Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?

P
psajid
गुरुवार, 02/13/2014 - 07:27
🗣 67 प्रतिसाद
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत. या गोष्टीने मनास फार दुःख होतंय. आज सगळीकडे पाश्चात दिवसांचे स्तोम माजले आहे, जिकडे पाहावे तिकडे - हा डे - तो डे ह्या इंग्रजी डे ने आपल्या भिंतीवरील दिनदर्शिका अगदी भरून गेली आहे. आता त्या लोकांनी आपण आपल्या जन्मदात्या आईवर वर्षातल्या कोणत्या एका दिवशी ममता करायची, बापाला कोणत्या दिवशी आनंदात ठेवायचे हे ठरवायचे का काय ? त्या लोकांनी प्रेम करण्याचा सुध्दा एक दिवस ठरवून टाकला आहे म्हणे ! ज्याला आज सगळीकडे "व्हेलेण्टाईन डे " म्हणतात. जो उद्याच आहे. इंग्रजी डे साजरा करणाऱ्या या लोकांना आपल्या देशातील महापुरुषांच्या जन्मतिथी माहित नसेल, आपल्या घरातील आई - वडिलांची आपल्यासाठी आपल्या आजारपणामध्ये जागलेली कित्येक रात्री मधील एक रात्र माहित नसेल मात्र हा दिवस मात्र त्यांच्या आठवणीमध्ये असेल. आयुष्यातील किती मोठी शोकांतिका ! आपण आपल्यामध्ये असणारा माणुसकीचा झरा जो पीडितांसाठी, गरिबांसाठी, आपुलकीच्या माणसासाठी वाहतोय हेही विसरत चाललो आहे का ?. ज्याच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो तो "व्हेलेण्टाईन" हा तिसऱ्या शतकातील रोम मधील ख्रिश्चन संत होता, जो सैनिकांच्या लग्नावर बंदी असताना त्या देशातील सैनिकांचे चोरून लग्न लावून द्यायचा, आणि हे जेंव्हा त्या राजाला कळले तेव्हा त्याने त्याला बंदी बनवून १४ फेब्रुवारी २६९ ला मारून टाकले. पण त्या अगोदर त्याला राजाकडून धर्मांतर केलेस तर तुला मुक्त करतो असे सांगण्यात आले होते. मात्र त्याने धर्मांतरास नकार दिला. त्याने रोम च्या राजाची आंधळी मुलगी ला त्याच्या दैवी उपचारांनी ठीक केले होतं. मरण्यापूर्वी त्याने त्या मुलीला एक पत्र लिहले आणि त्याखाली त्याने "From your Valentine" असं लिहलं होतं. त्याने धर्मासाठी आपला जीव दिला. प्रेमासाठी त्याने जीव दिला असा साधा उल्लेखही नाही. आपल्या भारतीय संस्कृती मध्येही संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले प्राण दिल्याचा उल्लेख आहे. मात्र आपल्या आठवणीमध्ये त्यांचा बलिदान दिवस नाही. हे खरं तर भारतीय इतिहासाचे दुर्दैव म्हणावं लागेल. १४ फेब्रुवारी लाच (१९२२ साली) असणारी गायनातील स्वर्गीय आनंद पं.भीमसेनजी जोशी यांची जन्मतिथी कुणाच्या आठवणीमध्ये आहे ? आणि याच दिवसी १९३१ ला आपल्या देशातील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फासी दिली. तुम्ही कोणता दिवस तुमचा आनंद म्हणून साजरा करायचा हे तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार नाही मात्र तो दिवस साजरा करताना आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा. २५ - ५० रुपये गुलाबाच्या फुलावर खर्च करण्यापेक्षा गरीब दुबळ्या अनाथ मुलांना कपडे किंवा अन्न वाटून किंवा दुष्काळात होरपळनाऱ्या, पाण्यासाठी दाहीदिशा टाहो फोडणाऱ्या लोकांसाठी, मुक्या जनावरासाठी पाणी देवून आपल्यामध्ये असणारे सामाजिक भान जपणे गरजेचे आहे, असं मला वाटतं. ज्यांचा आपल्या देशाशी संबंध आहे, आपल्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, जे आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृती च्या उन्नती साठी अहोरात्र झटताहेत, लढतायेत, मरतायत किंवा त्या सीमेवर लढणाऱ्या शूर सैनिकांचे जे थंडी, बर्फवृष्टी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावतात ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षितता अनुभवू शकतो, त्यांचे विस्मरण हे इंग्रजी डे साजरे करताना होता कामा नये. एवढंच हे इंग्रजी डे साजरं करताना माझं कळकळीचं आणि नम्र सांगणं आहे. - साजीद पठाण

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13868 views

🗣 चर्चा (67)
ट
टिवटिव गुरुवार, 02/13/2014 - 07:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
मराठीप्रेमी गुरुवार, 02/13/2014 - 08:35 नवीन
आपण पाश्चात्यांचे अनुकरण करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत. असे अनुकरण करणे अजिबात योग्य नाही. ही सगळी थेरे बंद झालीच पाहिजेत. आपल्या थोर्थोर संस्कॄतीचा पाईक होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. भले आपल्या संस्कॄतीत एके काळी स्त्रियांना नवर्‍याच्या चितेवर जाळत का असेनात, समाजातील एका मोठ्या घटकाला कायम दुय्यम सामाजिक स्थान का असेना, आमची संस्कॄती थोरच! बाकी तुमची भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याची तारीख चुकली. ती २३ मार्च १९३१ आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानव गुरुवार, 02/13/2014 - 09:14 नवीन
आहे. चला हवा येऊ द्या....
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 02/13/2014 - 08:47 नवीन
वॅलेंटाईन डे साजरा करणारांना स्वातंत्र्ययोध्यांविषयी आदरभाव नसतो, हा निष्कर्ष कसा काय काढला? तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागले तर, वर्षाचे सर्व ३६५ दिवस सुतकी चेहेर्‍याने काढावे लागतील! आणि हे पाश्चिमात्यांचे (पाश्चात्यांचे नव्हे) अंधानुकरण फक्त वॅलेंटाईन डेलाच कसे दिसते? आम्ही त्यांची वेषभुषा स्वीकारली, त्यांची भाषा ही कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारली, त्यांची कालगणना व्यवहारात स्वीकारली, हे सगळेही सोडून द्यायचे काय? (ड्राय डे सोडून कुठल्याही डेला विरोध नसणारा!) सुनील
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 02/13/2014 - 08:54 नवीन
एकांगी लेख. जे जे चांगल असेल ते ते घ्याव.
आणि याच दिवसी १९३१ ला आपल्या देशातील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फासी दिली.
बाकी या बद्दल काय बोलावे? जरा गुगलवरुन शोध घेतला की कळेल. उगाच कुणी तरी पेटवतो आणि आपण लगेच मशाल असल्याचा अविर्भावात पेटायला लागतो.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 02/13/2014 - 09:19 नवीन
अहो राजे, कोणी कोणासाठी काम करत नाही. प्रत्येकजण फक्त स्वतःसाठी जगत आहे. त्यातून वेळ मिळालाच तर दुसर्‍याचा विचार करु शकतो. विचार करायला वेळ मिळाला तरच पुढची पायरी. ज्या थोर लोकांची नावे तुम्ही घेतलीत तसे लोक फक्त बोटावर मोजण्यापुरतेच असतात.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 02/13/2014 - 09:41 नवीन
आपल्याकडेही वर्षात एकच दिवस बैलपोळा , एकच दिवस गुरुपौर्णिमा , एकच दिवस भाऊबीज , एकच दिवस शस्त्रपूजा ,एकच दिवस तिळगूळ घ्या गोड बोला असे बरेच काही एकेक दिवसच असते. हे सर्व प्रतीकात्मक दिवस आहेत. रोज सर्वानी सर्वांवर प्रेम केले तरी ते 24x7x365सतत दाखवत राहणे शक्य नसते.. पण ते व्यक्त करणे, दाखवणे यासाठी एक सांकेतिक दिवस ठरला असेल तर त्यात काय दुरित? प्रथा पाळण्यात सर्वाना / बहुतांशाना आनंद मिळत असल्यास ती पाळावी की. प्रथेची केवळ उगमदिशा पाहून तिला नावे ठेवू नयेत. सती प्रथा norway त असती तरी ती वाईटच. आणि जे जे अन्य कुठून आलेय ते वाईटच असा पॅरेनोईड विचार करु नये.
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री गुरुवार, 02/13/2014 - 09:58 नवीन
पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?>>> पाश्च्यात देशांमध्ये सगळ्या वाईटच गोष्टी आहेत का? आपली संस्कृती खूप चांगली आहे का? चांगल्या वाईट प्रथा सगळी कडेच आहेत. पण आपण फक्त वाईट गोष्टीं विषयीच बोलतो नेहमीच कि पाश्च्यात संस्कृती किती वाईट आहे. इथे पायी चालणार्यांना आधी प्राधान्य दिले जाते. स्त्रियांना योग्य मान दिला जातो .कोणी कोणाच्या गोष्टींमध्ये अवाजवी लक्ष घालत नाही.अजून बर्याच चांगल्या गोष्टी आहेत.पण जर नावेच ठेवायची असतील तर मग बोलायलाच नको.
  • Log in or register to post comments
P
psajid गुरुवार, 02/13/2014 - 10:00 नवीन
बाकी तुमची भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याची तारीख चुकली. ती २३ मार्च १९३१ आहे. बरोबर आहे तुमचे ! या तारखेला फासी झाली नाही तर फेब. ला फाशीची शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले असे म्हणायचे होते. समजून घ्या !
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 02/13/2014 - 11:25 नवीन
यांना ७ ऑक्टोबर १९३० रोजी फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि २३ मार्च १९३१ ला ती अमलात आणली गेली. १४ फेबृवारी १९३१ रोजी पं. मदन मोहन मालवीय यांनी आयर्विन यांना सदर देशभक्तांची फाशी माफ करण्यासाठी दयेचा अर्ज सादर केला जो अर्थातच फेटाळला गेला.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 02/13/2014 - 12:26 नवीन
म्हणजे १४ फेब्रुअरीला काहीतरी झालं ना.... काय झालं ते जाऊ द्या, काही तरी झालं ते महत्वाचं!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/13/2014 - 10:20 नवीन
बाकी लेखावर मत देण्याआधी तुम्ही या विषयातील तज्ञ दिसताय त्यामुळे बरेच दिवस मनात असलेले थोडे शंका निरसन करावे ही विनंती: आधी तुमचे पहिलेच विधान पाहू
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत.
१. आपली संस्कृती म्हणजे कोणाची? २. आपली संस्कृती म्हणजे फक्त हिंदू संस्कृती धरावी का? उत्तर हो असल्यास तसे का? ३. आपली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती म्हणायचे असल्यास १९४७ मध्ये भारत नावाचा सध्याचा देश अस्तित्त्वात आला. ६० वर्षात अशी कोणती संस्कृती उभी राहिली आहे जी जगात सर्वात मोठी ठरावी? ४. आपली संस्कृती म्हणजे मराठी संस्कृती म्हणाचीये का? मग बैसाखी किंवा ओणम साजरा केल्यावरही तुम्ही असे लेख लिहिणार का? ५. आपल्या संस्कृतीला सर्वात मोठे कशाच्या निकषावर म्हणता आहात? लोकसंख्येच्या असेल तर चीनी संस्कृती सर्वात मोठी ठरेल. या पाचावर आधी बोलु मग बाकीचे प्रश्न मांडतो
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 02/13/2014 - 10:23 नवीन
जाऊ द्या हो ! किती छळता त्यांना ? नया हय वह !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/13/2014 - 10:47 नवीन
अहो म्हणून तर एकच वाक्य घेतले ;)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 02/13/2014 - 11:01 नवीन
आता काय करायचे? :(
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 02/13/2014 - 13:00 नवीन
पाश्चात्यांनी चालू केलेल्या विकिपिडीयामधे पौर्वात्य भारतीयांनी लिहीलेल्या माहितीप्रमाणे पं. भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारीस झाला आहे, १४ फेब्रुवारीस नाही. (टाईम्स ऑफ इंडीयात पण ४ च तारीख आहे, १४ नाही). बाकी चालूंदेत.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 02/13/2014 - 13:25 नवीन
ऊदर को बायको बहुत आदर से बात करना पडता है. घर मे भोत सारा काम करना पडता है. लफडा ़ किया तो जी. पी.एल. मिलता है.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 02/14/2014 - 03:58 नवीन
आरे वह क्या बोल रहा है? तुम क्या बोल रहा है?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 02/13/2014 - 14:14 नवीन
सदस्यकाळ 7 months 1 week
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 04:48 नवीन
आम्हाला हिंदी भाषेचा उपयोग कधी कधी खटकतो :(
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 02/13/2014 - 18:51 नवीन
व्हॉट ्स अ‍ ॅप वर आलेला मेसेज इथे चिकटवलेला पाहून जरा हसू आलं
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 03:26 नवीन
ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, जे आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृती च्या उन्नती साठी अहोरात्र झटताहेत, लढतायेत, मरतायत किंवा त्या सीमेवर लढणाऱ्या शूर सैनिकांचे जे थंडी, बर्फवृष्टी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावतात ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षितता अनुभवू शकतो, संभाजी महाराजांना पं.भीमसेनजी जोशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २५ - ५० रुपये गुलाबाच्या फुलावर खर्च न करता गरीब सामाजिक भान जपणार्‍यांना सर्व हयात आणि स्वर्गवासी सजीवांना इश्वराला सर्वांनाच
इंग्रजी डे म्हणून नव्हे इश्वर निर्मित कालचक्रातील एक दिवस म्हणून इतर म्हणतात म्हणून नव्हे मला तसे करण्यास खरे तर केव्हाही आवडते म्हणून आदर व्यक्त करण्या साठी कोणतेही फूल न तोडता हे गुलाब छायाचित्र केवळ आदर व्यक्त करण्या साठी लावत आहे. आणि साजीद भाऊंनाही आदराचा प्रणाम . Image removed.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 02/14/2014 - 03:38 नवीन
निदान पाकळीतरी दिसुंदेत की राव! ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 04:20 नवीन
Image removed. The pink rose was exhibited during 'Flower Show 2012' which was held at the Acharya Jagadish Chandra Bose Indian Botanic Garden, Howrah, from 28 to 30 January, 2012. सौजन्य http://commons.wikimedia.org/
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 02/14/2014 - 04:46 नवीन
हो ना. काहीतरी वेगळेच दिसतेय.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 04:59 नवीन
आम्ही कधी कुणाला गुलाब तसा दिला नव्हता आणि केवळ आदरच व्यक्त करावयाचा आहे त्यामुळे छायाचित्र लावताना बारकाईने बाकी विचार केला नाही गुलाबाचेच छायाचित्र आहे. डोळ्या समोर गुलाबच येऊ यावा म्हणून अजून एक छायाचित्रही दिले आहे. प्रतिसादा करिता धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 02/14/2014 - 04:51 नवीन
कसली संस्कृती अन कसले काय? आपला देश म्हणजे एक मोठे चाक आहे ज्यावर कोणाचेच नियंत्रण नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 02/14/2014 - 07:21 नवीन
हो हो.. कं. ज. ना. !!! :-)
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 02/14/2014 - 08:11 नवीन
कं. ज. ना.
आता हे काय आणि??
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Fri, 02/14/2014 - 11:40 नवीन
कंपनी जबाबदार नाही :)
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 02/14/2014 - 12:04 नवीन
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 07:41 नवीन
अँटी व्हॅलेंटाईन डे Singles Awareness DayRead more at: http://www.firstpost.com/world/anti-valentines-day-isnt-about-singles-saying-no-to-love-1389817.html?utm_source=ref_article
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 11:14 नवीन
अहो आश्चर्यम कॅथॉलीक चर्चचे एक वेब साईट सुद्धा साजीदभाऊं प्रमाणेच मत पण त्यांच्या भूमीकेतून मांडते की !
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 02/14/2014 - 07:54 नवीन
Valentine हा कोण कुठला , आणि त्याच्या नावाने दिवस का साजरा करावा हा प्रश्न मलाही (आता) पडतो , म्हणून मी तो दिवस साजरा करीत नाही (पैसे ही वाचतात ना)..पण कॉलेजच्या दिवसांत असा प्रश्न पडत नसे. अहो एखादा मुलगा एखाद्या मुलीला पसंत करत असतो (किंवा त्याउलट) , ते त्याला व्यक्त करायचे असते. आता या दिवशी तो एखादे भेटकार्ड, फूल देवून सहज ते व्यक्त करु शकतो इतकेच. मुलीलाही उगाच उठसूट अचानकपणे कोणत्याही दिवशी कुणीतरी प्रपोज करत राहिले तर वैताग येईल ना..म्हणजे या दिवशी प्रेम व्यक्त करण्याची, प्रपोज करायची सोय होते. आता अशीच काही सोय आपल्या संस्कृतीत उपलब्ध असती तर लोकांनी नसतेही लक्ष दिले वॅलेंटाईन कडे...संक्रात च्या तिळगूळ ची कल्पना काहीशी जवळ जाणारी आहे पण Exacly same नाही. १४ जाने. ला तिळगूळाच्या निमित्ताने ओळख वाढवावी आणि १४ फेब ला प्रपोज करावे, म्हणजे दोन्ही संस्कृती साज-या करण होईल .. बाकी गुलाब काही आपण आयात करत नाही त्यामुळे गुलाबावर खर्च केलेले पैसे आपल्याच देशातच फिरतात..सिग्नलवर गुलाब विकणारे रिलायन्स वा तत्सम मोठ्या देशी वा विदेशी कंपनीचे कर्मचारी नक्कीच नसतील , गरीब वगैरे म्हणु शकतो आपण त्यांना...
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 02/14/2014 - 10:18 नवीन
१४ जाने. ला तिळगूळाच्या निमित्ताने ओळख वाढवावी आणि १४ फेब ला प्रपोज करावे
हो... अगदी खरे... असे करता करता बरोबर ९ महीन्यांनी १४ नोव्हेबंर'ला बालदिन साजरा करायचा...हाकानाका ;)
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 02/14/2014 - 08:06 नवीन
तुम्हाला इतिहासाला मास्तर कोन होते वो,मला जरा त्यांचा चरणस्पर्श करायचे आहेत्,म्हणुन विचारल....!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 02/14/2014 - 09:04 नवीन
>>>पाश्च्यातांचे हे काय आहे नेमकं? पण >>>तुम्ही कोणता दिवस तुमचा आनंद म्हणून साजरा करायचा हे तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार नाही मात्र तो दिवस साजरा करताना आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा. ह्याबाबत विरोध नसावा कुणाचाच!
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 02/14/2014 - 09:31 नवीन
पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?
भरपुर...!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 02/14/2014 - 09:48 नवीन
पाश्चतांचे अनुकरण कितपत योग्य ?>>>>>>>> जेवढ आवडेल तेव्हढ .
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 02/14/2014 - 09:53 नवीन
पाश्चात्य लोक आपले अनुकरण करतात का? भारताबाहेरील मिपाकरांचा काय अनुभव या बाबतीत?
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Fri, 02/14/2014 - 10:34 नवीन
हो .......करतात की...आमच्या शहरामध्ये एक जर्मन कुटुंब पुण्यातील आयुर्वेदिक वैद्याचे उपचार घेतात.पण याला अनुकरण म्हणता येईल का? बाकी माझी एक जर्मन मैत्रीण साडी नेसते आणि हिंदी पण बोलते .( माझ्या पेक्षा छान बोलते हिंदी ) :)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 10:51 नवीन
एका परदेशी स्टोअर मध्ये एक जर्मन कुटूंब मुलाबाळांसोबत खरेदीस आल होत. मला शॉप असिस्टंट (चूकीने) समजून मुलांकरता स्वीट्स विचारत होत आणि मी त्या दुकानाच्या शेल्फवरची सोनपापडी त्यांना आनंदाने कचकून खपवली.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 10:46 नवीन
युनायटेड किंगडमातील लोकांना सध्या भारतीय पा.कृ.तीतील करी म्हणजे रस्सा भाज्या आवडतात असे ऐकुन आहे. एरवी पिझ्झे आणि नुडल आवडीने खाऊन सुद्धा इतालवी आणि चिन देशांपासून सावधानता बाळगणारा आणि भारतावरच प्रेम करणारा-
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 02/14/2014 - 10:53 नवीन
माझ्या UK स्थित एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार तिथे Indian Restaurants ची एकूण मिळकत ही तिथल्या English वा British Restaurants च्या एकूण मिळकती पेक्षा जास्त आहे कारण अनेक British लोक सुद्दा Indian Restaurants मध्ये खाणे तसेच पार्टी करणे अधिक पसंत करतात.
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Fri, 02/14/2014 - 11:03 नवीन
जर्मन लोकांना भारतीय जेवणाचं,पेहरावाच आणि बॉलिवूडच खूपच आकर्षण आहे.आमचे घरमालक फ्रेड काका यांना जिंजर टी खूप आवडतो.ते आले की मी चहा करतेच.अजून त्यांना बाकी कशाची टेस्ट दिली नाहीये. ;) :D एकदा त्यांना भारतीय खानावळीत ( Hotel ) मध्ये नेले होते सगळ जेवण झाल्यावर गुलाबजाम मागवले तर अगदी चाटून पुसून साफ केला बोल आणि आम्ही दोघे चाटच पडलो. :D ऑस्ट्रिया मध्ये एक शा. खा.ची चाहती आहे. तिची documentary आहे U Tube वर मस्त आहे .मला शा.खा. आवडत नाही पण ती क्लिप आवडली. :)
  • Log in or register to post comments
क
कल्पक Tue, 02/18/2014 - 07:37 नवीन
पाश्चात्य लोक चांगल्या भारतीय गोष्टी, सवयी, मुल्ये आत्मसात करताना दिसतात. बरेच अमेरिकन लोक नियमित योगा आणि ध्यान करताना आढळले. भारतीय हॉटेलांमध्ये अमेरिकन लोक आवडीने मसालेदार पदार्थ खाताना दिसले. भारतीय पदार्थ, चहा घरी कसा करायचा असे विचारताना दिसले. माझ्या एका अमेरिकन सहकाऱ्याने ख्रिसमसला सगळ्या कुटुंबाला गाजर हलवा तयार करून खाऊ घातला आणि सगळ्यांना चक्क आवडला. आणखी एक निरीक्षण म्हणजे अमेरिकेत ३१ डिसेंबरला लोक कोणताही गोंधळ गोंगाट करत नाहीत, रस्त्यावर दारू पिउन तमाशा करणारे तरुण तरुणी दिसत नाहीत, इतरांना त्रास न होऊ देता, कायदे न मोडता, घरे सजवून शांतपणे नवीन वर्षाचे स्वागत करतात. कुठेही पोलिस बंदोबस्त लावावा लागत नाहीत. दुर्दैवाने भारतात हे प्रकार खूप दिसतात.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/18/2014 - 08:37 नवीन
तेथे "रस्ता आपल्या बापाचा" असा विचार करणारे बरेच कमी आहेत
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/14/2014 - 11:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/14/2014 - 16:31 नवीन
दिल्लीच्या राजकारणात जनलोकपाल बिलावरून आणि तेलंगाणावरून रक्त आटवल जात असताना; भारताच्या काही भागात काहींनी आजचा व्हेलेंटाईन डे प्रेमीयुगूलांवर टमाटे फेक करून साजरा केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे भारताच्या दुसर्‍या टोकाला प्रेमीयुगूलांनी व्हेलेंटाईन डे रक्तदान करून साजरा केल्याचे वृत्त आहे. आम्ही या चर्चा धाग्यावर गुलाब फुल लावून समस्त सजीवसृष्टी बद्दल आदर व्यक्त केला. तुम्ही आज काय काय केले ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/18/2014 - 08:03 नवीन
दुसरीकडे भारताच्या दुसर्‍या टोकाला प्रेमीयुगूलांनी व्हेलेंटाईन डे रक्तदान करून साजरा केल्याचे वृत्त आहे. यांचे अभिनंदन करायला हवे ! सामाजिक जाणिव,भान ठेवुन अश्या प्रकारे दिवस साजरा केल्यास उत्तम. हे सर्व होत असताना एक दुसरं चित्र सुद्धा पहायला मिळाले... व्हॅलेंटाईन्स डेला फुलं आणि भेटवस्तूंपेक्षा कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची अधिक विक्री मागच्या वर्षी याच दिवशी स्नॅपडील या साईट वरुन दीड लाख कंडोम विकले गेले होते ! त्यामुळे हा इंपोर्टेड सण नक्की काय वाटचाल करतोय याची कल्पना येइल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा