21
नवीन
मस्त लिहिलय सुचेता...
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
Mon, 02/02/2015 - 10:28
नवीन
मस्त लिहील अहेस. तुच टाईप केलेस का?
आता लवकरच भेटुया. म्हणजे अजुन लिहीशील.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 02/02/2015 - 10:40
नवीन
अनाहिताय !
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 02/03/2015 - 10:42
नवीन
स्वाहा!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 10:08
नवीन
खिक्क
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 02/02/2015 - 12:00
नवीन
एक सांगू ?
...मनाच्या मागे नको जाऊ, त्यालाच इच्छाशक्तीच्या मागे यायला भाग पाडावं ..! =)
- Log in or register to post comments
व
विटेकर
Tue, 02/03/2015 - 11:15
नवीन
माऊली ,
हे जमलं असते तर पृथ्वीचा स्वर्ग व्हायला वेळ लागला नसता !
- Log in or register to post comments
स
सुचेता
Mon, 02/02/2015 - 12:12
नवीन
शाळकरी मुलीच्या मनातील आंदोलन आहेत ग, शेवट आई विषयी ती जो विश्वास व्यक्त करते न , त्यासाठी खरतर लिहल होतं, पूर्व प्रकाशीत आहे साप्ताहिक सकाळ ला ते वरती लिहायच राहिल
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Mon, 02/02/2015 - 17:35
नवीन
छान लिहिले आहेस ग
- Log in or register to post comments
M
Maharani
Tue, 02/03/2015 - 02:38
नवीन
छानच लिहिलयस सुचेता ताई
टी
- Log in or register to post comments
आ
आरोही
Wed, 02/04/2015 - 09:49
नवीन
मस्त ग सुचेता ताई !! लेख आवडला .
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 02/05/2015 - 07:37
नवीन
अगदी नवथर मुलीच्या मनात शिरून!
- Log in or register to post comments