बेगानी शादी में
http://www.loksatta.com/sampadkiya-news/indian-mentalty-of-celebrating-unwanted-things-shemful-thing-as-an-indian-365449/
लोकसत्ता पुरवणीत आलेला गिरीश कुबेर ह्यांचा एक अप्रतिम लेख. ह्यावर घरी (म्हणजे इथे मिपा वर) चर्चा हा उद्देशच ह्या धाग्याचा...
थोडक्यात काय तर सुनिता विल्यम्स, सत्य नादेला, इंद्रा नुई, विक्रम पंडित इत्यादी भारतीय मूळ असलेल्यांचे (निदान नावावरून तरी)पाश्चात्य जगातले (त्यातही अमेरिकेतले ) व्यावसायिक यश ह्यावर भारतातल्या लोकांनी जल्लोष करण्यात आपली गुलामी मानसिकता दिसते ...तस्मात ते करणे योग्य नव्हे
ह्यात असे म्हटले आहे कि एखाद्या जर्मन/फ्रेंच मूळ असणार्या माणसाने अमेरिकेत असे यश मिळवले तर जर्मनीत (किंवा त्याच्या माय(?)देशात)जल्लोष होणार नही...आणि म्हणून आपणही व्यक्त होतांना असे भान ठेवावे..
ह्यातून निर्माण होणारे काही मुद्दे
- आपला आनंद कसा व्यक्त करावा हे कुणी अन्य देशात किंवा अन्य संस्कृतीत बघून ठरवावे का?
- आपल्या यशामुळे आपल्या आधीच्या वस्तीत (मुद्दाम हा शब्द) आनंद साजरा होतोय हे बघून, त्यांनाच फटकारून काढण्याची उर्मी होत असेल तर ते कितपत बरोबर ?
- ह्याला अपवाद आहेत उदाहरणार्थ जयंत नारळीकरांच्या यशाचे भारतात उचित कौतुक मान सन्मान वगैरे झाले, त्यांनी ते अत्यंत योग्य प्रकारे स्वीकारून त्याचे रेसिप्रोकेशन केले असे दिसते..त्याची वर्णने वाचतांना हे गुलामी वगैरे वाटत नही ... असे का ?
🗣 चर्चा
(4)
इ
इरसाल
Sat, 02/08/2014 - 07:43
नवीन
हे म्हंजे अस झालं " शेत मे तुरी अवर भट भटणी को मारी"
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 02/08/2014 - 08:40
नवीन
आणि खरं देखील.
याच आय.टी. सेक्टरमधे गुगलचं पिल्लु जे मोटोरोला मोबिलिटी लिनोव्होने मटकावलं... पण हा ड्रॅगनचा विजय आहे असा कुठलाच अभिनिवेष शांघाय-बिजींगवरुन ऐकायला आला नाहि. असं म्हणतात कि मोटोरोला मोबिलिटी मोस्टली भारतीय चालवतात. जुना सी.ई.ओ. संजय झा, त्यानेच गुगलच्या गळ्यात घंटा बांधली. पण आज ति कंपनी विकत घेतली एका चायनीज कंपनीने... आणि आपले लोक मायक्रोसॉफ्टच्या एका पदावर एक भारतीय नाव चढलं म्हणुन पेढे वाटताहेत. अवघड आहे राव.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sat, 02/08/2014 - 11:50
नवीन
भारतात असलेल्या शिक्षण पद्धतीमुळे आणि विशेषत: शासकीय पद्धतीमुळे, तुम्ही वर दिलेल्या यादीतील मंडळी भारतातच राहिली असती तर ती आहेत त्याच्या बरोबरीच्या पदावर पोहोचली असती असे कोणालाही वाटत नाही. भारतात कर्तुत्ववान व्यक्तीला न्याय मिळत नाही अशी सल जवळ जवळ सगळ्या शिक्षितांच्या मनात असते आणि तीचा पुरावा मिळाल्याचा आनंद, आपल्याच सारखाच एक भारतीय विदेशात उच्च पदावर पोहोचल्याच्या बातमीने मिळतो.
मनात असलेली ' हम किसीसे कम नही' ही भावना सुद्धा या विदेशात यशस्वी झालेल्या भारतीयांच्या उदाहरणाने बळावते.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sat, 02/08/2014 - 12:11
नवीन
मला तरी ह्यात गुलामगिरी वगैरे वाटत नाही. अनेकांना ह्या यशस्वी भारतियांबद्दल आदर वाटून त्यातून प्रेरणा मिळते आणि अगदी तेवढे नसले तरी, कुवतीनुसार, यश संपादण्यास मानसिक आणि शारीरिक बळ लाभते.
भारतिय व्यक्तीच का, मला कोणाच्याही अथक परिश्रमाने मिळविलेल्या यशाने भारलेपण येते आणि माझ्या क्षेत्रात मी अजून काय करु शकतो ह्यावर विचारमंथन होते.
कोणाही चांगल्या आणि यशस्वी व्यक्तीबद्दल आदर वाटणं ही सकारात्मक भावना आहे. सकारात्मक भावनेतून, विचारांमधून सकारात्मक कृतीशिलता अंगी बाणविली जाते. असा माझा विश्वास आहे.
- Log in or register to post comments