Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?

ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर
गुरुवार, 01/16/2014 - 10:54
🗣 203 प्रतिसाद
आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-mangement-work-is-government-badve-utpat-appeal-rejected-by-su-4494499-NO.html अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 30808 views

🗣 चर्चा (203)
स
सचीन Fri, 01/17/2014 - 07:35 नवीन
कुठल्याही मंदिरात जो पैसा येतो तो सर्व सामान्य जनतेचा असतो. ह्या पैसा सरकारात जमा झाला तर मंदिरासाठी लागणारा खर्च वगळता इतर पैसा हा विकासकामासाठी वापरता येवू शकतो.
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Fri, 01/17/2014 - 07:49 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Fri, 01/17/2014 - 08:27 नवीन
काय्च्या काय (न्हेमीपरमानं) ! उलट अन्भ्व असा हाय की पुधारी आप्ली पिलावळ अश्या जागात बसवतान नी मलाई खातान. विकासकाम करायच अस्त तर टॅक्साचा पैका कायाला स्कॅमा आनि भ्रश्टाचारामादी खाल्ला अस्ता सर्कारच्या मन्त्र्यासन्त्र्यान्नी. आता हे न्विन कुरण झालं, नायका? आता स्कॅमातून थोडा उरलासुरला (ल्येफ्ट ओवर का का ते) भाटमंडलींच्या बी पुढ्यात पडतया म्हना, नाय्का?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/17/2014 - 09:42 नवीन
सचिनराव , गेले काही दिवस तुमची बॅटिंग बघतो आहे ...तरीही केवळ न राहवल्याने ... आता इथे केवळ उत्सुकतेपोटी एक प्रश्न विचारत आहे हज यात्रेवर होणार्‍या सरकारी खर्चाविषयी आपले काय मत आहे ? तो पैसा कोणाचा असतो ? आणि हाच पैसा सरकार जमा केला तर मुस्लिम समाजातील अशिक्षितता , बेकारी , गरीबी वगैरे विषयक विकासकामांकरीता वापरता येईल का ? आणि ह्याला तुम्ही जे काही उत्तर द्याल ते किती आयडीलिस्टीक आणि किती प्रॅक्टीकल आहे ?
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 01/17/2014 - 09:45 नवीन
मलाही हाच प्रश्न पडला आहे. सचीनराव उत्तराच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/17/2014 - 09:47 नवीन
हज यात्रेची तर अजूनच मजा आहे. हजला जायचे तर स्वतःच्या कमाईच्या पैशातून जायचे असे इस्लाम सांगतो. तस्मात हज सबसिडी इटसेल्फ इज गैरइस्लामी. पण सोयीचे असल्याने इथे तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 01/17/2014 - 09:48 नवीन
आणि गंमत म्हणजे एअर इंडियातूनच जायची सक्ती आहे. त्यामुळे तेही लोक वैतागलेत म्हणे.
  • Log in or register to post comments
उ
उद्दाम Sat, 01/18/2014 - 04:48 नवीन
http://halalinindia.com/hajjsubsidy.php
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/17/2014 - 09:54 नवीन
एअर इंडीयाला चार पैसे सुटावे म्हणुन हज सबसीडीचा फास रचण्यात आला. त्यामागचं लॉजीक आठवत नाहि, पण हज सबसीडीचा पैसा स्वस्त हवाई सेवा देण्याच्या बहाण्याने एअर इंडीयाच्या खिश्यात जातो असं काहिसं गणीत होतं.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/17/2014 - 10:06 नवीन
शक्यता नाकारता येत नाही. पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 01/19/2014 - 07:26 नवीन
वस्तुस्थिती ह्याउलट आहे. सरकारी उपक्रमासाठी एयर इंडियास राबवण्यात येते, आणि तेही घाट्याच्या व्यवहारात! सौदीबरोबरील करारानुसार, एयर इंडियाची जी विमाने हज्ज यात्रेकरूंना भारतातून तिथे नेतात, त्यांना उलट प्रवासासाठी प्रवासी घेण्याची मुभा नाही, तेव्हा ती तशीच रिकामी परत येतात! ह्याविषयीच्या 'ऐसी' वरील एका चर्चेत ह्याचा उहापोह झाला होता. तिथे सविस्तर वाचावे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/19/2014 - 09:57 नवीन
>>> सौदीबरोबरील करारानुसार, एयर इंडियाची जी विमाने हज्ज यात्रेकरूंना भारतातून तिथे नेतात, त्यांना उलट प्रवासासाठी प्रवासी घेण्याची मुभा नाही, तेव्हा ती तशीच रिकामी परत येतात! बापरे! म्हणजे दुहेरी तोटा!! हे नादान काँग्रेसवाले मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करून देशाला अजून किती खड्ड्यात घालणार आहेत? काँग्रेस अधिवेशनात बाह्या सरसावत काहीतरी असंबद्ध बरळणारे राजपुत्र या विषयावर का मौन पाळतात?
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Fri, 01/17/2014 - 10:01 नवीन
बहुतांश मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत.. व्याज खाणे हे देखिल पवित्र कुराणाने वर्ज्य सांगितले आहे, त्यामुळे बहुतांश मुस्लिम बांधव व्याज बँकेला परत करतात असे मी पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/17/2014 - 10:04 नवीन
बहुतांश नको , टक्केवारी द्या !
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Fri, 01/17/2014 - 10:09 नवीन
९९ टक्के मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत ,स्वखर्चाने जातात.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Fri, 01/17/2014 - 10:28 नवीन
टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १००% टॉपगिअर्ड थाप ! हर देशाला हजसाठी किती इसम पाटव्वयचे त्याचा कोटा असतोया. भारताचा कोटा हज कमिटी ओफ इंडियातर्फे भरला जातो पिलोसोपरसाब आणि सर्कारी खर्च त्या कमिटीच्या सहमतिने क्येला जातो. आत्त ती मदन न घेनारे किती जास्त आन् न घ्येनारे किती थ्योडे त्ये हितं बगा बगा क्येला ना कचरा विंटरनेटनं तुम्च्या फेलोफिला नुट्रल्गियर मद्दी टाकून ... ही ही ही ही ही ही ही ही ही ही ही ही ही
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 01/17/2014 - 10:36 नवीन
:D
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/17/2014 - 10:50 नवीन
टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Fri, 17/01/2014 - 14:39 ९९ टक्के मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत ,स्वखर्चाने जातात.
ओके . http://en.wikipedia.org/wiki/Haj_subsidy इथे मिळालेल्या माहीती नुसार २०११ साली १२५,०५१ इतके लोक सबसीडी घेवुन हज ला गेले , तुमच्या मते हे केवळ १% आहेत , अर्थात २०११ साली भारतातुन हज ला गेलेल्यांची संख्या १,२५,०५,१०० ( अक्षरी : एक कोटी पंचवीस लाख पाच हजार शंभर फक्त ) इतकी आहे तर !! ओके . __________________________________________________________ इथे आपली चर्चा संपते !
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Fri, 01/17/2014 - 10:52 नवीन
त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी ते पैसे परत केले होते असे वाचलेले.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/17/2014 - 10:57 नवीन
कुठे ते बोला नाहीतर ही तुमची मुक्ताफळे आहेत असेच समजावे लागेल. एकतर आधी अनरिअलिस्टिक विधाने करायची अन खोपच्यात सापडले की विधाने बदलायची हे नेहमीचं आहे नाही का मोपेड फिलॉसॉफर?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/17/2014 - 11:01 नवीन
कुठे वाचले होते ? कारण २००९ साली झाला इतकाच खर्च २०११ साली झाला असे गृहीत धरले तरी तो खर्च INR 8647.7 million (अक्ष्ररी : जाऊनद्या आता तुमचं तुम्हीच वाचा ) http://en.wikipedia.org/wiki/Haj_subsidy असे मलातरी कोणत्याही पेप्रात वाचायला मिळाले नाहीये , असे काही झाले असते तर किमान "द हिंदु " ने तरी नक्कीच छापले असते . आता तुम्ही कुठे छापुन आले होते ते शेयर कराच (तुमचे लॉजिक लक्षात आल्याने चर्चा संपली असे म्हणालो होतो , पण तुम्ही असा फुल्ल टॉस्स ताकल्यावर परत बॅटींगला यायची खुमखुमी आली . असो . आता मात्र चर्चा खरचं संपली .)
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Fri, 01/17/2014 - 11:13 नवीन
पवित्र कुराणाच्या नियमाने वागणारा मुस्लिम बांधव त्याच्या धर्माचरणाची बातमी करण्याच्या फंदात पडत नाही ,ते निस्वार्थीपणे हजचे पैसे परत करतात. पैसे परत केल्याची बातमी मी एका वर्तमानपत्रात वाचली होती ,आता त्याची लिँक सापडत नाहीए.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/17/2014 - 11:16 नवीन
म्हणजे सांगोवांगी अन वडाला वांगी. तुमचा गिअर मोडून पडला आहे ,पेट्रोल तर कधीचेच संपले होते.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/17/2014 - 11:21 नवीन
सब्सीडी एकदर्शी असते, ति आल्या चॅनलने परत करता येत नाहि हा संदर्भ गटण्या विसरला.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/17/2014 - 11:31 नवीन
यग्जाक्टलि.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/17/2014 - 11:19 नवीन
असे फुल्ल टॉस्स टाकु नका हो =)) ..... काम करु द्या , मी इन्कमटॅक्स भरला नाही तर सबसीडीला पैसे कमी पडतील =))
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/19/2014 - 15:24 नवीन
>>> पवित्र कुराणाच्या नियमाने वागणारा मुस्लिम बांधव त्याच्या धर्माचरणाची बातमी करण्याच्या फंदात पडत नाही पण धर्माचरणासाठी लाऊडस्पीकरवरून आवाज देतात त्याचं काय?
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Sun, 01/19/2014 - 17:44 नवीन
गणपती नवरात्र गरबा दिवाळीतले फटाके याबाबत मुस्लिम बांधवांनी णिषेध केला तर चालेल काय आपल्याला?तसेच आपणही त्यांना समजून घ्यावे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/19/2014 - 18:27 नवीन
आपले विचार किती सुंदर आहेत... बाय द वे... एक विचारायचे होते... पण नकोच राहू दे...
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Fri, 01/17/2014 - 17:34 नवीन
टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १०००% टॉपगिअर्ड थाप ! वर्ची लिंक वाच्ली नायका??? इनोदबी लैच झ्याक जमतया. का सप्नात कायबाय वाचून फकस्त डोस्क्यात आल्या त्या पूड्या सोडन्याला फिलोसोफि म्हंतात आसं वाटत तुमाला ?
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Fri, 01/17/2014 - 17:51 नवीन
फिल्लोसफ़र राव तुमचा "गिअर" तपासून पहा !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/19/2014 - 15:22 नवीन
>>> त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी ते पैसे परत केले होते असे वाचलेले. हे काँग्रेसच्या समाचारपत्रात वाचलेलं दिसतंय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/19/2014 - 15:20 नवीन
सहमत. विमान तिकिटाची जी काय नॉमिनल किंमत असेल ती मुस्लिम स्वतःच्या खिशातूनच देतात. त्यांना सबसिडीचा एक रूपयासुद्धा हातात मिळत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/17/2014 - 10:10 नवीन
इस्लामिक फायनान्सबद्दल भलतेच अज्ञान दिसते..कुणा मुसलमानाचे स्टेट बँकेत समजा खाते असेल तर तो व्याज परत करेल ही शक्यता अतिशय म्हणजे अतिशय कमी आहे. असे एकही उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. पण अलीकडे इस्लामिक बँकिंग नावाचा प्रकार रूढ होऊ पाहतोय ज्यात व्याज इ.इ. ब्यान आहे. साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की मग बँकव्यवसाय चालणार कसा? कारण व्याज आकारणी हा तर ब्यांकेचा आत्मा आहे. तर त्याचे उत्तर असे की व्याजाच्या नावाखाली नेहमी जे काही घेतले जाते ते अन्य मार्गांनी आणि वेगळ्या लेबलखाली घेतले जाते. थोडक्यात हिशेब एकच. धर्म काही सांगो, अर्थस्य पुरुषो दासः हे आणि हेच खरे आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 01/17/2014 - 14:00 नवीन
व्याजाच्या नावाखाली नेहमी जे काही घेतले जाते ते अन्य मार्गांनी आणि वेगळ्या लेबलखाली घेतले जाते. थोडक्यात हिशेब एकच. धर्म काही सांगो, अर्थस्य पुरुषो दासः हे आणि हेच खरे आहे.
अगदी हेच्च लिहायला आलो होतो. बर्‍याच इस्लामिक ब्यांका स्विस रेसिडेंट असतात**, कारण काही विशिष्ट कँटन (स्विस जिल्हे) त्यांना चिक्कार करसवलती देतात. इस्लाममध्ये "कर चुकवू नये" वगैरे काहीतरी असतं. त्याचं काय करतात कोण जाणे! ** "त्या" स्विस ब्यांका या नव्हेत
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/17/2014 - 14:07 नवीन
अच्छा, हे ठौक नव्हते. स्विस लोक बाकी खतरनाक बेरकी दिसतात एकदम. :)
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 01/17/2014 - 10:35 नवीन
त्यामुळे बहुतांश मुस्लिम बांधव व्याज बँकेला परत करतात असे मी पाहिले आहे.>> साफ खोटे आहे. पुराव्या द्या.
  • Log in or register to post comments
प
परिंदा Fri, 01/17/2014 - 14:30 नवीन
मुद्दलाच्या दुप्पट व्याज मिळवायचा धंदा पठाण लोक करायचे. ते मुस्लिमच होते ना ब्वा?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/19/2014 - 05:24 नवीन
मी एका बँकेत २ राज्ये आणि ५ शाखा, एक अ‍ॅडमिनि. ऑफिस एवढ्या जागी २५ वर्षे सर्व्हिस केली. एकाही मुस्लिमाने कधी व्याज परत दिलेले पाहिले नाही. उलट रत्नागिरीत एन आर आय ठेवी मोठ्या प्रमाणात मुस्लिम खातेदारांकडून येत असत. आणि ठेव रिन्यू करताना काही नियमांमुळे मधल्या कालासाठी कमी व्याज दिले तर आवर्जून विचारत असत. कोणीही खातेदारांनी जागरूक असणे चांगलेच, मला त्यात काही गैर वाटत नाही. तिथे धर्माचा काही संबंध येत नाही. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे गेले तर इस्लामिक देशांमधे बँका कायम तोट्यात चालल्या पाहिजेत कारण व्याजाच्या फरकातून मुख्यतः बँक चालवण्यासाठी पैसे येतात. मध्यंतरी कोणीतरी आर्थिक संस्थेने खास इस्लामिक म्युच्युअल फंडही काढला होता. डिव्हिडंड मिळाल्याशिवाय म्युच्युअल फंड कसा काय चालवता येईल?
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Sun, 01/19/2014 - 05:40 नवीन
ईस्लामिक देशात बँका फक्त सेव्हिंग अकांऊट चालवतात व नॉमिनल व्याज देतात, त्यांची भिस्त कर्जाच्या व्याजावर असावी.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/19/2014 - 10:28 नवीन
ईस्लामिक देशात बँका फक्त सेव्हिंग अकांऊट चालवतात व नॉमिनल व्याज देतात, त्यांची भिस्त कर्जाच्या व्याजावर असावी. वरचे वाक्य पाहून इतकेच खात्रीने सांगू शकतो की तुमचे इस्लामिक बँकिंगचे अज्ञान अगाsssध आहे ! त्यातले तीनही दावे इस्लामच्या शिकवणीविरुद्ध आहेत ! तुम्ही फक्त काल्पनिक बेजबाबदार दावे करण्याऐवजी जरी थोडासा आंतरजाल अभ्यास केलात (पोत्याने माहिती आहे तेथे) तरी तुमच्या चर्चेला थोडातरी विश्वासूपणा यायला मदत होईल आणि मिपासारख्या सार्वजनिक चौकात तुम्ही जी आयडी घेतलीत तिच्या नावाची लज्जा थोsssडितरी वाचू शकेल. बाकी लोकांचे मनोरंजन हाच हेतू असल्यास... लगे रहो ;)
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Sun, 01/19/2014 - 10:42 नवीन
हायला. ही तर टॉपगियर्ड थाप जाली की व वंगाळशेट ! ह्येन्ला आवरा आता नायतर ह्ये असल इस्लामविरुद्द लिवलं म्हनुन त्येच्या नावं फतवा निगुन गियर मोडित निगायचा. ल्येका, ल्येका, ल्येका, चारचौगात किति खोट ब्वोलून आपली इज्जत चौकात उघडि कराय्याची ? बाकी लोकबी कयबाय वाच्त्यात, त्येन्ला डोस्क अस्तया. त्येंच्यापुडं आप्ल रिकाम खोकं अस उगड नाय करायच प्वोरा. लोकं खो खो हसत्यात बाबा.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 01/19/2014 - 07:35 नवीन
वेगळे आहे, आणि आता ते जगातील बर्‍याच फायनॅन्स सेंटरांत मूळ धरू लागले आहे (प्रचंड प्रमाणात पैसा इस्लामी जगात, मध्यपूर्वेत उपलब्ध असल्याने, त्यांच्यामागे धावणे जगाला जरूरी आहे आता!) ह्याच चर्चेत वर बॅटमॅन व आदूबाळ ह्यांनी ह्याविषयी माहिती दिलेली आहे ती पहावी. टॉफ्या खाऊ नयेत, प्रकृतिस अपायकारक असते :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/19/2014 - 15:26 नवीन
>>> बहुतांश मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत.. व्याज खाणे हे देखिल पवित्र कुराणाने वर्ज्य सांगितले आहे, त्यामुळे बहुतांश मुस्लिम बांधव व्याज बँकेला परत करतात असे मी पाहिले आहे. जबरदस्त खोटे वाक्य!
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 01/17/2014 - 09:52 नवीन
कुठल्याही समाजाच्या सणांवर, धार्मिक गोष्टींवर थोडाफार खर्च केला सरकारने तर बिघडले कुठे? तसे तर सरकार कुंभमेळ्या वरतीही करोडो रुपये खर्च करते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/17/2014 - 09:59 नवीन
अर्थात "पंढरपुरच्या मंदीरातुन कमाई करा आणि हज यात्रेला सबसीडी द्या " असंच तुम्हाला म्हणायचे आहे तर ?
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 01/17/2014 - 10:07 नवीन
पंढरपुरच्या मंदीरातुन कमाई करा नि कुंभ मेळ्यावर खर्च करा असेही होवू शकते
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/17/2014 - 10:44 नवीन
मग ते करायला सरकार कशाला हवे ? मंदीर विहिंपच्या किंव्वा संघाच्या ताब्यात द्यायले हवे होते मग !
  • Log in or register to post comments
स
सचीन Sun, 01/19/2014 - 16:49 नवीन
त्यापेक्षा बडवे परवडले
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 01/19/2014 - 18:19 नवीन
म्हणुन तर आम्ही म्हणतोय की हा निर्णय चुकीचाच आहे ... हिंदुंची मंदीरे हिंदुंच्य्याच ताब्यात !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा