Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

तुम्ही आय लव्ह यू च उत्तर काय द्याल?

स
सुवर्णमयी
Fri, 01/31/2014 - 00:38
🗣 126 प्रतिसाद
"व्हॅलेंटाईन्स डे" यंदा पौर्णिमेला येतो आहे (बहुधा.. ) म्हणजे अगदी दुर्मिळ असा योग! प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. (पडते म्हणजे तोंडघाशी पडते असा अर्थ घेऊ नये..) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 42290 views

🗣 चर्चा (126)
अ
अनन्त अवधुत Fri, 01/31/2014 - 01:37 नवीन
म्हणजे देवीच्या देवळात प्रपोज केले तर उत्तर होकारार्थी येईल असे वाटते का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 01/31/2014 - 05:12 नवीन
म्याच्च्या पैल्याच बॉलवर शिक्सर \m/ =))
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/31/2014 - 01:42 नवीन
प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. खरयं... प्रेम ठरवुन करताच येत नाही. ते फक्त होत. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. अरेच्च्या फक्त ३ वेळाच ! मला वाटल हा आकडा जास्त असावा ! ;) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हॅहॅहॅ... अजुन तरी आमच्या आयुष्यात असा गोल्डनमयी दिवस उजाडला नाहीये... परंतु... मला गाण्याची लयं हौस असल्याने एक दुवा देतो :- I Love You...I Love You...I Love You - Meri Neendon Mein Tu
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 01/31/2014 - 08:00 नवीन
एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते
टायपो असावा. मी एका दिवसात तीनदा प्रेमात पडतो कधिकधी
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 02/01/2014 - 04:14 नवीन
विमे, शिकवणी घेता का हो आम्हा पामरांची =)) ;-)
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 02/02/2014 - 14:42 नवीन
नीट वाच रे. मी दिवसातून ३ दा प्रेमात पडतो. माझ्या प्रेमात कुणी पडते असे कुणी म्हटले आहे ??
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 02/06/2014 - 18:15 नवीन
पुन्हा हलकेच घ्या रे/ग ...;) तो : आय लव्ह यु स्नेहांकिता : ॥ प्रेमेषु बोलुनि ॥ ॥ तंगड्याषु तोडानि ॥ ॥ थोबाडुषु धुवुनि ॥ ;) खालील प्रतिसादामधील ज्योक ओळखाणार्‍यास माझ्या तर्फे काटाकिर्र मध्ये मिसळ !! ती : आय लव्ह यु बिरूटे सर : अं ! ती : सॉरी : माझ प्रेम आहे तुमच्यावर बिरुटे सर : ...अं !! ती : क्षमस्व ..माझ केवळ तुमच्यावर प्रेम आहे बिरुटे सर : गुड ! आत कसं ती : अं ती : आय लव्ह यु खटपट्या : चांगलय ती: आय लव्ह यु तस्थास्तु : :) ;) ;)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता गुरुवार, 02/06/2014 - 20:55 नवीन
एक राहीलं ती : आय लव यु.. सुहास.. ( वाश्या) : आमचे इथे प्रत्येकाला प्रपोज करुन मिळेल... आय लव यु म्हणण्याचा वेगळा खर्च पडेल !! ती. : बेशुद्ध
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 02/06/2014 - 21:38 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 02/07/2014 - 02:18 नवीन
हा हा हा हा ..लय भारी ग !! हे घ्या ...आणि हलके घ्या ... तो : आय लव्ह यु आनन्दिता : आमच्या इथे काकवांच्या कानाला चावुन मिळेल, भोंगा पसरायचा वेगळा चार्ज पडेल ;)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Fri, 02/07/2014 - 05:12 नवीन
ही ही ही.... :-P लहानपणी आम्ही भोंगा न पसरण्यासाठी पण वेगळा चार्ज लावायचो...
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता गुरुवार, 02/06/2014 - 20:56 नवीन
हळू घ्या म्हणायचं राहीलं.. :) :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/06/2014 - 21:15 नवीन
हॅहॅहॅ... वाश्याची तर विकेटच उडवली ! ;)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 02/09/2014 - 07:21 नवीन
आवडलंय
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 01/31/2014 - 02:49 नवीन
ह्या ! उगाच खोटं बोलू नको !
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 01/31/2014 - 03:39 नवीन
तो: आय लव यू ती: आय लव यू टू तो: आय लव यू थ्री!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 01/31/2014 - 04:15 नवीन
व्हॅलेंटाईन डे ला आम्हाला आमची (जी केव्हा अन जी कोण होईल ती) बायको बी "आय लव्ह यु" म्हणायची नाही, रावडी, बाईक फ्रिक, दढीयल (वाढलेली दाढी) अन सदैव विद्रोही मोड ऑन असल्या पोरांस गर्लफ्रेंडा मिळत नसतात, सो मी काय उत्तर देईन ते ऑट ऑफ क्वेशचन!!!!.. कॉलेज च्या दिवसात आपल्याला गर्लफ्रेंड नाही ह्याचे कधी वाईटही वाट्ल नाही!!!!, आम्ही आपले "तोका ना मोका चुल्हा मा झोंका" च्या तत्वावर ऑपरेट करायचो/ करतो :) १. व्हॅलेंटाईन च्या १० दिवस आगोदर पासुन दाढी वाढवा २. मुद्दाम व्हॅलेंटाईन इव्हनिंग ला काळा शर्ट परिधान करुन आपल्या बुलेट वर धगधग करत "टोळभैरव मोड" ऑन करा ३. अन तुमच्या अस्तित्वाने घाबरलेल्या कन्या अन वशाळलेली पोरे ह्यांची मजा घ्या!!!!! ४. थकलात की श्रमपरिहारा हेतु मस्त एक किंगफिशर चा टिन उघडा अन स्वातंत्र्य सेलीब्रेट करा!!!! हाच आमचा शिरस्ता!!!!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 01/31/2014 - 04:26 नवीन
तेल्कट छपरी पोरांवरच सुंदर पोरी भाळायच्या असा आम्चा अणुभव हाय !
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 01/31/2014 - 04:51 नवीन
आँ!!!! अनुभव शेयर करताय का आम्हाला गुंडाळताय हो चौकटराजे महोदय ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 01/31/2014 - 05:16 नवीन
माझे उत्तर... . हे सांगण्यासाठी इतका वेळ वाट बघायची गरज नव्हती...आधी माहीत असते तर मस्त प्लान बनवला असता... ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 01/31/2014 - 05:29 नवीन
'आय लव्ह यू' म्हणायला व्हेलेंटाईन डेच कशाला पाहिजे? तसही, असतो कधी हा व्हॅलेंटाईन डे? (इथपासून आमची तयारी). आता ह्या उतारवयात एखादी मुलगी (रादर, एखादी बाई) 'आय लव्ह यू' म्हणेल अशी सुतराम शक्यता नसल्यामुळे (ऐन भरात असतानाही कोणी मुलगी कधी म्हणाली नाही) काय उत्तर द्यावं ह्यावर विचार करण्याची गरजच नाही. तशी शक्यताच नसल्यामुळे अगदी सेफ वाटतंय (बायकोला, मुलींना आणि ओळखितल्या बायकांना). निवृत्ती जवळ आली असताना सरकारी खात्यात वगैरे जसं आपल्या नांवाला फार जपलं जातं तसंच, 'आता 'भलती' रिस्क नको' ह्या विचारांनी माझ्याकडूनही अविचारी पुढाकार घेतला जाणार नाही. त्यामुळे 'व्हॅलेंटाईन डे' आणि 'ऋषी पंचमी' ह्यात आता कांही फरकच उरलेला नाही.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/31/2014 - 05:32 नवीन
श्री रामसेने आणि प्रमोद मुतालिकांचं नाव ऐकलांव नाय काय कंदी? ते पाठोपाठ अ.आ. बुवा, हळदीकुंकू आणि मंगळसूत्र घेऊन यायचे! आजूबाजूला बघून मगच "इ लोवे योउ" म्हणा!
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 01/31/2014 - 09:47 नवीन
@श्री रामसेने स्पेस चुकीच्या जागी पडली काय?? हे Mr.रामसेने असं वाटतंय. :D
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/31/2014 - 10:06 नवीन
ते वरिजिनल तसंच है! श्री राम सेने (Sri Ram Sene)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 01/31/2014 - 05:33 नवीन
माझं उत्तर : अरे माझं लग्न झालय राजा ! " सोन्या एवढे दिवस लावतात का ?? बघ उशिर नसता केलास तर आज मी तुझ्यासोबत असते छकुल्या ?? श्श्या ... बाकी तु म्हणालास ते बरं ़ केलस ... नैतर मला वाटायचं कि , मलाच असं का वाटतय कि तु माझ्यावर फीदा आहेस ते ! :-/ आता किती छान वाटतय म्हणुन सांगु .... " =))
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/13/2014 - 09:34 नवीन
तो--आय लव्ह यु ती--अरे माझं लग्न झालय राजा ! तो--अगं म्हणुनच तर आत्ता प्रपोज करतोय..सध्या सेफ गेम खेळायचे दिवस आहेत (डेली सोप मालिकांचा प्रभाव)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 01/31/2014 - 05:41 नवीन
ऐन वेळी जे सुचेल ते उत्तर देईन. असं आधीपासूनच कसं ठरवायचं; तसंही ते काय म्हणतात कवीहृदय वगैरे घेऊन जन्माला आलेलो नाहीच.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/31/2014 - 05:50 नवीन
ते कोण म्हणतय आणि कोणत्या परीस्थीतीत म्हणतय त्याप्रमाणे उत्तर बदलेल. कोण म्हणतय याच्या कॅटॅगरी खालिल प्रमाणे लहान बालके सुंदर तरुण कन्यका (माझ्या)लग्ना आधी (मला) आवडणारी पण आता लग्न झालेली लग्न झालेल्या इतर सुंदर तरुणी (सर्व प्रकारच्या (आणि आकाराच्या) स्त्रीया सुंदरच असतात त्या मुळे खर तर सुंदर तरुणी ही व्दीरुक्ती होते) एखादी मध्यमवयिन स्त्री एखादी उतारवयीन स्त्री कोणत्याही वयाचा पुरुष (आजकाल काहि सांगता येत नाही) प्रत्येक कॅटॅगरी समोर उत्तर आपापल्या अनुभवांप्रमाणे कल्पावे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/31/2014 - 05:57 नवीन
वरती ज्ञानोबांच्या पैजारबुवांनी लिहिल्याप्रमाणेच उत्तर आहे. कोण म्हणतेय अन म्हणणारी अस्मादिकांना कशी वाटेल यावर उत्तर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Fri, 01/31/2014 - 06:28 नवीन
आपल्याला नै बै जमायचं तसलं ........ ;) :P :D
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 01/31/2014 - 06:30 नवीन
उफ् युम्म् मा
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 01/31/2014 - 07:21 नवीन
हीहीही!! :D
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/31/2014 - 07:31 नवीन
@अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?>>> विचारतात काय हो ! खरचं कुणी ? ;) . . . . . . . . . . . हल्ली??? =))
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 01/31/2014 - 07:34 नवीन
मले इचारलीस ?
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 01/31/2014 - 07:35 नवीन
व्हाय मले इचारलीस ?
  • Log in or register to post comments
म
मराठीच Fri, 01/31/2014 - 08:01 नवीन
आजपर्यंतच्या इतिहास... मख्खमयी चेहरा करुन प्रियमयीला होकार देण्यात वेळ घालवून गुलाबमयी स्वप्न हातचे घालवून, टीनपॉटमयी आयुष्य जगत आपले ह्रदय आता लोखंडमयी केले पाहीजे ह्या रुक्षपाषाणमयी विचारांपर्यंत मी आलो आहे...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/31/2014 - 08:10 नवीन
काका, सोप्या मराठीत पत्ता (कधीचाच)कटला असं सांगा की!
  • Log in or register to post comments
म
मराठीच Fri, 01/31/2014 - 13:09 नवीन
पत्ता कटला कारण आमी गोरेगोमटे नाकिडोळी निटस होतो... तेलकट केस काळाढुस्स चेहरा नकटे नाक मवाली चेहरा अशी आमच्याकडे चांगली फिचर्स नव्हती.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 01/31/2014 - 08:42 नवीन
Image removed. संदेश खाणे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 01/31/2014 - 08:49 नवीन
राँग नंबर ! बेटर लक नेक्स्ट टाईम !
  • Log in or register to post comments
ब
बन्डु Fri, 01/31/2014 - 09:13 नवीन
व्हॅलेंटाईन्स डे के दिन मे कह दूं अजनबी... !
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 01/31/2014 - 09:39 नवीन
(कोल्लापुरी) पक्या - माजं लै प्रेम हाय तुझ्यावर. ती- सॉरी यार, आय अ‍ॅम अलरेडी एंगेज्ड. . . . पक्या - अगायाया !!! इंग्लीश???? :D
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 01/31/2014 - 11:31 नवीन
पक्या - माह्यं लै लव हाय तुह्यावर. ती- सॉरी यार, आय अ‍ॅम अलरेडी एंगेज्ड. . . . पक्या - अम्मम्म... पाह्यं नं वं जरासं अ‍ॅडजश्ट व्हत असनं तं.. ;-)
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 01/31/2014 - 12:24 नवीन
पक्या - आय लऊ यु ती - आय येम नॉट इंट्रेष्टेड पक्या - देन डेव्लप..... ती - बेशुद्ध :P
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/31/2014 - 09:45 नवीन
विचारणारी कोण, कशी इ.इ. आहे त्यावर उत्तर अवलंबून असेल. अगदीच खडकी दापोडी असेल तर नेहमीचाच रिप्लाय 'बरं मग?' ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 01/31/2014 - 10:00 नवीन
मेल टु फिमेलः आय लव्ह यु. फिमेल टु मेलः कसं शक्य आहे ते? मी आधीच विवाहीत आहे, त्यात मी एकाच्या प्रेमात सीरियसली आहे. परवाच दोन जणांनी मला प्रपोज केलंय. दे आर रियल गुड लूकींग अ‍ॅण्ड रिच. बॉसनं विचारलं त्याला मी नाही म्हणूच शकत नाही आणि त्यात तू? नाही रे शक्य नाही. . . . . . मेल टु फिमेलः बघ ना, कर ना थोडं अ‍ॅडजस्ट, जमेल तुला! (फॉरवर्डेड मेसेजमधून साभार)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 01/31/2014 - 10:11 नवीन
जरा अ‍ॅडजस्ट हुतंय काय बघा की.. :))
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 01/31/2014 - 10:25 नवीन
मागे एका इंग्रजी मासिकात Sexual Harassment at Workplace या संदर्भात मुलाखती घेताना एका मुलाला विचारलं गेलं की उलट्या हॅरॅसमेन्ट बद्दल म्हणजे बायका पुरुषांच्या करत असलेल्या कार्यालयीन लैंगिक शोषणाबद्दल तुमचे काय मत आहे? तर पठ्ठ्याने उत्तर दिलं, "काय म्हन्टा? बायका पण sexual harassment करतात? मी वाटच बघतोय" :P धाग्याच्या शीर्षकातला प्रश्न वाचून काहींना असंच काहीसं वाटलं असेल :D
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 01/31/2014 - 10:46 नवीन
हम्म फुट्टी मेरी किस्मत !!!!! असे कित्येक व्हॅलेंटाईन्स डे आले अन गेले ;)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 01/31/2014 - 11:10 नवीन
माझं उत्तर आणि धागकर्तीला प्रश्नः (गोठोस्कर दादा ष्टाईल) आज सकाळीच काय हो?? (ह घ्या हां)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा