पाकिस्तान, दहशतवाद आणी सलोखा
काल नेहेमीप्रमाणेच एक घटना घडली, ज्याने बऱ्याच जणांना हुरूप मिळाला, तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना टीकेची संधी, मिडियाला चघळण्यासाठी बातमी, विश्लेषकांना विश्लेषणाची संधी, पाकिस्तानला पुन्हा जगापुढे भारताविरोधात बोटं मोडण्याची संधी, (अहो या सगळ्यात आमच्या तेंडूलकर भाऊंचा विषय राहिला बाजूला.. असो इंडीया फर्स्ट) तर आज शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांच्या भारतातील सहभागावर निषेध व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला. माझ्या मते, शिवसेनेची ही कृती म्हणजे एक अपरिहार्य पाऊल आहे. पाकिस्तानमधील निष्पाप नागरिक अजिबात निषिद्ध नाहीत, पण जर कलाकार,खेळाडू,उद्योजक भारतात येऊन त्यांना हव्या त्या गोष्टी साध्य करीत असतील तर त्यांनी अशा गोष्टींसाठी परवानगी मागण्याआधी स्वतःहून दहशतवादाचा निषेध करावा आणी पाकिस्तानामुळे भारताला झालेल्या वेदनांसाठी एक दूत म्हणून माफी मागावी. केवळ पाकिस्तानातीलच नव्हे तर प्रत्येक देशातील नागरिकांनी त्यांच्या देशातून इतर देशात जाताना अशा प्रकारे दुसऱ्या देशाची माफी मागावी, यासाठी नियमच करावा. काही पाश्चात्य देशात जर कायमचे नागरिकत्व हवे असेल तर त्यावेळी सदर देशाचे संपुर्ण राष्ट्रगीत म्हणून दाखवणे अनिवार्य आहे त्याच धर्तीवर जर एखाद्या देशात प्रवेश हवा असेल तर अशाच प्रकारे एखादी अट घालण्यात यावी.
“मी अमुकअमुक देशाचा नागरिक असून मला आपल्या देशात अ/ब/क कारणासाठी प्रवेश हवा आहे, तत्पूर्वी मी माझ्या देशाचा जबाबदार सामाजिक घटक/दूत म्हणून माझ्या देशातील समाजकंटकांकडून आपल्या देशावर झालेले दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले किंवा इतर कोणत्याही प्रकारे झालेल्या नुकसानीबद्दल दिलगीर असून मी याचा मानवतेच्या दृष्टिकोनातून निषेध करतो/करते आणी त्याबद्दल आपली माफी मागतो/मागते, यापुढे माझ्या देशातील समाजकंटकांकडून माझ्या,आपल्या किंवा इतर कोणत्याही देशाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी आग्रही असेन आणी अशा प्रकारांना व्यक्तिशः देखील खतपाणी घालणार नाही”अशा प्रकारची अट मान्य केल्याशिवाय व्हीजा मंजूरच करू नये. यामुळे दोन प्रकारे फायदा होईल,
- ज्यांना आपल्या देशाबद्दल तिरस्कार/मत्सर आहे त्यांना आपल्या देशात येण्यापासून अटकाव होऊ शकेल.
- मानवतेच्या पुरस्कर्त्यांना देशात सहज प्रवेश मिळेल आणी तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांचा आक्षेप दूर होईल. (कारण मानवतेच्या पुरस्कर्त्यांना अशी अट मान्य करायला हरकत नसावी)
🗣 चर्चा
(19)
अ
अर्धवटराव
Wed, 02/05/2014 - 06:35
नवीन
इतक्यात तर असले फटाके वाजले नाहित मिपावर....
- Log in or register to post comments
य
यशोधन वाळिंबे
Wed, 02/05/2014 - 06:42
नवीन
बातमी
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 02/05/2014 - 07:15
नवीन
मग ठीक आहे.
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Sun, 02/23/2014 - 20:08
नवीन
डॉन पेपर ची बातमी
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 02/05/2014 - 06:40
नवीन
भावना पोहोचल्या पण अशी अट टाकून नक्की काय उपयोग होईल हे समजणार नाही.मी काही वर्षे अमेरिकेत होतो.त्यावेळी अमेरिकेच्या व्हिसा फॉर्ममध्ये पुढील प्रश्न होता:"Do you intend to enter the United States in order to carry out terrorist or subversive activities?" ज्यांना अशाप्रकारच्या कृत्यांसाठी अमेरिकेत प्रवेश मिळवायचा होता ते या प्रश्नाचे उत्तर "हो" असे थोडीच देणार आहेत. बाकी काही नाही पण या प्रश्नावरून आम्ही मित्रमंडळी बरेच हसलो होतो हे नक्कीच आठवते.
- Log in or register to post comments
य
यशोधन वाळिंबे
Wed, 02/05/2014 - 06:47
नवीन
याच उत्तर नाही असं दिलं आणी नंतर कृतीतून शब्द फिरवला की त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकत असावा.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 02/05/2014 - 07:19
नवीन
यावरून एक गोष्ट आठवली. कसाबविरूध्द आरोपपत्र ठेवले होते त्यात लोकांना ठार मारणे, देशाविरूध्द युध्द पुकारणे इत्यादी आरोपांबरोबरच एक आरोप होता---प्लॅटफॉर्म तिकिट न घेता छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये प्रवेश करणे!! (त्यावेळी पेपरमध्ये हे वाचल्याचे आठवते). बाकी आरोप इतके गंभीर होते आणि त्याविषयीचे पुरावे सज्जड असताना हा पुचाट आरोप ठेऊन नक्की काय मिळाले याची कल्पना नाही. त्याच धर्तीवर अशा तत्वांनी इतर गंभीर गुन्हे केले असतील तर त्या गुन्ह्यांसाठी शिक्षा द्यायला इतर कडक कायदे असतानाही "भारतात प्रवेश करताना दिलेले आश्वासन मोडले" याचे शेपूट लावून काही साध्य होईल का?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 02/05/2014 - 07:48
नवीन
नियम, कायदे राबवताना जर एक पद्धत रूढ केली तर कुठल्याही परिस्थितीत तिचं पालन करणं क्रमप्राप्त असावं. तिकीट न काढता प्लॅटफॉर्मवर जाणं हा गुन्हा नोंदवणं हे पोलीसांचं काम. त्या गुन्ह्याची तिव्रता ठरवणं न्यायालयाचं काम.
शिवाय, कायद्याच्या इतीहासात गुन्हेगाराने कायद्याला अनंत मार्गाने गुंगारा दिल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे एखादी लहानशी फट देखील गुन्हेगाराला मिळु नये हा उद्देश असावा.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 02/05/2014 - 07:55
नवीन
बरोबर आहे. त्याच उद्देशाने तसे केले होते. पण कसाब जर इतर सगळ्या गुन्ह्यांमधून निर्दोष सुटला असता तर निदान त्याला २०० रूपये दंड तरी बसावा असा उद्देश असावा.
- Log in or register to post comments
य
यशोधन वाळिंबे
Wed, 02/05/2014 - 08:14
नवीन
@ अर्धवटराव, सहमत..
साध्या फाशीलाही मरेपर्यंत फाशी सारखी खोलात जाऊन स्पष्ट नावं देणे यातूनच सुचले असावे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 02/05/2014 - 11:10
नवीन
>>>साध्या फाशीलाही
साध्या म्हणण्याचं प्रयोजन? मरेपर्यंत समजा नसली तरी फाशी एकदा ट्राय करुन बघितल्यास समजावं. (अॅट योर ओन रिस्क)
साधी फाशी नि संगीत फाशी असं काही नसावं बहुतेक.
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Wed, 02/05/2014 - 15:37
नवीन
छान प्रस्ताव आहे
साधक बाधक चर्चा होण्यास हरकत नसावी.
स्वगत - कु. वाळिंबे यास सदाशिव पेठेतील 'संदीप वासलेकर ' इन मेकिंग म्हणावे काय ?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प
गुरुवार, 02/06/2014 - 07:58
नवीन
या साठी एक बिरबलाची कथा आठवली,त्यात एका व्यक्तीला अकबर राजाने एका गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावली होती,पण बिरबलाच्या मते तो माणुस निरपराध होता,पण राजाज्ञा तर पाळायची होती तेव्हा बिरबलाने एक युक्ति केली,की त्या माणसाला जसे फासावर चढवले तेव्हा त्याला लगेच सोडवले आणि त्याचे प्राण वाचवले,म्हण्जेच अपराध्याला शिक्षा झाली म्हणजेच फाशी दिली तरी त्या व्यक्तीचे प्राण हि वाचले,त्यामुळे तेव्हा पासुन मरेपर्यन्त फाशी हा शब्द रुढ झाला असावा.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 02/05/2014 - 14:32
नवीन
कम्युनिस्ट रशिया आणि शीत युद्ध अस्तित्वात होते तो पर्यंत म्हणजे साधारण १९९१ अगदी ९३-९४ पर्यंत किमान... असाच काहीसा प्रश्न "तुम्ही कम्युनिस्ट पार्टीशी संलग्न आहात का" या संदर्भात असायचा. अमेरीकेत अनेक भारतीय लेफ्टीस्ट अर्थात कम्युनिस्ट आजही राहतात, तेच इतर देशातील कम्युनिस्ट स्थलांतरीतांचे पण असेल.
- Log in or register to post comments
ब
बन्डु
Wed, 02/05/2014 - 07:53
नवीन
चित्रपटातील एक सीन आठ्वतो का? एका पत्रकाराचा क॓मेरा चोरिला जातो आणी झालेल्या चोरिची कंप्लेंट करतो.
यावर यशवंत त्या चोराला बोलावतो बीर्याणी + कोल्ड्रिऩ्क वै. देतो आणी प्रेमाने विचारतो कि कॅमेरा घेतला(चोरला) असेल तर देवून टाक. तो नाही नाही म्हणतो. त्याच्या कानाखाली आवाज काढ्ल्यावर तो कॅमेरा परत करतो.
असो, हे लोक ईतके सरळ सोट आहेत हे ग्रुहितकच चुकिचे आहे. ह्यांच्य पुर्वजां ही भारता वर हल्ले केले आणी ते ही तेच करत आहेत.
- Log in or register to post comments
य
यशोधन वाळिंबे
Wed, 02/05/2014 - 08:19
नवीन
हे आपल्याकडच्या मानवतावाद्यांना (?) कोण सांगणार? त्यामुळे सगळ्यांना समजतील/रुचतील/पचतील असेच उपाय करावे लागणार..
रोज असह्य वेदना सहन करते, आमची आई..
तरी आम्ही म्हणतो, जय लोकशाही..
- Log in or register to post comments
P
psajid
Wed, 02/05/2014 - 07:54
नवीन
मलाही वाटतं असावं असं एखादं हमीपत्र ज्यामार्फत बाहेर देशातील लोक आपल्या देशातील जनतेला किंवा आपल्या लोकशाहीला कोणत्याही प्रकारे बाधा न पोहोचवण्याची हमी देतील.
- Log in or register to post comments
य
यशोधन वाळिंबे
Wed, 02/05/2014 - 08:27
नवीन
असा नियमच असावा, हमी दया अन्यथा सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाही.. हमी देऊनही जर कारस्थानं केली तर पुरावा आयताच हातात मिळतो.. आणी हमी न देता केली तर सर्वात आधी अवैधरित्या घुसखोरीचे कलम टाकता येईल कदाचित..
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 02/06/2014 - 05:31
नवीन
स्वागतार्ह पाऊलः भारताचा विसा १८० देशांतील नागरीकांना इथे पोचल्यावर अर्थात ऑन अरायवल मिळू शकेल
- Log in or register to post comments