बेताल भाषणबाजी!
http://abpmajha.abplive.in/incoming/2014/02/09/article259627.ece/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-#.UveTI2d3vcu
पवार घराण्यात जन्माला येणे ही एकमेव पात्रता असणार्या सुप्रियाताईसाहेब सुळे यांनी असा सल्ला दिला की आंदोलन करताना सामान्य लोकांच्या एस टीची जाळपोळ न करता नेत्यांच्या गाड्या जाळा! वा!
एस टी ची नासधूस करू नका हे म्हणणे ठीक आहे. पण हे नेत्यांच्या गाड्या जाळण्याबद्दलच्या काड्या कशाला सारताय?
एक जबाबदार वारसदार आपलं खासदार असले टाळ्याखेचक डायलाग मारते हे कितपत उचित आहे?
अर्थात पिताश्रींचे योग्य प्रशिक्षण असले तर उद्या बाईसाहेब सफाईदार कोलांटी उडी मारुन त्या जळणाच्या उपदेशाला वेगळेच वळण देतील हेही शक्य आहे.
नेत्यांच्या गाड्यांभोवती मोठी सुरक्षा असते. ती कशी भेदायची ह्यावर काही टिपा द्यायला हव्या होत्या. स्वतःची वा आपल्या "जाणत्या" तीर्थरुपांची गाडी आपणहून आंदोलकांना उपलब्ध करुन द्यायला हवी होती.
उद्या सत्ताभ्रष्ट झाल्यावर आपण काय प्रकारची आंदोलने करणार आहोत ह्याची चुणूक राष्ट्रवादींने दाखवली आहे की काय अशी शंका येते.
आंदोलक असे करण्यात यशस्वी ठरले तर ताईसाहेबांचे बंधू योग्य तो फवारा मारून अग्निशमन करतील काय? असो.
एकंदरीत असली भाषणबाजी करुन माकडाच्या हातात कोलित दिले असे व्हायला नको.
🗣 चर्चा
(8)
प
प्यारे१
Sun, 02/09/2014 - 17:34
नवीन
मला वाटलं राव्हल्याबद्दल काही असेल. अपेक्षाभंगलो. :-/
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 02/09/2014 - 20:36
नवीन
ओय्य ... राव्हल्या कोन ?
राहुलजी गांधीजी म्हणायचे , आम्हा युवकांचे नेते आहेत ते ...आमचे प्रधानमंत्री !!
राजनीती नही काजनीती !
| RTI © | Women Empowerment ® | Lokpal ™ |
.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sun, 02/09/2014 - 20:59
नवीन
युथ पावर(र) आणि ढेमोक्रसी(र) टायपायला विसरल्या बद्दल णिषेध.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 02/09/2014 - 21:27
नवीन
आणखी थोडी वाट पहा...आमच्या प्रियंका मॅडम उतरतीलच मैदानात. तिकडे त्या यु.पी. गाजवु लागल्या म्हणजे इथल्या मराठी मुलींचं कौतुक आपोआपच बंद होईल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 02/10/2014 - 04:33
नवीन
काल राजसाहेबांनी मात्र सरकारी माहिती वाचून दाखवून दिले की टोलमध्ये किती गोलमाल आह ती .
इतकी लाख वाहने विआइपिंची आणि न देणाऱ्यांची कशी काय जाऊ शकतील ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 02/12/2014 - 04:52
नवीन
नेते लोकांना कोणी शिरेसली घेत नाही हे त्यांना पण माहिती असतंय.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Wed, 02/12/2014 - 05:20
नवीन
;)
- Log in or register to post comments
न
नित्य नुतन
Wed, 02/12/2014 - 10:27
नवीन
पण ताई बोलतायत त्यात तथ्य आहे
- Log in or register to post comments