Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २

म
मेघनाद
Tue, 02/18/2014 - 16:02
🗣 27 प्रतिसाद

Book traversal links for फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २

  • ‹ फावल्या वेळेतली फोटोग्राफी….
  • Up
  • फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग ३ ›
फावल्या वेळेतली फोटोग्राफी…भाग १. =================================================================== पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद बघून अजून काही छायाचित्र प्रकाशित करायच धाडस करतोय. पण खरच मिपा वर आपली कला सादर करा आणि चकटफू त्याच मुल्यांकन करून घ्या एकदम मस्त प्रकार. खाली दिलेली छायाचित्रे पण माइक्रोमॅक्स मोबाईलनेच टिपलेली आहेत, ह्या छायाचित्रांमध्ये ऑटो फोकस आणि कॅमेराची क्षमता जाणवते आहे. सार्वक मिपा सदस्यांनी एकदा हा भाग देखील डोळ्याखालून घालावा हि विनंती. मुखवटा मास्क माझ्या ऑफीस मध्ये एका सहकारी मुलीच्या टेबलवर हा मुखवटा लावलेला होता, बघता क्षणीच क्लिक करायचा मोह झाला. फुल फ्लॉवर देवाच्या चरणी अर्पण होण्यासाठी तय्यार एक फुल. ब्याग Bag सहजच कल्पना सुचली क्लिक करायची हि ब्याग बघून. काचेवरील ठसे ग्लास टेक्स्चर खिडकीची काच. कीबोर्ड कीबोर्ड किबोर्डचा क्लोझ अप. आकाश आकाश आकाश जास्त सुंदर आहे कि इमारती? वाटाणे हिरवे वाटाणे हिरवे रसरशीत वाटाणे. मोकळे आकाश आकाश संधीप्रकाश... एच डी आर HDR माझ्या ऑफिस मधून दिसणाऱ्या दृश्याचा "एच डी आर" प्रतीचे छायाचित्र. पर्णकुटी HUT खिडकाळीच्या राम मंदिरातील पर्णकुटी.. एसटी बस bus चालत्या इंद्रायणी एक्स्प्रेस मधून सकाळी ८ च्या सुमारास काढलेला लोणावळा परिसरातील एसटी बस चा लोभस फोटो. कसा वाटला? तळटीप: आकार बदलावा लागल्यामुळे काही छायाचित्रांचा मूळ आकार बदलला आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14375 views

🗣 चर्चा (27)
स
सचिन कुलकर्णी Tue, 02/18/2014 - 16:17 नवीन
फोटो आवडले पण खिडकाळीचे 'राम' मंदिर म्हणजे कल्याण फाट्यावरचे का?
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Tue, 02/18/2014 - 18:47 नवीन
हो अगदी अचूक बोललात, माझीच चूक झालीये. सुधारणा करतो. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 02/19/2014 - 11:24 नवीन
सही ! क्लास आहेत फोटु :)
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 02/19/2014 - 11:26 नवीन
सही ! क्लास आहेत फोटु :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 02/18/2014 - 16:27 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/18/2014 - 17:13 नवीन
"काचेवरील ठसे" हा प्रयोग फारच आवडला.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 02/18/2014 - 17:49 नवीन
ठसे आणि शेवटचा आवडला.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Tue, 02/18/2014 - 18:50 नवीन
@निवेदिता-ताई , श्रीरंग_जोशी , यशोधराजी : खुप खुप धन्यवाद
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 02/18/2014 - 19:04 नवीन
वाह.. अरे वा! पहिल्या भागाच्या तुलनेत खरोखरच ह्या प्रतिमा सुंदर आल्या आहेत. मला कळफलकाची प्रतिमा फार आवडली. तुम्ही या प्रतिमेवर इन-मोबाइल थोडेसे प्रोसेसिंग केले आहे. ते छान जमले आहे. किंचित शार्पनेस वाढवायला हवा मधल्या G च्या आजूबाजूचा. शेवटचा एसटी बस सुपर्ब. याला पॅनिंग प्रकारचे छायाचित्रण म्हणतात. लवकर जमत नाही असे छायाचित्र काढायला. अगदी डीएस्एल्आर असला तरी. त्यामुळे भ्रमणध्वनीसंचानेही चांगले साधलेले मीटरिंग पाहून छान वाटले. थोडेसे लॉन्ग एक्स्पोजर आहे तरीही हायलाइट्समधील भागही ब्लो-आउट झालेला नाही. मस्तच. एचडीआर, मोकळे आकाश ह्या सामान्य वाटल्या. मुखवटाही ठीक. डोळ्यांच्या खाचांवर चटकन लक्ष जात नाही कारण त्यावरील ब्लो-आउट झालेला पांढरा भाग. आजूबाजूच्या काळसर पार्श्वभूमीच्या तुलनेत तो जास्तच ठसतोय. ह्या छायाचित्रात एचडीआर कदाचित थोडी जान आणू शकेन. रच्याकने हा पेनिन्सुला आयटी पार्क, परळ आहे का?
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Tue, 02/18/2014 - 19:20 नवीन
अरे वाह खूप आनंद झाला प्रतिक्रिया वाचून… परळ मधील पेनिन्सुला सेंटर आहे ते…जो भाग छायाचित्रात दिसतोय ते क्लब हाउस आहे अशोका टावरचे. बाजूलाच माझ ऑफिस आहे "मिड-डे".
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 02/18/2014 - 23:35 नवीन
सर्वच फोटू छान
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/18/2014 - 23:46 नवीन
बस आणि एचडीआर खूप आवडले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/19/2014 - 02:06 नवीन
बोलती बंद केली आहे . योग्य आणि सुंदर फोटोग्राफी . कल्पना ,कोन सर्वोत्तम जे फोटोग्राफरकडे असावे लागते . हा फोटो मी का काढला आणि असाच का काढला हे फोटो काढणाऱ्याला फोटोतून सांगायचे असते ते पोहोचले . या नेहमीच्याच वस्तुंकडे असे इथे पाहा हे तो सांगतो . (बैगची चेन आणि काचेवरचे ठसे ). बाकीचे काम त्या यंत्राचे आहे आणि ते वेगवेगळे येते . त्या अनुषंगाने येणारे दोष हे गौण आणि दुर्लक्ष करायचे असतात . बसचा फोटो काढतांना कैमरा थोडासा रेल्वेगाडीच्या धावण्याच्या दिशेने धरला आहे त्यामुळे झाडे वेगाने पुढे सरकत आहेत पण बस रे च्याच वेगाने जात असल्याने स्थिर आली आहे .आपोआपच "पैनिंग " साधले आहे . इमारती आणि आकाश छान . जवळचे फोटो काढतांना सर्वच चांगले कैमरेही फसतात अथवा एखादा मोठा उजेडाचा धब्बा येतो . कैमरा बहुतेक ८ एमपि आहे .फोटो किती केबि /एमपि चा साठवला जातो ?
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Wed, 02/19/2014 - 18:31 नवीन
मनापासून दिलेली दाद वाचून फार छान वाटल…. "पैनिंग " बाबतीत तुमचं म्हणण काहीस बरोब्बर आहे, होय कॅमेरा ८ एमपी चाच आहे. फोटोची साधारण साईझ ३. ते ३. एमबी पर्यंत जाते.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/19/2014 - 03:12 नवीन
वाहव्वा!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 02/19/2014 - 11:09 नवीन
आम्हाला त्यातलं काही कळत नाही. पण बस, कीबोर्ड आणि ठसे आवडले.
  • Log in or register to post comments
स
सुखी Wed, 02/19/2014 - 13:30 नवीन
पॅनिंग छान जमले आहे :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/19/2014 - 13:45 नवीन
आणि ते एचडीआर काय आहे ?
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Wed, 02/19/2014 - 18:41 नवीन
एच डी आर म्हणजे "हाई डायनामिक रेंज". ह्या प्रकारात साधारण ३ फोटो घेतले जातात आणि मग ते सर्व फोटोस कंबाइन करून अंतिम छायाचित्र तय्यार केल जाते, त्या छायाचित्रात प्रखर उजेडापासून ते अगदी मंद उजेडापर्यंतच्या प्रकाश लहरी टिपल्या जातात (हे सर्व मी माझ्या आकलन क्षमतेनुसार सांगितलं आहे.) तज्ञ अजून खोलात सविस्तर सांगू शकतील. तोपर्यंत हा दुआ बघावा: HDR
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/19/2014 - 21:51 नवीन
दुआ वाचला . हे एक फोनमध्ये अगोदरच ठेवलेले कैमरा अॅप आहे . आकाशाच्या पाश्र्वभूमीवर लाल रंगाची वस्तु(जास्वंदिचे फूल) अथवा कौसानी वगैरे ठिकाणाहून हिमालयातील सकाळची सोनेरी शिखरे यांचे फोटो काढतांना सोनेरी ,निळा ,पांढरा भाग घेता येईल .
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 02/19/2014 - 15:52 नवीन
पेनिन्सुला! तरीच वाटत होतं हे दृश्य पाहिल्यासारखं का वाटतंय... फोटो एकदम मस्त! बस आणि कीबोर्ड विशेष आवडले. स्वॅप्स यांची प्रतिक्रिया पण आवडली.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Wed, 02/19/2014 - 19:04 नवीन
एवढे छान छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे अतिशय धन्यवाद……… *DANCE* :dance:
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता गुरुवार, 02/20/2014 - 02:29 नवीन
बॅगचे छायाचित्र अतिशय आवडले... वेगवेगळी टेक्स्चर्स सुरेख टिपली आहेत. एक वेगळे कॉम्पोझिशन. की बोर्ड आणि ठ्श्यांच्या क्ल्पना आवडल्या.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद गुरुवार, 02/20/2014 - 18:39 नवीन
खूप खूप आभार...अगदी अचानक टिपलेला फोटो आहे तो. वाटलही नव्हत एवढा छान दिसेल.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/20/2014 - 04:53 नवीन
तुमच्या कंपनीत हाऊसकिपींगवाले किबोर्डवरची धुळ साफ करत नाहीत का? :P
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/20/2014 - 04:54 नवीन
बशीचा फोटू लै आवडला.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद गुरुवार, 02/20/2014 - 18:37 नवीन
@किसनजी: नेमका हाच कीबोर्ड सोडला मेल्याने......हा हा हा कप बशीच्या पुढे एक सुंदर फुल पण आहे हो.....बाकी तुमची प्रतिसाद देण्याची पद्धत आवडली बॉ.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा