फंडे
फार पुर्वि (म्हणजे ७० चे दशक} कारखाना व्यवस्थापना मधे २ फंडे होते ..
अर्थात आजच्या बदलत्या कालखंडात ते किति लागु आहेत हे सांगणे कठिण,,
..१.पर्सोनल विभाग फंडा..२..शॉप फ्लोअर फंडा
१.पर्सोनल विभाग फंडा
पुर्वि एच.आर वगैरे असले प्रकार नव्हते..रेस्झुमे हा हि प्रकार नसायाचा..
साध्या कागदावर स्व अक्षारात नांव पत्ता शिक्षण अशी माहित असायची.
काम देताना त्याची व कारखान्याची गरज..ओळखी याचा पण विचार व्हायचा
पहिल्या फंड्याला ३ आर फंडा म्हणायचे..म्हणजे.. Recruit..Retain.. Retire
१..Recruit..म्हणजे ईंजीनिअर , कामगारास भरति करुन घेणे..भरति करताना कार्य कौशल्याची चाचणी शिक्षण कौटुंबिक पार्श्वभुमी व ओळखी याचा विचार व्हायचा..
२...Retainत्यास कारखान्यात टिकवुन घरणे..त्या साठी प्रशिक्षण.कारखान्याचाच एक सदस्य बनवणे..व इतर अडी अदचणीस मदत करणे असायचे..
३..Retire सन्मानाने सेवानिवृत्त करणे...
हंगामी कामगार असले प्रकार नव्हतेच..
........
शॉप फ्लोअर व्यवस्थापन..
शॉप फ्लोअर वर रोज नविन काम नविन डॉईंग्ज..असे प्रकार चालुच असतात..
त्या साठी ३ डी हा फंडा असायचा.. Discuss..Demonstrate.. Delegate
१.. Discuss.. यात संबंधित मामगार व सुपर वाईजर समवेत जॉब, ड्रॉईंग, ऑपेरशन क्रम..आदिच्या वर चर्चा करायचो..जर कुणाला ड्रॉईंग मधे अडचण वा इतर काहि समजले नसेल तर तर समजावुन सांगणे असे प्रकार असायचे.
२..Demonstrate.. म्हणजे काम प्रत्यक्ष करुन घेणे ..यात अनुभवी ईंजिनीअरला कामगार कुठे व नेमकी काय चुक करु शकतो याची कल्पना असते..व ति टाळणे..जॉब पुर्ण होईपर्यंत मशिन वर थांबणे..व काम झाल्यावर ड्रॉईंग बरहुकुम झाले का याचे इन्स्पेक्शन करणे..व एखादा काम कामगार व सुपर वाईजर च्या काम लक्षात आले कि त्यांच्यावर ते सोपवणे.
३..Delegate ..काम सोपवणे व किति वेळात काम व्हायला हवे याची कल्पना देणे..
ह्या पद्धतिने काम शिकवणारा ईंजीनिअर हा कामगाराना आवडत असतो..
कितिहि नाठाळ व ट~र्या कामगार असला तरी तो तुमच्या शी नमुनच वागतो असा अनुभव होता....
अर्थात आता जग बदलले आहे..हे फंडे जुने असले तरी जुनाट नक्किच नाहित..
अर्थात आता कामाशी संबंध नसल्याने हे कितपत उपयोगी असावेत? या बद्दल सांगणे अवघड..
🗣 चर्चा
(10)
म
मुक्त विहारि
Wed, 02/19/2014 - 08:40
नवीन
अजुन लिहा.
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Wed, 02/19/2014 - 09:41
नवीन
आवडलेत हो!येवु द्यात नविन फंडे.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 02/19/2014 - 11:47
नवीन
यावरून आमच्या क्षेत्रातला १-२-३ फंडा आठवला:
म्हणजे एकाला घ्या, दोन माणसांचा पगार द्या आणि त्याच्याकडून तीन माणसांचं काम करुन घ्या...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/19/2014 - 14:42
नवीन
ऐटीत पण हेच चालते
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 02/19/2014 - 12:14
नवीन
खरं आहे बाकी.
- Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक
Wed, 02/19/2014 - 17:37
नवीन
एक नोकरी
दोन बायका
तीन खोल्यांचे घर
चार चाकांची गाडी
पाच आकडी पगार
..
असाही काहीसा फंडा ९०च्या दशकात होता.. चूकले असेल तर दुरुस्त करा काका.. ;)
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 02/19/2014 - 18:15
नवीन
२ बायका..छे रे
- Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक
Wed, 02/19/2014 - 19:25
नवीन
मी मला झेपणारा आकडा सांगितला काका, तुम्हाला कमी वाटत असेल तर वाढवा.. ;)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 02/20/2014 - 03:36
नवीन
१ घऱवाली..
१ बाहर वाली
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 02/19/2014 - 19:21
नवीन
एक नोकरी
दोन बायका
तीन खोल्यांचे घर
चार चाकांची गाडी
पाच आकडी पगार
हा क्रम उलटा केला तर
एक आकडी पगार
दोन चाकाची सायकल
तीन खोल्यांचे घर
चार बायका
पाच नोकर्या
फंडे जाउ देत जगणं अवघड होईल
- Log in or register to post comments