Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सर्व वास्तु पांडवकालीन कश्या ?

प
प्रमोद देर्देकर
Fri, 01/24/2014 - 07:02
🗣 106 प्रतिसाद
आपण कोणत्या ही ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) पहायला गेलात तर तेथील स्थानिक रहिवाशी ती वास्तु पांडवकालीन आहे असा उल्लेख करतात. माझे इतिहासाचे जे वाचन झाले ते थोडेसेच, आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा योगही जास्त नाहिये. आज पर्यंत जेवढ्या ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) गोष्टी पहिल्या, स्थळांचा इतिहास स्थानिक लोकांकडुन ऐकला त्यावरुन एक अनुमान निघते की या सर्व वास्तु पांडवांनी त्यांच्या वनवासातील काळात ते इथे होते तेव्हा बांधल्या आहेत. आता पांडवांना जो वनवास झाला तो १२ वर्षाचा आणि एक वर्षाचा एकांतवास होता. त्यानंतर ते कौरवांशी लढाई मध्ये गुंतले आणि जेव्हा युधिष्ठीर राजा झाला तेव्हा त्याने केलेल्या राज्यकारभारातील काळात इतर पांडव त्याच्या बरोबरीने होते. ही एवढी शिक्षेची १३ वर्षे सोडली तर पांडव हस्तिनापुर सोडुन बाहेर गेलेले नाहित. मग आता प्रश्न असा की एवढी देवळे, लेण्या त्यांनी कधी बांधल्या. मग त्यात लोणावळ्याची एकवीरा देवी, अंबरनाथचे शंकर मंदिर, दाभोळची चंडिकादेवी, नुकत्याच अतिवास यांनी केलेल्या भीमनी घंटींचा उल्लेख. आणि इतरही बरेच काही मंदिरे, वास्तु,लेण्या ज्या पांडवांनी बांधल्या असे सर्रास सांगितले जाते त्या आल्या. औंढा नागनाथ हे मंदिर तर एका रात्रीत बांधुन पुर्ण झाले असे म्हटले जाते. मग फक्त एकांतवासचे एक वर्षाच्या काळात भारतातील बहुतेक सर्व राज्यांना पांडवांनी भेटी दिल्या होत्या काय? आणि एकांतवास भंगु नये म्हणुन ते जर सतत जागा बदलत असतील तर किती कमी वेळात हे बांधकाम झाले असेल?. ( पण एकांतवासात पांडव हे विराट राजाच्या दरबारी आश्रयाला होते.) का त्यांनी फक्त कोनशीला बसवीली आणि नंतर ते बांधकाम तिथल्या स्थानिक लोकांनी बांधकाम क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मदतीने पुर्ण केले. कारण मुळात असे कोरिव बांधकाम करायला अनेक वर्षे लागतात. कारण ताजमहाल बांधायला ही ३० वर्षाच्या वर काळ लागला होता तेही हजारो मजुर असताना आणि कुशल कारागिर असताना. मग बांधकाम क्षेत्रातील कुशलता ५ पांडवांपैकी कोणत्या पांडवाकडे होती? कारण गुरुकुलातले शिक्षण तर शस्त्रविद्या संबंधी झाले होते. जाणकार लोक काही प्रकाश टाकतील काय?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24667 views

🗣 चर्चा (106)
प
प्रचेतस Mon, 01/27/2014 - 11:14 नवीन
ते नै सांगता येत. असतीलही कदाचित. पांडववंश तसा बराच प्राचीन होता. गुप्तांच्या आधी ते कुषाणांचे मांडलिक होते. पण ते मुख्य राज्यकर्ते कधीही झाले नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/27/2014 - 11:18 नवीन
धन्यवाद. कुशाणांचे मांडलिक म्हणजे बरेच प्राचीन आहेत तर!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/27/2014 - 11:22 नवीन
हो ना. साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून. सुरुवातीला ते झारखंड भागात होते. नंतर साधारण ४ थ्या शतकात कुणा तिकडच्याच हस्ति नामक राजाने त्यांचा पराभव केल्यावर ते खाली छत्तीसगडला स्थलांतरीत झाले. साधारण पाचव्या शतकाच्या शेवटी पांडववंश अस्तंगत झाला.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/27/2014 - 11:29 नवीन
इंटरेस्टिंग! साला भारतीय इतिहासाची चौकट तयार असली तरी चित्र खूप अर्धवट आहे अजून. असे किती राजवंश असतील अन किती लोकांचा इतिहास हमेशा हमेशा के लिए गायब झाला असेल काय ठौक. भारतभर राज्य असणार्‍या अशोकाबद्दलही चाळीसेक शिलालेख सोडल्यास फारसे काहीच सापडू नये हे आश्चर्य!!!! इन्शागणपती, हे मधले व्हॉईड्स निघून जातील हळूहळू.....
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 01/27/2014 - 11:47 नवीन
बॅट्या साहेब, वल्ली साहेब याला जबाबदार खरं तर मुस्लिमांची झालेली परकीय आक्रमणे,आणि त्यानंर आलेले गोरे लोक कारणीभुत.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 01/27/2014 - 12:30 नवीन
किती लोकांचा इतिहास हमेशा हमेशा के लिए गायब
पुराणातून अनेक वंशावळी दिलेल्या असतात, त्याबद्दल नीट अभ्यास करून सुसूत्र असे कुणी लिहिलेले आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/27/2014 - 13:14 नवीन
ते माहित नै. पण बर्‍याच राजवटींच्या शिलालेखात अथवा ताम्रपटांत वंशावळी सापडतात. मला वाटते चंद्रगुप्ताच्या दरबारी असलेल्या ग्रीक राजदूत मेगास्थेनीसने कुरुकुलाच्या १५३ राजापर्यंत वंशावळ लिहिलेली आहे. तर राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, होयसाळ इत्यादी सर्वच द्वारकाधीश कृष्णापर्यंत आपले पूर्वज नेऊन भिडवतात. कदाचित आपले हे (मानलेले) पूर्वज म्हणजे त्यांची राजकीय गरज असेल.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/27/2014 - 13:29 नवीन
पुराणातून अनेक वंशावळी दिलेल्या असतात, त्याबद्दल नीट अभ्यास करून सुसूत्र असे कुणी लिहिलेले आहे का?
हो. ई एफ पार्गिटर नामक एका साहेबाने तसा प्रयत्न केलेला आहे. पुराणांतील वंशावळींतून इतिहास शोधायचा अन तो मांडायचा महत्पराक्रम त्याने केलाय पण ते काम खूप जुने आहे. त्याच्यानंतर ते काम किती पुढे गेलं ते ठौक नाही. त्याचे पुस्तक इथे पीडीएफ स्वरूपात वाचता येईल. मी अजून हे वाचलेले नाही, असे काम झालेय इतपतच ठौक आहे. बाकी मग वल्ली म्हणतो ते खरेच आहे. ताम्रपट इ. ठिकाणांतून वंशावळी दिलेल्या असतात. पण कुठल्या वंशावळीतील कुठले राजे अन्य पुराव्यांतून माहिती आहेत ते समग्रपणे कुणी पाहिलेय की नाही, किंबहुना पार्गिटरसाहेबाने तरी ते काम कितपत केलेय ते मला ठौक नाही. पाहिले पाहिजे. अन मेगास्थेनिसने दिलेल्या वंशावळीचा उल्लेख पहिल्यांदाच वाचला.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/27/2014 - 13:30 नवीन
अर्र लिंक गायबली वाटतं. ही घ्या लिंक.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 01/27/2014 - 17:37 नवीन
पार्गिटर साहेबाच्या कामाबद्दल वाचले होते, आता खुद्द ते पुस्तक वाचले पाहिजे. खरंच टोपीकर साहेबाने काय काय अभ्यास करून ठेवलेले आहेत, ते बघून कौतूक वाटते ( हल्लीची शासकीय फ्याशन म्हणजे इंग्रज कित्ती वाईट्ट आणि हिंदु आणि मुसुलमान कित्ति कित्ति गोग्गोड आणि गळ्यात गळा घालून हिंडणारे देश्भक्त वगैरे असे सांगायचे) मागे मला हिंदुस्थानातील (म्हणे) सर्वात प्राचीन (थेट वेदात उल्लेखिलेला वगैरे) 'कालिंजर' हा किल्ला बघायला जायचे होते, (तेंव्हा चोम्पुतेर, नेत वगैरे नव्हते) अजिबात कुठे माहिती मिळत नव्हती, शेवटी दिल्लीत एका लायब्रीत धूळ खात पडलेल्या शंभरेक वर्षांपूर्वीच्या प्रचंड बाडांमधे अगदी डीटेलवार माहिती, चित्रे, खेडेगावांचे वर्णन, तिथली लोकसंख्या (आता अगदी हास्यास्पद वाटणारी), उद्योगधंदे, वगैरे सापडले. हा किल्ला 'चित्रकूट' (करवी स्टेशन) जवळ असून खुद्द चित्रकूट आणि कालिंजर बघण्यासारखे आहे. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मी पूर्वी पुरातत्व विभागाच्या फोटो सेक्शन मधे नेहमी जाऊन बाडे चाळत बसायचो. स्वातंत्र्यपूर्व काळात टोपीकरांनी अतिशय मेहनतीने (घोड्यावरून अवजड साहित्य नेऊन) काढलेले पुरावशेषांचे उत्कृष्ट फोटो बघायला मिळायचे, आणि अल्प किंमतीत प्रिंट काढून देत असत. स्वातंत्र्योत्तर काळातील फोटो कसले, तर अमूक जागी नेहरू, इंदिराजीण, वा मंत्री वगैरे गेलेले असताना त्यांचे काढलेले फोटो. नंतर तर ते प्रिंट काढून देणे वगैरे बंदच झाले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/27/2014 - 21:03 नवीन
...शंभरेक वर्षांपूर्वीच्या प्रचंड बाडांमधे अगदी डीटेलवार माहिती, चित्रे, खेडेगावांचे वर्णन, तिथली लोकसंख्या (आता अगदी हास्यास्पद वाटणारी), उद्योगधंदे, वगैरे सापडले. हा पाश्चिमात्यांचा गुण आणि त्याबरोबर त्यांचे संघटनकौशल्य कौतूकास्पद आहे. त्यांना धडाडीने आणि चिकाटीने केलेल्या जगप्रवासाची साथ देवून सगळा वसाहतवादाचा कालखंड निर्माण केला गेला.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 01/28/2014 - 08:33 नवीन
टोपीकरांनी इतके प्रचंड काम करून ठेवले आहे की त्याला तोड नाही. टोपीकर नसते तर मौर्य साम्राज्याला आपण विसरून गेलो असतो. अहो जिथे तुघलकाच्या काळातही लोक अशोकाला विसरले होते तिथे आजची काय कथा? तुघलकाने अशोकाचा एक स्तंभ फरपटत आणला अलाहाबादजवळ आणि पंडितांना लावले कामाला, वाचा यावर काय लिहिलेय ते म्हणून. पण ती लिपी होती ब्राह्मी, कुणाला काहीच कळेना. जेम्स प्रिन्सेप नसता तर ही लिपी अन त्याबरोबर बाकीचे सर्व काही गेले असते विस्मृतीच्या गर्तेत. कालिंजर किल्ल्याची माहिती रोचक वाटतेय. पाहिला पाहिजे एकदा. पुरातत्त्व विभागात अशा प्रिंटा वैग्रे काढून देत असत हे ऐकून खरेच डॉळे पाणावले. इतके जनताभिमुख कसे काय झाले काय की???? एक हस्तलिखिताची झेरॉक्स जर मिळवायची झाली तर इतक्या खटपटी लटपटी कराव्या लागतात की कळायचं बंद होतं. कसला रिसर्च आणि कसलं काय :(
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 01/28/2014 - 09:10 नवीन
अतिशय भिन्न संस्कृती, प्रदेश व आचारविचारांच्या लोकांवर राज्य करायची, व त्या राज्यशटकातुन अर्थप्राप्ती करण्याची महत्वाकांक्षा टोपीकरांच्या पथ्यावर पडली असावी. व्यापार, विद्यार्जन, कला वगैरे बाबतीत विचारांचे आदान-प्रदान करताना युरोपेतर भागातही डॉक्युमेण्टेशन बर्‍यापैकी होत असावे (युआन स्त्वांगच्या भारतभेटी दरम्यानचे प्रवासवर्णन किंवा जुन्या भारतीय विद्यापीठांची वाचनालयं वगैरे अगडबंब होती असं म्हणतात. आपल्या जयंत कुलकर्णी साहेबांनी मध्यपूर्वेतील जुन्या इस्लामी राजवटींच्या कला-विज्ञान-साहित्य-ज्योतिष वगैरे भरभराटीवर काहि लेख लिहीले आहेत.)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/31/2014 - 19:09 नवीन
इन जण्रल युरोपात डॉक्युमेंटेशनची परंपरा लै जुनी आहे- तिचा उगम ग्रीकोरोमन परंपरेत सापडतो. राज्यविस्तारामुळे त्याला चालना मिळाली हे मान्यच. पण ते सोडूनही तिथे इतिहासलेखन तगडे आहे. अर्थात रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर अन इ.स. १२०० च्या आधी तिथे कितपत चालायचे देव जाणे. त्या पीर्यडमध्ये बायझँटाईन साम्राज्य इतर युरोपाच्या तुलनेत बरेच पुढे होते.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 01/31/2014 - 19:42 नवीन
भारतातला पहिला लिहिला जाणारा ग्रंथ "जय" जो पुढे महाभारत म्हणून ओळखला जातो. याचा रचनाकाल ई.स.पूर्व ३१०० असा आहे.हा ग्रंथ वेदव्यास यांनी सांगितला व प्रत्यक्ष गणपतीने याचे लिखाण केलेले आहे असे मानले जाते. पण गणपतीची अट होती कि लिहितांना थांबणार नाही(म्हणजे वेदव्यासांनी सांगणे थांबू नये). तेव्हा वेद्व्यासांनीही एक अट घातली कि गणपतीने कोणताही श्लोक पूर्ण समजल्याशिवाय लिहू नये.(व जेणे करून वेद व्यासांना विचार करायला वेळ मिळावा). या अटीपायी वेद व्यासांनी जय मध्ये १८०० कुट प्रश्न सागितले आहेत, जे गणपतीला समजायला वेळ लागला व वेद व्यासांना पुढील श्लोकरचना करायलाहि अधिक वेळ मिळाला. त्यावेळेला हे सर्व लिखाण भूर्जपत्रावर केले जात असे. हे सर्व लिखाण ज्याला बाड(लाल कपडयात)मध्ये बांधून ठेवले जात असे,जी परंपरा आजही भारतात पाळली जाते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/31/2014 - 21:24 नवीन
तुम्ही पु ना ओकांचे शिष्य काय हो? नै म्हणजे परवाच गणपतीला मी भेटलो आणि त्याला हे सांगितल्यावर तो इतका चिडला की सोंडेचा फटकाराच बस्णार होता, पण थोडक्यात वाचलो. म्हणाला, लोकांना कामधाम नै. एकेकाला लाथा घातल्या पाहिजेत. उगीच फेकाफेक करत बसतात. त्याच्या हातातला लाडू खाली पडला. मी खाणार होतो, पण त्याचा राग पाहून सटकलो.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 01/31/2014 - 21:33 नवीन
नाही हो आम्ही कोणाचे शिष्य नाही, आणि कोणी आमचा गुरु नाही.(आमची कोठेही शाखा नाही ह्या धर्तीवर) प्रगत मेंदू हेच आमचे साधन आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/31/2014 - 21:35 नवीन
प्रगत मेंदू हेच आमचे साधन आहे.
प्रगत वगैरे सोडा, मेंदू वापरता याबद्दल साशंक आहे.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 01/31/2014 - 21:44 नवीन
अर्थात हा प्रश्न(प्रोब्लेम या अर्थी)आपला आहे, माझा नाही. सूचना: १) मिपा हे साधन उत्तम रित्या सकारात्मकपणे (Positively) वापरली जाऊ शकते, मी ह्या बाबतीत ठाम आहे. २) खाली पडलेली वस्तू (मग ती अगदी देवाच्या हातातील लाडू असली तरी)खाऊ नये,अशी विनंती.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/31/2014 - 21:50 नवीन
मिपा हे साधन उत्तम रित्या सकारात्मकपणे (Positively) वापरली जाऊ शकते, मी ह्या बाबतीत ठाम आहे.
जाहिरात करणे अन तेच तेच चर्‍हाट लावणे हे पॉझिटिव्ह नाही या बाबतीत मी ठाम आहे.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 01/31/2014 - 22:11 नवीन
मी कुठलीही जाहिरात केलेली नाही व मुद्दा सोडून लिहित नाही. आपल्या(तेच तेच)वाचण्यातच खूप मोठ्ठी चूक होत आहे असे दिसते. असो. असे अवांतर मुद्दा सोडून लिहिण्याऐवजी व्यनी चा चपखल पणे वापर करावा, हि विनंती.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/31/2014 - 22:16 नवीन
चालूद्या.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 02/01/2014 - 04:48 नवीन
हे सर्व लिखाण भूर्जपत्रावर केले जात असे. हे सर्व लिखाण ज्याला बाड(लाल कपडयात)मध्ये बांधून ठेवले जात असे,जी परंपरा आजही भारतात पाळली जाते.
म्हणजे मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे म्हणजे त्यच्यातील त्याच्यातील हस्ताक्षर गणपतीचे असणार गणपती देव आहे...म्हणजे तो अमर आहे म्हणजे सोंड असलेला माणुस शोधला की सापडला गणपती =))
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 02/01/2014 - 08:15 नवीन
"मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे" ही शक्यता एक खर्व(१००,०००,०००,०००) मध्ये एक आहे. याचे कारण देशावर झालेलले अगणित आक्रमणे, लुटालूट व जाळपोळ. सोरटी सोमनाथावर १६ आक्रमण झालेले सर्वश्रुत आहेच. नुसते एका तक्षशीला(सध्याचे पाकिस्थान) विश्वविद्यालयाबद्दल बोलायचे झाले तर आक्रमणकर्त्यांनी लावलेली आग सलग अडीच वर्षे धुमसत होती, विचार करा किती लिखाण जळाले असेल येथे! अजून एक विनंती: आपल्याला विडंबनाची, फालतू जोक्स करायची आवड असेल तर नवीन धागा अवश्य काढावा, आम्हालाही हसायला आवडतेच कि! (किमान पक्षी, आपले अज्ञान लोकांसमोर येणार नाही याची काळजी घ्यावी.)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 02/01/2014 - 12:43 नवीन
"मुळ प्रत कुठेतरी असली पाहीजे" ही शक्यता एक खर्व(१००,०००,०००,०००) मध्ये एक आहे. याचे कारण देशावर झालेलले अगणित आक्रमणे, लुटालूट व जाळपोळ. सोरटी सोमनाथावर १६ आक्रमण झालेले सर्वश्रुत आहेच. नुसते एका तक्षशीला(सध्याचे पाकिस्थान) विश्वविद्यालयाबद्दल बोलायचे झाले तर आक्रमणकर्त्यांनी लावलेली आग सलग अडीच वर्षे धुमसत होती, विचार करा किती लिखाण जळाले असेल येथे!
अगदी बरोबर...हे मलासुध्धा माहित आहे माझा मुद्दा असा आहे की "जर महाभारत खरोखरच गणपतीबाप्पाने लिहिले आहे असे मानले तर त्याच्यामुळे मी लिहिलेले बाकी मुद्देसुध्धा बरोबर ठरतात की" मला इतकेच लिहायचे आहे की "ज्याने कोणी महाभारत लिहिले/सांगितले तो मर्त्य मानव'च' होता पण त्याला गणपतीबाप्पाने खरोखरच खुप बुध्धी दिली होती" याउप्पर जर बाकी काहिही अर्थ काढायचा असेल तर त्याला मी काय करणार
अजून एक विनंती: आपल्याला विडंबनाची, फालतू जोक्स करायची आवड असेल तर नवीन धागा अवश्य काढावा, आम्हालाही हसायला आवडतेच कि!
नक्की
(किमान पक्षी, आपले अज्ञान लोकांसमोर येणार नाही याची काळजी घ्यावी.)
माझ्या या प्रतिसादात मी काय अज्ञान दाखवले ते जरा इस्कटुन सांगता का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 02/02/2014 - 13:22 नवीन
आयला...किती वेळ वाट बघायची??
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 02/02/2014 - 16:14 नवीन
गणपती देव आहे...म्हणजे तो अमर आहे म्हणजे सोंड असलेला माणुस शोधला की सापडला गणपती
सातच चिरंजीव आहेत, ज्यात गणपतीचा उल्लेख नाही. सोंड असलेला माणूस शोधून दाखवावा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 02/03/2014 - 16:08 नवीन
सोंड असलेला माणूस शोधून दाखवावा.
हाहाहा...वाटलच होतं असा काहितरी प्रतिसाद येणार...माझ्याकडे उत्तर तयार आहे पण जोपर्यंत माझ्या "सगळ्या" प्रश्नांची उत्तरे येत नाहीत तोपर्यंत मी वाट बघणार तुम्हाला तुमच्या माहीतीवर विश्वास असेल तर माझ्या "सगळ्या" प्रश्नांची उत्तरे द्या...मग आपण पुढे बोलु
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 02/02/2014 - 13:39 नवीन
हा ग्रंथ वेदव्यास यांनी सांगितला व प्रत्यक्ष गणपतीने याचे लिखाण केलेले आहे असे मानले जाते.
माझ्या मते ही महाभारत हे गणपतीने लिहिले हे बहुधा महाभारतातील सर्वात शेवटचे प्रक्षिप्तीकरण आहे. बहुधा सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान. संपूर्ण महाभारतात गणपतीचा उल्लेख इतर कुठेही नाही. याशिवाय महाभारताच्या सर्वच पर्वांची सुरुवात "नारायणं नमस्कृत्य....." या श्लोकाने होते हे विशेष.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/28/2014 - 09:38 नवीन
टोपीवाले इतिहास किंवा इतर लेखन करतांना खूप कष्ट घेतात हे खरे . कलिंजरची उत्सुकतापोटी मी पण मुंबईच्या वल्ड ट्रेड सेंटरमधल्या उ प्र पर्यटनातून बरीच पत्रके आणली होती . मी आता विल्यम डर्लिंपल (जयपूर लिट फेस्टि करणारा) चे 'व्हाईट मुघल्स' आणि 'लास्ट मुघल्स वाचतो आहे . इतिहास {रंजक} कसा लिहावा याचे उत्तम उदाहरण .
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/27/2014 - 14:46 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 01/28/2014 - 00:19 नवीन
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_ _/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_ _/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 01/28/2014 - 05:59 नवीन
हाहाहा. चर्चा तर होणारच. :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/27/2014 - 09:41 नवीन
मूळ प्रश्न अजिबात अनुत्तरित राहिलेला नाही . एक एक देऊळ घ्या(पांडवांनी बांधले एका रात्रीत सांगतात ते) तेथील स्थानिक काहीही आख्यायिका सांगोत ती वास्तु पांडवांनी सोडा पांडवकालीन सुध्दा ठरणार नाही . पण यावरून असा आग्रह धरता येणार नाही की पांडवांनी /कौरवांनी काहीच बांधकाम केले नाही .
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 01/27/2014 - 09:56 नवीन
प्रश्न खरा आहे .... :)
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Mon, 01/27/2014 - 14:45 नवीन
>>कोणत्याही प्रकारचे वर्चस्व हे प्रथम मनात निर्माण करायचे असते... मनाने गुलाम झालेल्यांना भौतीक, राजकीय, आर्थिक गुलाम बनवायला फार श्रम पडत नाहीत. गेल्या अनेक शतकांत रुजवलेली "पश्चिमेचे ते सगळे सोने" आणि "आपले ते सगळे माती" ही विचारसरणी किती भारतियांच्या मनातून गेली आहे? योगशास्त्रही भारतिय म्हणून बुरसटलेले होते, पण ते पश्चिमेकडून "योगा" बनून आले तेव्हा कॉन्व्हेंट-शिक्षित हुच्चभ्रू समाजालाही त्याच्यावर सोन्याची झळाळी दिसू लागली. १७-१८ व्या शतकापर्यंत भारत आणि चीन यांचा प्रत्येकी सर्व जगाच्या एक त्रितियांश व्यापारावर कब्जा होतो हा इतिहास आपण कधीच विसरून गेलो आहे. अमेरिकेच्या पहिल्या दोन शतकात तेथे गेलेले युरोपियन्स त्यांच्या राजांच्या जुलूमाला आणि गरीबीला कंटाळून जिवावर उदार होऊन गेले होते हे किती जणांना आठवते? युरोपच्या सम्राटांची आणि अगदी लहानसहान राजांची नावे आठवतात याचे आपल्याला किती कौतूक असते पण भारताच्या इतिहासाच्या अज्ञानाचे दु:ख वाटत नाही. डिसइन्फरमेशन / मिसइन्फर्मेशन कँपेन हे एक फार मोठे मानसिक साधन (सायकॉलॉजीकल टूल) आहे आणि त्याचा उपयोग युद्धकाळात होतो तितकाच (किंबहुना त्यापेक्षा जास्त) शांतताकाळातही होतो. आताही जागतिक आणि भारतिय राजकारणात आपण काय फार वेगळे बघतो आहोत काय?<<< >>>भारतीय लोक मेंढरांसारखे असतात/ आहेत हा आजचा प्रवाद काही विचारवंत करताना दिसतात. फारसा चुकीचा नाही. पण त्यामागची मनोरचना, समाजरचना, इतिहास सोयिस्कर रित्या विसरला जातो का एवढंच पहायचं होतं. प्रचंड चळवळ्या युरोपियनांनी, अमेरिकेनं जगाला बंदिशाळेत परिवर्तित केलं, आपल्याला सोयिस्कर असे शोध लावले नि अत्यंत बहिर्मुख बनवलं. आज आम्ही भारतीय त्यांचं अंधानुकरण करण्यात कृतकृत्यता मानतो. बाकी कोलंबस महाशय भारताकडंच जाणीवपूर्वक निघाले होते म्हणे. (भय्ये मुंबईला येतात तसंच असावं)<<< >> ई एफ पार्गिटर नामक एका साहेबाने तसा प्रयत्न केलेला आहे. पुराणांतील वंशावळींतून इतिहास शोधायचा अन तो मांडायचा महत्पराक्रम त्याने केलाय पण ते काम खूप जुने आहे. त्याच्यानंतर ते काम किती पुढे गेलं ते ठौक नाही.<<< जळ्ळं....हे पण मेल्या त्या गोर्‍या मा**नेच केलयं की काय...?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/27/2014 - 16:47 नवीन
जळ्ळं....हे पण मेल्या त्या गोर्‍या मा**नेच केलयं की काय...?
तसं कै नै. आपल्याकडेही डॉ. ग. ह. खरे, डॉ. वा. वि. मिराशी, डॉ. भगवानलाल इंद्रजी, डॉ. शोभना गोखले यांसारखे जागतिक किर्तिचे इन्डोलॉजिस्ट होऊन गेले. जबरदस्त कार्य केलंय या लोकांनी. अर्थात ह्यांची जितकी कदर व्हायला पाहिजे तितकी झाली नै हेदेखील तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/27/2014 - 16:52 नवीन
हेच तर मी म्हणतोय. भारतीय लोकाना भारतीय गोष्टींपेक्षा "इंपोर्टेड" गोष्टींचे जास्त आकर्षण आहे हीच खरी शोकांतिका आहे :(
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 01/28/2014 - 06:21 नवीन
आजकालच्या सुनांना लेकीच्या आडुन सांगावं लागत नाहि महाराज (फ्फ्फ्फु ची स्मायली)
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Mon, 01/27/2014 - 17:16 नवीन
याला म्हणावे 'मे़काले इफेक्ट'.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Mon, 01/27/2014 - 17:20 नवीन
इंपोर्टेड गोष्टि त्यान्च्या विस्तृत डोक्युमेन्टेशन मुळे लिलया उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील भारतिय संशोधन तसे उपलब्ध आहे का? कदाचित हीच खरी शोकन्तीका असावि. वल्ली नी दिलेली सगळि नावे शोधतेय. डॉ. वासुदेव वीष्णु मिराशी यान्चे विकी पान दिसले, पण डॉ. भगवान्लाल ईन्द्राजी आणि डॉ. शोभना गोखले यान्चे विकि पान सुद्धा दिसत नाहीये. काही लिंन्क्स मिळु शकतील का, सिरियसलि...?
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 01/31/2014 - 05:43 नवीन
डॉ. भगवान्लाल ईन्द्राजी आणि डॉ. शोभना गोखले यान्चे विकि पान सुद्धा दिसत नाहीये. तर मग बनवायला नको? आपण नाही तर आपला इतिहास अजून कोण लिहिणार? 'अरे! डॉ.शोभना गोखले हे पान नाही. बनवू या! सगळे मिळून मदत करा.' असा धागा का नाही काढला? सगळ्यांच्या मदतीने पान सहज तयार झाले असते. अजूनही तयार करा. मजकूराच्या विकिकरणाची मदत मी करेनच.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/31/2014 - 09:31 नवीन
ही कल्पना फार छान आहे. जाणकारांनी यात लक्ष घालावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Sun, 02/02/2014 - 04:48 नवीन
तात्पर्य काय की लिन्का नाहियेत...धन्यवाद! अवांतरः माझे काम आणि आवड दोन्हीही वाचनाशी संबन्धित असल्यामुळे ते मी भरपुर करतेच. त्यामुळे लोकांना लिहितं करणार्‍या उपक्रमाचे अभिनंन्दन आणि खुप खूप शुभेछा!! ईतके लोक लिहिणार ते वाचायला माझ्यासारखे फडश्यापाडु वाचक हवेतच ना.. तुमच्यासाठी हे.मा.शे.पो. कारण चर्चा भरकटतेय. चर्चेशी सुसन्गत काही वाटले तर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. प्रत्युत्तर ना देण्यासाठी पुनःश्च धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 02/02/2014 - 11:27 नवीन
लिंका शोधायचा बराच प्रयत्न केला पण दुर्दैवाने ह्या संशोधकांविषयी अत्यल्प माहिती जालावर उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/02/2014 - 12:30 नवीन
जाणकारांनी त्यांचे लेखन मराठी विकीवर (जर अधिकारमुक्त असेल तर) टाकायचा विचार केला पाहिजे असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 02/02/2014 - 14:16 नवीन
त्यांच्याबद्दलची माहिती मराठी विकीवर नक्कीच टाकू शकेन. बाकी इंद्रजी आणि मिराशी यांचे लेखन प्रताधिकारमुक्त असावे. अर्काईव्ह.ओआरजी वर ते उपलब्धही आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/02/2014 - 16:55 नवीन
वल्लीसाहेब, मग घ्याच मनावर हे भले काम. तुमच्यासारखा व्यासंगी माणूसच ते उत्तम प्रकारे करू शकेल. मराठी विकीवर असे लेखन आले तर मराठी वाचकांना सबळ शास्त्रीय माहिती तर मिळेलच पण भारतिय इतिहासाबद्दलचे अनेक गैरसमज दूर व्हायलाही मदत होईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/28/2014 - 01:13 नवीन
सर्वात जुन्या हिंदू लेण्या वेरूळ ,बदामी ,महामल्लपुरम येथे आहेत त्या चौथ्या शतकानंतरच्या आहेत . बांधलेली देवळे नाचणा ,देवघर (म . प्र ) पाचव्या शतकात गुप्ता काळातील आहेत . नशीब त्यांनातरी पांडवांच्या नावावर खपवत नाहीत .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/02/2014 - 15:52 नवीन
पुण्यात गोखलेनगरच्या आसपास पांडवनगर नावाचा भाग आहे. हा भाग पांडवांनी वसविलेला आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 20 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 27 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा