म्हणून नथुराम उजवा ठरतो.....
गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली.
गांधी घराण्यातील हत्येचा विषय निघाल्यावर आपसूकच इंदिरा गांधी आणि बापू यांच्या हत्येची आठवण झाली नाही तरच नवल. (आपण जरी विसरायाचा प्रयत्न केला तरी प्रसारमाध्यमे आणि खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्याची आठवण करून देत राहतील.)
आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. परंतू बापुंचा मारेकरी(नथुराम) आता ‘पहिला दहशतवादी’ म्हणून संबोधला जातो.
खरे तर वेगळ्या खलिस्तानसाठी प्रयत्न करणारे जर्नेलसिंग यांच्या हत्येचा सूड किंवा श्रीलंकेत होत असणाऱ्या तामिळींच्या अत्याचाराचा सूड म्हणून भारतातील पंतप्रधानाना जबाबदार धरणारे लोक जे भाषा आणि धर्म यांचा संकुचित विचार करत होते व भारतापासून वेगळे होण्याची मागणी करत होते ते खरे दहशतवादी होत.
उलटपक्षी अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत (जिथे सर्व धर्मांना सारखी वागणूक असेल आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करणारी धोरणे नसतील.) याच्यासाठी कायम आग्रही राहणारा व यांच्याआड येणाऱ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी त्यावेळेस जे करता आले ते करणारा नथुराम मात्र दहशतवादी. ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता.
वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढेच वाटते की देशाची अखंडता डोळ्यासमोर ठेवून कायद्याने चुकीचे ठरवलेले पाऊल उचलूनदेखील त्यावर ठाम राहणारा नथुराम कायम या सगळ्यात उजवा ठरतो.
टीप: इथे कोणाच्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचा हेतू नसून तिन्ही गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.
🗣 चर्चा
(107)
अ
अमोल मेंढे
गुरुवार, 02/20/2014 - 07:59
नवीन
टीप खरी वाटत नाही...
- Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी
गुरुवार, 02/20/2014 - 08:04
नवीन
अमोलजी,
हीच तर गम्मत आहे...एखाद्या माणसाने कितीही खरे सांगायचा प्रयत्न केला तरी कुठले तरी पूर्वग्रह त्याच्या म्हणण्याच्या आड येतात. :(
प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
गुरुवार, 02/20/2014 - 08:05
नवीन
फक्त चर्चा तीही.....संपादित
- Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी
गुरुवार, 02/20/2014 - 08:07
नवीन
आपले दुर्दैव दुसरे काय??
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/20/2014 - 08:07
नवीन
म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे म्हटले असते तर आपल्या टीपेशी ते सुसंगत ठरले असते. दाभोलकरांच्या मारेकरी व गांधींचे मारेकरी यात समान सूत्र म्हणजे विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले म्हणून त्या व्यक्तीलाच संपवून टाका. याचे कुठल्याही पातळीवर उदात्तीकरण वा समर्थन हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या करणे मला अविवेकी वाटते.
- Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी
गुरुवार, 02/20/2014 - 08:09
नवीन
समर्थन करणे हा हेतूदेखील नाहीये..
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/20/2014 - 08:13
नवीन
आपल्याला समर्थन करण्याचे देखील अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. आपला तो हेतु नाही ही गोष्ट वेगळी.
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
Tue, 02/25/2014 - 11:16
नवीन
नथुराम गोडसे अमर रहे
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
गुरुवार, 02/20/2014 - 08:21
नवीन
की
हे अविवेकी आहे.
लादेनच्या विचारांचा मुकाबला कसा करता आला असता? मग लादेनला मारून टाकणे अविवेकी आहे का? नथुरामजी ह्यांचेसाठी गांधी लादेन एवढेच भयंकर असतील त्या काळात. भारतीय सीमेवर जे झाले त्यास गांधी कारणीभूत आहेत असा काहीसा विचार त्यांनी केला असेल का?
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 02/20/2014 - 08:36
नवीन
उगाच काहीबाही अर्थ जोडु नका.विचारस्वातंत्र्याचा व लिखाणस्वातंत्र्याचा गैरफायदा आहे हा.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/20/2014 - 08:38
नवीन
लादेन हा काही विचारांची लढाई लढत नव्हता. त्यामुळे हे उदाहरण गैरलागू.
>नथुरामजी ह्यांचेसाठी गांधी लादेन एवढेच भयंकर असतील त्या काळात.<
होय त्यांच्याशी नथूरामला विचारांनी लढता येत नव्हते तो इतर वेळी विचार करणारा गृह्स्थ असून सुद्धा!
>>भारतीय सीमेवर जे झाले त्यास गांधी कारणीभूत आहेत असा काहीसा विचार त्यांनी केला असेल का? <<
तसा विचार त्याने केला म्हणुन तर गांधीजींचा खून केला.विचार पटले नाहीत करा खून.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
गुरुवार, 02/20/2014 - 09:44
नवीन
धर्म संरक्षण, धर्म वृद्धी वगैरे त्याचे विचारच होते कि .....तसा विचार अमेरिकेने केला म्हणुन तर लादेनचाचा खून केला. विचार पटले नाहीत करा खून......
>>भारतीय सीमेवर जे झाले त्यास गांधी कारणीभूत आहेत असा काहीसा विचार त्यांनी केला असेल का? तसा विचार त्याने केला म्हणुन तर गांधीजींचा खून केला.विचार पटले नाहीत करा खून......
तुलना लादेन आणि गांधी नसून विचार पटले नाहीत तर करा खून हे कितपत योग्य किंवा विवेकी आहे ह्या अनुषंगाने...इतकेच
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 02/25/2014 - 13:48
नवीन
थोडासा फरक आहे.
नथुरामच्या मते गांधी वैचारिक अतिरेकी होते. आणि सीमेवर/ सीमेपलीकडे त्याच्या देशबांधवांवर होणार्या अत्याचारांना त्यांचा वैचारिक अतिरेक कारणीभूत होता. इतर हत्या आणि गांधीहत्या यांमध्ये मूलभूत फरक हाच आहे ही नथुरामने गांधींना मारले ते त्यांच्या भूतकाळासाठी नाही, तर त्यांच्या भविष्यकाळासाठी.
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
Tue, 02/25/2014 - 11:16
नवीन
अनुमोदन.
नथुराम गोडसे अमर रहे
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 02/20/2014 - 08:36
नवीन
चक्क विषयांतर करत; संबंध नसलेलेल्या; मी काढलेल्या (मिपा) धाग्यांची जाहीरात करत असल्या बद्दल क्षमस्व. ( :) )
*मिपावर चालु केलेले धागे:
** राष्ट्रीय राजकारणावरचा प्रादेशिक अस्मितांचा प्रभाव
** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
** मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?
* भावी धागा विषय:
** चिकित्सामक विचार कसा करावा
** तर्कशास्त्र आणि तर्कसुसंगतता
** तर्कदोष अर्थात तार्कीक उणीवा
- Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी
गुरुवार, 02/20/2014 - 08:44
नवीन
विषय ३ गांधीवरून दाभोळकर मार्गे लादेनकडे गेला... :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/20/2014 - 08:48
नवीन
>>> दाभोलकरांच्या मारेकरी व गांधींचे मारेकरी यात समान सूत्र म्हणजे विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले म्हणून त्या व्यक्तीलाच संपवून टाका.
दाभोळकरांचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या विरूद्ध असणार्यांनी त्यांना संपविले असा निष्कर्ष ते सापडेपर्यंत काढता येत नाही.
दाभोळकरांना खरोखरच त्यांचे विचार सहन न होणार्यांनी मारले का त्यांना मारल्यामुळे त्यांच्या हत्येची सुई आपोआप 'सनातन'वर व पर्यायाने हिंदू संघटनांवर वळेल हे गृहीत धरून कोणीतरी 'सनातन' विरोधकाने त्यांना मारले का त्यामागे बिल्डरमाफिया, राजकारणी वगैरे मंडळी होती हे अजून समजलेले नाही.
पोलिसांना त्यांचे मारेकरी कोण हे आतापर्यंत समजलेले असणार आहे. सुरवातीचे काही महिने 'सनातन' विरूद्ध जंग जंग पछाडून सुद्धा काहीच पुरावे मिळाले नाहीत. तो पर्यंत मोलाचा वेळ वाया जाऊन खर्या मारेकर्यांना सुखरूप निसटायची संधी मिळाली. त्यामुळे या हत्येमागे 'सनातन' नसून कट्टर 'सनातन' विरोधक असलेला एखादा राजकारणी असावा असे वाटते. पोलिसांना तो कोण हे कळले असावे, पण राजकीय दडपणामुळे त्यांचे हात बांधले गेले असावेत असे वाटते.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 02/20/2014 - 09:00
नवीन
+१ मला या प्रकरणात काही "धर्मनिरपेक्ष" लोकांचा हात असल्याचा पहिल्यापासून संशय आहे. पण पुरावे नसल्यामुळे न बोलणे उत्तम.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
गुरुवार, 02/20/2014 - 12:27
नवीन
दाभोलकर यांची हत्या झाल्यावर माझ्या मते खरा आनंद या तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी लोकांनाच झाला असावा. कारण हिंदुत्ववाद्यांना झोडपायला एक नवीन बहाणा मिळाला. निखिल वागले वगैरे आतातायी पत्रकार तर दिसेल त्या सेना -भाजप नेत्याला जणू काही त्यांनीच सुपारी देवून दाभोलकरांना संपवले अश्या अविर्भावात ओरडत होता. सर्वत्र हे ढोंगी पुरोगामी लोक काही पुरावा / तपास होण्याआधीच दाभोलकर आणि गांधी हत्या यात साम्य शोधत होते. दाभोलकर यांच्या हत्ये मागे अन्य काही शक्यता असू शकतात ( संपत्ती वाद , चळवळी मधील अंतर्गत वाद वगैरे ) असे वाटते.
(इथे मिपावर मी कुणावर वैयक्तिक टीका करत नसून माझा रोख खास करून माध्यमामध्ये दाभोलकर हत्ये विषयी बोलणारे विचारवंत/ राजकारणी यांच्याकडे आहे)
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 02/20/2014 - 08:58
नवीन
तरीही फरक येतोच.
गांधींजींची हत्या करण्याचा निर्णय केतीही अविवेकी असला, तरी त्यामागे त्याचे काहीतरी तर्कशात्र होते. भले ते चूक असेल, पण त्याचे मूळ हे राष्ट्रभक्ती हेच होते. फारतर आपण त्याला वाट चुकलेला म्हणू शकतो, पण किमान देशद्रोही म्हणू नये अशी आशा आहे.
दाभोळकरांची हत्या ही आर्थिक हितसंबंधातून झालेली आहे असा होरा आहे. तस्मात या दोन्ही घटनांना एकाच तराजून तोलू नये.
- Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी
गुरुवार, 02/20/2014 - 09:14
नवीन
आनंदाजी नथुरामबद्दल लिहिताना अगदी हेच मला म्हणायचे आहे..
बाकी दाभोलकर प्रकरणात अजून पोलिसांनाच काही सुगावा नाही उगाच त्यावर काही तर्कशास्त्र लावण्याची आता तरी काही गरज भासत नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 02/20/2014 - 09:00
नवीन
दाभोलकरांचा खुन नेमक्या कोणत्या कारणावरुन झाला याची १% सुद्धा माहिती आपल्याकडे नाहि. गांधीहत्येशी दाभोलकर मर्डरची नाळ जुळायचं एकमेव कारण म्हणजे अजुनही दाभोळकरांच्या खुनाबाबतचं अंधारलेलं वलय. या वलयात अनंत शक्यता समानतेने सामावल्या आहेत... सरकारने/सत्ताधारी पक्षाने मुद्दाम त्यांचा खुन करवला, हिंदु धर्मीयांना पुरोगामी विचारांप्रती नेणार्या व्यक्तीला परधर्मीयाने संपवला, दाभोलकरांच्या अनौरस मुलाने आपल्या आईच्या दु:खांचा बदला घेतला, दाभोलकरांना अचानक काहि धनलाभ होणार होता जो कुणाला तरी खुपत होता, "द" पासुन सुरु होणार्या अडणावांच्या प्रसिद्ध व्यक्तींना ठार मारणारा सायको किलर तयार झाला होता, दाभोलकरांना खुन्याकरवी आत्महत्या करायची हुक्की आलि होती, मिपावर धाग्यांचा रतीब कमि झालेला दाभोलकरांना व काहि मिपाकरांना बघवला नाहि, अ.निं.स. ने आपल्या फायद्याची सनसनाटी तयार करायला दाभोलकरांचा बळी दिला... अशा अनंत शक्यता आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/20/2014 - 09:06
नवीन
कसल्या एक से एक शक्यता शोधुन काढल्यात ...
दाभोळकरांनी जादुटोणा विरोधी कायदा म़जुर करु घेण्यासाठी तर हे बलिदान केले नसावे ना ?
किंव्वा जसे मॉरीआर्टीला दाखवण्यासाठी शेरलॉक मेल्याचे नाटक करतो तसे काहीसे तर केले नसावे ना ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 02/20/2014 - 09:56
नवीन
परिस्थिती संभाओनासे भरी हुई है :)
या गदारोळात दाभोलकरांच्या मृत्युबाबत जि शब्दांची आतिषबाजी होते त्याबद्दल मात्र खेद वाटतो. व्यक्ती दाभोलकर त्यांच्या चाहत्यांना दु:खात लोटुन गेले आणि कार्यकर्ते दाभोलकर अनेक सकारात्मक शक्यतांना पूर्णविराम लाऊन गेले :(
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 02/20/2014 - 14:11
नवीन
अगागा! कहर. असो, शेवटचा एपिसोड बघता शरलॉकनेच ब्रिटन सोडावे लागु नये म्हणून पुन्हा मॉरीऑर्टीला परत आणले की काय मानायला जागा आहे.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 02/20/2014 - 10:54
नवीन
प्रकाश घाटपांडे साहेब,
हे विधान पटलं नाही. विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले म्हणून नथुराम गोडसेने महात्मा गांधींना संपविले ही वस्तुस्थिती नाही. 'गांधी हत्या आणि मी' ह्या त्यांच्या बंधूंनी , गोपाळ गोडसेंनी, लिहीलेल्या पुस्तकात गांधी हत्या करण्यामागची नथुराम गोडसेंची वैचारिक बैठक विशद केली आहे. त्यानुसार, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या भवितव्याचे निर्णय घेण्याची संसदेला असावी तेवढी मोकळीक राहिली नाही. उपोषणाचे हत्यार उपसून संसदेचे निर्णय आपल्याला हवे तसे फिरविण्याचे हत्यार गांधीजींनी वापरायला सुरुवात केली. ५५ कोटीं पाकिस्तानला देण्याचा निर्णय अशा उपोषणाच्या हत्यारानेच स्वतःच्या मनाप्रमाणे गांधींनी वळवून घेतला. तसेच फाळणी संदर्भातील त्यांच्या हिन्दू विरोधी भूमिकेने प्रषासनाला त्यानी हतबल केले होते. ह्या सर्व (आणि अशा अनेक) घटनांनी व्यथित होऊन नथुराम गोडसेने विचार केला की महात्मा गांधींचे 'अस्तित्व' हा देशाच्या प्रगतीतील अडसर ठरतो आहे. ते जिवंत आहेत तो पर्यंत स्वतःच्या शरिराचा (उपोषण मार्गाने ते संपविण्याच्या धमकीचा) वापर करीत राहतील. हे शरीर नाहिसे झाले तर तर भारत सरकार पाकिस्तान बाबतीत, भारताच्या प्रगती बाबत 'योग्य' तो निर्णय घेण्यास मोकळे राहिल त्यांच्यावर महात्माजींच्या उपोषणाला झुकून त्यांना पटतील असे निर्णय घेण्याची, घेतलेले फिरविण्याची नामुष्की येणार नाही.
'गांधी हत्या आणि मी' ह्या पुस्तकात श्री. गोपाळ गोडसे ह्यांनी नथुरामांच्या वैचारीक बैठकीबद्दल त्याच्याशी चर्चा करूनच हे विचार मांडले आहेत. हे पुस्तक मी जवळ जवळ १०-१२ वर्षांपूर्वी वाचले आहे. शब्द इथे-तिथे होण्याची शक्यता आहे पण तपशील वरिल प्रमाणेच आहे.
ज्यांनी चर्चा करायला पाहिजे होती, गांधीजींचे विचार परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायला हवा होता त्या काँग्रस पक्षाने कांही प्रामाणिक आणि आत्यंतिक प्रयत्न केले नाहीत. केले असतिल तरी गांधीजींनी आपला हेकटपणा सोडला नाही. शेवटी काँग्रसला नमतं घ्यावं लागलं. त्यांची ही हतबलता पाहता नथुरामाला महात्माजींचे 'शरीर' संपविणे हा एकच मार्ग उरलेला होता. (निदान त्याचा तसा समज होता).
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे देशाचे नेता नव्हते. त्यांच्या आततायी कृतीने देशप्रगतीला बाधा नव्हती. ते स्वत:च्या शरीराचा उपयोग करून सरकारला नमविण्याचा, त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायला लावायचा प्रयत्न करीत नव्हते. त्यांची हत्या करणारे मारेकरी आणि नथुराम गोडसे ह्यांची तुलना योग्य वाटत नाही. नथुराम गोडसेंचे 'विचार' चुकीचे असतील पण कृत्य वाटत नाही. ते देश प्रेमाने प्रेरित होते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे नाही. (निदान तसं कांही अजून सिद्ध झालेलं नाही).
डॉ. नरेंद्र दाभोलकराची हत्या हा देशप्रेमाचा विषय ठरत नाही. मोजक्या राजकारण्यांच्या 'दुकानाचा' ठरू शकतो. म्हणून दोन घटना वेगवेगळ्या आहेत असे मला म्हणायचे आहे.
- Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी
गुरुवार, 02/20/2014 - 11:27
नवीन
अभ्यासाला सलाम :)
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
गुरुवार, 02/20/2014 - 12:53
नवीन
हा ५५ कोटी आणि खून यांच्या संबंधाचा एक भयानक गोंधळ लोकांनी घालून दिला आहे. मला कळतच नाही की यातलं नक्की खरं काय?
मुळात हे वाटणीमधे भारताला पावणे पाचशे कोटी आणि पाकिस्तानला पाऊणशे कोटी ठरवले माऊंटबॅटनबरोबर भारताच्या व पाकिस्तानच्या बाजूच्या शिष्टमंडळांनी (आपल्याबाजूने अर्थातच लोहपुरूष). वीस कोटी आधीच दिलेले, काश्मिरमधे युद्धाला तोंड फुटल्यावर आपण उरलेले पैसे थकवले म्हणून माऊंटबॅटनने हा आंतरराष्ट्रीय कराराचा भंग आहे आणि युनोमधे गेलात तर हे तुमच्या विरोधात जाईल असे सांगितल्यावर गांधींनी त्याला सहमती दर्शवली.
खरी गंमत पुढे आहे, एक बाजू म्हणते की गांधी यासाठी थेट उपोषणालाच बसले (खरंतर हे हास्यास्पद आहे, एका बाजूला पाकिस्तानला युद्धाबाबत समज देताना त्यांनाच पैसे मिळावे म्हणून डायरेक्ट उपोषण कोण करेल? पण काही सांगता येत नाही). तर दुसरी बाजू म्हणते की पंजाब आणि दिल्ली प्रांतातले दंगे थांबावेत म्हणून उपोषण होते आणि गांधी या ५५ कोटींबद्दल या काळातल्या कुठल्याही वक्तव्यात काही बोललेले नाहीत. (इथे मला दंग्यांची माहिती मिळाली नाही अन त्या काळातल्या वक्तव्यांचीही).
बरं त्यावर कहर म्हणजे हे नथुराम साहेब १९४४ पासूनच गांधींवर कावलेले होते. आता ह्याला काय दृष्टांत झाला होता की गांधी पुढे जाऊन तयार होणार्या पाकीस्तानला द्यायचे पैसे थकवू देणार नाहीत? नथुरामने खुनानंतर लिहीलेलं लिखाण उपलब्ध आहे. त्या आधी २-३ वर्षे या माणसाची मानसिकता आणि विचार काय होते हे कुठे कळेल? म्हणजे ३ र्या प्रयत्नात खून यशस्वी होईपर्यंत किती वेगवेगळ्या कारणांमधून हल्ले करण्यात आले ती माहीती मिळू शकेल का?
फाळणीमधील हिंदू विरोधी भूमिका म्हणजे नक्की काय हे कुठे वाचायला मिळेल? कारण मी वाचलेल्या माहीती नुसार जिना यांना सत्ता हवी होती, आणि ती मिळणार नाही हे उमगू लागल्यावर त्यांनी मुस्लिम कार्ड खेळले. गांधी शेवटपर्यंत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते पण आता आजूबाजूचे सगळेच सत्तालोलूप झालेले असल्याने हे कधी घडले नाही. तसेच हे हिंदू राष्ट्र व्हावे अशी काहींची इच्छा होती. आता असे झाले तर करोडो मुस्लिम कुठेतरी घालवावेच लागणार आणि फाळणी तरी होणार किंवा कत्तल तरी. आणि धर्माधिष्ठीत राष्ट्र हे काँग्रेसच्या विचारसरणीच बसत नसल्याने अर्थातच त्याला ही विरोध होता.
माझ्या वाचनातून मला जे कळले त्यानुसार गांधींचा दोन्ही टोकांना विरोध होता. फक्त ते एकच गोष्ट विसरले की लोक देशासाठी फक्त तोवरच लढत होते जोवर पारतंत्र्यावर विजय मिळणे दृष्टीक्षेपात आले नव्हते. एकदा राष्ट्र बनणार हे दिसू लागले की मग स्वातंत्र्यसैनिक गायबले आणि मुंगळे जमायला सुरूवात झाली.
बाकी, नथुरामला खून करायचाच होता तर तो गांधींपेक्षा हैदराबादच्या निजामाचा केला असता तर हजारो हिंदूंवरचे अत्याचार सुद्धा रोखता आले असते असं नाही वाटंत? किंवा अखंड भारत निर्माणासाठी थेट जिनालाच उडवला असता तर? हरीसिंगला आपण मिळून हिंदूराष्ट्र बनवू म्हणून पटवला असता तर? जर-तर खेळायचे तर बरंच खेळता येईल.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 02/20/2014 - 13:28
नवीन
पाकिस्तानला पैसे देण्याबाबत गांधीजी आग्रही होते तर पाकिस्तानने काश्मिरातून आधी लष्कर मागे घ्यावे तसेच जशी जमाठेवीची विभागणी केली तशीच जबाबदार्यांचीही (Assets and Liabilities) विभागणी करावी ह्या बाबत सरकार आग्रही होते. त्यात गांधी़जींनी उपोषणाचे अस्त्र उगारून 'पैसे देऊनच समस्या सोडवा' असा आग्रह धरला. गांधीजींचा अशा मुद्द्यावरून मृत्यू होणे काँग्रसला राजकिय दृष्ट्या परवडणारे नव्हते (गांधीजींना हे पक्के ठाऊक होते) त्यामुळे त्यांनी नमते घेतले/त्यांना घ्यावे लागले.
गांधीजी उठसुट उपोषणाला बसायचे आणि मौन व्रत अंगिकारायचे. लगेच, काँग्रसनेते त्यांची समजूत काढायला धावायचे. त्यामुळे पंजाबातील दंग्यांसदर्भातही एखादे उपोषण असेलच. सांगता येत नाही.
असो. माझी माहिती वाचीव आहे. अभ्यास असा कांही नाही. कांही चुकत असल्यास चर्चेद्वारे मला समजून घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 02/20/2014 - 13:45
नवीन
गांधीजींनी ५५ कोटींसाठी उपोषण केले नव्हते तर उपोषण दिल्लीतील दंगली थांबाव्यात म्हणून होते. हा मुद्दा मी मागे मिपावर मांडला आहे.तसेच या विषयावर अनंतवेळा चर्वितचर्वण झालेही आहे.तरीही एक पिंक टाकायचा मोह मलाही आवरत नाही.
मागे श्री. राजघराणे यांच्या एका चर्चेत इथे लिहिलेला प्रतिसाद जरूर वाचावा अशी विनंती करतो. त्या प्रतिसादात १८ जानेवारी १९४८ च्या इंडिअन एक्सप्रेसची इमेज चिकटवली आहे.आता परत ती इमेज चिकटवायचा प्रयत्न केला पण काही केल्या ते जमले नाही म्हणून जुन्याच प्रतिसादाचा दुवा देत आहे. त्या प्रतिसादात १८ आणि १९ तारखेच्या पेपरचाही दुवा दिला आहे. हे दोन पेपर वाचून कळेलच की ५५ कोटींचा निर्णय आणि गांधीजींनी उपोषण सोडणे यात दोन दिवसांचा फरक आहे. तरीही गांधीजींनी उपोषण ५५ कोटींसाठीच केले असे छातीठोकपणे कसे म्हटले जाते?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 02/20/2014 - 14:17
नवीन
बहुधा तेव्हा ही चर्चा पण झाली होती की ५५ कोटी हे एकमेव कारण नसले तरी उपोषणाच्या अनेक कारणांपैकी तेही एक होते. त्याचे पुरावे देखील तेव्हा देले होते असे वाटते.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 02/21/2014 - 07:22
नवीन
याच विषयावर मी इथे चर्चा सुरू केली होती. अत्यंत रोचक चर्चा आहे.
प्रतिसाद एक से एक. शेवट कोणत्याही कन्क्ल्युजन शिवाय आहे ;)
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 02/21/2014 - 07:43
नवीन
गांधी-नथुराम, काश्मीर, केजरीवाल इत्यादी अनेक विषयांवरील चर्चांना हे वर्णन लागू पडेल :)
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
Tue, 02/25/2014 - 11:19
नवीन
दणदणीत अनुमोदन
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 02/20/2014 - 18:20
नवीन
नथुराम हा खुनी होता आणि माथेफिरू होता. त्यात उजवेडावे करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्या संदर्भात अधिक लिहायची इच्छा नाही. पण प्रकाशरावांना एक माहिती मिळणे या हेतूने प्रश्न आहे:
दाभोलकरांच्या मारेकरी व गांधींचे मारेकरी यात समान सूत्र म्हणजे विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले
नथुराम माथेफिरू-खुनी असण्यास तुम्ही म्हणता ते कारण पूर्ण पटते. पण दाभोलकरांच्या बाबतीत देखील नक्की हेच घडले आहे का इतर काही वेगळीच कारणे देखील असू शकतात? उ.दा. साधना ट्रस्टचे मोक्याचे ठिकाण वगैरे? कुठेतरी असे वाटते की जर हे निव्वळ अंधश्रद्धाविरोधाच्या विरोधातील भडक माथ्याने केलेले काम असते तर त्या व्यक्ती आजतागायत लपून राहू शकल्या नसत्या. अजूनही नक्की काय झाले ते का समजत नाही आणि आरोपी का पकडले जात नाहीत हा मुद्दा आहे. असो.
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
Tue, 02/25/2014 - 11:15
नवीन
नथुरामचे स्टेटमेंट वाचा. अत्यंत विचारीपणाने केलेले कृत्य आहे हे. माथेफिरू अजिबात नाही.
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
Tue, 02/25/2014 - 11:13
नवीन
गांधी आणि दाभोककरांचे मारेकरी यात समान सूत्र?
घाटपांडे, अहो आधी दाभोककरांचे मारेकरी सापडू देत तरी. की तुम्हाला माहितच आहे....तसे असेल आणि तुम्ही पोलिसांना माहीती देत नसाल तर तो गुन्हा ठरू शकतो हां. आधीच बोंबाबोंब कशाला.
बाकी अ.नि.स. च्या बाबतीत आर्थिक अनियमितता (म्हणजे फ्रॉड हो) च्या बातम्याही वाचल्या आहेत. तेव्हा ही हत्या आर्थिक कारणांनी झालेली देखील असू शकते. आणखी सतरा लफडी असतील....आणि हे लगेच चालले तूलना करायला. दाभोलकरांचा पुळका ज्याला यायचा त्याला येऊदे, पण तो एक नंबर हिंदूद्वेष्टा होता.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 02/25/2014 - 14:30
नवीन
कैच्याकै...उगाचच
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 02/20/2014 - 08:09
नवीन
+१ सहमत आहे.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 02/20/2014 - 08:12
नवीन
सदा हरीत विषय !
- Log in or register to post comments
स
सचिन कुलकर्णी
गुरुवार, 02/20/2014 - 08:34
नवीन
नथूरामचे उद्दातीकरण करणारा धागा वाटला शीर्षकावरून. पण आपल्या प्रतिक्रियेवरून तसे नाही हे समजले.
बाकी
यासाठी +१..
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/20/2014 - 09:00
नवीन
नथुराम YZ होता ... कशाला नसत्या उचापती सांगितल्या होत्या ... होतय पार्टीशन तर होऊन दे की ... तुम्हाला थोडीच धग पोहचत होती ? मेले तर पंजाबी अन बंगाली मरत होते ... मराठी त्यात्यही स्पेशली ब्राह्मण लोकांचे काय जळत होते ?
गांधी रहायला हवे होते ... मग मजा आली असती ....
पाकिस्तानले काश्मीर मधे घुसखोर घुसवल्यानंतर गांधीनी काय केले असते ?
निजामाने हैद्राबादेत रझाकारांकरवी अत्याचार सुरु केल्यावर गांधीनी काय केले असते ?
संयुक्त महाराष्ट्राबाबत गांधी काय म्हणाले असते ? बॉम्बे गुजाराथीनु की आमची मुंबई ?
६५ च्या युधात दारुण पराभव पाहिल्यावर गांधीनी काय केले असते ?
किंव्वा मुसलमानांनी मागितला म्हणुन पाकिस्तान दिला मग खलिस्तान्यांनी मागितल्यावर खलिस्तान दिला असता का ? किंव्वा तमिळनाडु दिला असता का ?
७२ च्या वेळी पुर्व पश्चिम पाकिस्तानच्या अंतर्गत कलहात नाक खुपसले असते का ?
आणिबाणि च्या वेळी कोणाची बाजु घेतली असती ?
९१ ला इकॉनॉमी ओपन केली असती का ?
९२ च्या घटनेवर काय रीअॅक्शन असती ?
कसाबला आणि त्याहीपेक्षा अफजल गुरुला गांधीनी दया दाखवली असती का ?
गांधी रहायला पाहिजे होते राव ... खरंच खुप मजा आली असती !!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 02/20/2014 - 09:05
नवीन
यावर सविस्तर लेखन व्हावे... जरी इतिहासात जर-तर ला अर्थ नसला, तरी.. बाके क्लिंटन आणि ऋषिकेश यांच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.
- Log in or register to post comments
स
साती
गुरुवार, 02/20/2014 - 09:53
नवीन
कसाबला फाशी देईपर्यंत बिचार्या गांधींचे वय किती झाले असते?
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 02/21/2014 - 09:43
नवीन
ह्या न्यायाने "आप"ल्या आण्णांना "राज्यगांधी" (आता सरहदी राहिल्या नाहीत हो पुर्वी सारख्या) म्हटले गेले असते काय ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/20/2014 - 09:57
नवीन
सहमत आहे, पण कसाबपर्यंत ते रहायला पाहिजे होते हे म्हणणे म्हणजे अंमळ अतीच आहे ;) =))
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 02/20/2014 - 09:57
नवीन
या विषयावर इतके लिहून व बोलून झाले आहे की यावर पुन्हा काही लिहिण्याइतके या धागयत/प्रतिसादांत नाविन्य नाही.
तरी माझे नाव घेतलेच आहे तर एक पिंक टाकून जातो:
जरी त्यांचा खून केला नसता, तरी इथे मांडलेल्या प्रश्नांपैकी कित्येक घटना घडेपर्यंत गांधीजी असण्याची व/किंवा वयोमानानुसार त्यांचा राजकीय सहभाग असण्याची शक्यता धुसर आहे.
मात्र ते जेव्हा होते तेव्हा यापैकी एका गोष्टींवर त्यांनी आपली मते स्पष्ट केलीच आहेत. तो म्हणजे काश्मिर प्रश्न.
याचे उत्तर गांधीजींनी १९४८मध्येच ४ जानेवरीच्या प्रार्थना सभेत दिले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे:
If Pakistan harasses Kashmir and if Sheikh Abdullah who is the leader of Kashmir asks the Indian Union for help, the latter is bound to send help. Such help therefore was sent to Kashmir. At the same time Pakistan is being requested to get out of Kashmir and to arrive at a settlement with India over the question through bilateral negotiations. If no settlement can be reached in this way then a war is inevitable.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/20/2014 - 10:42
नवीन
काय सांगता ? युध्द अटळ आहे असं गांधी म्हणाले ??
हे उशीरा सुचलेले शहाणपण असावे काय ? जर फाळणीच्याच वेळेला हा अॅटीटयुड दाखवला असता तर गांधी भारताचे लिंकन ठरले असते !!
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Fri, 02/21/2014 - 14:36
नवीन
म्हणजे भाळि खुन होणेच ठरवले होते ? एकुणच नाथूराम द्रुश्टिकोनाला एक खतरनाक वळ्न दिलत राव. अजुन थोडे विस्कटा खरोखर रोचक लिखाण.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 02/25/2014 - 08:21
नवीन
गांधी आणि लिंकन असा लेख लिहायचा विचार कित्येक दिवस मनात आहे ...
दोघांपुढेही गृहयुध्द आणि फाळणी हा पर्याय होता ,
एकाने युध्दाचा पर्याय निवडला आणि देष एकसंध राखला तर दुसर्याने फाळणीचा पर्याय निवडला पण शांतता एकसंध राखली ...
दोघांचाही खुन झाला ...
लिंकन ज्याने युध्दाचा मार्ग स्विकारला होता त्याच्या अनुयायांनी खुन्याच्या जातीच्या लोकांवर अन्याय केल्याचे ऐकिवात नाही आणि गांधी ज्यांनी अहिंसेचा मार्ग स्विकारला होता त्यांच्याच अनुयायांनी त्यांच्या तत्त्वांना तिलांजली दिली .
लिंकन, ज्याने खुप मोठ्ठे युध्द पत्करुन देष एकसंध राखल्या , त्यांच्या देषात अनेक लोकांचि चित्रे नोटवर असतात ह्या उलट गांधी जे देष एकसंध राखु शकले नाहीत त्यांच्या देषात ते एकमेव नोटेवर चमकतात ...
लिंकनच्या खुन्याचे समर्थन करणारा किंव्वा गुलामगिरीचे समर्थन करणारा एकही माणुस पाहण्यात नाही .... मात्र गांधीच्या खुना/वधाचे समर्थन आणि अल्पसंख्यांच्या लांगलुंचनावर टीका करणारे कित्येक लोक पाहण्यात आहेत .
लिंकन गेले पण आता गुलामगिरी ह्यामुद्द्याला घेवुन त्यादेषात अराजक माजेल अशी काही चिन्हे नाहीत ...हिकडे गांधी गेले पण अल्पसंख्यलांगलुंचन ह्यामुद्द्यावर एकडे आजही अराजकता आहे ...
लास्टली गुलामगिरी समर्थक कोण्या माथेफिरुने त्यांच्या देषात राष्ट्रीय चिंन्हांचा अवमान केला तर त्याला कडक शिक्षा होईल ...आणि आम्ही अमरजवान स्मारकाला लाथमारण्यार्याचे काय होते ह्याची वाट पहात आहोत ....
असो .
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »