डे चे फंडे
भारतातील जनतेने पाश्चात्य संस्कृतीतल्या नेमक्या चुकीच्या गोष्टीच उचलल्यात, आत्मसात केल्यात, अशी एक नेहमी ऐकू येणारी ओरड आहे. ती खरीही आहे काही अंशी. आपल्याकडे खरंच तिथल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी सोयीस्करपणे उचलून त्यांचं स्वरूप खूप वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे आणि एकंदरीतच त्या ’संस्कृती’ कडे बघण्याचा भारतातल्या बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हा काहीसा वक्रच असतो.
पेहराव, खाण्या-पिण्याच्या सवयी, आपल्या संस्कृतीशी विसंगत पण मनाला भावणारे असे अनेक आदर्श, सण, त्यांच्या साजरीकरणाच्या पद्धती या आणि अशा अनेक गोष्टी आपण आनंदाने, नाईलाजाने, किंवा मग केवळ समाजाशी आपली नाळ तुटू नये या भावनेने, आत्मसात केलेल्या आहेत. यात एक मोठ्या प्रमाणावर आपलीशी झालेली गोष्ट म्हणजे निरनिराळे ‘डे’ज. जन्मदिवसाच्या झालेल्या बर्थ-‘डे’, पासून ते वादग्रस्त आणि वैचारिक काथ्याकूटांचे कारक ठरलेले फ़्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन्स डे असे अनेक डे’ज भारतभर साजरे होतात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक गट यांना विरोध करतात, तरुणाई त्या विरोधाला न जुमानता ते साजरे करते, त्यांचा आनंद घेते, आणि मागील पिढी, वडीलधारी पिढी याबाबात फक्त मौन पाळणं पसंत करते.
२०१४ चा व्हॅलेंटाईन्स डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणा-या या ’डे’ विषयी बोलताना अनेक जण ’हा निव्वळ मूर्खपणा आहे’ असं म्हणतात. प्रेमाचं प्रदर्शन करण्याचा, त्या भावनेची विटंबना करण्याचा हा एक बहाणा आहे असं म्हटलं जातं. आज देशात प्रेमातून होणा-या हत्या, हल्ले यांची संख्या वाढती आहे. बलात्कारासारखे भयानक गुन्हे सर्रास घडतायत. असं असताना, व्हॅलेंटाईन डे ला विरोध होणं स्वाभाविक आहे. आणि त्याला कारणं आहेत. जिथे प्रकटीकरण अपेक्षित असतं तिथे प्रदर्शन करायची आपल्या समाजाची एक जुनी खोड आहे. व्हॅलेंटाईन डे च्या नावाखालीही प्रेमभावनेचा जो विपर्यास केला जातो, कुठलीही लज्जा न जुमानता जे प्रेमाचं सार्वजनिक प्रदर्शन केलं जातं ते नक्कीच चुकीचं असतं.
एक मोठा गट असं म्हणणा-यांचा असतो की प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कशाला हवा?... ते रोज आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त झालं पाहिजे. आणि हाच नियम मग मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे सगळ्यांना लागतो.. ते सगळे ’डे’ सुद्धा चुकीचे किंवा अनावश्यक आहेत असं मत पुढे येतं. ते काही अंशी खरं जरी असलं तरी ते दोन संस्कृतीतला दुवा होऊ शकत नाही.
काल माझ्या एका सहकर्मचा-यांशी सहज याविषयी बोलत असताना त्यांचाही विचार वर मांडल्याप्रमाणेच दिसला; की केवळ ’हा’ दिवसच कशाला... इत्यादी. मला मात्र याबद्दल असं वाटतं की, जसं गणपती समोर आपण रोजच हात जोडतो, तरीही गणेश चतुर्थी चं महत्व वेगळं असतं, विठठलाचं नाव नेहमी मुखात असलं तरीही आषाढी - कार्तिकी ची ओढ आगळी असते, तसंच काहीसं या ’डे’ज बद्दल आहे. प्रेम ही भावना रोज कृतीतून व्यक्त झाली तरी एक दिवस ती भावना नेहमीपेक्षा जास्त दृष्य, आणि श्रुत, स्वरुपात व्यक्त झाली तर बिघडलं कुठे?
मी म्हटलंही त्यांना तसं. अर्थात, व्हॅलेंटाईन किंवा इतर कुठल्याही डे च्या नावाखाली जे गैरप्रकार आणि जी बेदरकार थेरं चालतात, त्याचं मुळीच समर्थन केलं जाऊ नये, किंबहुना त्याला विरोध व्हायलाच हवा. पाश्चात्य संस्कृतीतला जो चुकीचा भाग घेतलाय त्याला विरोध करणं ही एक गोष्ट झाली; पण त्या संस्कृतीला आपल्या परंपरेनुसार वळण देऊन जर त्यातील पटतील ते सण, दिवस, रुचतील तसे साजरे केले, तर हरकत का असावी! जसा व्हॅलेंटाईन्स डे साजरा होतो तशीच गुढीपाडव्याच्या नववर्ष शोभा यात्रेलाही गर्दी जमायला हवी. आणि काही अंशी ती जमतेही. तेंव्हा, जितकी गरज जुन्या पिढीने विचारांचं उदात्तीकरण करण्याची आहे, तितकीच जबाबदारी नवीन पिढीने आपल्या संस्कृतीच्या गाभ्याला धक्का न लागू देण्याची आहे. या दोन्ही गोष्टी जर झाल्या तरच तो दोन संस्कृतींमधला, दोन दृष्टिकोनांमधला दुवा ठरेल आणि मग एक दिवस ’संस्कृती डे’ साजरा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

🗣 चर्चा
(14)
त
तुषार काळभोर
Mon, 02/10/2014 - 08:28
नवीन
माझाही व्हॅलेंटाईन डेला तीव्र विरोध नाही. मला शब्द नाही सुचत, पण तुमचे शब्द अगदी चपखल आहेत.
माझा विरोध प्रकटीकरणाला नाही, प्रदर्शनाला आहे.
(अर्थात, इतरांना विरोध करणारा मी कोण?)
माझ्यापुरता मी फक्त "माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे", असं म्हणून करू शकतो. व्हॅलेंटाईन डे ला फिरायला जाणं, (कँडललाईट) डिनर करणं, गिफ्ट्स्/ग्रीटींग कार्ड्/चोकलेट्स देणं हे प्रथा म्हणून करणं मला नाही पटत.
म्हणजे या गोष्टी केल्याच पाहिजेत, या अट्टाहासाला विरोध आहे.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Mon, 02/10/2014 - 08:50
नवीन
हे 'डेज्'चे खूळ गेल्या २० वर्षातले आहे.केकवाले,ग्रीटिंग कार्डवाले,फूलवाले,कुरियरवाले,ऑनलाईन वाणी(फ्लिप्कार्ट वगैरे)व खालोखाल मिडियावाले ह्या डेजचा पुरेपूर फायदा घेतात् व धंदा करतात.व 'डेज्'ना विरोध करणार्यांना 'जुनाट विचारसरणीचे' म्हणण्यात येते.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Mon, 02/10/2014 - 09:24
नवीन
डे'ज/ सण यांना सरसकट विरोध होउ नये कारण कोणाला कशात आनंद मिळेल ते आपण सान्गु शकत नाही.. आपल्या आनंदाचा इतरांना त्रास होणार नाही याचा सर्वांनी विचार केल्यास सर्वांच्याच हिताचे आहे..
लेखातील विचार खूपच संतुलित आणि योग्य वाटले!!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 02/10/2014 - 09:39
नवीन
छान मांडलय.. संपूर्ण सहमत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 02/10/2014 - 09:34
नवीन
हलवेंटाईन डे सारखे डे काय आणि अन्य सण काय, तत्त्वतः फरक काहीच नाही. फक्त डे ला धार्मिक अधिष्ठान भारतीय संदर्भात नाही म्हणून धर्ममार्तंडांची अंमळ जळजळ होते.
ते सोडून बाकी लोकांना अपील न होण्याचे कारणही साधे अन पटण्यासारखे आहे - "आमच्या वेळी ही थेरं नव्हती, आत्ताच कुठून आलंय काय की." समजा कामदेव अथवा अजून कुणा देवाच्या नावाने हा डे साजरा केला असता तर छुपून गेला असता, पण धर्माची मखलाशी नाही म्हणून जनतेला पचत नाही. तस्मात हा प्रकार रुजवायचा असेल तर कामदेवाशी जोडा, चार ढोंगी साधूंना प्रवचने द्यायला लावा, गेल्या ५००० वर्षांपासून हा प्रकार कसा चालू आहे इ.इ. बंबार्डमेंट करा अन मग बघा मज्जा.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Mon, 02/10/2014 - 11:09
नवीन
संस्कृती ही आता मार्केटिंगची बाब झाली आहे; त्यामुळे असं होणारच. त्याचा 'आपली' आणि 'त्यांची' संस्कृती याच्याशी काही संबंध नाही. अगदी पारंपरिक सणदेखील आता ज्या पद्धतीने साजरे होतात त्यावरुन हे अगदी स्पष्ट लक्षात येईल.
शिवाय 'आपली' आणि 'त्यांची संस्कृती मिळून सध्याच्या युगाची एक नवी संस्कृती तयार होते आहे - इतकंच. लोकांना खायला-प्यायला; खरेदी करायला काहीएक निमित्त हवं असतं; आणि बाजाराला ते विकायला.
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 02/10/2014 - 11:26
नवीन
ड्राय डेज सोडले तर इतर कुठल्याही डेजला आपला विरोध नै बॉ! ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/11/2014 - 09:32
नवीन
आमचा तर त्यांनाही नाही,
आदल्या दिवशीच सगळी तयारी करायची.
दारू विकायला आणि परवाना द्यायचा आणि मग हे ड्रायडे वगैरे पाळायचे.
मी तर म्हणतो...
सगळे डे रोज साजरे करा.
अगदी मदरडे,फादरडे पासून ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत.
जबाबदारी टाळता यायला लागली की माणुस दिवस साजरे करायला लागतो आणि जन्मोजन्मीचे पुण्य एका दिवसांत कसे मिळेल याच्या मागे लागतो.
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Mon, 02/10/2014 - 21:59
नवीन
दोन्ही बाजू अगदी योग्य शब्दांत मांडल्या आहेत. लेखन आवडले.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/11/2014 - 09:33
नवीन
छान...
(सगळे डे रोज पाळणारा) मुवि
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 02/11/2014 - 10:24
नवीन
चांगले लिहिले आहे वेल्लाभट. आवडले.
- Log in or register to post comments
श
शिद
Tue, 02/11/2014 - 10:34
नवीन
आम्हाला तर फक्त सॅटर'डे व सन'डे चे तेवढे कौतुक...अगदी मन'डे पासुनच. ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/11/2014 - 11:12
नवीन
+ १
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 02/12/2014 - 02:44
नवीन
@ सगळे : धन्यवाद !
- Log in or register to post comments