गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २५
Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २५
मागिल भाग..
गुरुजिंच्या या वागण्याचा पाठशाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर असा काहि जबरदस्त परिणाम घडलेला असायचा. कि तो विद्यार्थी कित्त्तीहि स्वच्छंदि वगैरे असला,तरीही...जर पड्लच काहि चुकिचं पाऊल,तर ते पडण्याआधी गुरुजिंचा चेहेरा त्याच्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नसे!
पुढे चालू...
==============================
दिवसामागुनी दिवस चालले... ह्या गाण्यातील ओळींप्रमाणे त्यातला पुढचा जो भाग , तो जीवलगा..कधी रे येशील तू??? हा ही वेदपाठशाळेच्या-हरएक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातला समान धागा.. क्षणभर थबकलात ना तूलनेमुळे..? सहाजिकच आहे. पण पुढे आमच्या त्या जीव-लगा'ची जी ओळख होइल्,त्यावरून तुंम्हालाही अगदी सहज पटेल ही तूलना!
त्याच काय आहे,की परिक्षा हा अगदी प्राचीन मनुष्यजीवना पासून ते आजपर्यंतच्या आधुनिक साधनयुक्त जगण्यापर्यंत.. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरचा, म्हटला तर महत्वाचा ट्प्पा...अणि गृहीत धरला, तर-सहप्रवासी! हा जणू जीवन जगण्याचा एक नियम आहे,असं आपण मानतो.पण...,या नियमाची पुरेपुर जाणिव होते,ती आमच्या वेदपाठशाळेत होणार्या प्रतिवर्षिक परिक्षांनी. तुंम्ही म्हणाल त्याचा आणि 'जीवन एक परिक्षा!' असल्या निबंध वजा गोष्टीचा काय नेमका परस्पर अनुबंध? तर यातलं पहिलं,आणि ठळक साम्य, म्हणजे ही परिक्षा पहिल्यावहिल्या वर्षापासून जी सुरु होते,ती शेवटाच्या वर्षापर्यंत चालते. हीला कोणतीही सेमीस्टर सारखी पद्धती लागू पडत नाही. आणि पाडण्याचा प्रयत्न केला ,तर ती संपूर्ण..म्हणजे टोटल-फेल जाते..किंवा जाइल. आणि कॉपी तर यात-करताच येत नाही!
पहिल्या दिवशी जी संध्येतली चोविस नावं संथेमधे घोकली..आणि आपला या शिक्षणात जन्म-झाला...त्यापासून ते वेदातल्या शेवटच्या ग्रंथातल्या शेवटच्या अध्यायातल्या शेवटच्या मंत्र अगर श्लोकापर्यंत ..सगळ्याची प्रतिवार्षिक परिक्षाच परिक्षा.. आपल्या लौकिक शाळेच्या भाषेत समजायचं तर पहिलीला दिलेली परिक्षा आणि अभ्यासविषय..टेक्सबुक म्हणून दुसरीला नसतो. इतकच काय तिमाही आणि सहामाही असे छोटे छोटे ट्प्पेही असतात. पण आमच्याकडे मामलाच वेगळा .परिक्षा एकदाच दर वर्षाचे-शेवटी! आणि परिक्षेला गृहीत अभ्यासक्रम ,हा संपूर्ण वर्षाचा! हे पहिल्यावर्षी..पुढे दुसर्या वर्षी, परिक्षेला प्रथम आणि द्वितीय अश्या दोन्ही अभ्यासक्रमांची परत संपूर्ण परिक्षा... हाच क्रम पुढे चालू राहून माणूस जेंव्हा वेदातला शेवटाचा ग्रंथ पाठ करून पूर्ण करतो..तेंव्हा दशग्रंथाची-परिक्षा म्हणजे अख्या दहा वर्षाच्या पाठांतरीय (संपूर्ण) अभ्यासा'चीच परिक्षा.. म्हणजे दहावीला परिक्षा पहिली..ते..दहावी..या संपूर्ण अभ्यासक्रमाची. बरं लौकिक शाळांमधे कित्तीही विवाद्य वाटलं,तरी पुढची इयत्ता हा अधिच्या इयत्तेचा अपडेटच असतो. पण इकडे अपडेट वगैरे भानगडच नाही.. सारे काहि जन्म दिनापासून ते शेवटापर्यंत जीवन पूर्ण व्हावे,आणि अखेरीस त्या भगवंता-समोर पापपुण्याच्या हिशेबाला उभे रहावे तसे!!!. तेच नशिबी यायचे! काहिच,कुठेच न सोडणारे! आणि हो..,यात लेखी-असे काहिही नाही,सारेच्या सारे तोंडी'च-द्यायचे.
मंडळी... त्याच त्याच व्याख्या आणि संदर्भ वारंवार फेकून मारल्यासारखं वाटलं ना? त्याबद्दल क्षमस्व! पण आमची ही प्रतिवार्षिक-गतवार्षिक अभ्यासाची भर पडत वज्रासमान-कठिण होत चाललेली ही परिक्षा..ही जेव्हढी जीवघेणी आहे,तेव्हढीच जीवं-लंगं ही आहे बरं!!! अहो.., 'ही परिक्षा ज्यानी-दिली,त्यानी आयुष्यातली कुठलिही परिक्षा (बिनधोक)द्यावी...'(हे - पुण्यात ज्यानी टूव्हिलर चालवली,त्यानी कुठेही बिनधोक चालवावी...! या चालीवर वाचावे..! ;) ) आहाहाहा...!!!!!! परिक्षेचा आदला महिना जवळ येत चालला,की काय ती तयारी-सुरु होते..एकेका वेदपाठशाळांमधून! एक तर आपल्याच गोटात प्रचंड चढाओढ(पहिलं येण्यासाठी!) आणि बाहेरून इतर पाठशाळांचे विद्यार्थीही येणार असतील,तर ती गोटाबाहेरचीही लढाई... म्हणजे, रणांगण एक आणि शत्रू दोन...अशी अवस्था! मग काय???? मनातून एकच गर्जना बाहेर पडते....
(मी दिल्लीला होतो तेव्हा )आमच्या इन्स्टित्युट मध्ये ओपन बुक एक्जॅम्स असायच्या , पुस्तके , नोट्स, चिठ्ठ्या चपाट्या घेवुन परीचपाट्यायेण्याची पुर्ण परवानगी असायची ! पण एकही प्रश्न सिलॅबस मधला पडेल तर शप्पथ ! प्रत्येक प्रश्नावर डोकं आपटायला लागायचं ... तेव्हा कसे बसे पास व्हायचो ! ( ब्यॅट्या सेम कॉलेजातील असल्याने त्याला माझ्या भावना कळतील कदाचित ) असो. नको त्या आठवणी !