Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

वैद्यकिय हलगर्जी (मेडिकल नेग्लिजन्स)

म
मिश्रेया
Sun, 02/01/2015 - 10:00
💬 76 प्रतिसाद
आज मी माझ्या आयुष्यात आलेल्या वादळाची कहाणी येथे मांडणार आहे. 2010 साली मला मासिकपाळीचा त्रास होत होता,आमच्या फैमिली डॉ ना कन्सल्ट करुन त्यांनी मला माझ्या आग्रहा (Insist) मुळे महिला स्त्री रोग विशेषज्ञ चे नाव रेफर केले त्या मॅडम ने काही टेस्ट करुन मला 3-4 महीने ट्रिटमेंट दिली व दर महिन्याला मासिक पाळी च्या 3-4थ्या दिवशी भेटायला बोलवत असे. औषधोपचार काही लागू पडत नाही हे पाहून मॅडम ने सोनोग्राफी व काही चाचण्या केल्यावर त्या म्हणाल्या कि गर्भ पिशवी काढायला हवी नाहितर कैंसर् होइल.मला हा धक्का च होता,जेमतेम 35 क्रॉस केलेय आत्ताच, हे कसे शक्य आहे?माझा मुलगा 5 वित् व लेक 10वि ला. तिच्या पेपर ला रजा हवी म्हणुन मी रजेचे प्लॅनही केले होते. मी डॉ ना म्हटले कि 4-5 महिन्यांनी ऑपरेशन करु. लेकीचे अभ्यासा चे दिवस आहेत.तर त्या म्हणाल्या उशिर झाला तर कैंसर होइल मग काय करशील. हल्ली सोपी व सुलभ surgery करता येते hysterectomy म्हणजे दुर्बिणीने झटपट शस्रक्रिया होतात.थोड़ी खर्चिक आहे पण 4/5 दिवसात नॉर्मल होउन office ला ही जाऊ शकते. So मी डॉ च्या नर्सिंग होम मधे एडमिट झाले व् next day लोडशेडिंग चा त्रास नको म्हणून त्यांनी पहाटेची ऑपरेशनची वेळ ठरवली मला anastheshiast ने भूल देताना काही बाहि विचारले व् नन्तर चे मला 6/7 तासाने शुद्धित आल्या वर माझ्या नवरया ने सांगितले कि ऑपरेशन टेबल वरच माझे ब्लड प्रेशर वाढले व् मला oxygen वर् ठेवावे लागले व् आश्चर्य म्हणजे ह्या dr ने बाहेरून दुसरे dr बोलावले. माझ्या dr ना हि surgery येत नाहीं व त्याचे laparoscopic instruments ही त्यांच्याकड़े नाहीत. सगळे काही कुणा एका बाहेरच्या डॉ ने manage केले. मी अजिबात हा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते जशी शुद्धित आले तसे मळमळ, चक्कर व uneasy वाटायला लागले dr म्हणाल्या तुला हॉस्पिटल च्या वातावरणा चा त्रास होत असेल . 4 दिवसांनी मी डिस्चार्ज घेउन घरी आल्यावर मला खुप् ढेकर व् उचक्या लागल्या .पोट दुखी ,उलटी असे सगळे त्रास सुरू झाले. परत त्यांच्या कडे गेलेे .त्या म्हणाल्या urine ,blood test करा . हे असे टेस्ट करणे सतत सुरु होते व् urine infection असेल म्हणुन वेग वेगळ्या डॉ कड़े त्या मला पाठवत राहील्या. gen physician, gen surgeon, urologist, gastroentrologist असे सगळ्या डॉ ना दाखवत राहिले urologist ने सांगितले urine tube choke व् crack झाली त्यात stents टाकावे लागतील मग 2 divas त्यांच्या हॉस्पिटल मधे admit झाले तेव्हा माझ्या डॉ व् दूसरे म्हणजे ज्यानी hysterectomy केली ते दोघेही uroligist च्या हॉस्पिटल मधे हजर होते.तेथे दोन्ही ureters मध्ये stents टाकून मला under observtion म्हणून परत मैडम च्या nursing home मधे shift केले.2 दिवस तिथे एडमिट राहिले.पुढें 4 महीने मला प्रचंड पोटदुखी सतत सुरू राहिली. Urologist चे म्हणणे foreign part, body मधे adjust होताना त्रास होतो so सहन करा व् pain killer घ्या व् एकदा jaslok ला senior urologist ला दाखवा असे सुचवले. दरम्यान माझ्या लेकीचे paper सुरू झाले व् मी त्या पुर्ण दिवसात high painkiller वर् राहिले कारण तिचे महत्वाचे वर्ष होते आणि थोडयाच दिवसांचा प्रश्न होता .तिच्या शेवट च्या पेपर च्या दिवशी मी तिला परीक्षा सेंटर वरुन सरळ jaslok ला घेउन गेले तिथल्या यूरोलॉजिस्ट नी sonography व् काही tests सांगीतल्या त्यां 2 दिवसांत केल्या तेव्हा ते म्हणाले बहुदा दोन्ही kidneys खराब झाल्या आहेत open surgery करावी लागेल मगच कळेल की एक की both the kidneys are damaged. मी व् माझा नवरा हादरलो आता पर्यंत 2 surgery न औषध व एवढे डॉ व् इतक्या tests... ह्या सगळ्यात खूपच खर्च झाला म्हणून सरळच विचारले कि हया surgery ची खात्री असेल का? ते म्हणाले no guarantee आणि ख़र्च minimum rs.5 /7 lakh depending on the which stage it is . दोघेही सुन्न झालो .घरी आलो तेव्हा काहीच सुचत नव्हतं nursing home मधे डॉ मॅडम ना भेटलो त्या म्हंटल्या काय करायचे ते ठरवा मी urologist शी बोलते पण तो काही discount देणार नाही. लीलावती,हिंदुजा कुठेही खर्च होणारच.आत्ता पर्यंत चा ख़र्च व् आजार बघता आम्हाला मुलांच्या भवितव्याची सोय पाहुन जाणीवपूर्वक निर्णय घेणे जरूरी होते. त्या रात्री झोपले म्हणजे डोळे मिटुन पडले झोप होती कुठे? सकाळी मला जाग आल्यावर डोळे च उघडेना. आरशा समोर उभी राहिले तर लक्षात आले कि पूर्ण शरीर सुजले आहे . मी घाबरले dr मॅडम कड़े धाव घेतली त्यानी urologist ला फ़ोन केला तर ते सेमिनार ला गेले म्हणून 2 दिवस भेटणार नव्हते . मी घरी आले व् खूप रडले 2 दिवस आतून पुर्ण पणे फट्टू झाले होते पण मुलाना व् नवरयाला अजुन tension नको म्हणून आव आणून normal रहाण्याचा प्रयत्न करत होते . 2 दिवसांनी urologist भेटले मला पाहून उडालेच . "go to some big institute now " असे म्हणाले मला वाटले stents काढून टाकावे का? पण urologist म्हणाले "it may be a crime now" त्यांनी ही आपले कर्त्तव्य म्हणून मला saifee hospital चा reference दिला.जे काही बील होईल त्यावर 5000/ कमी होतील असे ही सांगितले. मग आम्ही घरी आलो न माझ्या डॉ मैडम ना कळवले .त्याना आमचा " sion hospital" ला जायचे ठरवल्याचे चे सांगितले . दुसऱ्या दिवशी सकाळी च् डॉ मैडम ने त्यांची कार व् ड्राईवर पाठवले सायन ला जायला. मुलांचि 5/6 दिवसात परत येते अशी समजुत घातली .धाकटया मुलाची परीक्षा सुरू झाली होती.घरातून बाहेर पड़ताना उद्विग्न मनःस्थी तीत होतो- sion hospital ला पोहोचलो. Urology चे head डॉ ने तपासले व् तातडीने admit व्हायला सांगितले. माझ्या नवर्याला एडमिट करायला बरेच सोपस्कार करावे लागले.महिला वार्ड मधे भर्ती झाले.नवरा चटई टाकून वार्ड च्या बाहेर passage मधे झोपला. पुढे त्याने 2 महीने असेच काढले. 2 र्या दिवशी सकाळी च् surgery केली (PCN) . dr ने किडनी मधे पाठीतुन 2 ट्यूब घातल्या.ट्यूब चे एक टोक किडनी त तर दूसरे टोक पाठितुंन बाहेर काढून त्याला urine bag लावली व .urine bypass केली .8 दिवस urine चे reading घेतले .मग तिथुन TATA hospital ला rhenal function test करायला पाठवले. माझ्या किडण्या वाचल्या ... आता पुढे मोठी surgery करायची ठरली .डॉ ने नवर्याला बोलावून सांगितले कि open surgery करणार तेव्हा च आतील प्रॉब्लेम कळतील. सकाळी operation ला सुरुवात झाली तेव्हा एक injection ने भुल दिली ........ 9 तास ऑपरेशन चालले.दोन्ही ureters damage (strictures)झाले होते ते कापून टाकले व माझ्या आतड़याचा 20 cm part कापून तिथे लावला....(ILEAL REPLACEMENT SURGERY) पोटात urine leak होउन सगळे आतडे चिकटले होते त्यामुळे त्याना Mobilise करायला पोटात खुप gases सोडावे लागले त्यामुळे व इतक्या वेळ पोट उघडे रहिल्याने ते बंद करता येईना म्हणून कच्चे टाके घालुन फक्त वरची कातडी शिवली व मला ventilator वर हलवले. नवरा देवाचा धावा करत होता डॉ नी त्याला explain केले "critical case आहे खुप गुंन्ता गुंत होती. पुढिल 5-6 दिवस ventilator वर ठेवू ,वाचली तर पुढची ट्रीटमेंट करू". सुदैवाने दुसऱ्या च दिवशी मी शुद्धि वर आले.मग पुढील 8 दिवसांनी परत 4 तास लागले पक्के टाके घालायला.ह्या 2 महिन्यातले 8 दिवस सोडल्यास माझ्या संपूर्ण शरीरात तब्बल 14 नळया होत्या . मी सुखरूप आहे पण कायम दर 2 ते 2 1/2 तासांनी यूरिन पास करणे गरजेचे आहे .दर 4 महिन्यानी sonography, urine व् blood test करुन sion hospital ला follow up ला जावे लगते.हे मी "हयात"असे पर्यन्त सुरु राहणार. ह्या सर्व दरम्यान मुले ,घर ,नवरा त्यांची नौकरी सगळ्याचीच हेळसांड झाली.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 22119 views

💬 प्रतिसाद (76)
ल
लव उ Mon, 02/02/2015 - 09:26 नवीन
तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/02/2015 - 10:12 नवीन
वाचून खूपच वाईट वाटले. फारच वाईट अनुभवातून गेलात तुम्ही. काय सुचवावे ते कळत नाही. परंतु जमल्यास ओळखीतल्या एखाद्या एक्स्पर्ट डॉक्टरचा पुन्हा एकदा सल्ला घ्या. पुण्यात डॉ. कल्याण गंगवाल हे अत्यंत निष्णात डॉक्टर आहेत. त्यांची फी जरा जास्त आहे. परंतु ते अत्यंत निष्णात आहेत. ते कदाचित योग्य ती पुढील उपचारयोजना सुचवू शकतील. तुमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मिश्रेया Tue, 02/03/2015 - 08:04 नवीन
खुप आभार, तुमच्या जर हे डॉ खुप जवळ्चे असतिल तर त्यान्ना माझी केस सान्गा किव्वा मला त्यान्चा फोन नम्बर पत्ता द्या.मी नक्की सम्पर्क करेन. आणी आपले म्हणणे अगदी योग्य आहे. मि ह्याच करता माझा फेसबुक वर पेज उघडला आहे. प्लीज आपण येथे हि प्रतिक्रिया तेथे नोन्दवाल का. https://www.facebook.com/shreyafightsback मला खुप मदत होइल.आभारी आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/04/2015 - 09:42 नवीन
मिश्रेया, तुम्हाला "व्यक्तिगत संदेश" सुविधेतून संपर्क क्रमांक कळविलेले आहेत. ते बघा किंवा तुमचे ई-मेल बघा.
  • Log in or register to post comments
स
स्नेहल महेश Mon, 02/02/2015 - 10:17 नवीन
तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटो आनि पुढचे आयुष्य निरोगी जावो ह्याच शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
पदम Mon, 02/02/2015 - 10:25 नवीन
खूप धीराच्या आहात हो तुम्ही लवकर बरे व्हाल खात्रि आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 02/02/2015 - 10:43 नवीन
लौकर बर्‍या होण्यासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Mon, 02/02/2015 - 10:54 नवीन
तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटो ही सदिच्छा. माझ्या आईच्याबाबतीत देखिल आम्हाला साधारण असाच अनुभव आहे. आईलाही मासिक पाळीचा काहीतरी(तेव्हा मी साधारण ६-७वीत होते आणि मी पहिलेच आपत्य त्यामुळे आई साधारण ३०-३२ वर्षाची असेल) त्रास होत होता त्यामुळे गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला गायन्याकने. आम्ही तेव्हा सोलापुरला रहायचो. तेव्हा सेकंड ओपिनिअन वैगेरे घेतले की नाही आठवत नाही.एक बर्‍यापैकी नावाजलेल्या गायन्याक डॉक्टर दांपत्याकडे ट्रिट्मेंट सुरु केली. कालातंराने ऑपरेशन झाले. त्याकाळात ही भरपुर पैसे घेतले त्यांनी. आई बरी होवुन घरी आली आणि तिला फ्रिक्वेंट युरिनेशनचा + पोट दुखीचा इ. त्रास सुरु झाला. अगदि १० मिनीट्सही मधे अंतर नाही आणि थांबवणे ही शक्य व्हायचे नाही तिला. तिथुन मग डॉक्टर विझिट सुरु झाल्या. प्रत्येकवेळी एकच उत्तर आणि फारतर मेडिसिनमधे बदल. 'आत्ताच झाले आहे ऑपरेशन , होइल थोडे दिवसानी निट' , पण बराच काळ लोट्लातरी काही फरक पडे ना . दरम्यान डॉक्टर बद्लुन झाले पण उपयोग शुन्य. नंतर आजोळी एका गायन्याकला दाखवले, त्यानी असे निदान केले की ऑपरेशन दरम्यान युरिन ट्युबला(सिस्टिमला) धक्का लागल्याने हा प्रोब्लेम सुरु झाला आहे. माझे पप्पा या बाबतित थोडे कड्क स्वभावाचे त्यानी तड्क आधिच्या डॉक्टरला गाठले आणि याबद्दल जाब विचारला तर त्याची ततपप..त्यानी कबुल केले की त्यांच्या बायकोने ही शस्त्रक्रिया केली (याच्या उपस्थितित) आणि त्यादरम्यान असे झाले कारण तिला ह्या टाईपच्या शस्त्रक्रियेचा जास्त अनुभव नाही ती नेह्मी डिलिवरीस बघते. कालांतराने दुसर्‍या डॉक्टरच्या ट्रिट्मेंटने/ तिच्या स्वताच्या विल पॉवरने,ती शारिरि़क झिज भरुन निघाली आणि ते १० मिनिट्सचे अंतर आता २-अडिच तासावर आले आहे. पण ती २-३ इअर्स आईला जो त्रास सहन करावा लागला तो केवळ शब्दात सांगता येणार नाही, कुठे बाहेर जाता यायचे नाही,जाण्याचा प्रसंग आलाच तर तिला लाज वाटत राहायची. आणि हे सगळ फक्त त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे.
  • Log in or register to post comments
M
MaheshW Mon, 02/02/2015 - 11:52 नवीन
किमान चार वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवा. एकालाही दुसऱ्याकडे गेलो होतो किंवा जाणार आहे हे अजिबात म्हणजे अजिबात सांगू नका. सगळ्या टेस्ट परत दहावेळा करायला लागल्या तरी चालतील. चुकूनही "अमुक या डॉक्टरांनी पण अश्याच टेस्ट सांगितल्या, आताच केल्या, हे त्याचे रिपोर्ट्स" हे शब्द तोंडातून बाहेर पडू नये. दहा टेस्ट्स मध्ये गेलेला पैसा आणि वेळ परवडेल पण वर ह्या ताईंनी जे सोसले आणि भोगले ते तरी वाट्याला येणार नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे इथे खेदाने म्हणावे लागते.
....पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 02/02/2015 - 11:54 नवीन
साधे टीव्ही वगैरे असल्या गोष्टी घेताना आपण चार ठीकाणी चौकशी करतो. मित्रात विचारतो की हा ब्रँड कसा आहे वगैरे. स्वताच्या आरोग्याशी खेळ असताना, डॉक्टरची आधी चौकशी नको का करायला? किंवा ३-४ ओळखीच्या लोकांनी रेकमेंड केलेल्या डॉक्टर कडे नको का जायला? Second Opinion तर मस्ट आहे कसलीही सर्जरी करायच्या आधी.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 02/02/2015 - 15:31 नवीन
वाईट वाटले. मात्र आश्चर्य वाटले नाही. आम्हा कुटुंबियांना डॉक्टरलोकांचे अत्यंत वाईट अनुभव आले आहेत. कन्सल्टिंग टाईप डॉक्टरची सेवा असेल तर काही हरकत नाही. पण हॉस्पीटलमध्ये गेल्यास फसवणूक होणारच याची मानसिक तयारी कायमच ठेवावी. डायलिसिसच्या वेळी माझ्या काकांना चिंचवडमधील एका नामांकित इस्पितळात चुकीचे इंजेक्शन दिल्याने ३ दिवस आयसीयूमध्ये काढावे लागले होते. इस्पितळात चालत गेलेले काका 'नातेवाईकांना बोलावून घ्या' या सल्ल्यापर्यंत पोचले. माझ्या वडिलांच्या ऑपरेशनपूर्वी एक दोन चाचण्या करताना चुकीचे सँपल पाठवले व निकाल यायला प्रत्येकवेळी दोन दिवस लागत असल्याने तीनचार दिवस मुक्काम वाढ(व)ला. शहाण्या माणसाने व्यायाम वगैरे करुन या डॉक्टरलोकांपासून जितके दूर राहता येईल तसे राहून स्वतःचे आरोग्य सांभाळावे. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आरोग्य महत्त्वाचे. दुर्दैवाने बायकांना बाळंतपणा वगैरेंमुळे डॉक्टरच्या खेपा घालाव्याच लागतात. त्याला काही इलाज नाही.
  • Log in or register to post comments
म
मिश्रेया Tue, 02/03/2015 - 07:48 नवीन
Hysterectomy करताना माझ्या दोन्ही मूत्र नलिका ना ईजा झाली होती. हे sion hospital ला admit झाल्यावर तिथल्या डॉ ने सांगितले. माझ्या डॉ मॅडम ने आम्हाला ह्या बाबतीत काहीही कळु दिले नाही.व जवळ जवळ 4 महीने काही बाही घरगुती उपाय सुचवत राहिल्या व बऱ्याच इतर डॉ कडे refer करत राहिल्या.मी sion hospital वरुन 50 दिवसांनी discharge घेवुन घरी आल्यावर त्या मला भेटायला आल्या. खुप आपुलकी दाखवुन म्हणाल्या "I owe you my entire life, मला तुमच्या त्रासा ची कल्पना आहे.दर 2 ते 2 1/2 तासाने urine pass करायला उठायचे म्हणजे रात्रीची झोपमोड ही होणार. "Better to use ADULT DIAPER" हा विचित्र पर्याय उपाय होऊ शकतो का?? मी काही braindead नाही मला Sense आहे.हा उपाय माझ्यासाठी तरी नाही. आम्ही त्याना ह्या वर आमचे मानसिक,शारीरिक व आर्थिक नुकसाना बद्दल बोललो व आमचा कायदेशीर कारवाई करण्याचा विचार आहे असे सांगितल्या वर त्या म्हणाल्या "मला ही मुलंबाळ आहेत, मला कल्पना आहे तुमच्या सर्व त्रासा ची त्यामुळे मी माझ्या कडून जमेल ती मदत करेन".मला त्यांनी 2 दिवसांची वेळ मागितली व काय best करू शकते ते कळवते असे म्हणाल्या. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांचा फ़ोन आला तेव्हा त्या म्हणाल्या "तुला काय करायच ते कर. Medical council वगैरे माझे काही वाकडे करू शकत नाही. मी तुला काहीही मदत करणार नाही, एक पैसा ही देणार नाही.you can do whatever you want." मग मात्र मी ठरवले आता legal way ने जाऊ. तशी तक्रार Maharashtra medical council ला व consumer court(CST) मधे केली. Medical council मधे माझी केस 2012 सालापासून अशीच pending आहे without any action, as she had warned me....... Consumer court मधे judges ना मेडिकल terms समजत नसल्यामुळे व काही गोष्टी MANAGE होत असल्यामुळे 3 /4 महीने पुढची तारीख मिळते. खुप वेळा हताश होते आपल्या ह्या सिस्टममुळे, ढेपाळते ही.कारण त्या डॉक्टरतर ऊजळ माथ्याने त्यांची प्रेक्टिस करत आहेत व त्रास फक्त मीच भोगते आहे. त्यांना काहिही करता येत नाही कि त्यांची प्रेक्टिसही थांबवता येत नाही. पण मग विचार करते मी नशीबवान आहे की मी जिवंत आहे,माझ्या मुलां सोबत, माझ्यासाठी अतोनात कष्ट घेऊन मरणातुन खेचून आणणार्या माझ्या नवर्यासोबत आहे. तेवढे पुरेसे आहे.पण म्हणतात ना म्हातारि मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. मी अन्याया विरुद्ध लढते त्यात काहीच चुकीचे नाहीये ना? गप्प बसले असते तर क्लेश, मनस्ताप झाला असता.त्यापेक्षा मी प्रामाणिक प्रयत्न करते आहे म्हणून मला समाधान आहे. मी ह्या संदर्भात ज्या डॉ ना भेटले त्यात काही असे मोठे थोर डॉ आहेत ज्यांनी मला सल्ला रूपी warning दिली की समजा road accident मधे एखाद्या ट्रक ने उडवले असते तर काय केले असते??? So just forget it. एक महाशय तर म्हणाले की पैसे देऊन गुंडांकडून हया डॉ कडून भरपाई वसूल करा. आश्चर्य वाटते क़ी माझ्याकड़े कामाला येणाऱ्या बाई च्या हातून काचेची बरणी फुटली तर ती म्हणाली "माझ्या पगारातून कापून घ्या ताई" पण ह्या सुशिक्षित व आर्थिक दृष्टया सक्षम असणाऱ्या ना इतकी ही जाणीव असु नये??? माझा खुप विश्वास आह प्रथम देवा वर व नंतर sion हॉस्पिटल्सच्या डॉ वर ,ज्यानी मला ह्या प्रकरणात सर्वोपरी सहकार्या साठी आश्वस्त केले आहे ...म्हणून भले देर सही सवेरा तो होना ही है. मि आता सायन होस्पिटल शिवाय अन्य डॉ कडे जात नाही. न्याय मिळावा म्हणुन मी खालील प्रमाणे पेज तयार केलाय. https://www.facebook.com/shreyafightsback तुम्हाला विनन्ती आहे क्रुपया त्या ला लाईक करा व शेअर करा.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/03/2015 - 08:18 नवीन
फेसबुक पेजवर लाईक केल्यामुळे तुम्हाला न्याय कसा मिळेल हे समजले नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/03/2015 - 08:39 नवीन
+१. शिवाय कायदेशीर कारवाई आणि तत्सम गोष्टींबाबत एक बाजू ऐकून दुसरी बाजू न जाणता किंवा ती जाणण्याची क्षमता नसताना असा मोहिमेच्या उद्देशाने एकतर्फी पाठिंबा कसा देणार. दिला तरी तो जेन्युइन कसा असेल आणि तो कुठे मोजला जाणार? कायदेशीर लढाईत तुम्हाला मानसिक बळ मिळो आणि त्याबाबत आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/03/2015 - 17:10 नवीन
लोकजागॄती होण्यासाठी त्यांनी फेसबुक पेज सुरू केले असावे जेणे करून अशा शस्त्रक्रियांबाबत निर्णय घेण्यापूर्वी लोक अधिक काळजी घेतील. याखेरीज इतर लोकांनी सदर पेज लाइक करण्यामुळे कायदेशीर लढाई लढताना शुभेच्छांचे बळ आपल्या पाठिशी आहे ही भावना अंतःकरणात राहील. श्रेयाताई - आपल्या आरोग्यात सुधारणा होवो व कायदेशीर लढाईसाठी परमेश्वर आपल्याला बळ देवो.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 02/04/2015 - 01:42 नवीन
हरामखोर ही एकच शिवी तोंडात येते. मीश्रेया माझ्या बहिणीला वय वर्षे २६ ब्रेस्ट मध्ये झालेली गाठ २न्ड लेवल कॅन्सरम्हणुन रिपोर्ट देउन पुरी कॅन्सरची ट्रीटमेंट दिली गेली. नंतर मुंबईत एका हॉस्पिटलने मुळ टेस्तची स्लाईड मागीतली.......... गाटह फायब्रॉइडची होती. कॅन्सरस नव्हती. आज सगळे सगळे केमो रेडीएशनचे साईड एफेक्तस आणि बरच काही...
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/03/2015 - 08:05 नवीन
अत्यंत मनस्तापजनक आहे हे सर्व. इतकं सहन केल्यावरही पेशंटला दाद मागणं इतकं अवघड जावं आणि तक्रार २०१२ पासून पेंडिंग रहावी हे निराशाजनक आणि दु:खदायक आहे. अशा बाबतीत निष्काळजीपणा नेमका कसा सिद्ध करतात? शस्त्रक्रियेदरम्यानच चूक झाली आणि अमुकच डॉक्टरच्या हातून झाली असं कसं सिद्ध करतात? विशेषतः एकामागून एक अनेक सर्जरी झाल्या असतील तर? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत आणि एकूण दोष डॉक्टरचा आहे असं सिद्ध करणं अत्यंत अवघड असावं असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 02/03/2015 - 14:48 नवीन
खरंय. डॉक्टरांना नक्की कशी अकाऊंटिबिलिटी असते ते या निमित्ताने जाणून घ्यायला आवडेल. दीड वर्षापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाने एका हॉस्पीटलला ६ कोटी रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता. मला तो निर्णय प्रचंड आवडला होता. http://www.thehindu.com/news/national/kolkata-hospital-3-doctors-told-to-pay-rs-596-cr-for-negligence/article5268364.ece कदाचित एखाद्या अनुभवी वकीलाशी चर्चा वगैरे करुन पाहता येईल असे सुचवावेसे वाटते. मेडिकल कौन्सिल वगैरे *ट काही करणार नाही असे मला वाटते. बेडरुममध्ये पैशाच्या थप्प्या लावणारे केतन देसाईंसारखे लोक मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआय आणि एमसीआय यांच्या एथिक्समध्ये फारसा फरक दिसत नाही.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 02/03/2015 - 09:15 नवीन
त्या मेडमचं नाव सांगु शकता का? की केस चालु असल्याने सांगु नये? पण असल्या डॉक्टरांचा अनुभव शेअर करायला एखादी फोरम हवी.. जिथे लोक असे अनुभव लिहु शकतील.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 02/03/2015 - 16:50 नवीन
एकूणातच तुमचा अनुभव हा अंगावर सर्रकन काटा आणणारा आहे. ह्या पुढची कायदेशीर लढाई तर अजूनच किचकट. तुम्हाला आरोग्य लाभो आणि तुमच्या कायदेशीर लढाईत तुम्हाला यश येवो हिच इश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 02/03/2015 - 17:52 नवीन
खूपच वाईट अनुभव. डॉक्टरच्या हातात आपण विश्वासाने जीव सोपवतो, त्याच्याकडून असे व्हावे आणि वर काय करायचे ते कर ही धमकी? भयानक आहे. माझ्या ओळखीच्या एका बाईंची डिलिव्हरी मुंबईच्या एका नामांकित हॉस्पिटलमधे झाली. मात्र डिलिव्हरीला उशीर झाला आणि बाळाला प्राणवायु कमी पडून तो निळा पडला. हॉस्पिटलमधे ऑक्सिजन सिलेंडर्स नव्हते. बाळाला दुसर्‍या हॉस्पिटलमधे हलवा सांगून प्रत्यक्ष घेऊन जाऊन ऑक्सिजन लावीपर्यंत मधे जो वेळ गेला तेवढ्यात त्याच्या मेंदूच्या पेशी मृत झाल्या आणि आज तो २२/२३ वर्षाचा मुलगा भाजीपाला होऊन जगतो आहे. मानसुद्धा स्वतःची स्वतः वर उचलता येत नाही. डोळ्यांना दिसत नाही की बोलणे चालणे नाही. त्याला कसल्याही संवेदना नाहीत. केवळ जिवंत आहे. त्याच्या आईवडिलांकडे पैसा आहे म्हणून त्याला तसाच सांभाळत आहेत इतकंच. जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी दिसतो तेव्हा त्यांच्या आयुष्याचा नरक करणार्‍या डॉक्टरला केवळ शिव्याशापच तोंडात येतात.
  • Log in or register to post comments
V
vikramaditya Tue, 02/03/2015 - 18:13 नवीन
आणि लोकांच्या आयुष्याची वाताहत करुन पुन्हा दुसरे दिवशी निर्विकारपणे कामावर हजर होणा-या महाभागांना कोपरापासुन नमस्कार. It is simply not possible unless one discards one's conscience completely.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 02/10/2015 - 19:50 नवीन
वाचून खूप वाईट वाटले. अशी वेळ कोणावरही चुकुनही येवू नये हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करीन. असे आढळून आले आहे कि ४८% hysterectomy शल्यक्रिया ह्या गरज नसतांना होतात! 44% advised unnecessary surgery: 2nd opinion-givers पण याची एक दुसरी बाजूही आहे/असते. याला जबाबदार आपण सारे भावी patients च असतो! दुसरा कोणी ह्याच (किंवा अजून इतर कोणत्याही आजाराने )आजारी असेल तर त्याची नीट विचारपूस न करणे किंवा त्याचे भोग तो भोगतोय असे म्हणून आपण आपली स्वत:ची (चुकीची) समजूत काढून त्यावर कधीच सखोल विचार करत नाही व आजाराविषयी दूरदृष्टी तर अभावानेच दिसते. Patient मालदार असला तर ताबडतोब शल्यक्रिया करायला लावून आजाराचे फक्त management केले जाते. पण आजाराचे मूळ कारण बहुतेक वेळेला (>९०% वेळेला) तसेच ठेवले जाते व पुढच्या मोठ्या आजाराची एक सुरवात होते. त्यातून अजून एक मोठी शल्यक्रिया केली जाते. असे वर्षानुवर्षे आजारी पडून सारे मनस्वास्थ्य घालवून बसतो. ज्याचा कोणाचा सल्ला घेणार तो complete recovery साठीच घेत जावा अथवा मला ह्याही आजारासाठी व्यनी करा!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/30/2016 - 08:20 नवीन
वैद्यकिय हलगर्जीचे एक नवीन प्रकरण ऐकले. एका वर्गभगिनीच्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची होती. बाहुलीच्या मापानुसार भिंगाची ऑर्डर दिली होती. प्रत्यक्ष डोळा उघडल्यावर भिंग बसविताना लक्षात आले की जे भिंग बसविले जात आहे ते ठरलेल्या मापापेक्षा वेगळ्या मापाचे भिंग आहे. तरीसुद्धा डॉक्टरांनी तेच बसवायचा निर्णय घेतला. महिलेने त्यावर आक्षेप घेतल्यावर नवीन भिंगाची शोधाशोध सुरू झाली. दुर्दैवाने त्याक्षणी रूग्णालयात तेच एकमेव भिंग उपलब्ध होते. दोन्ही भिंगांच्या मापात फार जास्त फरक नाही असा डॉक्टरांनी दावा केला. शेवटी नाईलाजाने पूर्णपणे न जुळणारे भिंग डोळ्यात बसविले गेले. त्यामुळे अर्थातच रिकव्हरीला जास्त वेळ लागला. रूग्णाने इतरांना असा सल्ला दिला आहे की शस्त्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच डोळ्यात बसविण्याचे भिंग योग्य मापाचे आहे का नाही याची खात्री करा व नंतरच शस्त्रक्रियेला सुरूवात करा. अशीच दुसरी केस म्हणजे डोळ्यात महागडे इम्पोर्टेड भिंग टाकतो असे सांगून त्याचे पैसे घेऊन प्रत्यक्षात आयत्यावेळी स्थानिक कमी प्रतीचे स्वस्तातले भिंग टाकले. जेव्हा रूग्णाने विरोध केला तेव्हा आता शस्त्रक्रिया सुरू झाली आहे व याक्षणी दवाखान्यात हेच एकमेव भिंग उपलब्ध आहे असे सांगून तेच वापरले गेले. त्यानंतर तिच्या नवर्‍याने तक्रार दाखल केल्यावर प्रकरण अंगाशी येत आहे हे पाहून डॉक्टरांनी नाईलाजाने वरचे पैसे परत दिले. परंतु कमी प्रतीचे स्वस्तातले भिंग टाकल्यामुळे ते लवकर खराब व्हायची शक्यता आहे व त्यामुळे हीच शस्त्रक्रिया भविष्यात काही काळात पुन्हा करावी लागेल. सारांश - डोळ्याची शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी डोळ्याच्या मापाचे जे ठरविलेले भिंग आहे तेच उपलब्ध आहे याची खात्री केल्यानंतरच शस्त्रक्रिया सुरू करा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 01/30/2016 - 08:28 नवीन
बापरे! कठीण आहे!
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 01/30/2016 - 10:30 नवीन
असेही होऊ शकते हे माहीत नव्हते. इथे हा अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा