Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सिनेमा आणि पार्श्वसंगीतातली गाणी....

म
मुक्त विहारि
Sun, 02/01/2015 - 01:07
💬 16 प्रतिसाद
कधी-कधी एखाद्या सिनेमात पार्श्वसंगीत म्हणून एखाद्या गाण्याचे तुकडे घुसडल्या जातात. उदा, "सुहाग" ह्या सिनेमात एका शॉट मध्ये, परवीन बाबीच्या एंट्रीला, "बॉनी-एम" चे "मा-बेकर" ऐकू येते. आज ओशन्स-१२ परत बघतांना, "लेझर डान्स"च्या वेळी वाजणारे संगीत आठवले,थोडा-फार शोढ घेतला तर, मुळ गाणे पण मिळाले. हे सिनेमातील पार्श्र्वसंगीत ====>https://www.youtube.com/watch?v=mr834Cs9ncs आणि हे मुळचे गाणे =====> https://www.youtube.com/watch?v=kATa1ypyZCQ तुम्हाला पण असाच काही खजिना मिळाला असेल तर, जरूर सांगा...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3154 views

💬 प्रतिसाद (16)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/01/2015 - 03:08 नवीन
स्टेप अप-१ मधे एका सीनपुरतं एक जेमतेम २० सेकंदांचं गाणं जोश हेंडरसननी लिहिलयं फिलॉसॉफी नावाचं. खुप छान आहे. आख्खं गाणं असत फार मस्त झालं असत ते. आणि हो मी पहिला =))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/01/2015 - 03:23 नवीन
आपले स्वागत आहे "कॅप्टन जॅक स्पॅरो"जी. माय्बोली मोड ऑफ.... चला परत एकदा "मी पहिला" हा कुणालाही त्रास न देणारा क्लब सुरु झाला.... है तत्तड-तत्तड....
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/01/2015 - 03:31 नवीन
कुठल्याही क्लबाचे पुणरुज्जीवण, पुणर्स्थापणा वगैरे करण्यात आलेली णाही हे णम्रपणे सांगतो. डोक्यात सहज आलं म्हणुन लिहिलं. =))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/01/2015 - 04:39 नवीन
ओके... संमेलनात बोलूच.
  • Log in or register to post comments
D
damn Sun, 02/01/2015 - 06:07 नवीन
राज कपूरच्या काही चित्रपटांमधे, आधिच्या चित्रपटांमधे असलेल्या पार्श्र्वसंगीतावर आधारित, पुढच्या स्वतःच्याच चित्रपटामधे गाणे develop करुन टाकलेले आहे. पण नेमके आत्ता आठवत नाहिये. आणि गूगलून काहीही सापडले नाही. अवांतर : एवढसं टाईप करायला केवढा वेळ लागला मला! तुम्ही लोक एवढे मोठमोठाले लेख कसे टाईप करता!! अतिअवांतर : टंकलेखन सहाय्यामधे स्माईलीझ कशा टाईप कराव्यात, याचे मार्गदर्शन नाहिये. कुठे मिळू शकेल?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2015 - 06:09 नवीन
http://www.misalpav.com/filter/tips/3 :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
D
damn Sun, 02/01/2015 - 06:36 नवीन
*yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: शेवटी एकदाचे सापडले. पण तुम्ही दिलेल्या पानावर, स्वगृह पानावरून, जाण्याचा मार्ग कुठेही सापडला नाही. मि.पा. वर काही भुयारी/गुप्त मार्ग आहेत का! *secret* :secret: *secret* :secret:
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/02/2015 - 07:19 नवीन
ज्या चौकटीत तुम्ही शब्द टंकता त्याच्या खालच्या चौकटीत असलेल्या लाल रंगांच्या... More information about text formats या किंवा Textual smiley या शब्दांवर टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 02/01/2015 - 18:38 नवीन
१.आह मधल्या एका सीनचं पार्श्वसंगीत मेरा नाम जोकर मधल्या जाने कहां गये वो दिन च्या आधी जे संगीत वाजतं तसं आहे. २. चांदनी मधल्या मितवा या गाण्यातल्या एका कडव्याआधी (मला वाटतं छोटे छोटे दिनरात) सिलसिला मधलं देखा एक ख्वाब तो - चं संगीत वाजतं.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 02/01/2015 - 11:00 नवीन
..कम सप्टेंबर थीम ही हिंदी सिनेमात एकेकाळी वापरली गेलेली सर्वाधिक पॉप्युलर पार्श्वसंगीत थीम असावी. "टकीला" ही तशीच अजून एक. ..शोलेमधली गिटार कॉर्डस धून मस्त.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 02/02/2015 - 15:01 नवीन
मराठीत " बिगी बिगी चल , चल चल ढवळ्यास चल चल चल शिवारी जाउ " असं एका गीत होतं त्याला कम सप्टेंबरच्या थीम ची चाल फक्त मुखड्या पुरती दिली होती. तसेच 'नजरे मिली, दिल धडका .. आय लव्ह यू राजा " या गीतासाठी देखील कम सप्टेंबरच्या थीमची निवड केली होती. टकीला चा वापर नम्बर फिफ्टीफोर या गीतात मुखड्यासाठी सी रामचम्द्र यानी केला आहे. 'रासा सायांग' ही गीत अग्नेय आशियात फार लोकप्रिय लोकगीत आहे. त्याच्या वापर शंकरजय यानी सिंगापूर या सिनेमातील याच नावाच्या गीतासाठी केला आहे. रॉन गुडविन यांचा अरिबियन नाईट्स हा अल्बम अनेक हिंदी सिनेमात पार्शसंगीतात वापरण्यात आला आहे. एवढेच काय कम स्प्टेंबरच्या मागील बाजूचा जो ऑरकेस्ट्रा आहे त्यावर आधारित सुमन कल्याणपूर यानी गायलेले एक गीत आहे. ते आता आठवत नाही. बाजे पायल छमछम हे कल्याणजी विरजी शहा यांचे गीताचा मुखडा एका लेबानिश धुनवर आधारित आहे. स्नेहल भाट्कर यांचे लहरोंपे लहर हे गीतही असेच.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 02/02/2015 - 16:36 नवीन
टकीला हे मुख्यतः विनोदी मारामारीचं पार्श्वसंगीत. ..जो जीता वोही सिकंदरमधे संजूने कॅफेत छेडलेली मारामारी हे एक उदाहरण.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 02/01/2015 - 16:10 नवीन
हम किसीसे कम नही चित्रपटात आबा चे हनी हनी गाणे कितीतरी सीन्स मधे आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 02/01/2015 - 16:37 नवीन
तेरे लिए..जमाना तेरेलिए = अॅबाचे मामा मिया.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 02/02/2015 - 06:46 नवीन
श्री ४२० हा सिनेम १९५५ चा. त्यात १९५९च्या अनाडीच्या टायटल साँगचे संगीत आहे (किसी की मुस्कुराहटो पे...). अर्थात दोन्ही सिनेमांना शंकर जयकिशनचे संगीत होते. श्री ४२० मधे अन्धुकशी ये रात भीगी भीगी ह्या चोरी चोरी मधल्या गाण्याच्या सुरवातीला वाजणारी सुरावटही ऐकू येते.
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Mon, 02/02/2015 - 16:16 नवीन
बॉबी मध्ये ऋषी कपूर जेव्हा प्राणनाथला पहिल्यांदा भेटायला येतो तेव्हा जे पार्श्वसंगीत आहे त्यावर पुढे हमेशा हमेशा हे गाणे अन्नू मलिक ने बनवले, अशी माझी सुमारे २ वर्षांपूर्वीपर्यंत समजूत होती, पण बहुतेक ही कोणतीतरी सिम्फनी आहे, कारण इथे युरोप मध्ये रेल्वे स्टेशन वर काही लोकांना ही धून वाजवताना ऐकले आहे. अधिक माहिती कोणाला असेल तर सांगावे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा