How to make Weighted Blanket - जड पांघरूण बनवा
मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोएसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम. :)
हळूहळू ऑटीझमबद्दल वाचताना, सेन्सरी disorder कळली. व हाय एनर्जी सेन्सरी मुलांना शांत करण्यासाठी जराशी जड पांघरूण किंवा जड जाकेट इत्यादींचा वापर होतो हे हि वाचनात आले. proprioceptive तसेच tactile सेन्सेस ना उपयुक्त इनपुट देण्यासाठी तसेच डीप प्रेशरसाठी याचा चांगला फायदा होतो. अधिक माहिती या लिंकवर मिळेल : http://www.sensory-processing-disorder.com/weighted-blankets.html
परंतु हे सगळं स्पेशल असल्यामुळे महागही. चांगली वर्षभर डोळा ठेऊन होते मी, पण काहीच मनासारखे व खिशाला परवडेल असं पसंत पडेना. खरं सांगायचे तर मुलाची गोष्ट येते तेव्हा मी अमाप खर्च करते. पण छोट्याश्या जड पांघरूणासाठी ८०-100$ घालवणे काही बरोबर वाटत नव्हते. कारण मुलगा अगदी खात्रीने ते वापरेल याची शक्यता कमीच वाटत होती.
शेवटी गेल्या आठवड्यात http://www.pinterest.com/ वर एक पिन निदर्शनास आली. व अगदी युरेका मोमेंट वाटली मला ती. घराच्या घरी स्वस्तात जड पांघरूण बनवायचे! (हि pinterest साईट फारच उपयुक्त आहे. ऑटीझमबद्दल पुस्तकातून मिळणार नाही इतकी माहिती मला पिंटरेस्टवर मिळाली.)
साध्या Duct tape, तांदूळ व ९ sandwich size zip lock bags वापरून बनवले आहे. साधारण वजन असेल ५-६ पाउंड. आणि आकार आहे साधारण २ फुट x १.५ फुट. तुम्हाला आवड असेल व जमत असेल तर तुम्ही या ब्लांकेटला छान कापडी कव्हरही शिवू शकता. मला शिवणकाम येत नसल्याने मी केले नाही.
हि ती पिन: http://www.pinterest.com/pin/293508100690440961/
आणि हे मी बनवलेल्या वेटेड ब्लांकेटचे फोटो. आधल्या मधल्या स्टेपचे फोटो घ्यायला विसरले. परत बनवले तर अपडेट करीन. क्रमवार कृती तुम्हाला वरील ओरिजिनल पिनमध्ये मिळेल.
माझा मुलगा काल चक्क ५ मिनिटाच्या आत झोपला हे सांगायचे राहिले. :) मला अजिबात खात्री नव्हती, परंतु मुलाला खूप आवडले! :)
माझा मुलगा काल चक्क ५ मिनिटाच्या आत झोपला हे सांगायचे राहिले. :) मला अजिबात खात्री नव्हती, परंतु मुलाला खूप आवडले! :)
💬 प्रतिसाद
(8)
ल
लव उ
Fri, 01/30/2015 - 06:49
नवीन
ALL THE BEST
- Log in or register to post comments
स
सुप्रिया
Fri, 01/30/2015 - 09:10
नवीन
तुमच्यातल्या आईला सलाम.
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 01/30/2015 - 10:16
नवीन
+१
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 01/30/2015 - 12:08
नवीन
वेगळीच माहिती आहे. तांदळाचा हा उपयोग आवडला. एकदा मान दुखायला लागल्यावर मैत्रिणीने अशीच युक्ती सांगितली होती. गरम पाण्यच्या पिशवीने मान शेकता येत नाही म्हणून स्वच्छ सॉकमध्ये तांदूळ भरून गाठ मारायची व सोसवेल इतपत मायक्रोवेवमध्ये गरम करून शेकायचे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 01/31/2015 - 04:09
नवीन
समुद्राच्या किनार्यावरची वाळु वापरुन पहा. जास्त परिणामकारक असते. (अर्थात जपुन, भाजायची शक्यता असते.)
- Log in or register to post comments
स
स्वमग्नता एकलकोंडेकर
Fri, 01/30/2015 - 18:31
नवीन
धन्यवाद!
रेवती, मीदेखील सॉक मध्ये तांदूळ भरून गरम करून शेकते. जास्त वेळ गरम राहतो सॉक.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 01/31/2015 - 00:21
नवीन
आणि तुमच्यातल्या आईला सलाम...
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Tue, 02/03/2015 - 07:44
नवीन
यूट्यूबवर थोडीशी खोदाखोद केली आणि शिवणकाम न करता तुमचं हे ब्लँकेट आवडत्या कापडाच्या आवरणात कसं घालता येईल याचा शोध घेतला.
या व्हिडिओत थोडीशी माहिती मिळाली, पण नेमकं no-sew blanket कसं केलं ते नीटसं कळलं नाही. त्या साठी हा व्हिडिओ उपयुक्त वाटला:
बाहेरच्या कापडी आवरणाच्या केवळ गाठी सोडवून आतलं 'वेटेड ब्लँकेट' वेगळं काढता येईल आणि कापडी आवरण वॉशिंग मशिन मध्ये धुता येईल.
- Log in or register to post comments