प्रजासत्ता की प्रजा’सट्टा’
२६ जानेवारी. एक असा दिवस, ज्या दिवशी १९५० साली भारत, एक प्रजासत्ता म्हणून उदयास आला. एक असा दिवस ज्या दिवशी भारताची आपली अशी घटना, आपलं संविधान लागू झालं, आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळाले. मतदानाचा हक्क मिळाला. प्रत्येक भारतीय नागरिकावर एक जबाबदारी आली. राष्ट्र घडवण्याची, राष्ट्राचा उद्धार करण्याची.
आज २६ जानेवारी हा दिवस खिशावर, गाडीत, स्कूटर वर झेंडे लावण्याचा, आणि त्या दिवसापुरता राष्ट्राभिमान दाखविण्याचा दिवस म्हणून उरला आहे, असं चित्र दिसतं. येत्या २६ जानेवारीला भारताच्या प्रजासत्ता होण्याला ६४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मागे वळून बघितलं तर कळतं की, एक प्रचंड मोठा पल्ला आपण ओलांडला आहे. ज्या दरम्यान देशात अनेक सरकारं आली, अनेक पडली, अनेक फळली, अनेक रुळली. भारतीय नागरीक म्हणून आपण आपले सगळे हक्क बजावले. संविधानाने दिलेला मतदानाचा अतिमौल्यवान हक्कही आपण बजावला. परंतु तो हक्क बजावताना त्याबरोबर असलेली जबाबदारी आपण विसरलो. त्यामागचा विचार आपण विसरलो. आपल्या मताने आपण किती फरक पाडू शकतो याचा अंदाज आपण कदाचित बांधू शकलो नाही. त्यामुळे मतदानाकडे, पाच वर्षांनी किंवा कधीकधी त्या आधी पाळायचा एक शिष्ठाचार, या दृष्टीने सगळ्यांनी बघितलं आणि तिथेच आपलं चुकलं. आमिषाला भुलण्याची माणसाची सहजप्रवृत्ती आहे, जिचा सूद्न्यांनी उपयोग केला, आणि मग ‘मतदान’ या शब्दातला अर्थच विरला.
आज बघितलं, तर सव्वाशे कोटी इतकी प्रचंड आपली लोकसंख्या आहे. ज्यातील ७५% टक्के जनता शिक्षित आहे. परंतु शिक्षित, अशिक्षित अशा दोनही वर्गात मतदानाबाबत कमालीची उदासीनता आहे. शहरांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. जशी प्रत्येक गोष्टीची फॅशन येते तशी मतदानाची फॅशन येऊ लागली आहे. सिनेमातील नट नट्या, लोकप्रिय उद्योजक, कलाकार यांच्या मार्फत लोकांना मतदानाचं महत्व समजावण्याचं काम होतंय. आणि लोकं ‘फॅड’ म्हणून का होईना मतदान करतायत. हा टक्का अजून वाढेल; वाढावा. परंतु त्यामागे विचार असला तरंच ते ख-या अर्थाने ‘मत‘ ठरेल. नाहीतर तो केवळ अनेक पर्यायांपैकी निवडलेला एक पर्याय असेल.
सदर लेख प्रहार वृत्तपत्रात छापून आलं होतं, त्याचा हा दुवा आणि वर छायाचित्र
आपल्याकडे असलेल्या राजकारणी पक्षांची, संघटनांची संख्या आता हातावर मोजण्याइतकी राहिलेली नाही. त्याचंही पेव फुटलंय. काही मोठे पक्ष आहेत, ज्यांना राजकीय इतिहास आहे; आणि काही नवे पक्ष आहेत, ज्यांच्यात मोठं होण्याचा विश्वास आहे. प्रश्न प्रत्येक नागरिकावर आहे, की निवड कुणाची करावी. परवा बस स्टॉप वर एक संवाद सहज कानावर पडला. "आता असं झालंय ना, की कुणावर विश्वास ठेवावा कळत नाही. चांगला उमेदवार, चांगला पक्ष, म्हणून निवडून द्यावं तर तोही विश्वास फोल ठरवतो. सगळे पक्ष, सगळे नेते, एकसारखेच वाटायला लागलेत. मत वाया जाऊ द्यायचं नाही आणि माझ्या नावावर कुणी दुसराच येऊन मत देऊन जाऊ नये म्हणून फक्त मतदान करतो मी. मताचा भ्रष्टाचार होऊ देण्यापेक्षा मतदानाचा शिष्ठाचार पाळायचा. एक नाव ठरवून जायचं मनात, आणि दाबायचं बटण. एकाला काढा आणि दुस-याला ठेवा. केलंन तर करेल चांगलं काम.", एक मध्यमवयीन गृहस्थ त्याच्या मित्राला सांगत होता.
मतदान ही एक परीक्षा आहे. आणि मतदान ही जितकी राजकीय पक्षांची परीक्षा आहे त्याहून जास्त ती नागरिकांची परीक्षा आहे आणि त्याकडे परिक्षेसारखंच बघितलं पाहिजे. परिक्षेचा जसा अभ्यास केला जातो, तसाच मतदानापूर्वी, उभे असलेले, पक्ष, नेते, त्यांची व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, त्यांची धोरणं, इतिहास या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. तसं करून मगच आपण आपलं मत ‘योग्य‘ उमेदवाराला, ‘योग्य‘ पक्षाला दिलं पाहिजे. विचारहीन मत हे लोकशाहीसाठी विघातक ठरतं, आणि तसं होऊ नये याची खबरदारी नागरिकांनी घ्यायला हवी. मागून असंतोष व्यक्त करण्यापेक्षा मतदान करतेवेळीच जर त्यातलं गांभीर्य जपलं तर आणि तरच आपल्या देशाचं भलं होणार आहे. अन्यथा आश्वासनं, निवड, सत्ता, विश्वासघात, पतन, पुन्हा आश्वासनं, पुन्हा निवड, पुन्हा विश्वासघात, हे सत्र चालूच राहील. मग याला प्रजासत्ता म्हणावं की प्रजा‘सट्टा’; आपल्यालाच प्रश्न पडेल.
तेंव्हा या प्रजासत्ताक दिनाला मनापासून प्रतिद्न्या करूया. या देशाला ख-या अर्थाने एक प्रजासत्ताक राष्ट्र सिद्ध करायची मतदानाची जी आणखी एक संधी जवळ येऊ घातलीय, तिचा योग्य फायदा घेऊया. माझ्यातर्फे समस्त देशबांधवांना आणि भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा!

...पण कालमर्यादा २०३१ पर्यंत ते प्रत्त्यक्षात आंमलात येईल असे म्हणतोय. इतका वेळ कोण थांबणार आहे.आता तुमच्या उमेदवाराचेच बघा. त्याने तुम्हाला जे काय सांगितले आहे ते ३१ डिसेंबर २०३१ ला या एका दिवशी आस्तित्वात येणार आहे काय? त्याचा आराखडा जर खरोखरचा असेल तर त्याच्याकडे दर वर्षी काय काय सुधारणा होतील त्याचे वेळापत्रक असायला हवे. त्या दरवर्षी पडताळून पहाता येतील आणि त्या झाल्या तर त्यांचा फायदा तुम्हाला पहिल्या वर्षापासून पुढे त्या त्या वर्षी मिळतच राहणार आहे की नाही? असे एक एक करत सरतेशेवटी शेवटच्या वर्षीपर्यंत सर्व सुधारणा झाल्या की आराखड्याची अंमलबजावणी पुरी झाली असे म्हणता येईल. युरोप-अमेरिकेनेही आताचा टप्पा गाठायला अनेक दशके घेतली आहेत हे विसरून कसे चालेल? आता जर कोणी "पाच वर्षात कळव्याचा कॅलिफोर्निया करतो" असे म्हटले आणि त्याला केवळ "कमी वेळ सांगितला" म्हणून मत मिळणार असेल तर गोष्ट फारच वेगळी :) "रोम एका रात्रीत बांधले गेले नाही" हे आपण जाणतो पण आपल्याला आपले रोम चमत्कार होऊन पटकन बनले पाहिजे असे वाटण्यात गैर वाटत नाही. मुख्य म्हणजे "रोमच्या बांधकामावर नीट नजर ठेवल्याशिवाय तर ते तसे बांधले गेले नसते" ही वस्तुस्थिती तर आपण पुर्णतः विसरतो !