मानव : चिंपँझी आणि वराह यांच्या संकरातून बनलेला प्राणी ???
"प्रायमेट नावाच्या पूर्वज प्रजातीपासून माणूस आणि ग्रेट एप प्रकारची माकडे उत्क्रांत झाली" आणि "ही उत्क्रांती डार्विनच्या सिद्धान्ताबरहुकूम हळूहळू होत गेली" हे दोन सिद्धांत शास्त्रीय जगतात आणि जनसामान्यात चांगले मान्यता पावलेले आहेत. एका शास्त्रीय संशोधनाला सुरुंग लावणारे इतर शास्त्रीय सिद्धांत मांडले जात नाहीतच असे नाही. पण वरच्या या दोन गोष्टी शास्त्रीय जगतात बर्यापैकी जम धरून बसलेल्या आहेत... किंवा खरेतर "आताआतापर्यंत जम धरून बसलेल्या होत्या" असेच म्हणावे लागेल.
कारण आता त्या गोष्टींनाही सुरुंग लावणारा सिद्धांत अमेरिकेतील जॉर्जिया युनिव्हर्सिटीतल्या डॉ युजीन मॅक्-कार्थी यांनी मांडला आहे. त्यांच्या सिद्धान्ताप्रमाणे माणूस चिंपँझी मादी आणि वराह नर यांच्या संकरापासून झालेला प्राणी असावा याला भरपूर शास्त्रीय पुरावा आहे.
डॉ युजीन मॅक्-कार्थी ही आसामी सामान्य शास्त्रज्ञ नाही. संकरशात्रातल्या जागतिक स्तराच्या मोजक्या तज्ज्ञामध्ये त्यांची गणना होते. त्याचे प्राणी-संकरावरचे मूलभूत संशोधन हजारो संशोधन लेखांमध्ये दुवे (रेफरन्स) म्हणून वापरले गेले आहे. त्यांच्या सद्याच्या या सिद्धान्ताला शास्त्रीय जगतात सावध पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी त्यासाठी दिलेल्या कारणपरंपरेची स्तुतीच होत आहे... त्यांना सरळ सरळ वेडा म्हणायला शास्त्रीय जगतात अजून कोणी पुढे आले नाही यावरून त्यांच्या सिद्धान्ताच्या शास्त्रीय भक्कमतेची आपल्यासारख्या त्याबाबतीत तज्ज्ञ नसलेल्यांनाही अप्रत्यक्ष कल्पना यावी.
त्यांच्या सिद्धान्ताच्या पाठिंब्यासाठी त्यांनी मांडलेले आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः
१. माणूस आणि चिंपँझी जनुकशास्त्राप्रमाणे जवळचे असले तरी त्यांच्यामध्ये खूपच फरक आहेत आणि ते का हे विशद करणारा दुवा म्हणून कोणताच प्राणी या दोघांमध्ये नाही.
२. चिंपँझीच्या जनुकांच्या जवळपासही येणार नाहीत अशी बरीच जनुके मानवात आहेत आणि ती जनुके वराहात आहेत.
३. मुख्य म्हणजे ही वेगळी जनुके इतर प्रायमेट्स मध्येही नाहीत... म्हणजे ती प्रायमेट, ग्रेट एप्स आणि सद्या मान्यता असलेल्या मानवाच्या पूर्वजांकडून मानवाला मिळणे शक्य नाही. त्यामुळे ती फार वेगळ्या प्राण्याच्या संकरातून मिळण्याची शक्यता सबळ बनते.
४. वराह व मानवाच्या जनुकीय साम्यांमुळेच हृदयाच्या झडपांचे, कातडीचे आणि मूत्रपिंडाचे रोपण किंवा मधुमेहाविरुद्ध वापरले जाणारे इन्शुलीन याकरिता वराह याच प्राण्याची निवड केली गेली आहे कारण काही जनुकीय साम्यांमुळे ते अवयव अथवा इन्शुलीन मानवी शरीर जास्त सहजपणे स्वीकारते (रिजेक्शन रिअॅक्शन कमी प्रमाणात होते). हीच गोष्ट जनुकशास्त्रीयदृष्ट्या वराहाला जवळचे आणि माणसाला वराहाइतकेच दूरचे असलेल्या कुत्रा, शेळी अथवा अस्वल या प्राण्यांबाबत शक्य होत नाही.
५. जनुकशास्त्रियदृष्ट्या बर्याच वेगळ्या असलेल्या प्राण्यांमधील संकर जरी नेहमीची गोष्ट नसली तरी प्रयोगशाळेत आणि निसर्गातही ही गोष्ट फार अशक्य अथवा अगदी फारच मोठा अपवाद नाही. डॉ युजीन मॅक्-कार्थी यांच्या Handbook of Avian Hybrids of the World या पुस्तकात पक्षीजगतातले ४,००० पेक्षा जास्त हायब्रिड्स नोंदलेले आहेत. येथे सस्तन प्राण्यांच्या अनेक संकरांची यादी व माहिती मिळेल.
६. संकरित प्राण्यांत वंध्यत्वाचे प्रमाण खूपच असते. जीव-इतिहासात असे बहुतेक संकर प्रजनन करण्यास असमर्थ असल्याने नष्ट झाले आहेत. आजही मानवात सर्वसाधारण प्राण्यांपेक्षा वंध्यत्वाचे प्रमाण लक्षणीय आहे. आधुनिक मानव जन्माला येऊन दोन लाख वर्षे लोटली आहेत. इतका काळ वंध्यत्व सुधारायला मिळूनही त्याचे इतके प्रमाण आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात तर ते खूपच मोठे असले पाहिजे. संकराच्या सिद्धान्ताच्या बाजूचा हा एक अप्रत्यक्ष पुरावा आहे.
माणसाच्या दोन लाख वर्षांच्या इतिहासात त्याच्या अनेक वंशावळी तयार झाल्या. त्यातील इतर सर्व नष्ट होऊन फक्त आता जिवंत असलेली एकुलती एक वंशावळ एकाच नर आणि मादीपासून (जेनेटिक अॅडम व ईव्ह) निर्माण झाली आहे हे तर सिद्ध झाले आहेच. इतर वंशावळी हळूहळू अस्तंगत होण्याचे वंध्यत्व हे एक महत्त्वाचे कारण असू शकते आणि केवळ योगायोगाने निर्माण झालेल्या काही उत्परिवर्तनांमुळे आपली आताची वंशावळ शिल्लक उरली आहे असेही असू शकेल. (हा इटॅलिक्समधला आपला माझा लॉजिकल अंदाज... एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीत आपलेपण दोन पैसे असले पाहिजेतच ना राव ;) )
७. डॉ युजीन मॅक्-कार्थींचा सिद्धांत केवळ शास्त्रीय ज्ञानावर आणि शास्त्रीय सारासारविवेकावर (लॉजिक) बेतलेला आहे, त्यामुळेच अजून तरी त्याला इतर शात्रज्ञांकडून सरळ सरळ आव्हान पुढे आलेले नाही किंवा त्याची चेष्टाही झालेली नाही.
🗣 चर्चा
(83)
आ
आयुर्हित
Sun, 01/26/2014 - 13:09
नवीन
उत्तम लेख व विचार आहेत आपले!
आपल्या वेदात व पुराणात याचे उत्तम रीतीने वर्णन केलेले आहे, फक्त ते रूपकाच्या रुपात असल्याने बर्याच वेळेला,बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही.
ओळखा पाहू काय आहेत ते!
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 01/27/2014 - 08:02
नवीन
अतिशय उत्तम,
फक्त एकच प्रश्न आहे, सगळ्याच गोष्टी रुपकात का हो टाकल्या?
अजुन एक, डुकरांना डायबेटीस व्हायचा चान्स कमी असतो बरंका, शिवाय, डुक्कर हे डायबेटीस विरुद्ध लढ्यातील एक महत्वाचे हत्यार आहे.. नजर राहूद्या तुमची तिकडेही..
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 01/27/2014 - 12:45
नवीन
त्या काळी सर्व विद्या मुखोद्गत करणे अति आवश्यक होते.त्यासाठी लक्षात ठेवणे सोपे जावे म्हणून रूपकाची गरज पडायची.
क्षमा करा, मी फक्त दोन पाय असलेल्या व प्रगत मेंदू असलेल्या मानव प्राण्याचीच काळजी घेतो.प्रगत मेंदू हेच माझे साधन आहे.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 01/27/2014 - 18:33
नवीन
अहो, प्रगत मेंदू असलेल्या मानव प्राण्याची काळजी घेण्याचेच डुक्कर हे एक साधन आहे..
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 01/27/2014 - 18:51
नवीन
आपण आपल्याया प्रिय अशा कोठल्याही प्राण्याचा/साधनाचा वापर करायला मोकळे आहात.आपणास कोणी अडवणार नाही.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 01/27/2014 - 19:09
नवीन
आम्ही तर करणार बुवा डुकराचा वापर.. तुम्ही बसा रुपकं शोधत..
http://www.scientificamerican.com/article/pigs-porcine-diabetes-islet/
http://www.cmaj.ca/content/174/1/25.full
http://www.biotechlearn.org.nz/focus_stories/pig_cell_transplants/diabetes_and_pig_cell_transplants
http://globalnews.ca/news/728296/pig-cells-may-help-diabetic-patients/
वाचा जरा, सरळ भाषेत आहे, रुपक नाहीत..
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
Wed, 01/29/2014 - 12:17
नवीन
तुम्ही उतम रित्या उत्क्रांत झाला आहात ;)
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Wed, 01/29/2014 - 13:22
नवीन
कस्स्च्चं हो.. गर्दीबरोबर चालत आलो..
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sun, 01/26/2014 - 13:10
नवीन
माणसाचं पार डुक्कर केलंसा की...
चला माणसाच्या काही ठराविक वागण्याचं थोडं तरी कारण सापडायला हरकत नाही आता!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 01/27/2014 - 09:03
नवीन
मी पण तेच म्हणत होतो.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 01/26/2014 - 17:18
नवीन
रोचक संशोधन आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/26/2014 - 17:21
नवीन
वेगळी माहिती.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 01/26/2014 - 18:50
नवीन
हम्म्म्म! बघू अता पुढे काय होतं ते! :)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 01/27/2014 - 06:09
नवीन
ह्म्म्म...
अवांतर :-
yadā kadācij jīvātmā
saḿsaran nija-karmabhiḥ
nānā-yoniṣv anīśo 'yaḿ
pauruṣīḿ gatim āvrajet
TRANSLATION :-
While rotating in the cycle of birth and death again and again in different species because of his own fruitive activities, the dependent living entity, by good fortune, may happen to become a human being. This human birth is very rarely obtained.
संदर्भ :- Bhaktivedanta VedaBase: Śrīmad Bhāgavatam 8.22.25
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 01/27/2014 - 07:06
नवीन
अतिशय उत्तम लेख,
उत्क्रांतीची प्रक्रिया ही अनेक सरमिसळीचा खेळ आहे हे आता हळूहळू मान्य होतय..
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Mon, 01/27/2014 - 07:06
नवीन
अतिशय उत्तम लेख,
उत्क्रांतीची प्रक्रिया ही अनेक सरमिसळीचा खेळ आहे हे आता हळूहळू मान्य होतय..
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Mon, 01/27/2014 - 09:03
नवीन
चला म्हणजे मी विचारवंतांना डूक्कर म्हणतो ते काही चुकीचे नाही तर.
सामान्य माणसे डुक्कर + चिपंझी.
विचारवंत डूक्कर^१२ + चिंपांझी
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Mon, 01/27/2014 - 09:10
नवीन
- Log in or register to post comments
भ
भाते
Mon, 01/27/2014 - 12:17
नवीन
धन्यवाद एक्का काका, ऊपयुक्त माहिती पुरवलीत.
सोज्वळ शिव्यांमध्ये हा शब्द का वापरतात हे आज समजले. :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 01/27/2014 - 12:17
नवीन
नवीनच माहिती.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Mon, 01/27/2014 - 12:43
नवीन
अतिशय रोचक संशोधन आहे!
तुमचे लेखनही मुद्देसुद आहे.
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Mon, 01/27/2014 - 14:58
नवीन
तुमचं लेखन वाचून नेहेमीच काहितरी नविन हाती लागत....मानवी स्थलांतराचा ईतिहास पण खूप आवडला...
- Log in or register to post comments
ज
जेपी
Mon, 01/27/2014 - 16:12
नवीन
रोचक .
- Log in or register to post comments
च
चिगो
Mon, 01/27/2014 - 17:08
नवीन
म्हणजे आता पोर्क खणं म्हणजे कॅनीबलीझ्म ठरणार की काय? ;-)
रोचक लेख..
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 01/27/2014 - 18:40
नवीन
=))
- Log in or register to post comments
व
वडापाव
Mon, 01/27/2014 - 18:37
नवीन
म्हणजे आता पोर्क खणं म्हणजे कॅनीबलीझ्म ठरणार
की काय? >>> +111
=))
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
Fri, 01/31/2014 - 22:44
नवीन
+१११
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 01/27/2014 - 18:50
नवीन
तसे रशियन्स अस्वलाला आपला पूर्वज समजत से काहीसे वाचलेले आठवले!
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 01/27/2014 - 19:29
नवीन
कुणाला थोडे मांजराचे जीन्सपण सापडले तर बघा हो. फार बरं वाटेल मला. ;)
गमतीदार संशोधन आहे.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Mon, 01/27/2014 - 20:09
नवीन
नाही हो... कोणीही काहीही लिहितं आणि डेली मेल सारखा न्यूजपेपर त्याला पब्लिसिटी देतो. लेखकाचं नाव गूगल केलं असतं तर त्याच्या 'संशोधना'च्या चिंध्या उडवणारा हा लेख सापडला असता.
- या लेखकाने पीएचडी पूर्ण केल्यानंतर कुठच्याही प्रतिष्ठित संस्थेत रीसर्च केला नाही. (हा दोष नाही, केवळ संशय निर्माण करणारी परिस्थिती)
- आपलं संशोधन कुठच्याही प्रतिष्ठित पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये पब्लिश करण्यासाठी पाठवलं नाही.
- लेखन केवळ आपल्या वेबसाइटवर ठेवलं.
- शंभर वर्षांपूर्वीच चुकीच्या सिद्ध झालेल्या कल्पना वापरल्या
- डुकरं आणि मनुष्य यांच्यात जनुकीय साम्य तो काहीच दाखवत नाही
- किंबहुना काही वरवरची शारीरिक साम्यं दाखवण्यापलिकडे तो काहीच जनुकीय पुरावे देत नाही (स्वतः जेनेटिसिस्ट असूनही)
- थोडक्यात स्वतःकडे काही पुरावे नसताना, केवळ एक कविकल्पना तो मांडतो आणि आपल्या कल्पनेला मिळतेजुळते असे आणि असेच बारीकसारीक पुरावे तो शोधण्याचा प्रयत्न करतो.
असल्या भलत्यासलत्या कल्पना सत्य असू शकतील असा विश्वास ठेवण्याआधी त्या असत्य असू शकतील यावर अधिक विश्वास ठेवावा. कोणीतरी गारुडी येऊन 'बाई, हे औषध घ्या, तुम्हाला नक्की मुलगा होईल' असं सांगतो त्याबद्दल आपण कसा विचार करू? तसंच करावं.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/27/2014 - 20:41
नवीन
हा दावा अजून फक्त ६ महिन्यांपूर्वीचाच आहे. अश्या संशोधनाला विरोध तर अपेक्षित आहेच. त्या संशोधकाला सिद्धांत स्फोटक असल्याने त्याचे पुस्तक प्रसिद्ध करायला प्रकाशक मिळाल नाही म्हणून ते संशोधन त्याच्या वेबसाईटवर आहे, असे त्याचे म्ह्णणे आहे. मात्र त्याचे अगोदरचे पक्ष्यांच्या संकराचे पुस्तक छापलेले आहे आणि आंतजालावर विकत घेता येते.
पण अनेक मान्यवर पियर्स जून २०१३ पासून अजून गप्प आहेत. जरा त्यांचेपण विचार बाहेर येऊ द्यात... तोपर्यंत हा सिद्धांतच राहील. नंतर पाठीबा मिळाला नाही तर त्याचे हसे होऊन कचर्यात जाईल. पण जर अजून काही संशोधन होऊन पुरावे मिळाले तर क्रांतिकारी विचार ठरेल. अजून काही काळानंतरच चित्र जरा स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण प्रेक्षक बनून त्याचा मागोवा घेत मजा बघूया !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/27/2014 - 20:48
नवीन
हा धागा टाकायचा राहिलाच...
http://scienceblogs.com/pharyngula/2013/07/02/the-mfap-hypothesis-for-the-origins-of-homo-sapiens/
हा लेख त्या संशोधनाच्या विरोधात आहे. मला त्यातल्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचनीय वाटल्या :)
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 01/28/2014 - 05:10
नवीन
वैज्ञानिक ज्ञानाची प्रगती करण्याची प्रक्रिया अशी चालत नाही. म्हणजे कोणीही उठून अपुऱ्या पुराव्यांवर काहीतरी लिहील मग प्रस्थापित वैज्ञानिकांनी तो खोडून काढण्याचा प्रयत्न करावा ही अपेक्षा चुकीची आहे. तसं केलं तर वैज्ञानिकांना आपलं खऱ्या संशोधनाचं काम करायला वेळच मिळणार नाही. नवा सिद्धांत मांडायचा तर त्यासाठी भक्कम पुरावा गोळा करून तो त्या क्षेत्रात काम करणाऱ्या चार रिव्ह्यूअर्सना खोडून काढता येणार नाही अशा स्वरूपात मांडण्याची जबाबदारी ही मांडणाऱ्याची असते. या प्रक्रियेतून गेलेले विचार मग सर्व वैज्ञानिकांसमोर प्रसिद्ध होतात. जर इतरांनाही तो पुरावा मजबूत वाटला तर काही लोक त्या दिशेने बरोबर की चूक असं संशोधन करून बघतात. मग पाठिंबा मिळतो आणि सिद्धांत प्रस्थापित थियरीत सामावला जातो. पण पहिली पायरी चढता न आलेल्या विचारांना पाठिंबा द्यायचा की नाही हे प्रस्थापितांनी ठरवावं ही अपेक्षा बरोबर नाही. मी उद्या उठून म्हणेन की मला भारताच्या धावण्याच्या ऑलिंपिकच्या टीममध्ये जायचं आहे. तर ऑलिंपिक निवड समितीने मला का घेता येणार नाही याची कारणं देत बसणं अपेक्षित आहे का? वेगवेगळ्या पातळीवर स्पर्धा होतात, त्यात मी भाग घ्यावा, मी पुरेशा वेगाने धावतो हे सिद्ध करावं, मग माझा विचार होईल. तसंच आहे हे.
सिद्धांत या शब्दाने नावाजण्याच्या लायकीचं हे प्रकरण नाही असं माझं मत आहे. मी समजा म्हटलं 'मोहेंजोदाडोच्या जवळ मला एक प्लास्टिकची पिशवी दिसली याचा अर्थ मोहेंजोदाडो संस्कृतीत प्लॅस्टिक वापरलं जायचं.' तत्त्वतः हाही सिद्धांतच आहे. पण त्याला मी फारतर एक विधान म्हणेन.
तुम्ही दिलेली सायन्स ब्लॉगची लिंक छान आहे. त्यात लेखकाने म्हटलं आहे 'कदाचित त्याचंच बरोबर असेल आणि माझं साफ चुकलेलं असेल. त्याला एक प्रयोग करून हे सहज सिद्ध करता येईल...'
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/28/2014 - 09:08
नवीन
मी त्या संशोधकाच्या बाजूने लढतोय असा तुमचा गैरसमज झालेला दिसतोय ! लेखाच्या शिर्षकातच मी तीन प्रश्नचिन्हे टाकली आहेत त्यावरून काय ते समजा.
मानवाच्या उत्क्रांतीबद्दल एक खळबळजनक सिद्धांत आणि तोही एका अमेरिकन युनिव्हर्सिटीत काम करत असलेल्या मान्यवर संशोधकाकडून केला गेलेला असल्याने मला त्याचे कुतुहल आहे. याकरताच ती गोष्ट मिपावर टाकली. विश्वास काय अधिक विचारही पियर्सकडून अधिक पुरावे मिळाल्यासच ठेवला जाईल. पण मी माझा छंद म्हणून यासंबद्धीची माहिती कोणताही पूर्वग्रह न ठेवता माझ्या अल्पमतीला जमेल तेवढ्या शास्त्रीय मार्गाने पडताळत राहीन, एवढेच. बघू काय होते पुढे ते !
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 01/28/2014 - 13:15
नवीन
लेखातली वाक्यं, लेखावर आलेले काही प्रतिसाद पाहता अनेकांना या मांडणीत काही दम वाटत असावा असा समज होणं साहजिक होतं.
त्यावरून एक व्यापक मुद्दा डोक्यात आला - नवीन विचारांबद्दल ओपन माइंड ठेवायचं म्हणजे नक्की किती ओपन ठेवायचं? या प्रश्नाला खरं तर सरळधोपट उत्तर नाही. ते प्रत्येकासाठी थोडं थोडं वेगळं असतं. काही घरं सर्वांचं मनापासून स्वागत करणारी असतात, तर काही घरं सहसा इतरांना आत प्रवेश देत नाहीत. या दोन टोकांत प्रत्येक घर कुठेतरी बसतं. अर्थातच जितकं स्वागत करणारं घर तितकं चांगलं. पण तरीही अशी घरं देखील चोरांना किंवा पूर्ण अनोळख्याला 'या, चार दिवस राहूनच जा' म्हणण्याआधी विचार करतात. काहीही सत्य असू शकेल असं धरून चालणं म्हणजे दारात येणारा प्रत्येकजण भला माणूस असेल असं गृहित धरण्यासारखं आहे. विचारांचं स्वागत करतानाही तितक्या प्रमाणात सूज्ञपणा दाखवणं म्हणजे क्लोज्ड माइंड असणं असं नाही. किंचित स्केप्टिसिझम ठेवणं हे उलट चांगलं आहे.
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Tue, 01/28/2014 - 15:43
नवीन
माझ्या पुरता तरी डोळे उघडणारा प्रतिसाद...
Once a priest, always a priest असं नसत आणि Once a Thief, always a Thief असंही नसत...थोडक्यात ओपन माइंड म्ह्णजे पुर्वग्रहविरहीत माइंड. बरोबर ना?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 01/28/2014 - 17:10
नवीन
काहीजणांना सग्गळं कळतं पण वळत नाही. आणि काही लोक "लोकां सांगे ब्रह्मज्ञान" अशा प्रकारातलेही असतात. तेव्हा सगळीकडेच नेहमी डोळे उघडे ठेवून रहावे. म्हणजे थोडक्यात 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे'. काय?!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/28/2014 - 17:03
नवीन
ही चर्चा पुढे चालवावी असे वाटत नव्हते. पण दोन्ही प्रतिसादात संशोधनप्रक्रियेवर बराच उपदेश वाचला. त्यावरून तुमचा संशोधनाचा बराच अभ्यास आहे असा अंदाज बांधला. म्हणूनच थोडेसे लिहीत आहे:
१. जर तुम्ही तुमचा प्रतिसाद संशोधकाच्या विरोधी असलेल्या एकुलत्या एका लेखावर न बेतता, मूळ संशोधन आणि इतर काही संशोधकांची मते विचारात घेऊन लिहीला असतात तर तो जास्त संतुलीत आणि शास्त्रीय झाला असता.
२. माझ्या लेखावरचा एकांगीपणाचा क्लेम तुमच्या सोडून इतर कोणाच्या प्रतिसादात दिसत नाही, तेव्हा गैरसमज कोणाचा झाला आणि घर-चोर वगैरे उदाहरणे कुठे आणि कितपत लागू होतात हे वर मुद्दा १ मध्ये नोंदलेली डॉक्युमेंट्स वाचून मग लेख (शिर्षकासह) व इतर प्रतिसाद वाचून नंतर ठरवल्यास ते जास्त शास्त्रीय ठरेल.
३. शास्त्रीय प्रक्रियेबद्दल मला थोडीबहुत कल्पना आहे, कारण माझ्या स्किलसेटमध्ये खालील काही क्षुद्र गोष्टी आहेतः
अ) ICH-GCP (Royal College of Physicians, London) आणि NIH-PHRP सर्टीफाईड क्लिनीकल रिसर्च इन्व्हेस्टीगेटर
आ) ICH-GCP ट्रेनर
इ) IRB पॉलिसी आणि रिसर्च सेंटर स्ट्रॅटेजी लिहीणे हा माझ्या व्यवसायाचा एक आवडता भाग आहे
ई) बहुराष्ट्रीय-बहुकेंद्रित शोधप्रकल्पांचे करार आणि आयोजन हा माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे, इ.
आणि ह्या पार्श्वभूमीचा उपयोग कोणत्याही संशोधनाकडे पूर्वग्रह न बाळगता (ते अगदी विचित्र वाटले तरी) बघायला आणि त्याला माझ्या शास्त्रीय अल्पमतीप्रमाणे योग्य तेवढे (आणि तेवढेच) शास्त्रीय महत्व द्यायला उपयोग होतो.
असो. आपल्या संशोधनाबद्दलच्या ज्ञानाची कल्पना असल्यानेच इतके लिहावेसे वाटले. आता लेखात असलेल्या संशोधनाची चमक सोन्याची आहे की पितळेची याबद्दल माझा स्वतःचा काहीच दावा नाही पण खरे काय आहे हे लवकरच समजेल असे वाटते. कारण आताआता नामवंत पियर्स सावध भुमिका घेऊ लागले आहेत. म्हणजे काही दिवसात त्यांचे परखड विचारही बाहेर येतील असे वाटते. तोपर्यंत या विषयी "Watchful expectancy and masterly inactivity." हा मार्ग मला उत्तम वाटतो. नाही का?
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 01/28/2014 - 17:45
नवीन
तुम्हाला उपदेश करण्याचा हेतू आहे असं वाटलं तर क्षमस्व. माझ्या स्केप्टिकल भूमिकेचं ते समर्थन होतं. आणि अशा कल्पनांबद्दल थोडं साशंक असणं म्हणजे ओपन माइंड नाही या आक्षेपाचं प्रीएम्प्टिव्ह खंडन होतं.
असो, तुमचं लेखन मी आवडीने वाचतो, आणि त्यातून मला बरंच काही मिळतं. तेव्हा गैरसमज नसावा.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 01/27/2014 - 20:42
नवीन
लेख चांगला आहे. नविन माहिती मिळतेय. ती कितपत खरी मानावी शंकाच वाटते आहे. (त्या शास्त्रातलं कांही कळत नाही म्हणून).
- Log in or register to post comments
व
विद्युत् बालक
Tue, 01/28/2014 - 12:18
नवीन
फरक एवढाच आहे कि पूर्वी माणसे हे वेद वगैरे ला ब्रह्म ज्ञान मानायची सध्या गोऱ्या कातडीच्या किंवा फारिन मधील सरसकट "संशोधनाला(?) " ब्रह्मज्ञान मानतात ! खरे खोटे ब्रह्मालाच ठाऊक !
अवांतर : विकीपेडिया मधील लेख मराठीत भाषांतर किंवा चोप्य्पस्त करून इथे टाकले तर मिपाच्या धोरणात बसतील का ?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/28/2014 - 17:11
नवीन
माणसाची गोरी कातडी आणि माकडांच्या तुलनेने नगण्य केस या गोष्टी (जीन्स) वराहाकडून मानवात आल्या असे त्या गोर्याचे म्हणणे आहे ! :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 01/28/2014 - 17:14
नवीन
अवांतरः भाषांतर करा पण शब्दशः नको. त्यात स्वतःची भर घाला.
महत्त्वाचे: दुसर्या कोणी चोप्य पस्ते केलेले असेल तर लिंक द्या. असे लिखाण आपण कॉपीराईट कायद्याच्या कक्षेत येत असेल तर ठेवू शकत नाही.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Tue, 01/28/2014 - 12:31
नवीन
आता (जर पुढे हे संशोधन खरे ठरले तर) तथाकथित पुराणमतवादी म्हणतीलच की हे भारतीयांना खुप आधीच माहीती होते, विष्णुचा वराहावतार हा त्याचाच पुरावा आहे ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 01/28/2014 - 13:23
नवीन
अर्थातच ;)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 01/28/2014 - 14:13
नवीन
एका इंग्रज माणसाने सांगितले की आमच्याकडे खूप खोल खणले तेंव्हा एक तांब्याची तार मिळाली म्हणजे आमच्याकडे तेंव्हा तारा यंत्र होते.
यावर एक भारतीय पुराण मतवादी म्हणाला की आमच्याकडे खूप खोल खणले तेंव्हा काहीच मिळाले नाही म्हणजे आमच्याकडे तेंव्हा पण बिनतारी(wireless) संदेश वहन होते.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/28/2014 - 17:19
नवीन
तेवढंच नाही तर टिव्ही*दृष्टी नसती तर महाभारत कसं बरं पाहिलं, ऐकलं आणि लिहीलं गेलं असतं ? +D
* : टिव्ही --> टिव्य --> दिव्य असा अपभ्रंश झाला असावा असा अंदाज आहे... बॅटमॅन नक्की सांगू शकेल.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 01/28/2014 - 18:34
नवीन
व्युत्पत्ती बरोबर, फक्त अगोदर दिव्य, मग टिव्य अन मग टिव्ही असे पाहिजे. कारण दिव्यदृष्टीच्या आधारे टिवटिव करीत म्हणून टिव्य अन मग त्याचे पुढे टिवी झाले.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/28/2014 - 18:46
नवीन
वरच्या टीव्ही*दृष्टी ऐवजी दिव्य*दृष्टी असा बदल करायचा असं ठरवून दुसरी ओळ लिहीली आणि बदल करायच्या अगोदर उंदीर चालवला :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 01/28/2014 - 19:04
नवीन
हा हा हा ;)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »