Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र तिसरे

व
विटेकर
Fri, 02/21/2014 - 12:33
🗣 5 प्रतिसाद

Book traversal links for दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र तिसरे

  • ‹ दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र दुसरे
  • Up
आता एकदम ५१ प्रश्न आहेत .. शेवटचा हप्ता. सोमवारी दासनवमी आहे .. तोपर्यन्त सोडविण्याचा प्रयत्न करावा, तसाही विकांत आहे. ५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ? ५२ वादविवादात पराभूत झाल्यानंतर ते विद्वान समर्थ शिष्य झाले त्यानंतरचे त्यांचे नाव काय ? ५३ त्यांची नियुक्ती कोणत्या मठावर झाली ? ५४ शिरवळ मठाचे मठाधिपती कोण होते ? ५५ शिरवळला भुईकोट किल्ला होता, त्याचे नाव काय ? ५६ पहिले दोन चरण समर्थांचे, नंतरचे दोन चरण कल्याणांचे अशी रचना आहे त्या काव्याचे नाव काय ? ५७ या रचनेत किती श्लोक आहेत ? ५८ कल्याणास सर्पदंश झाल्यानंतर विष उतरवण्यासाठी समर्थांनी कोणास नवस केला ? ५९ मिरज मठासाठी कोणत्या यवन सरदाराने जागा दिली ? ६० समर्थांच्या स्त्री शिष्यांत कीर्तनाचा अधिकार कोणाला होता ? ६१ समर्थ शिष्यांत बसून कीर्तन करण्याचा मान कोणाचा ? ६२ समर्थांचे उपलब्ध चित्र कोणत्या समर्थ शिष्याने तयार करून घेतले ? ६३ विवेक करावे साधन हे पत्र कोणाच्या हातचे ? ६४ कोणत्या गडावर समर्थांनी कीर्तन केले ? ६५ समर्थांनी शिवाजी महाराज यांना स्वप्नात प्रसाद दिला ही घटना कोणत्या गावी घडली ? ६६ समर्थांच्या झोळीत राज्य टाकण्याची घटना कोणत्या गावी घडली ? ६७ पाषाणात जिवंत बेडकी निघाली ही घटना कोठे घडली ? ६८ समर्थांनी कृष्णेकाठी ११०० सत्पुरुषांचा मेळावा घेतला ते गाव कोणते ? ६९ कीर्तनामध्ये कल्याण स्वामींना डोक्यावर टाळ मारताच अभंग आठवला ते गाव कोणते ? ७० माजलेला हत्ती कल्याण स्वामींनी शांत केला ही घटना कोणत्या गावी घडली ? ७१ समर्थांनी विठ्ठलमूर्तीची स्थापन कोणत्या गावी केली ? ७२ समर्थस्थापित कोणत्या गावचा मठ आजही पंढरपूरच्या आषाढीवारीची परंपरा सांभाळतो ? ७३ मारूतीने कोणत्या गावचा मदरसा पाडला ? ७४ समर्थ ज्या नदीच्या तळाशी पद्मासनात बसले होते त्या नदीचे नाव काय ? ७५ सज्जनगडावर रामदासस्वामी संस्थांनाची स्थापन कोणी केली ? केव्हा ? ७६ समर्थ सांप्रदायाची प्रस्थानत्रयी कोणती ? ७७ ग्रंथराज दासबोधाची रचना कोणत्या मठात झाली ? ७८ दासबोधात एकूण किती ओव्या आहेत ? ७९ दासबोधात एकाच ओवी दोनदा आली आहे, ती कोणती ? ८० समर्थांची चतुःसूत्री सांगणारी ओवी कोणती ? ८१ ‘प्र’ ने सुरू होणारे दासबोधातले पाच शब्द सांगा. ८२ समर्थांनी मनाच्या श्लोकांची रचना कुठे केली ? ८३ श्रीसमर्थ कायम वास्तव्यासाठी सज्जनगडावर केव्हा आले ? ८४ कल्याण स्वामी कोणत्या नदीचे पाणी समर्थांसाठी गडावर आणत असत ? ८५ वेण्णास्वामींनी सज्जनगडावर देह केव्हा ठेवला ? ८६ गडावरील राममंदिरात असलेल्या मूर्ती घडविणारा अंध कारागीर कोण ? ८७ समर्थांनी शेवटचे पत्र कोणास पाठवले ? ८८ समर्थांच्या नंतर चाळीस वर्षे सज्जनगडाचा कारभार कोणी पहिला ? ८९ औरंगजेबाने सज्जनगड जिंकला तेव्हा गडाचे नाव काय ठेवले ? ९० औरंगजेबाने सज्जनगड जिंकल्यावर गडावरील राममूर्ती कोठे हलवली ? ९१ समर्थांच्या निर्वाण प्रसंगी त्यांच्या सन्निध असणारे त्यांचे दोन शिष्य कोणते ? ९२ अंत्यसंस्कारानंतर समर्थांच्या अस्थी कोठे जतन केल्या होत्या ? ९३ समर्थांच्या अस्थिंचे विसर्जन कोणी व केव्हा केले ? ९४ समर्थांच्या अस्थींबरोबर कोणत्या शिष्याच्या अस्थिंचे विसर्जन झाले ? ९५ ‘बुडाला औरंग्या पापी’ असे समर्थ कोणत्या काव्यात म्हणतात ? ९६ या काव्याची रचना कोठे झाली ? ९७ छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना राज्याभिषेकाचे निमंत्रण द्यायला आले तेव्हा समर्थांनी त्यांना कोणता आशीर्वाद दिला व कोणत्या वस्तू दिल्या ? ९८ शालिवाहन शके १९३० या साली कोणत्या समर्थशिष्याची जन्मशताब्दी झाली ? ९९ त्या शिष्याचे जन्मस्थळ व समाधीस्थळ कोणते? १०० त्यांना समर्थांनी कोठे दर्शन दिले ? १०१ त्या शिष्याने लिहिलेल्या दोन ग्रंथांची नावे सांगा. जय जय रघुवीर समर्थ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2727 views

🗣 चर्चा (5)
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 12:38 नवीन
५१ बहुतेक सदाशिवशास्त्री आठवले/येवलेकर असे काहीसे नाव आहे. ५५ किल्ले सुभानमंगळ. ५९ आदिलशाही किल्लेदार जलालखान. ६० वेणाबाई अन बहुतेक अक्का. ८४ उरमोडी नदी. ९५ आनंदवनभूवन. सध्या इतकेच आठवते आहे.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 02/21/2014 - 12:41 नवीन
५९ मिरज मठासाठी कोणत्या यवन सरदाराने जागा दिली ? काय ओ हे ? तुमी मिर्जेच नय काय ?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 12:46 नवीन
हो, म्हणून तर जलालखान म्हणालो. तोच तेव्हा मिरजेचा किल्लेदार होता, नै का? त्यानेच जागा दिली असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2014 - 12:57 नवीन
५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ? >> वामन पंडीत (?) ६५ समर्थांनी शिवाजी महाराज यांना स्वप्नात प्रसाद दिला ही घटना कोणत्या गावी घडली ? सातारा - अजिंक्यतारा ६६ समर्थांच्या झोळीत राज्य टाकण्याची घटना कोणत्या गावी घडली ? सातारा ७० माजलेला हत्ती कल्याण स्वामींनी शांत केला ही घटना कोणत्या गावी घडली ? चाफळ ७५ सज्जनगडावर रामदासस्वामी संस्थांनाची स्थापन कोणी केली ? केव्हा ? >> वादग्रस्त प्रश्न ७६ समर्थ सांप्रदायाची प्रस्थानत्रयी कोणती ? मनोबोध , दासबोध आणि आत्माराम ८० समर्थांची चतुःसूत्री सांगणारी ओवी कोणती ? ८१ ‘प्र’ ने सुरू होणारे दासबोधातले पाच शब्द सांगा >>> प्रयत्न प्रचीती प्रबोध ? ? ८४ कल्याण स्वामी कोणत्या नदीचे पाणी समर्थांसाठी गडावर आणत असत ? उरमोडी / उर्वशी (?) ८७ समर्थांनी शेवटचे पत्र कोणास पाठवले ? संभाजी महाराज ८८ समर्थांच्या नंतर चाळीस वर्षे सज्जनगडाचा कारभार कोणी पहिला ? ८९ औरंगजेबाने सज्जनगड जिंकला तेव्हा गडाचे नाव काय ठेवले ? नवरसतारा ९० औरंगजेबाने सज्जनगड जिंकल्यावर गडावरील राममूर्ती कोठे हलवली ? >>> वासोटा (?)( नॉट शुअर ) ९१ समर्थांच्या निर्वाण प्रसंगी त्यांच्या सन्निध असणारे त्यांचे दोन शिष्य कोणते ? ९४ समर्थांच्या अस्थींबरोबर कोणत्या शिष्याच्या अस्थिंचे विसर्जन झाले ? कल्याणस्वामीच असणार ...दुसरे कोण ? ९५ ‘बुडाला औरंग्या पापी’ असे समर्थ कोणत्या काव्यात म्हणतात ? आनंदवन भुवन ९७ छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना राज्याभिषेकाचे निमंत्रण द्यायला आले तेव्हा समर्थांनी त्यांना कोणता आशीर्वाद दिला व कोणत्या वस्तू दिल्या ? ९८ शालिवाहन शके १९३० या साली कोणत्या समर्थशिष्याची जन्मशताब्दी झाली ? श्रीधर स्वामी ९९ त्या शिष्याचे जन्मस्थळ व समाधीस्थळ कोणते? शिगेहळ्ळी कर्नाटक १०० त्यांना समर्थांनी कोठे दर्शन दिले ? (पुण्याहुन सातारला येताना ? ) १०१ त्या शिष्याने लिहिलेल्या दोन ग्रंथांची नावे सांगा. आर्य संस्कृती आणि ?
  • Log in or register to post comments
व
विटेकर Tue, 03/04/2014 - 10:41 नवीन
http://dasbodhabhyas.org/literature/Samarth_Charitra_Prashna_Manjusha_ani_Uttare.pdf प्रश्नमंजुषेची उत्तरे अपलोड केली आहेत !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 35 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 41 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा